Shri Mahakali Puja

(India)

Feedback
Share

Shri Mahakali Puja, Lonawala, Maharashtra (India), 19 December 1982.

[Marathi Transcript]

ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK आता मराठीत सांगते थोडसं. इंग्लिश भाषेचा असा दोष आहे, की त्यांच्याविरूद्ध काही सांगायचं असलं तर ते तुम्हालाही कळेल. पण मराठी भाषेचा हा फायदा आहे, की मराठी भाषेत तुमच्याविरूद्ध काही बोलायचं असेल तर ते त्यांना कळणार नाही. हा तुमचा फायदा आहे! म्हणजे ते गुप्त राहतं सगळं. तुम्ही जे धंदे करता ते सगळे गुप्त असतात. हा तुम्हाला मराठी भाषेचा फार मोठा फायदा आहे आणि त्यामुळे माताजींनासुद्धा कळत नाही, असं जे लोकांना वाटतं, तर मला मराठी भाषा कळते आणि हिंदीही कळते आणि त्याहन भुतांची भाषा फार चांगली कळते. तेव्हा आज जे महाकालीच मी सांगितलं, तिकडे लक्ष दिलं पाहिजे, की महाकालीकडे लक्ष असायला पाहिजे आणि आपल्यामध्ये जे दोष आहेत ते काढायच्या मागे असलं पाहिजे. आता प्रथम आपल्याला जे प्रकार होतात, ते मी आधीच सांगितलंच की, ‘माझ्या मुलाला बघा.’ ‘काय झालं तुमच्या मुलाला? ‘काही नाही. फक्त लहानपणापासून बिछान्यातच असतो. हातपाय त्याचे मोडलेले आहेत. डोकं फिरलेल आहे. काही खात नाही. पित नाही. कंबर त्याची वाकत नाही. फक्त एवढं एकदा माताजी, तुम्ही पाय तिथे लावलेत तर बरं होईल.’ फक्त पूर्वकर्म बोलताहेत. ती मी कुठवर एवढं झालं. आता हे कशामुळे झालेलं आहे. सांगायला नको. ही तुमची जिंकणार. किती खाणार आहे? असा जीव आहे, त्याला वाचवून तरी काय करायचं? त्याला क्षमा करते, की त्याला परत जन्म घेऊ देत . समजलं पाहिजे. त्याच्यावरही कृपा करा, स्वत:वरही करा आणि माझ्यावर विशेषतः. पण तुमचे पाय माताजी घरी लागू द्या. तुम्हाला समजतं ना हे सगळं की माताजी अमुक आहेत. तुम्हाला सांगावं लागत नाही. ‘पाच मिनिटं तरी, बरं दोनच मिनिटं. बर एकच मिनिट. ‘ आणि त्या घरात गेलं, म्हणजे सात मजले चढून जावं लागणार. लिफ्टच आऊट आहे. असं का, आता रगडा मला तिथे. मग रगडायचं. आता ते सगळं झालं, आम्ही केलं पुष्कळ. रगडलं आपल्याला तुमच्यासाठी. जे म्हटलं ते केलं. ह्याला बघ रे, त्याला बघ रे, मावशीला बघ रे, अमक्याला बघ रे, सगळ्यांना बघून टाकलं. आता मी कोणाला बघणार नाही. तुमची असेल मावशी तर तुम्ही बघा. माझी ती मावशी नाही. कळलं कां! स्पष्ट मी सांगते. आता मला कोणी सांगायचं नाही, की माझ्या ह्याचं हे बघ, माझ्या त्याचंे ते बघ. कृपा करा आता माझ्यावर. फार झालं. दूसरं म्हणजे आपल्या घरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आणू नका माझ्यासमोर. त्याने मला अगदी कंटाळा आला आहे. सहजयोगावरती लक्ष द्यायला पाहिजे. सहजयोग आम्ही कसा वाढवणार? सहजयोगासाठी काय करायला पाहिजे, सेंटर कसं वाढवलं पाहिजे? आमच्यात काय चुकतं? का लोक आमच्याकडे येत नाही? आमच्यामध्ये कोणती वाईट गोष्ट आहे? हे स्वत: बसून ठरवायचं. बाता मारायच्या नाहीत. बसून विचार करायचा, आमच्यात काय खराबी आहे ? आम्ही सहजयोगात काय खराब करतो ? आमच्यात का जमत नाही? पूजेला कमीत कमी 10

Original Transcript : Marathi पंधरा भुतं तुम्ही जमा नाही केली, तर तुम्ही पट्टीचे मुंबईकर नाही. पण जर पुण्याला गेलं तर कमीत कमी एकवीस तरी असायला पाहिजेत. कारण पुण्याला तर महाभुतं असलीच पाहिजेत. ती आणून पूजेला बसवली नाही आणि माताजींना त्रास दिला नाही तर पुणेकर कसले! पेशवाई न ती, मग मातारजींनी सहन केलंच पाहिजे. मग आणून बसवायचे. अहो, पूजेला निदान बघा तरी कोण येतंया, कोण येत नाही ते. वाट्टेल ते आणून पूजेला बसवायचे. हे अगदी विशेष आहे. ‘माताजी, पूजेला येऊ का? म्हणजे सगळ्यांना माहिती आहे नां माताजी असं आहे. आम्ही येऊन बसतो नां पूजेला.’ पण अधिकार आहे का त्यांना पूजेला बसण्याचा, हे तुम्ही पाहिले पाहिजे. पण इकडे उलट आहे. इकडे मला सांगावं लागतं की मी अमूक आहे. ‘मी आदिशक्ती आहे,’ हे आधी सांगावं लागतं. तुम्हाला सांगावं लागत नाही. माहिती आहे तुम्हाला. मग, जेवढा फायदा घेता येईल तेवढा घेतला पाहिजे. जितकी भुतं आहेत तितकी आणा. गंगेत सगळी घाण घातली तर गंगा ती धुवून काढणारच. पण घाण घातलीच पाहिजे का? कधीतरी असा ही विचार करीत जा, की आम्ही माताजींच्या ह्याच्यात नेहमी अशा लोकांना घेऊन जातो. काही शुद्ध लोक भेटले तर बरंय! ह्या भुतांच्या ह्याने काय काम होणार आहे, मला त्रास देण्यापलीकडे. तेव्हा ही भुतं तुम्ही सांभाळून फक्त जे शुद्ध आहेत त्यांना तुम्ही पूजेला आणलं पाहिजे. आतापर्यंत मी सगळें सहन करून घेतलं , पण आता ह्याच्यापुढे करणार नाही. जर तुम्ही भुतं घेऊन आले तर तुमच्या घरी दहा भुतं बसवीन. स्पष्ट सांगते. एक नाही, दहा. मला बसवणं कठीण नाही आहे त्यांना आणि तिथे पर्मनंटली बसवून ठेवीन. मी हसून सांगते. पण खरं सांगते मला फार त्रास होतो ह्या गोष्टीचा! हे महाकालीचं स्वरुप जे आहे ते अत्यंत प्रेमळ आहे आणि तुम्हाला रक्षक आहे. इतकेच नाही तर तुमची सगळी काही जी इच्छा आहे ती पूर्ण करायला समर्थ आहे. पण अशा फालतूच्या इच्छा तुम्ही जर घेऊन आलात, किती आम्हाला कर्दन करायचं आहे आणि संहार करायचा आहे. आम्ही काय करायचं? तुम्ही मुलं म्हणून आम्ही किती सहन करायचं? ह्या मूर्खपणाच्या गोष्टी आहेत. दूसरं म्हणजे, हे तर झालं भुतांच्या बाबतीत. भयंकर अॅटॅचमेंट, अगदी आमचे प्रधान म्हणतात ना की फॅटर्निटी असते. एकाला भूत असलं की बरोबर तो दुसर्या भुताला चिकटतो. अगदी बरोबर, ओळखायचं म्हणजे तरी काय की ह्यांच्यात भुतं आहेत कां? दहा भुतं एकत्र मिळाली की समजायचं की दहाच्या दहा भुतं , एकमेकाला चिकटली. चिकटणारच. कारण भूत भूतालाच चिकटतं. अगदी स्टँप आहे त्याचा. हे कृपा करून लक्षात ठेवलं पाहिजे. ‘सज्जनांची संगती गाठावी.’ सज्जनांनी स्वत:ला एकत्र बांधून आणखीन एक ग्रुप करून राहायचं आहे आणि भांडायचं नाही. तो ग्रुप एक करून ठेवला मग हळूहळू करून तो ग्रुप वाढवत गेले पाहिजे. म्हणजे तो न्युक्लिअस बनतो. तो न्युक्लिअस असा वाढवत जायचा मग सज्जनांनी जवळ जवळ येत जायचं. भांडकुदळपणा हे लक्षण भुतांचं आहे. क्रोध आदी ह्या गोष्टी भुतांच्या लक्षणाने आहे. तेव्हा क्रोध येऊ द्यायचा नाही. राग येऊ द्यायचा नाही किंवा घाईघाईने लोक काम करतात, अरे हे कर रे, ते कर रे. असं, तसं. म्हणजे मला कळलं, की हे आलं इकडे. दहा भुतं बसली तर मनुष्य करणार तरी काय? एक तऱ्हेचा रूबाब पाहिजे माणसात. काय शिवाजी महाराज नां तुम्ही! म्हणजे शिवाजी महाराजांचे नुसते पुतळेच उभे करतात जिथे तिथे. अहो, तुम्ही शिवाजी महाराज! त्यांचा रूबाब काय आणि तुमचा रूबाब काय! ते पहा. 11

