Public Program Akurdi (India)

1980-01-11 Program at Akurdi, Pune आता आपण परम पूज्य माताजींनी पुणे जवळी चिंचवड येथे आकुर्डी गावी केलेला उपदेश ऐका.  हा उपदेश दिनांक ११ जानेवरी १९८० रोजी केला होता. मी आता काय बोलणार आहे हेच माझ्या लक्षात येत नव्हतं. कारण हे सारं प्रेमाचं कार्य आहे. परमेश्वराचं  मानवावर अत्यंत प्रेम आहे. इतकं कोणत्याही वस्तूवर नाही. सृष्टी सबंध निर्माण केल्यावर , सर्व सृष्टीला आपल्या शक्तीच्या जोरावर पूर्णपणे  सुसज्ज  केल्यावर त्यांनी मनुष्याची निर्मिती केली. फार मेहनत घेऊन ही निर्मिती केलेली आहे, आणि ह्या मानवाच्या हातातून , काही तरी विशेष घडणार आहे, एक लहानसा अमीबा आज मानव स्थितीला पोहचला तो कशासाठी? ह्या दिव्याची तयारी हजारो वर्षांनी परमेश्वराने केली आहे.  अनेक वेळेला अवतरणं ह्या संसारात  आली.  त्यांनी हे महान कार्य करून मानव निर्माण केला. त्या नंतर धर्माची सुद्धा स्थापना केली. मानवामध्ये धर्म स्थापन करून त्याला पूर्ण पणे स्वतंत्रता देण्यात आलेली आहे. वाटलं तर त्याने अधर्मात जावं, वाटलं तर त्याने धर्मात राहावं. माणसाला त्याची बुद्धी वापरण्याची पूर्ण मुभा आहे. हे एवढ्यासाठी, की जेव्हां त्याला परमेश्वराच्या साम्राज्यात प्रवेश मिळणार त्या वेळी तो स्वतंत्र असला पाहिजे. आपल्या स्वतंत्रेत त्याने धर्म स्वीकारला पाहिजे. जबरदस्तीने नाही. धर्म हा हितकारी आहे, मंगलमय आहे हे त्याने आपल्या स्वतंत्रेत जाणलं पाहिजे. चुका होतील, उलट मार्गाला सुद्धा जातील, पण शेवटी त्यांनी स्वतःच्या धर्मात बसलं पाहिजे. अशा स्थितीमध्ये आज हा सहज योग, महायोग्याच्या पूर्ण (अस्पष्ट) जन्माला आलेला आहे. महायोग म्हणजे, आता आम्ही मुंबईहून आलो पुण्याला. पुण्याहून, ह्यांनी सांगितलं आकुर्डीला जायचंय माताजी, तरी योग घडला नव्हता, थोडा आराम केला, अजून योग घडला नाही, माझी मुलं वाट बघत बसली आहेत, अजून आम्हाला त्यांचं दर्शन झालेलं नाही. तो पर्यंत योग Read More …