Shivaji School, Vishesh goshti sathi vel aali aahe

Rahuri (India)

1982-02-03 Vishesh Goshti Sathi Vel Aali Aahe Rahuri Source NITL HD, 45'
Download video - mkv format (standard quality): Watch on Youtube: Watch and download video - mp4 format on Vimeo: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Vishesh Goshti Sathi Vel Aali Aahe 3rd February 1982 Date : Place Rahuri Public Program

[Marathi Transcript]

ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK परमेश्वराच्या अनेक कृपा आपल्यावर होतात. माणसावरती अनेक त्याच्या कृपा होतात. त्याच्या आशीर्वादाने अनेक उत्तम आणि उत्तम असं जीवन त्याला मिळतं, पण मनुष्य मात्र परमेश्वराला प्रत्येक क्षणी विसरत असतो. परमेश्वराने साक्षात ही सर्व पृथ्वी आपल्यासाठी निर्माण केलेली आहे आणि ती पृथ्वी निर्माण करून त्याच्यामध्ये विशेष रूपाने एक स्थान बनवलं आहे, ज्याच्यामुळे ती फार सूर्याच्या जवळ नाही, चंद्रापासून तितकी दर आहे जितकी तिला रहायला पाहिजे. आणि त्या पृथ्वीमध्ये हे जीवजंतू तयार करून आज ते सुंदर दूर कार्य मनुष्य निर्मितीमध्ये फलद्रूप झालेले आहे, म्हणजे आता तुम्ही मानव झालात. आता मानव स्थितीत आल्यावर आपण परमेश्वराला विसरून जावं हे बरोबर नाही. ज्या परमेश्वराने आपल्याला इतकं ऐश्वर्य, सुख आणि शांती दिलेली आहे त्या परमेश्वराला लोक फार लवकर विसरतात, पण ज्या लोकांना परमेश्वराने एवढा आराम दिलेला नाही, जे अजून दारिद्रियात आहेत, दु:खात आहेत, आजारी आहेत, त्रासात आहेत ते मात्र परमेश्वराची आठवण करत राहतात. पण ज्या लोकांना परमेश्वराने दिलेले आहे ते मात्र त्याला विसरून जातात. ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. ज्यांना आशीर्वाद दिला ते मात्र परमेश्वराला साफ विसरून जातात आणि ज्यांना दिला नाही ते मात्र त्याची आठवण काढत राहतात. मग त्याची आठवण केल्यावर, त्यांनाही आशीर्वाद मिळाल्यावर ते ही विसरून जातील. मानवाचं असं विचित्र डोकं आहे की त्याला काहीही दिलेलं झेपतच नाही. म्हणून हे आपण समजलं पाहिजे की सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर आपण बसून मोजत बसलो की परमेश्वराने सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला किती तऱ्हेने आशीर्वादित केलेले आहे तर आपल्याला आश्चर्य वाटेल! आजच माझ्याकडे पुण्यातले पुष्कळ श्रीमंत लोक आले. त्यांच्या घरी किती आजार आहेत, त्या लोकांना किती त्रास आहेत, किती मानसिक त्रास आहेत. कुणाचा मुलगाच दारू पितोय, तर कुणाचा नवराच दारू पितोय, तर कुणाची बायकोच वाया गेलेली आहे अशा रीतीने सर्वांना एवढे प्रश्न