Original Transcript : Marathi कालच पुण्यात मी सांगितलं , की पंक्तीला फुकट करुन बसतात सहजयोगी म्हणजे कमालच झाली बुवा! अहो, या महाराष्ट्रात आमच्या मेहतराणीला जरी म्हणत असू, ‘ये जेवायला बस.’ तर ती तशी बसायची नाही दहादा तिला निमंत्रण दिल्याशिवाय. हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेले आहे. शिवाजी महाराजांच्या गोष्टी सोडा, माझ्या डोळ्यांनी मी पाहिलं आहे, की आमच्या घरच्या मेहतराणीला जरी म्हणायचं असलं की, ‘बाई तू जेवायला ये.’ तर तशी येणार नाही, तिला निमंत्रण गेलं नाही तर. ‘मला तुम्ही माताजी, आमंत्रण पत्रिका दिली नाही तर मी कशी येऊ ?’ ही पद्धत आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेली आहे. आणि आता चांगले सहजयोगी, सभ्य लोक फुकटखोरी करून सगळी मुलंबाळं घेऊन जेवायला बसतात, हे ऐकून मला वाटलं आता मी काय बोलायचं! म्हणजे कोणती पद्धत ही, कोणती लेव्हल झाली! खाण्याचा म्हणजे आपल्याला भयंकर त्रास आहे. कुठे जेवायला असलं, भोजन असलं, मग भजन असलं म्हणजे चांगलं. जेवणाशिवाय आपण बोलत नाही. म्हणजे काय ड्रकराची जात आहोत की काय! मला समजत नाही. कसे हे या शिवाजीच्या राज्यात जन्माला आले ? हेच मला आधी लक्षात येत नाही. कुठेही खायला मिळालं की धावत जायचं, ही काय पद्धत झाली ! फुकटखोरीला काहीतरी मर्यादा पाहिजे आणि ही फुकटखोरी परमेश्वराला दिसते. आपण फुकटखोरी कुठेही करणार नाही. आता एखाद्याची मोटर चालली, बसून घ्या. ‘कशाला?’ ‘अहो, तेवढेच पैसे वाचतील.’ आणि ते पैसे जाणार कुठे? ते पैसे वाचवून तुम्ही करणार काय? स्वत:च्या इज्जतीने माणसाने रहायला शिकलं पाहिजे. ज्याला स्वत:ची इज्जत नाही तो सहजयोगात काय येणार हो! आणि करणार तरी काय? पहिल्यांदा मनुष्याने इच्छा केली पाहिजे की, ‘आमची इज्जत होईल. आम्ही काहीतरी रूबाबदार होऊ. अशी आम्हाला सुबुद्धीच मिळाली पाहिजे.’ सहजयोगी म्हणजे काय हे फुकटखोर, हे भांडण करणारे, आपापसात नावं ठेवणारे, म्हणजे माझ्या नावाची बदनामी होऊन जाते. तर आज पहिल्यांदा ही इच्छा करायची, पहिल्यांदा, की फुकटखोरी ही सहजयोग्याला शोभत नाही. तुम्हाला फुकट सहजयोग दिला तर त्याचा अर्थ असा नाही, की तुम्ही फुकटखोरी करीत फिरायचं. अहो, उलट होतंय आजकाल. माझ्याच खिशातून पैसे चाललेत. म्हणजे गुरूला पैसे द्यायच्या ऐवजी गुरूच पैसे देत आहेत. ही काय तऱ्हा आहे! तुम्हीच विचार करा, असं चालेल का परमेश्वराला ? त्यांना पटेल का? तुम्हाला सगळे माहिती आहे. सगळं शास्त्र माहिती आहे चांगलेच. शास्त्र काही सांगायला नको. पण त्यात तुम्ही कुठे फिट होता ते बघा. स्वतः आपली कोणती पोझिशन आपण बनवलेली आहे ते बघा. पैशाचा तर फार मोठा त्रास आहे. कुठेही चार पैसे वाचवता आले तर वाचवावे आणि चार घबाड मिळालं तर काय, वा, बिझनेसच आहे सगळा. माताजी, काही बिझनेस करीत नाही हे माहिती आहे ना तुम्हाला आणि तुम्ही सहजयोगात बिझनेस करू नये. मग पुढे मला सांगू नये. मग तुमचाही बिझनेस होईल. हे लक्षात ठेवलं पाहिजे. सहजयोगी सत्यवस्तू आहे, खरेपणा आहे. परमेश्वराचे साम्राज्य आहे, तिथे हे चालायचे नाही. ते काही इंडिया गव्हर्नमेंट नाही. परमेश्वराचं साम्राज्य आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. इंडिया गव्हर्नमेंटमध्ये चालतील तुमचे लाचलूचपत आणि सगळे धंदे. परमेश्वराच्या साम्राज्यात हे चालणार नाही. म्हणून मी सांगते बजावून परत. आज इथे सांगते आहे. लक्षात ठेवा. खबरदार कोणीसुद्धा जर एकही पैसा कमवण्याचा किंवा फुकटखोरीचा प्रयत्न केला ह्याच्यापुढे आणि जर काही त्रास झाला तर मी त्याला जबाबदार नाही. इमानदारीत उतरलं पाहिजे. अहो, 12

