Public Program Dhule (India)

1972-0409 Public Program Note: 1) Please note that the brackets present in this transcript represents:   a) […] = Unclear text/Missing audio   b) [अबकड/अबकड] = Best guesses text1/text2 (text not confirmed)  c) (abcd/अबकड) = Additional explanatory text खरोखर म्हणजे राजकुंवर राऊळ सारखी बाई या धुळ्यात आहे, हे या धुळ्याचे मोठं भाग्य आहे. तिच्या प्रेमाच्या आकर्षणाने मी इथे आले. मी तिला म्हटलं होतं एकदा धुळ्यात अवश्य येईन. आणि या ठिकाणी किती भक्तिभाव आणि किती प्रेम आहे, त्याची सुद्धा मला आतून जाणीव होत आहे. धर्माबद्दल आपल्या देशामध्ये, आदिकालापासनं सगळ्यांनी पुष्कळ लिहून ठेवलेलं आहे आणि चर्चा पुष्कळ झाल्या. मंदिरात सुद्धा आता घंटी वगैरे वाजत आहेत, चर्चमध्ये सुद्धा लोक जातात, मस्जिदीत जातात, धर्माच्या नावावर आपल्या देशामध्ये पुष्कळ कार्य झालेलं आहे. पण जे वास्तविक कार्य आहे, ते कुठंही झालेलं दिसत नाही. देवळात जातो आपण सगळं काही व्यवस्थित करतो, पूजा-पाठ सगळं व्यवस्थित करतो, घरी येतो, पण तरी सुद्धा असं वाटत नाही, की काही आपण मिळवलं आहे. आतली जी शांतता आहे, आतलं जे प्रेम आहे, आतला जो आनंद आहे, तो कधी सुद्धा मिळत नाही. कितीही केलं, तरीसुद्धा असं वाटत नाही, की आपण देवाच्या जवळ गेलो आहोत. किंवा आपल्याला ही माऊली मिळाली आहे, की जिच्या मांडीवर आपण डोकं ठेवून आरामाने म्हणू शकतो, की आता आम्हाला काही करायचं नाही.  माझं असं म्हणणं  नाही, की देवळात माणसाने जाऊ नये. जावं, अवश्य जावं. […] मधाची ओळख पटवण्यासाठी पहिल्यांदा फुलाच्या गोष्टी करू, तर बरं होईल. म्हणून त्यांनी साकार देव काढले ते [सांगण्यासाठीच/चांगल्यासाठीच], म्हणजे फुलांची नावे सांगितली. विष्णू पासून ते शिवापर्यंत, तसचं मुसलमानांमध्ये अली पासून वलीपर्यंत, ख्रिश्चन लोकांमध्ये ख्रिस्तापासून त्याच्या आईपर्यंत, सगळ्यांची वंशावळ झाली. Read More …