आहेत. एखाद्याला आईचरच प्रेम मिळालं नाही, तर एखाद्याला बापाचं प्रेम मिळालं नाही, तर एखाद्याला मुलाचं वागणं पसंत नाही. अशातऱ्हेने अनेक त्यांचे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न आापल्याजवळ नाहीत आज, पण ते प्रश्न उद्या तुमच्याजवळ जास्त पैसा आला किंवा जास्त सत्ता आली तर ते तुमच्यासमोर उभे राहतील. जर तुम्ही हे लक्षात घेतलं की हे सर्व परमेश्वराने आपल्याला का दिलया, ही सर्व सुविधा परमेश्वराने आपल्याला का दिली आहे ? तर मात्र तसं होणार नाही. परमेश्वराने आधी तुमची खाण्या-पिण्याची व्यवस्था केलेली आहे. पूर्वी लोकांनी पुष्कळ जर काही खायचं म्हटलं तरी चार जनावरं मारल्याशिवाय ते खाऊ शकत नसत. जंगलामध्ये जावं लागायचं, एकाच ठिकाणी रहावं लागायचं, किती लोकांना तर निवान्यालासुद्धा एक छत नसायचं. मग तिथे साप, विंचू, वाघ अशारीतीची भयंकर जनावरं असायची. त्यांच्यापासून भीती असायची. त्या ন

Original Transcript : Marathi सर्वांचे निवारण होऊन आज आपण एका सुव्यवस्थित ठिकाणी राहतो आहे. त्याशिवाय ह्या सर्व गोष्टींचे आता परमेश्वराने आपल्याला वरदान दिलेले आहे, टेलिफोन दिलेला आहे, नंतर आपल्याला ऐकायलासुद्धा, पुष्कळांजवळ मी पाहिलेले आहे की तुमच्याजवळ रेडियो वगैरे आहे. पण हे सगळं जरी मिळालं तरी आपण परमेश्वराला जास्तच विसरत चाललो आहोत. परमेश्वराने आपल्याला का दिलं? ज्या माणसाला पहावं त्याला तो घड्याळ लावून फिरतो आणि म्हणतो की आता वेळ नाहीये, फार उशीर झाला, फार उशीर झाला. प्रत्येकाला वेळ नाहीये. आता मी तिथे ब्राह्मणीला गेले होते, तिथे पुष्कळशा बायका उशिराने आल्या. म्हणाल्या, ‘माताजी, आम्ही कामावर गेलो होतो तर आम्हाला वेळ झाला नाही तर, आम्ही येऊ नाही शकलो तर, आत्ताच दर्शन द्या वगैरे वरगैरे.’ तर मी म्हटलं की, ‘एक दिवस नसत्या गेल्या तर काय झालं. आम्ही लंडनहुन आलो एक दिवस तुम्ही जर नसते गेले, तर दोन पैसे तुम्हाला कमी मिळाले असते. काही हरकत नाही. एक दिवस माताजी भेटायला इतक्या लांबून आल्या तर आम्ही त्यांना भेटायला आलो असतो. बरं आम्ही समजा जर निघून गेलो असतो तर तुमची आमची भेटच झाली नसती. पण महत्त्व कशाचं आहे ? तर दोन पैसे आपले बुडाले नाही पाहिजे. ते फार महत्त्वाचे आहे. मग उद्या आजारी पडले तर मात्र इथून लंडनपर्यंतचे तिकीट घेऊन तिथे येतील की आमच्या मुलाला ठीक करा. पण आज तुमच्या दारात आम्ही आलेलो आहोत तर तुम्हाला वेळ नाही. तर हे तुम्हाला परमेश्वराने का दिलं? हे घड्याळात सारखं तुमचं बघणं चालतं की आज वेळ नाही, काल वेळ नव्हता, उद्याही वेळ राहणार नही, मग घड्याळ कशाला बांधता? जर तुमच्या जवळ वेळच रहात नाही तर घड्याळ बांधून तरी उपयोग