Original Transcript : Marathi इमान म्हणजे केवढं होतं पूर्वी. महाराष्ट्रीयनांच इमान म्हणजे कोणी जिंकू शकत नव्हतं. अजूनही सबंध हिन्दुस्थानात गाजलेले आहेत इमानासाठी. फार इमानदार लोकं! गरीब लोक बरे तुम्हाला सांगते. इथल्या मोलकरणी, तुम्ही किल्ल्या द्या, काही हात लावणार नाहीत पैशांना ! पण हे मध्यम स्थितीतले साहेब लोक. हे दुसर्यांच्या दमावर साहेबी करण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार आहेत. फार तर दोन कुडते कमी घाला. काही फरक पडणार नाही. रेशमी नसले तर कॉटनचे घाला. आता तुम्हाला ‘वसुधैव कुटुम्बकम’ करून टाकलं आहे आम्ही. पण उदार चरित नाही. पैशाच्या बाबतीत अगदी कवडीचुंबक. मग पुण्याला तर प्रसिद्धच आहेत म्हणे. आता पुण्यावर फार मोठी जबाबदारी आहे. काल एवढे मोठे, तुमचे सदर्न कमांडचे जनरल साहेब मला म्हणाले, की आम्ही पूण्यभूमीत बसलो आहे. म्हटलं, असं कां? आणि मला म्हणाले, ‘माताजी, तुम्ही ह्याला पूर्यभूमी सारखं म्हणता आणि पुण्याला विशेष पुण्य म्हणता, तर इथेच तुम्ही का नाही वास्तव्य करत आणि इथेच तुम्ही राहून आमची का नाही मदत करत?’ एवढी ते पुण्याची महती गात होते. बिचारे आपले शीख आहेत, पंजाबातून आले. ‘दुरून डोंगर साजरे’, तर आपले पुण्याची महती गात होते. मी आपलं ऐकत होते. भाषणातही महती वगैरे गायली आहे. तेव्हा पूणेवाल्यांवर फारच जबाबदारी आहे. केवढी मी तुमची स्तुती केलेली आहे! मला वाटतं , भरमसाठ स्तुतीमुळेच हे झालेलं आहे बहुदा. बघा एक पत्र लिहिलं होत मी तुम्हाला. ते छापून आलं. त्याचं ट्रान्सलेशन कुलकर्णींना जमेना. मला जमेना, अशी स्तुती मी तुमची केली. तुम्हाला परमेश्वर मानून पूजलं आणि तुम्ही हे काय भिकाऱ्यासारखे उभे आहात. दरिद्री लक्षणं! तेव्हा ह्या स्वरुपातून निघायला पाहिजे. एवढेच एक करा. आपल्या जबाबदारीवर. स्वत: आम्ही इज्जतीची माणसं आहोत. कोण आमच्यावरती खर्च करणार! मग बघा साक्षात् लक्ष्मी तुमचे पाय धुणार. पण म्हणून नाही करायचं. परत तेच. माताजींनी सांगितलं आहे नां , म्हणून आम्ही हे करतोय. लक्ष्मी आमचे पाय नाही धूत. म्हणजे असं पत्र येईल माझ्याजवळ असं दहा पानी. तुम्ही असं म्हणाले , तुम्ही असं म्हणाले, लक्ष्मी आमचे पाय धूत नाही. लक्ष्मीने उलट आम्ही हारलो. आता एकही पैसा नाही. कर्जबाजारी झालो. बायको पळाली, सगळं झालं. अशा भयंकर परिस्थितीत सहजयोग उभा करायचा आहे. झंझावात! त्या झंझावातात सहजयोग्यांच्या रोपाला सांभाळून धरणारे पाहिजेत हो! कुठे गेले ते ? सगळे गेले का शिवाजींच्या बरोबर की पेशवाईतच गेले? संपले. ह्या रोपाला सांभाळून धरणारे लोक उभे करा आणि तुम्ही नाही केले तर मी उभे करीन. आणि मग ते तुमचं ठीक करतील. तुमच्यात ते सगळे असतांनासुद्धा तुम्ही जर ते उभं करणार नाही तर कुठून उभं करू. तर पुणेवाल्यांवर फार जबाबदारी आहे. मुंबईकरांना खूप झाडून ठेवलेले आहे आधीच. त्यांना झाडायला नको आता. पण मुंबईकरांनी हालायला पाहिजे. गणपतीसारखे चिकटून मुंबईत राहतात. हलल्याशिवाय मुंबईकरांचा काही फायदा होणार नाही. हललेच पाहिजे. हलतच नाही मुळी! हललेच पाहिजे. प्रत्येकाने ह्यावेळेला ठरवायचं, मी इथून गेल्यावर प्रत्येक मुंबईकराने महाराष्ट्राच्या सर्व सेंटर्सना भेट दिली पाहिजे. प्रत्येकाने. पैसे आहेत. सेंटरवर गेल्यावर ते काही तुम्हाला भुकं मारणार नाहीत. सुट्टी घेऊन, काहीही करून प्रत्येकाने दोन-चार तरी सेंटर्सना भेट दिली पाहिजे. ‘बरं, माताजींनी आता दोन- चारच म्हटलं नां! मग दोनच घेऊयात.’ मग दोन म्हणजे एक असलं तरी झालं. मग कळव्याला गेलं की झालं. 13

