Talk Pune (India)

TALK IN MARATHI-PUNE-1973-0916 जगातल्या पाठीवर कुठंही चर्चिला गेलेला नाही जितका आपल्याभारात वर्षात झालेला आहे कारण हिंदुस्थान ज्याला आपण पूर्वी भारतवर्ष म्हणत होतो ,हिच एक योग भूमी आहे. बाकी सगळ्या भोग भूमी आहेत . हि एक यॊग भोमि आहे म्हणून इथे फार मोठ मोठ्या प्रवृत्तीने म्हंटलं पाहिजे किंवा देवांनी अवतार घेतलेले आहेत आणि ह्या भूमीतच ह्या विषयवर हजारो वर्षांपासून म्हणजे कृष्णाला जर ६ हजार वर्षे झाली असतील तर रामाला जवळ जवळ ११ हजार तरी वर्ष झाली असतील आणि त्याच्या आधी कितीतरी आधी पासुन हजारो वर्षांपूर्वी वेदात वैगरे, इतिहासकारांना कदचित त्यांना पटायचे नाही माझे म्हणणे पण हझारोवर्षांपासून ह्या भारत वर्षामध्ये तपस्वी मुनींनी जे दृष्टा होते त्यांनी आत्मसाक्षत्कारावर पुष्कळ काम केलेले आहे पण आज काळ त्यांच्याबद्दल वाचतेय कोण , त्यांच्या बदल जाणतय कोण ,आपण हिंदू हिंदू म्हणून लोक फार गर्वाने फिरतात आणि मी बघते कि प्रत्येक गोष्टींमधय उठलं कि आम्ही हिंदू आहोत ,म्हणजे आम्ही काही विशेष आहोत असे सुद्धा पुष्कळ लोकं स्वतःला समजतात,पण ज्या आदिशंकराचार्यांनी ज्यांनी हिंदू धर्माची स्थापना वैगरे ज्यांनी केलेली आहे , त्यांनी जे तत्त्व या संसारात मांडलेले आहे,त्यांनी जी चैतन्यावर कामं करून त्याचं निरूपण केले आहे त्याबद्दल फार छाती ठोकपणे साऱ्या संसारा समोर इतक्या मोठ्यापणे सत्य मांडलेलं आहे , ते कोण जाणताय ? त्याच्याबद्दल कोणाला माहिती नाही.फक्त ब्राह्मण हा पूजेला पाहिजे अशा रीतीने आपल्या बद्दल एक कल्पना डोक्यावर चालवली आहे पण ब्राह्मण म्हणजे कोण ? हे सुध्दा जे त्यांनी सांगितलेलं आहे , ब्राम्हण तो कोण ज्याचा दुसरांदा जन्म झालेला आहे. आणी तेच कृष्णांनी सांगितले आहे तेच सगळ्या मोठ्या लोकांनी सांगितलेले आहे ,म्हणजे महंमद साहेबांनी सुद्धा तेच सांगितलेले आहे, आपले साईबाबा Read More …