काय? तर हा जो वेळेसाठी, जो मनुष्याला सारखा त्रास आहे तो एकाच कारणामुळे आहे की त्याला हे माहीत नाही की ही वेळ आपण का शोधत होतो? कोणची वेळ गाठायची आहे ? कोणत्या वेळेसाठी एवढी आपली धडपड चाललेली आहे ? कशासाठी वेळ पाहिजे? इकडून तिकडे वाया दवडण्यासाठी किंवा इकडून दारुच्या गुत्त्यात गेले किंवा घाणेरडी कामं केली, कुणाचे गळे कापले, कुणाचा खून केला अशा घाणेरड्या गोष्टी करण्यासाठी वेळ मिळालेला आहे? काहीतरी विशेष गोष्टीसाठी ही वेळ आलेली आहे. आपल्या भारतात काय किंवा बाहेर कधीही लोकांनी घड्याळं वेळ पाहिला नव्हता. आता हे नवीन सूत्र का निघालं लावून आहे? का? कशाला आपल्याला घड्याळाचं सारखं वाटतं की वेळ गेला बुवा, हा वेळ गेला, तो वेळ गेला असं अशासाठी वाटत आहे ? की आता माणसाला मनन करण्याची वेळ आलेली आहे! स्वत:साठी त्याला वेळ द्यायला पाहिजे. स्वत:बद्दल त्याला समजलं पाहिजे की मी कोण आहे? मी कशाला ह्या जगात आलो? जर माणसाला वेळ मिळाला तर तो काहीतरी भ्रमिष्टासारखं दूसरेच विचार करत बसतो. पण हा जो वेळ मिळवण्याचा सगळ्यांना एक छंद लागलेला आहे तो एवढ्यासाठीच आहे की त्यांनी हा विचार केला पाहिजे की मला काय करायचे आहे? मी कशाला ह्या जगात आलो ? परमेश्वराने मला कशाला आणलेले आहे या जगात? मला एवढ्या योनीतून काढून मानव स्थितीत का आणलेले आहे ? माझ्या जीवनाला काय अर्थ आहे ? हा असा विचार करण्यासाठी आपली ही धडपड आहे की आपण वेळ वाचवला पाहिजे. पण तसं होत नाही. तसं मुळीच होत नाही. जर तुम्हाला कुणाला म्हटलं, ‘मला आजच गेलं पाहिजे मुंबईला, आजच गेलं पाहिजे.’ ‘कशाला आजच गेलं पाहिजे?’ ‘नाही, कसही करून तुम्ही तिकीट काढा. मला आजच गेलं पाहिजे.’ ‘का?’ तर ‘मला सट्टा खेळायचाय.’ जे काही मनुष्य करतो अगदी विपरीत करत असतो. जे त्याला करायचं आहे त्याच्या विपरीत करत 3

Original Transcript : Marathi वेळ असतो. सरळ गोष्टी त्याला समजतच नाही की, बाबारे कशाला एवढा वेळ वाचवतोस? कशासाठी एवढा वाचवतोय? सगळे आपलं आयुष्य तुझं वायाच गेलेले आहे की रे! तुला हे कळलं का की तू ह्या संसारात कशाला आलास? आता तुम्ही कशाला ह्या संसारात आला ? तर परमेश्वराला जाणण्यासाठी ! परमेश्वराने ही सर्व सृष्टी केली, तुम्हाला सगळं काही दिलं, शेवटी एवढ्यासाठी की तुमच्यामध्ये सुजाणता यावी, तुमच्यामध्ये धर्म यावा आणि नंतर तुम्ही त्या धार्मिक स्थितीमध्ये परमेश्वराशी एकात्म व्हा. केवळ या जीवाचा आणि आत्म्याचा संबंध होतो. तुम्ही त्या परम पित्या परमात्म्याच्या साम्राज्यात प्रवेश करावा म्हणूनच परमेश्वराने ही सगळी रचना केलेली आहे आणि तो आतुरतेने तुमची वाट बघतो आहे की हे कधी माझ्याकडे येणार, पण तुम्ही