Original Transcript : Marathi कळवा म्हणजे सेंटरच आहे नाही तरी आणि मुंबईच्या बाहेरच आहे नाही का? म्हणजे हद्दीत नाही. मग बघायचे मॅपवर हद्दीत आहे, की बाहेर आहे. बाहेरच आहे मग काय! मग झालं, ‘आम्ही कळव्याला जाऊन आलो माताजी.’ ‘असं कां?’ मग ठाण्याला जाता का आता ? ठाण्याला जा, तिथे बरं राहील तुम्हाला. वटवाघुळं बनून. तिथे पुष्कळ आहेत. ते कसं काय राहील ? काय! उत्तम ! ही व्यवस्था नको सहजयोग्यांची. ती माझी मुलं आहेत. काय करताहात स्वत:बरोबर. लक्ष ठेवा स्वत:कडे. तुम्ही माझी मुलं आहात! तेव्हा वटवाघुळाच्या ह्या स्थितीला जायचं नाही. मुळीच जायचं नाही. तेव्हा सांभाळून रहा. हे सांभाळण्याची वेळ आलेली आहे. आता ह्यांच्याहून जास्त लोक येतील. त्यांना लुबाडायचं म्हणजे काय! तुम्ही काय ठगी करता की काय रस्त्यावर. म्हणजे त्यावेळचे ठग आता महाराष्ट्रात जन्माला आले असतील. तर तसं सांगावं. त्यांनी सगळ्यांनी इथेच जन्म घेतलेला आहे आणि हे ठग सगळे आता बसून ठगत आहेत सगळ्यांना. खुल्या दिलाने राहिलं पाहिजे. आता उद्या मंडळी येणार आहेत. सगळ्यांनी काही ना काही तरी त्यांना बक्षीस म्हणून द्यावं. मागच्या वेळेला मीच खर्च करून सगळ्यांना बक्षीस दिलं होतं. पुणेकरांच्या तर्फे त्यांना आत्ता आंबे दिले आणि लोटे आणि पात्र दिलं. कशाला ? पुणेकरांच्या तर्फे! आणि पुणेकरांनी काय केलं! व्वा! आम्ही समागम दिला माताजी, जेवायला बसलो सगळ्यांच्या बरोबर व्यवस्थित. सगळ्यांनी काही ना काही बक्षीसे ह्यांना दिली पाहिजेत. प्रत्येकाने मित्रता जोडली पाहिजे. पण मित्रता म्हणजे अशी नाही, की मला जरा पाचशे रुपये उसने द्या. मी कर्ज घेतलं होतं. माझी आई मेलेली आहे. तिच्या अंगावर कपडा नाही. हे असले प्रकार करण्यापेक्षा त्या लोकांना तुमच्याबद्दल काय कल्पना होणार आहे ते तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. स्पष्टपणे मी हे सांगते. आज स्पष्टच बोललेलं बरं. असल्या प्रकारच्या हलकटपणाच्या गोष्टी करायच्या नाहीत. जाऊन दोस्ती करायची. त्यांच्यासमोर आपला मोठेपणा दाखवला पाहिजे. ते तुमच्या दर्शनाला आलेले आहेत. हे चांगले आहे, की परमेश्वराच्या दर्शनाला जा आणि परमेश्वर भीक मागतो आहे ! काय स्थिती आहे हो! ही काय स्थिती आहे. तेव्हा लक्षात घेतलं पाहिजे. इतका विपर्यास करू नका सहजयोगाचा. तेव्हा कृपा करून ह्यांच्यासाठी काहीतरी करा. ते तुमच्यासाठी किती बक्षिसं घेऊन आले आहेत. एवढा खर्च करून इथे आलेत. आपल्याला पैसे तर समजतात कमीत कमी आणखीन काही समजलं नाही तरी. हे लोक केवढा खर्च करून आलेले आहेत ! त्यांच्यासाठी एखादी वस्तू दिली तर नेहमी लक्षात ठेवतील. प्रेमाने मिठ्या माराव्यात. त्यांना प्रेमाने घरी जेवायला बोलवायचं. दिल्लीकरांच हृदय बघा केवढं मोठे आहे! ‘सात दिवस आम्ही आमच्याकडे ठेवतो माताजी. तुम्ही काही केलं तरी आम्ही ऐकणार नाही. सात दिवस आम्ही आमच्याकडे ठेवू. आम्ही घेऊ. आम्ही एका खोलीत जरी राहतो तर काय झालं. आम्ही वाटून घेऊ. ‘ हे दिल्लीकर. तसे सगळ्यांना वाटून मुंबईकर दिलदार आहेत. त्याबद्दल शंका नाही. मुंबईकर दिलदार आहेत, पण हालत नाहीत. दिल्लीवाले लोणावळ्याला येतील, पण आज किती सहजयोगी मुंबईहन इथे आले, रविवारला आपण पूजा ठेवली तर. हातावर मोजून घ्या. आज यायला काय झालं होतं पूजेला. माताजी आज पूजेला बसणार आहेत. हे लोक इतक्या दुरून आले. तुम्ही काही इथपर्यंत येऊ शकत नव्हते ? किती लोक आले आहेत मुंबईचे मला लिस्ट करून द्या. काय झालं होतं यायला त्यांना आज! सकाळच्या गाडीने यायचं आणि संध्याकाळच्या गाडीने जायला काय झालं होतं ? काय दर आहे लोणावळा? आता काय कळव्याला प्रोग्रॅम केला म्हणजे होईल. तर त्याच्यामध्ये 14

Original Transcript : Marathi आंतरिकता नाही. ओढ नाहीये. तुमची जर आई उद्या आली असती तर आले असते भेटायला. नक्की. मी तुमची आई नाही आहे का? तुमच्या आईची आई आहे मी. माझ्याशिवाय चालणार आहे का तुमचं! आतरिकता नाहीये. मुंबईच्या लोकांना आतंरिकता असायला पाहिजे. दिल खोल असून फायदा काय ? आतंरिकता पाहिजे. पैसे खर्च करून सगळं विकत घेता येत नाही. आतंरिकतेने येतं. आतंरिकता आहे का तुम्हाला. आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे, आम्ही आंतरिक आहोत की नाही. अंतःकरणापासून वाटलं पाहिजे. असं नाही म्हणत की सर्वांना नाही वाटत. काही लोकांना मुळीच वाटत नाही. ‘माताजी, तुम्ही आल्यामुळे आमचा हा फायदा झाला, तो फायदा झाला.’ अहो, माझा काय फायदा झाला तो तर बघू द्या मला. आता मुंबईला जर चार माणसं आली तर मला विचार करावा लागतो कोणाच्या घरी ठेवायचं. ज्याच्या घरी ठेवावं तो उचलबांगडीच करत असतो. इथे हेच काम दिसतंय. हे आले ना ह्याला ह्याच्याकडे घाला. त्यांची टोपी ह्याच्यावर. काही समजतच नाही हे काय आहे. त्यांना काही तुमचं समजत नाही तर समजवून सांगा. पण आतंरिकता नाहीये. आतंरिकता असायला पाहिजे. सगळ्याच गोष्टी पैशाने विकत घेता येत नाही. पण तेच आम्ही जातो खेडेगावात, म्हणजे बहार आहे. आतंरिकता आहे. सगळं मस्त आहे. काय मजा येते हो! बैलगाडी असो नाही तर काही असो. पायी चालायला लागलं तरी काय झालं. अनवाणी चालायला लागलं तरी काय झालं! अहो, प्रेमाचं एवढ जे धो धो वहात असतं. त्याच्यापुढे काही नको मग. त्याच्या मग काही इच्छा रहात नाही. असं ठेवलं पाहिजे आणि तेच शिकलं पाहिजे त्या लोकांपासून. खुले आहेत. कधीही माझ्याकडून एक कवडीही घेणार नाहीत. मला त्रास देणार नाहीत. सगळी व्यवस्था कशी मस्त ! सकाळी सगळे आंघोळ करून इतके व्यवस्थित उभे. तेव्हा वाटतं अरे, माझा महाराष्ट्र हा! बस, मुंबई आणि पुणेकरांवर फार मोठी जबाबदारी आहे. तुम्ही सरताज ना इथे बसलेले. हातात तलवारी घेऊन. गंजू देऊ नका. सगळ्यांना सांगणं आहे, थोडे दिवस खेडेगावात जाऊन रहावं आणि थोडं खेडेगावातल्या लोकांकडून शिकावं. जरी काही नसलं घरात तरी अत्यंत प्रेमाने, ‘एक कप चहाच घेऊन जा माताजी. काही तरी घ्या. नुसतं पाणी नको.’ आणि केवढं प्रेमाने. हृदय भरून येतं. तसेच पाहिजे. आतंरिकता पाहिजे. ह्या लोकांना बघून हृदय भरलं पाहिजे. हे आले आहेत. कसे आमच्या जीवाशी हे आलेले आहेत. ह्यांना कुठे ठेऊ आणि कुठे नको. न्हाऊमाखू घालू की काय करू ? कसं करू? असा विचार यायला पाहिजे. ह्यांना जायचंय, आता कधी भेट होणार. हे आमचे जीवाचे निघाले आहेत. तसं नाही. त्याच्याकडून किती काय काढता येईल ते आपण काढलं पाहिजे. आता हे सगळे विसरा. झालं गेलं विसरून जायचं. आता पुढची वाटचाल करायची. त्या वाटचालीमध्ये आपण वर वर उठत जायचं. द्वैतातून अद्वैतात आल्याशिवाय होणार नाही. आणि आपण अजून द्वैतात बसलेलो आहोत आणि त्या द्वैतात थोडेसेच काटे आहेत. ते काढावे लागणार . पैशाचा हा जो आपल्या डोक्यामध्ये बोजा आहे, काढून टाका. तुम्हाला लाखोंनी पैसे मिळतील. ‘योगक्षेम वहाम्यहम्’ म्हटलेले आहे. सोडून बघा. ह्यांना प्रेमाने जवळ करा. चार पैसे खर्च करा. काहीही लागत नाही. तुम्ही कर्जबाजारी होणार नाही. मला काही नको आहे, पण ह्यांच्यासाठी करा. हे बाहेरून आले, त्यांना प्रेमाने जवळ घ्या. 15

