Guru Purnima, Sahaja Yoga a New Discovery Mumbai (India)

Guru Purnima Puja. Mumbay (India), 1 June 1972. Translation from Hindi to Marathi सहजयोगाचा एक अभिनव असा आविष्कार होत आहे. जे सत्य आहे जे ‘आहेच’ त्याचा आविष्कार कसा होतो हे समजून घ्या. कोलंबस हिंदुस्थान शोधायला बाहेर पडला. तेव्हाही हिंदुस्थान होताच; नसला तर शोध कशाचा घ्यायचा? तसेच सहजयोग होताच, पण त्याचा अनुभव आता तुम्हाला घ्यायचा आहे, काही जणांना मिळालाही आहे. सहजयोग हा त्या परमतत्त्वाकडे जाण्याचा एक मार्ग आहे; एक व्यवस्था आहे; एक प्रणाली आहे; मानवजातीला उन्नत स्थितीवर येण्यासाठी जीवनाला नवीन दिशा देण्यासाठी ही एक व्यवस्था आहे. ज्यामध्ये मानव या विश्वव्यापी चैतन्याची ओळख करून घेऊ शकेल आणि ते परमचैतन्य आत्मसात करू शकेल. याच परमतत्त्वाकडून सारी सृष्टी चालवली जात आहे व त्याच्यातूनच मानव जन्माला आला आहे. फार प्राचीन कालापासून याचा शोध चालत आला आहे. त्याच्याबद्दल बरेच काही लिहिले गेले आहे; प्रेम, पैसा, सत्ता अशा विविध क्षेत्रांमध्ये मानवाचा हा शोध चलत आला आहे. तरीही मानव अजून स्वतःला नीट ओळखू शकला नाही. तसे पाहिले तर हा एक आनंदाचा शोध आहे. पण मग कुणी संपत्ती मिळाली की आनंद मिळेल असे समजून पैशाच्या मागे लागले, पण त्याचबरोबर ज्यांनी अमाप संपत्ती मिळवली त्यांनाही दुःखापासून सुटका मिळाली नाही; काही लोकांनी तर या निराशेपोटी आत्महत्या करून घेतली. असे करता करता कुठेच आनंद मिळाला नाही म्हणून लोक धर्माच्या मागे लागले. धर्माच्या पाठीमागे लागल्यावरही त्यांचे चित्त बाहेरच्या गोष्टींमधेच अडकून राहिले आणि त्यांना खरी ‘स्व’ (स्वतःची) ओळख झाली नाही. हे असे का होते? कारण माणूस खऱ्या स्व बद्दल अपरिचीत असतो आणि त्यामुळे त्या ‘स्व’ चे वैभव, ऐश्वर्य, महानता, प्रेम हे त्याच्या लक्षातच येत नाही. त्या अवर्णनीय आनंदाला तो पारखाच राहतो. मानव स्वतःच आनंदस्वरूप Read More …