पैसे मिळाले म्हणून इकडे बहकले, सत्ता मिळाली म्हणून तिकडे बहकले, नाहीतर आपल्या मुला-बाळांमध्ये कुठे ना कुठे तरी असं तुमचं चित्त गेलेले आहे आणि तुमच्याजवळ एवढासुद्धा वेळ नाही की तुम्ही दोन मिनिटं परमेश्वराच्याबद्दल विचार कराल . पाश्चिमात्य देशातील लोकांनी सगळे हेच प्रकार केले. रात्रं- दिवस धडपड करून हे कर रे, ते कर रे, पैसे एकत्र कर रे, काय काय त्यांना जे करायचे ते करून शेवटी काय झालं? त्यांच्या मुलांनी आपल्या आई-वडिलांचं घर सोडलं आणि आम्हाला हे पैसे डोक्यावर घेऊन फिरायचे नाही. तुम्ही सांभाळा ते आणि ते लागले आपल्या मार्गाला आणि ते कुठे जाऊन पोहोचले तर त्यांनी हे सगळं तऱ्हेतर्हेचे गांजा-बिंजा घ्यायला सुरुवात केली. आता तुम्हालाही त्या रस्त्याने जायचे असले तर जा. त्याला कोणी काही मना करू शकत नाही कारण तुम्हाला स्वतंत्रता आहे. तुम्ही म्हणाल की आम्हाला नरकात जायचंय तर जा. सरळ जाऊ शकता. पण जर तुम्ही समजलात की, ‘मी कोण आहे? कशासाठी आलो आहे या जगात? मला काय काय करायचे आहे ? आणि माझी काय स्थिती आहे, वस्तुस्थिती काय आहे ?’ हे जर तुमच्या लक्षात आलं तर मात्र तुम्ही अधोगतीला न जाता सहजयोगाकडे याल. यालाही एक फाटा आहे, त्या फाट्याने, आपल्या एका लहानशा मा्गानिच तुम्ही आपल्या आत्म्यापर्यंत पोहोचू शकता. हे आत्म्याला ठाऊक आहे की तुमचा रस्ता कुठे आहे. तुम्ही कुठे चालला आहात. पण अजून तुमच्या चित्तात तो आत्मा आलेला नाही. तुमच्या चित्तात तो आत्मा आला, चित्तात म्हणजे, आता तुमचं माझ्याकडे चित्त आहे, तुमचं माझ्याकडे लक्ष आहे. तुम्ही बघता मी उभी आहे, माझे बोलणं ऐकता, सगळे काही तुम्हाला माहिती आहे की माताजी ह्या आमच्यासमोर बोलत आहेत. पण मी म्हटलं की, ‘आता तुमचं चित्त तुम्ही आपल्या आत्म्याकडे लावा किंवा परमेश्वराकडे लावा.’ तर ‘कसं लावायचं माताजी? मोठं कठीण काम दिसतयं ! असं कसं न्यायचं. आतमध्ये चित्त न्यायचं तरी कसं? कारण चित्त तर आमचे बाहेरच पसरलेले आहे. जे जातय बाहेर तेच चित्त आहे. तेव्हा आतमध्ये ते कसं घेऊन जायचं. आमच्या हृदयात जर आत्मा आहे तर आम्ही हदयाकडे कसं चित्त न्यायचं !’ म्हणूनच परमेश्वराने एक युक्ती योजलेली आहे की तुमच्यामध्येच एक कुंडलिनी नावाची शक्ती, जी तुम्हाला अंकुरते, अशी शक्ती त्याने त्रिकोणाकार अस्थीमध्ये ठेवलेली आहे. जेव्हा ही कुंडलिनी शक्ती तुमच्यामध्ये जागृत होते तेव्हा एक घटना घडते. समजा आम्ही इथे उभे आहोत आणि वरून काही पडलं तर सगळ्यांचं लक्ष तिकडे जाईल की नाही! आणि आपलं तर चित्त इतकं चलायमान आहे की एक मनुष्य इकडून तिकडे गेला तरी आपलं लक्ष तिकडे जातं. तेव्हा अशी जेव्हा घटना आतमध्ये होते तर आपलं चित्त आतमध्ये आकर्षिलं जातं आणि हे 4