[English to Marathi Translation]

MARATHI TRANSLATION (EnglishTalk) आज प्रथमतः आपण सर्वांनी आपली इच्छा आपल्या मनामध्ये प्रस्थापित करावयास पाहिजे की आम्ही सर्वजण साधक असून आम्हाला आमची प्रगती करून प्रगल्भता मिळविली पाहिजे. आजची पूजा ही सर्व विश्वासाठी आहे. ह्या इच्छेने सर्व जग प्रकाशित झाले पाहिजे. तुमची इच्छा इतकी तीव्र असावी, की तिने महाकालीची म्हणजे आत्म्याला मिळविण्याच्या शुद्ध इच्छेच्या चैतन्य लहरी सोडल्या पाहिजेत. ती खरी इच्छा, बाकी सर्व इच्छा मृगजळासारख्या आहेत. ईश्वराने तुम्हाला खास करून प्रथम इच्छा व्यक्त करण्यासाठी व नंतर त्या पावित्र्याची प्रखर इच्छा प्राप्त करून घेण्यासाठी निवडले आहे. तुम्हाला सर्व जगाला शुद्ध करावयाचे आहे. फक्त साधकांना नाही तर जे साधक नाहीत अशांसाठी, ज्याच्या पलीकडे काही त्याला म्हणजे आत्म्याला मिळविण्याच्या इच्छेचे वलय तुम्हाला या विश्वाच्या भोवती निर्माण करावयाचे आहे. इच्छेशिवाय हे विश्व राहिले नसते. ही परमेश्वरी इच्छा हीच आदिशक्ती होय.. ही सर्वत्र पसरलेली शक्ती आहे. हीच ती आपणा सर्वांच्या ठिकाणी असणारी कुंडलिनी होय. कुंडलिनी फक्त एकच इच्छा आहे आणि ती म्हणजे आत्मा होय. याशिवाय असणारी कुठलीही इच्छा ठेवल्यास कुंडलिनी वर चढत नाही. कुंडलिनीला जेव्हा समजते, की ही इच्छा जिच्याकडून पूर्ण होणार आहे. अशी व्यक्ती साधकाचे समोर आहे. तेव्हाच ती जागृत होते. जर तुम्हाला इच्छाच नसेल तर कोणीच ती निर्माण करू शकत नाही. सहजयोग्यांनी आपली इच्छा कोणावर लादू नये. तुम्हाला जागृती मिळाल्यावर लगेच पहिला अडथळा येतो ते म्हणजे तुम्ही प्रथम तुमच्या कुटुंबाचा विचार करता. तुम्ही विचार करावयास लागता, की माझ्या आईला ते मिळालं नाही, माझ्या वडिलांना ते मिळालं नाही, माझ्या बायकोला ते मिळालं नाही, माझ्या मुलांना ते मिळालं नाही, तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की, ही नाती भौतिक आहेत, संस्कृतमध्ये त्याला लौकिक असा शब्द आहे. ते अलौकिक नाहीत, ते ऐहिक नात्याच्या पलीकडचे नाहीत. हे संबंध लौकिक आहेत आणि हे पाश ही लौकिकच आहेत. तेव्हा तुम्ही जर ह्या नात्यातच गुरफटला गेलात तर महामाया तुमचा हा खेळ चालू देते. तो तुमचा खेळ तुम्हाला हवा तेवढा चालू राहतो. लोक माझ्याकडे त्यांच्या नात्याच्या मंडळींना घेऊन येतात. सरतेशेवटी त्यांच्या हे लक्षात येते, की ही फार मोठी चूक त्यांनी केली. आपल्या आयुष्यातील अत्यंत मोलाचे क्षण, तास, वर्ष व शक्ती अशा लोकांवर वाया गेलेली आहे की जे माताजींचे लक्ष वेधून घेण्यास अपात्र आहेत. तुम्हाला जेवढ्या लवकर कळेल तेवढ बरं की तुमच्यात ही इच्छा असेलही आणि कदाचित तुमच्या लौकिक नात्याच्या लोकांत नसेलही परंतु त्याने काही फरक पडत नाही. ज्यावेळी ख्रिस्ताला सांगितले की तुमचे बंधू व भगिनी बाहेर थांबलेले आहेत, तेव्हा ख्रिस्त म्हणाले, ‘माझे बंधु कोण? माझ्या भगिनी कोण? तेव्हा लोकांनी हे जाणलं पाहिजे की जे आपल्या घरगुती कटकटीमध्येच अडकून पडतात आणि माझे लक्ष वेधू इच्छितात, तेव्हा तुम्ही हे लक्षात ठेवा, की मी फक्त त्यांच्याशी खेळत 16

MarathiTranslation (English Talk) असते. त्याचा त्यांना काहीच फायदा नाही. तुमच्या प्रगतीकरता तुम्ही तुमच्या नात्यागोत्याच्या लोकांतील इच्छा काढून टाकली पाहिजे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. महाकालीची शक्ती प्रस्थापित करण्यासाठी हे सर्वात पहिले तत्त्व आहे. विशेषत: भारतातील लोक हे त्यांच्या कौटुंबिक जीवनात फार अडकलेले असतात आणि म्हणून तो फार मोठा प्रश्न होत्तून बसला आहे. जर तुम्ही एका व्यक्तीला जागृती दिली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, की तिचे सर्व नातेवाईक, भुतांचा समुदायच आहे. एकदा तुम्ही एका व्यक्तीला जागृती दिली, की तुम्ही अडचणीत पडतात आणि सर्व भुतं हळूहळू पुढे सरतात आणि मला छळण्यासाठी प्रयत्न करतात. त्यात माझी शक्ती विनाकारण वाया जाते. आणि त्याचा तुम्हाला काही उपयोग होत नाही. तुम्हाला असे झाले म्हणजे कळेल की ही चांगली गोष्ट नाही. जर तुम्हाला वेळ वाया दवडावयाचा असेल तर मी तुम्हाला वाया घालवू देईन. परंतु जर तुम्हाला तुमची उन्नती करावयाची असेल तर ही भौतिक नातीगोती असून ही काही शुद्ध इच्छा नाही, हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे.तेव्हा तुमची शुद्ध इच्छा ही भौतिक इच्छेपासून वेगळी करण्याचा प्रयत्न करा. ह्याचा अर्थ तुम्ही तुमचे कुटुंब सोडा असा नाही. तुम्ही तुमची आई सोडा, बहीण सोडा असा नाही. परंतु तुम्ही इतरजणांना बघता तसेच त्यांना साक्षी स्वरूपात राहन पहा की खरोखरच त्यांना आंतरिक इच्छा आहे की नाही. ती असेल तर चांगलीच आहे. ती तुमच्या नात्याची मंडळी आहेत म्हणून काही त्यांना अपात्र ठरवायचे नाही. दोन्हींकडून ते लागू पडते. जसे ती नात्याची आहेत म्हणून लायक आहेत असे नाही. त्याचप्रमाणे त्यांना नात्याची आहेत म्हणून वाळीतही टाकू नये. सहजयोगात तुमची इच्छा, शुद्ध इच्छा असली पाहिजे. तुम्हाला कित्येक गोष्टींमधून बाहेर पडायचे आहे. परंतु जे लोक कुटुंबात गुरफटलेले आहेत त्यांनी आपल्या नातेवाईकांवर सहजयोगाची जबरदस्ती करू नये. कमीतकमी त्यांना माझ्या डोक्यावर बसवू नये. आता आपल्यातील ही इच्छा की जी महाकालीची शक्ती दुगोचर होत आहे, आपल्याकडे बऱ्याच मार्गांनी येत असते. जसं मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितले , की तुम्हाला जागृती मिळाल्यानंतर तुम्ही सहजयोगी असल्यामुळे आपल्याला नातेवाईकांसाठी काहीतरी करावे असे वाटणे. त्यानंतर दुसरी इच्छा आपल्यामध्ये येते ती म्हणजे, आपल्या नातेवाईकांना बरे करावे. तुम्ही स्वत:ला जाणून घ्या आणि तुम्ही बघाल की इतरांनाही तसेच वाटते. तेव्हा महारोगापासून ते आणावे आणि कुटुंबातील सर्व कटकटी माझ्यापर्यंत आणतात. अत्यंत साध्या गोष्टी म्हणजे गर्भारपण किंवा क्षुल्लक सद्दीपर्यंत जो काही त्रास असेल त्यांना असे वाटते, की ते आईकडे साध्या शिंका, की ज्या अत्यंत नैसर्गिक असतात, त्या तुमच्या चित्तात आणल्या जातात, तर तुमच्या चित्तात जर त्या आहेत तर मी म्हणेन, की होऊ दे तुमचेच. बघा तुमचे प्रश्न सोडवता येतात कां? पण जर तुमच्या चित्तात ते नसतील तर ते माझ्या चित्तामध्ये असतात. तुम्ही त्यांना माझ्यावर सोपवा. मी त्यांना बघून घेईन. पण हे दुष्ट चक्र आहे. मनातील अत्यंत सूक्ष्म विचार आहे की, ‘ठीक आहे माताजी, आम्ही आमच्या चित्तातून काढून टाकलं, आता तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या.’ परंतु हा काही मार्ग नाही. आपल्यात फक्त एकच तीव्र इच्छा असली पाहिजे आणि ती म्हणजे ‘मी आत्मा झालो आहे कां? मी माझे ध्येय गाठले आहे कां? मी भौतिक इच्छेवर मात केली कां?’ स्वत:ला शुद्ध करा. एकदा का तुम्ही शुद्ध करू लागला की जे काही गळून पडेल तिकडे लक्ष असते. हे फक्त आश्वासन आहे, पण खात्री नाही. जर ते माझ्या चित्तात येणे पात्र असतील तर त्याचेकडे मी बघेन. जसं मी 17

MarathiTranslation (English Talk) माझ्या चित्ताला महत्त्व देते तसं तुम्ही पण महत्त्व दिलं पाहिजे. मला वाटतं की मी माझ्या चित्ताला महत्त्व देते त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त तुम्ही तुमच्या चित्ताला दिले पाहिजे. कारण बऱ्याचशा गोष्टी मी माझ्यातच घडवू शकते. कारण सर्व काही माझ्या चित्तात आहे. पण तुम्ही मात्र तुमची इच्छा भौतिक कटकटीमधून काढून शुद्ध करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही ती त्याच्याही पुढे न्याल तेव्हा तुम्ही विचार कराल , माताजी, आपल्या देशाच्या अडचणीचे काय ? बरं, मग तुम्ही तुमच्या देशाचा नकाशा मजजवळ द्या म्हणजे संपलं. त्यात सर्व काही आलं. आता स्वत:ला शुद्ध करा. तुमची जी इच्छा असेल ती सोडून द्या आणि तुम्ही एकदा का शुद्ध झालात कि तो भाग तुमच्या चित्ताद्वारे व्यापला जाईल. हे फार समजून घेण्यासारखं आहे. तुम्ही जेव्हा त्याच्या बाहेर जाल तेव्हाच तुम्ही त्याच्यावर उजेडाचा झोत फेकू शकाल. पण तुम्ही त्यातच रहाल तर तो उजेड लपला जाईल. तिथे उर्जेड फाकणार नाही. तुम्हाला त्या इच्छेच्या पलीकडे गेले पाहिजे. तुम्हाला इच्छा झाली, की प्रत्येकवेळी तुम्ही तिचेवर मात करून जो तुमचा प्रश्न मी सोडवावा असे तुम्हाला वाटते, त्याचेवर तुम्हाला प्रकाश टाकता आला पाहिजे. ही सर्व माझी डोकेदखी निष्कारण तुमच्यावर घेत आहात. तुम्हाला फक्त एकच गोष्ट करावयाची आहे. तुम्ही फक्त आत्मा बनले पाहिजे म्हणजे झालं. ही इतकी साधी गोष्ट आहे. बाकी सर्व माझी डोकेदखी आहे. आता तुमची सामूहिक इच्छा ज्या अडचणींकडे वळायला पाहिजे ती फार वेगळी असावी. तुमच्या शुद्धतेचा पाया मजबूत करण्यासाठी, शुद्धतेने सुगंधित होण्यासाठी तुमचे चित्त हे दुसऱ्या बाजुला असले पाहिजे. आता तुम्ही मला सामोरे नसून माझ्याबरोबर सर्व जगाला सामोरे गेलेले आहात हे लक्षात घ्या आणि मग सर्व प्रवृत्तीच बदलेल. तुमची प्रवृत्ती अशी असावयास पाहिजे की, ‘मी काय देऊ शकतो, कसं देऊ शकतो. माझ्या देण्यात काय चुका आहेत? मला फार दक्ष रहावयास पाहिजे. माझे चित्त कोठे आहे ? मला माझ्याबाबतीत अधिक दक्ष रहावयास पाहिजे की मी काय करीत आहे? माझ्या जबाबदाऱ्या काय?’ तुम्ही शुद्ध असण्याची इच्छा ठेवली पाहिजे. तुमची शुद्ध इच्छा असणे म्हणजेच आत्मा असणे. परंतु तुमच्या स्वत:बद्दल तुमची जबाबदारी काय? तुम्ही अशी इच्छा केली पाहिजे की, तुमची स्वत:संबंधीची जबाबदारी तुम्हाला कळावी आणि ती पूर्ण व्हावी. आता सहजयोगाबाबत तुमची काय जबाबदारी ? सहजयोग जे परमेश्वरी कार्य आहे, ज्याला सुरुवात झाली आहे आणि तुम्ही माझे हात आहात. त्या सहजयोगात तुमची काय जबाबदारी आहे ? तुम्हाला परमेश्वरी कार्य करावयाचे आहे आणि परमेश्वराविरुद्ध असणाऱ्या प्रवृत्तींशी, सैतानी प्रवृत्तींशी तुम्हाला लढा द्यावयाचा आहे. पुढे तुम्ही तुमच्या कुटुंबाविषयी आता जबाबदार नाही आणि जे आहेत ते अर्धवट सहजयोगी आहेत. मी तर म्हणेन, की ते अगदीच निरुपयोगी असून कामातून गेलेले आहेत. असे सर्व जण गळले जातील. त्यांच्या कुटुंबानाही त्रास सोसावा लागेल आणि मला माहीत आहे, की ते असच घडणार आहे कारण आता शक्ती अशातऱ्हेने एकत्र येत आहे की त्यातून निवडीला सुरुवात होईल. तुम्ही आत्मा बनल पाहिजे. ही स्वत:बाबतची तुमची जबाबदारी आहे. सहजयोगाबाबतची जबाबदारी म्हणजे तुम्ही मला अधिकाधिक चांगल्या रितीने समजणे. तुमची जबाबदारी म्हणजे तुमच्यातीलच ही यंत्रणा समजावून घेणे व ती कशी काम करते, कशी वागते ते समजावून घेणे. तुमची जबाबदारी तुम्ही स्वत: गुरु बनणे, एक क्षुद्र व्यक्ती न बनता एक आदरणीय व्यक्ती बनणे. 18