Original Transcript : Marathi चलबिचल करणारं मन जे आहे ते आतमध्ये ओढलं जातं. ते जेव्हा आतमध्ये ओढलं जातं तेव्हा आपल्याला काही आतमध्ये चित्त न्यावे लागत नाही. आपल्याला असं वाटतं की आपोआपच काहीतरी झालंय आणि आपलं चित्त आतमध्ये चाललेले आहे. तेव्हा ही कुंडलिनी जागृत होऊन आणि सहा चक्रांतून निघून, ह्या सूक्ष्म चक्रांतून निघून ह्या ब्रह्मरंध्राला भेदते. जेव्हा ती ब्रह्मरंध्राला भेदते इथे त्यावेळेला तुम्ही जसं या मशीनचं कनेक्शन लागलेले आहे ‘मेन’ शी तसं तुमचंही कनेक्शन परमेश्वराशी होते. म्हणजे समजा हीच कुंडलिनी आहे. ह्या वस्तूला काहीच अर्थ येणार नाही जर ह्याचं कनेक्शन लागलं नाही तर. कोणत्याही मानवालासुद्धा काहीही अर्थ नाही आहे जोपर्यंत त्याचे परमात्म्याशी तादात्म्य झालेले नाही. हे झालंच पाहिजे. घडलेच पाहिजे. जर हे झालं नाही तर ह्या मनुष्याच्या आयुष्याला काहीही अर्थ नाही. तो निरर्थक आहे. तो जन्माला येतो काय आणि मरतो काय, काहीही फरक नाही. जनावरांना तरी आहे अर्थ कारण त्यांना मनुष्य व्हायचे आहे. जनावरं येतात आणि मरतात तर त्यांना काही अर्थ आहे कारण नंतर त्यांना मनुष्य व्हायचे आहे. पण जर मनुष्याला देवपण घ्यायचं नसलं आणि त्याला जर आत्म्याशी संबंध जोडायचा नसला तर तो कामातून गेला. कारण आता पुढे तो काय करणार? तेव्हा तुम्ही आपल्या आत्म्याला ओळखलं पाहिजे आणि आत्म्यामध्ये लीन झाले पाहिजे. पण ते व्हायचं कसं? परत ‘माताजी कसं होणार?’ मी परत म्हणतेय ही कुंडलिनी शक्ती तुमच्यात जागृत होते. मग ही कशी जागृत होते ? जसं एखाद्या बी ला तुम्ही मातेच्या उदरात घातलं म्हणजे ते कसं आपोआप अंकुरतं तसं आपोआप सहजच ही कुंडलिनी तुमच्यामध्ये जागृत होते, पण त्याला जागृत करणारा कुणीतरी अधिकारी पुरुष लागतो. अधिकार परमेश्वरापासून, परमेश्वराच्या प्रेमापासून आलेला पाहिजे. पोटभरू लोकांना हे कार्य जमणार नाही. नुसते वितंडवाद करणार्या लोकांना हे जमणार नाही. ही एक शक्ती आहे, ज्याच्यामध्ये ही शक्ती असते त्या शक्तीमुळेच तुमची कुंडलिनी जागृत होते. म्हणजे जसा एक दिवा पेटलेला असेल तोच दुसरा दिवा पेटवू शकतो. जेव्हा माणसं आपल्याला असं समजतात की आम्ही म्हणजे काहीतरी मोठे आहोत. आम्ही मोठे सायंटिस्ट आहोत किंवा अमुक आहोत, तमुक आहोत तर ते नुसते मानव स्थितीत आहेत फक्त. त्यांचा काहीही उपयोग परमेश्वराला होत नाही. जेव्हा तुमचा संबंध आत्म्याशी होतो तेव्हा तुमच्यातून ही ब्रह्मशक्ती वाहून पसरलेली आहे. ती सगळीकडे वातावरणात असते, तिच्याचमुळे सर्व फुलांची फळं होतात. त्याच्यामुळेच बी अंकुरते. त्याच्यामुळेच सर्व जिवंत क्रिया होतात. तुमचाही जन्म