MarathiTranslation (English Talk) जर तुम्ही तेवढ्या उंचीवर जाणार असाल तर तुमच्यापैकी प्रत्येकजण संपूर्ण विश्वाच्या मोलाचा आहे. तुमच्यामधील महत्ता वाढवून जर तेवढी उंची तुम्ही गाठणार असाल तर विश्वामागून विश्वे तुमच्या पायावर घालता येतील. ज्या लोकांना अजूनही खालच्या पातळीवर रहावयाचे आहे ते कधीच प्रगती करू शकणार नाहीत. उदाहरणार्थ पश्चिमी सहजयोगीचे प्रश्न म्हणजे ते मातेविरूद्ध पाप करतात तर पूर्वेकडील सहजयोगी पित्याविरुद्ध पाप करतात, परंतु ह्यातून तुम्हाला बाहेर पडणं काही कठीण नाही. चित्त शुद्ध ठेवलं सहजयोगात स्वत:चे चित्त शुद्ध ठेवण्याच्या सर्व पद्धती तुम्हाला माहीत आहेत आणि जर चित्त शुद्ध नसेल तर तुमच्या इच्छेवर अत्यंत क्षुल्लक व निरर्थक गोष्टींचा परिणाम होईल, की ज्याचा तुमच्या प्रगतीशी काहीही संबंध नाही. जो चांगला सहजयोगी असतो तो आपल्या कपड्याबाबत कोण काय म्हणेल, कोण त्याच्याशी कसा वागेल याबाबत नि:शंक असतो. हा माणूस असा आहे, तो माणूस तसा आहे, असल्या टिकेवर त्याचे लक्ष असते आणि आक्रमकता वर्गैरेचा प्रश्नच उरत नाही कारण एक-दूसरा असा भावच उरत नाही. परंतु अडचण अशी आहे, की मी जेव्हा हे म्हणते तेव्हा मी हे तुमच्या प्रत्येकाविषयीच म्हणत असते असे कुणालाच वाटत नाही. जे चढाऊ वृत्तीचे आहेत ते आपल्याच वृत्तीने वागतात. तर जे मवाळ आहेत ते उलट विचार करतात. जसे मी जर एखाद्या चढाऊ वृत्तीच्या व्यक्तीबद्दल बोलले तर जे मवाळ लोक आहेत, ते त्याच माणसाविषयी विचार करतील, पण स्वत:विषयी नाही. तुम्ही ताबडतोब तुमचे चित्त दुसऱ्या व्यक्तीवर नेता आणि दुसर्या लोकांच्या दोषावरच लक्ष ठेवता. म्हणून तुमची इच्छा अशा तऱहेने ओझे असल्याने कमी कमी होत जाते. तेव्हा जागरुकता, संपूर्णपणे जागरुकता म्हणजे सतर्कता असणे फार महत्त्वाचे आहे. म्हणजे आपण आपलं चित्त सतत आपली शुद्ध इच्छा वाढविण्यावर ठेवलं पाहिजे. इच्छा ही तुमच्या हृदयातून येते आणि तुमची घडणच अशी आहे, की तुमचं ब्रह्मरंध्र हे ही हृदयच आहे. जर तुमचं हृदय स्वच्छ नसेल तर ते स्वच्छ राह शकत नाही. जे लोक सहजयोगाचा मोठेपणा सांगतात आणि सहजयोगाबद्दल मोठमोठ्या गोष्टी बोलतात ते सर्व ठीक आहे, परंतु जर त्यांचे हृदयच उघडे नसेल तर ते निव्वळ स्वत:ची फसवणूक करती असतात. स्वत:चे हृदय खुले करण्याचा प्रयत्न करा. मला आशा आहे की, जेव्हा तुम्ही ही पूजा करून महाकालीची आराधना करून व हा विशेष होम कराल तेव्हा आपण निश्चितच अशा तऱ्हेचे एक वलय प्रस्थापित करून सर्व विश्वाला प्रकाशित करू शकू. परंतु ह्या कार्यात आपण कितपत सहभागी झालेलो आहोत हा दृष्टिकोन तुम्ही ठेवला पाहिजे. मी अजून दुसऱ्या विषयीच विचार करीत आहे काय? मी माझ्या आत्म्याचा विचार करत आहे की अजूनही अत्यंत क्षुल्लक बाबींचाच विचार करत आहे. तेव्हा डावी बाजू ही गणेशापासून सुरुवात होऊन गणेशातच तिचा शेवट होतो. श्री गणेशाचा फक्त मुलभूत एकच गुण आहे आणि तो म्हणजे गणेश हा पूर्णपणे आपल्या मातेला शरण आलेला आहे. त्याला इतर देवदेवता समजत नाहीत. त्याला स्वत:च्या पित्याबद्दल माहिती नाही. त्याला फक्त त्याच्या मातेची ओळख आहे आणि तो पूर्णपणे तिला शरण आलेला आहे. परंतु ही शुद्ध इच्छा क्रियाशील झाली पाहिजे. त्याबद्दल मी जशजशा पूजा होत जातील तसे सांगेन. पण आज सर्वजण आत्मा होण्याच्या आपल्या शुद्ध इच्छेमध्ये स्वत:ला प्रस्थापित करू. 19