त्याच्याचमुळे झालेला आहे. त्या शक्तीची येते. ही ब्रह्मशक्ती चहुकडे तुमच्या हाताला जाणीव होते, परत मी म्हणते त्याची जाणीव होते. जाणीव म्हणजे जशी तुम्हाला गरम आणि थंडची जाणीव होते तशीच तुम्हाला या चैतन्य लहरींची जाणीव होते आणि तुमच्या हातामध्ये अशा थंड थंड लहरी येऊ लागतात. ही ओळख पुष्कळ वर्षापूर्वी मार्कडेय स्वामींनी सांगितली, त्याच्यानंतर आदि शंकराचार्यांनी सांगितली , ख्रिस्तांनी सांगितली , मोहम्मद साहेबांनी सांगितली, सगळ्यांनी सांगितलेली आहे. तरीसुद्धा तुम्हाला जोपर्यंत झालेली नाही तोपर्यंत माझ्या लेक्चरला काहीच अर्थ नाही. तेव्हा हे घटित झाले पाहिजे, तुमची जागृती झाली पाहिजे. तुम्हाला हे मिळालं पाहिजे. हीच माझी एक परम इच्छा आहे. म्हणूनच मी तुमच्यासाठी इतक्या लांबून इथे आलेली आहे. ते मिळवून घ्या. तुमचं जे आहे ते तुमच्यापाशीच आहे, ते तुमच्याजवळच आहे आणि ते फक्त तुम्हाला द्यायचे आहे, ते तुम्ही सहजच सगळं घेऊन परत त्याची वाढ करून घ्या कारण अंकुरतांना मात्र अंकुर 5

Original Transcript : Marathi फार सोप्या तऱहेने बाहेर पडतं, पण नंतर त्या लहानशा रोपट्याची फार काळजी घ्यावी लागते. म्हणून तुम्हालाही स्वत:ची फार काळजी घ्यावी लागेल. म्हणून पार झाल्यावरसुद्धा जरी बरं वाटलं तरीसुद्धा तुम्ही जाऊन इथल्या सेंटरवर पूर्णपणे ह्याची जी काही माहिती आहे ती घेऊन त्याप्रमाणे वागून आपले वृक्ष वाढवून घ्यावेत. ह्याच्यामुळे मनुष्याची शारीरिक, मानसिक व बौद्धिक स्थिती चांगली होते. सगळ्यात मुख्य म्हणजे त्याची धार्मिक प्रवृत्ती बरोबर होते. त्याला हे समजतं की हा खोटा आहे की खरा आहे. हा गुरू वाईट आहे की चांगला आहे. हे त्याला समजतं. आता परवा उसळवाडीला एके ठिकाणी मी गेले होते, तीन-चार वर्षापूर्वी, तर मला तिथे फार बरं वाटलं आणखीन व्हायब्रेशन्स आले म्हणजे थंड लहरी आल्या. तर मी विचारलं की, ‘इथे थंड लहरी कशा येतात?’ त्यांनी सांगितलं की, ‘इथे एक स्थान आहे म्हसोबाचं!’ मी जाऊन बघितलं. म्हटलं, ‘हे तर अगदी जागृत स्थान आहे इथून केवढ्या अशा थंड-थंड लहरी येतात.’ पण जर तुम्ही पार नसले तर तुम्हाला हा दगड काय किंवा तो दगड काय! दगडामध्ये काही फरक कळणार आहे का? तेव्हा ही जाणीव तुमच्यामध्ये झाली पाहिजे. ती जाणीव होताच तुमच्यामध्ये आनंदाचं साम्राज्य येतं आणि तुम्हाला सर्व परमेश्वरी शक्त्या हळूहळू कळू लागतात. तेव्हा आज हा दिवस आलेला आहे की परमेश्वरी शक्ती तुम्हाला मिळाली पाहिजे आणि माझेही राहरीवर विशेष प्रेम आहे, म्हणून मी अनेकदा येते. तर कृपा करून तुम्ही लोक आता आपली कुंडलिनी जागृत करून घ्या आणि त्याच्यानंतर इतरांची पण कुंडलिनी अशीच जागृत करून घ्या.