MarathiTranslation (English Talk) आता पश्चिमी मन म्हणेल, की हे कसे ? हे कसं करायचं? हा नेहमीच प्रश्न राहिलेला आहे. मी सांगू, ते अगदी सोपं आहे. आदि शंकराचार्यांनी विवेक चुडामणीचे लिखाण केले. पुष्कळ पुस्तकं लिहिली आणि त्या विषयीच्या तत्त्वज्ञानावरही लिखाण केले आणि त्यानंतर सर्व मोठ्या बुद्धीवादी लोकांनी त्यांच्यामागे त्यांना बेचैन केले आणि त्यांना म्हणाले, ‘हे घ्या ते घ्या.’ तेव्हा शंकराचार्यांनी त्या लोकांचा नाद सोडला आणि नंतर त्यांनी फक्त त्यांच्या मातेचे वर्णन व तिच्याविषयी भक्तीचे वर्णन करणारे सौदर्यलहरींचे लिखाण केले. त्यांनी लिहिलेला प्रत्येक श्लोक ‘मंत्र’ आहे. शरणागती ही फक्त मनाची किंवा तुमच्या मनातून आलेली नाही, तर ती हृदयापासून शरणागती आहे. ही अगदी हृदयाची शरणागती आहे. पश्चिमेकडील सहजयोग्यांना माहीत आहे, की त्यांच्यावर त्याची पाळमुळं घातक प्रवृत्तीचे हल्ले कसे एकामागून एक झाले, विशेषत: जेव्हा फ्रॉइड सारखा भयंकर माणूस उखडून काढण्यासाठी आला. पश्चिमी लोकांनी ते डोळे मिटून स्वीकारले आणि शेवटी त्यांना नरकाच्या वाटेवर सोडले. हे सर्व आता बाहेर काढावं. ते सर्व मूर्खपणाचं असून ह्या सर्व परमेश्वर विरोधी कारवाया आहेत. मग तुम्हाला कळेल, की आता ह्याला जोमाने लढा दिला पाहिजे आणि म्हणाल, ‘हा आमच्या मुलभूत तत्त्वाचा नाश आहे. जर आमची आई सर्व महान उदात्त पोषक आणि उन्नत व मुक्त करण्याचा उगम आहे आणि तुम्ही आम्हाला आमच्या मुळापासून तोडत आहात.’ तुम्हाला मला वाटले, जनावरांप्रमाणे वागवण्यात आलेले आहे आणि त्याला आपण सर्वजण इतक्या खालच्या पातळीवर म्हणजे अगदी जिवाणू सारख्या जगणाऱ्या माणसांसारखे झालेले हवे आहे. तेव्हा तुम्ही तुमच्यावर झालेले सर्व हल्ले समजणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि तुम्ही अत्यंत जागृत राहून त्यांच्याशी संबंध ठेवू नये. सरतेशेवटी मी असं सांगेन की, तुम्ही ह्या देशात वरची टोकं नसून खोलवर गेलेली मुळे बघण्यासाठी आलेले आहात. तुमची पश्चिमी स्वप्न वृत्ती बदला, टेलिफोन चांगले नसून तुम्हाला एकही टेलिफोन करता येणार नाही. टपाल व्यवस्था अगदीच भयंकर आहे आणि रेल्वे खराब आहेत. परंतु येथील लोक मात्र फार चांगले आहेत. त्यांना धर्म काय माहीत आहे. हे कुंडलिनीचे स्थान असल्यामुळे आणि प्रत्यक्ष श्री गणेशच याठिकाणी बसलेले असल्यामुळे त्यांच्यावर कसल्याही प्रकारचे हल्ले झालेले नाहीत. ह्या महाराष्ट्राला अष्यविनायकांचं संरक्षण असताना कुणाला ह्यांच्यावर हल्ले करण्याची काय छाती आहे. मला माहीत नाही की महाराष्ट्रीयन लोकांना याची कल्पना आहे की नाही. शिवाय याठिकाणी कितीतरी मारुती आहेत, तेव्हा त्यांच्यावर कोण हल्ले करणार? याठिकाणी कोणत्याही दुष्ट प्रवृत्तीचा प्रभाव नाही. फक्त हे लोक स्वत:च जरा पैशाच्या मागे लागलेले आहेत आणि हाच त्यांना एक श्राप आहे. जर ते त्यातून बाहेर पडतील तर ते अत्यंत महान लोक होतील. तेव्हा तुम्ही या देशात पाश्चिमात्य सुख भोगावयास आलेले नाहीत. तर आत्म्याचं सुख जाणणार आहात. तुम्ही भारताबद्दलचे तुमचे विचार बदला. मी एअर इंडियाबद्दल बिल्कुल म्हणत नाही. तुम्ही सहजयोगी म्हणून तुम्ही एअर इंडियाने यावं हा समज चुकीचा आहे. सहजयोगीशी एअर इंडियाचा काहीही संबंध नाही. रेल्वेचा किंवा इतर कशाचाही सहजयोगीशी संबंध नाही. तेव्हा कृपा करून तुम्ही देशाभिनामी राहून आपलीच एअर लाईन वापरा, तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला असं दिसून आलं असेल, की येथील लोक अत्यंत निरागस आहेत. त्यांना 20

MarathiTranslation (English Talk) फ्रॉईड समजू शकत नाही. तुम्ही त्यांच्याशी या विषयावर बोलू शकत नाही कारण ते त्यांना समजत नाही. याबाबतीत ते जरा वरच्या दर्जाचे आहेत. कारण त्यांच्यावर कोणी हल्ले केलेले नाहीत. एका दृष्टीने तुम्ही त्यांच्याहीपेक्षा श्रेष्ठ आहात कारण तुमच्यावर जरी हल्ले झालेले असले तरी त्यातून तुम्ही बाहेर आलेले आहात. तुम्ही फक्त तुमची दृष्टी वळवा आणि दुसर्या तडीवर जाल, ही फार महान गोष्ट आहे. तेव्हा तुम्हाला एक प्रकारचा आधार पण वाटेल की या मोठ्या देशात तुमच्यासारखाच विश्वास आणि श्रद्धा असणारे अनेक लोक आहेत. म्हणून तुम्ही आचंब्यात पडू नका. अशा तऱ्हेने आज आपल्याला महाकाली तत्त्वाची पूजा आरंभ करायची आहे. आजचा दिवस गौरीचा आहे किंवा गौरी गणेशाचा आहे. जरी पंचांगाप्रमाणे तो नसला तरी माझ्या सांगण्याप्रमाणे आपण आपल्या मध्ये अत्यंत सूक्ष्मतेत त्याला प्रस्थापित करू या. इच्छा शुद्ध असली पाहिजे आणि आपल्यामधील अनेक अडथळे धुवून टाकले पाहिजेत. आपण अत्यंत महान सहजयोगी होण्याची इच्छा करा, आपण एक जबाबदार सहजयोगी होण्याची इच्छा करा. आपण एक आपल्या मातेला पूर्णपणे शरण जाण्याची इच्छा करा. हे काही कठीण नाही. अहंकारच शेवटी जातो कारण नाहीतर तुम्ही शरणागती कसली करणार? तुम्ही माझे प्रेम संपादण्यापेक्षा मला तुमच्याकडून अधिक काही नको. तुमचं हृदय उघड करून माझं प्रेम संपादा हाच शरणागतीचा अर्थ होय.. अहंकार सोडा म्हणजे झालं. इतर कार्य सहज होईल. मी तुमच्या हृदयात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि मी अवश्य तिथे स्थिर होईन. 21