Public Program Pune (India)

Public Program, Pune, India या पुण्यभूमीवर आधीही पुष्कळ आक्रमण झालेले आहे. इतर राक्षसी प्रवृत्तींनी अनेक वेळेला याच्यावरती आक्रमण केलं. शिवाजी महाराज असताना सुद्धा आपल्याला माहिती आहे; येथे पुष्कळ अशा घटना झाल्या ज्या इतिहासात अद्वितीय आहेत. म्हणजे इथल्या जनतेने नेहमी सत्याचाच भाग उचलून धरला. त्या साठी झगडले. त्याचं ध्येय नेहमी सत्याला धरून राहणं असं होतं. नंतर आपल्या भारतामध्ये जो स्वातंत्र्याचा लढा झाला त्यात सुद्धा इथे वीरत्वाने लोक लढले आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं. तसंच सामाजिक पातळीवर सुद्धा फार महत्वाची कामगिरी केलेली आहे. तेव्हा खरं म्हणजे महाराष्ट्राची मानसिक भूमी ही पुणे. जरी मुंबईला आपण म्हणतो की राजधानी आहे, पण आर्थिक राजधानी असली तरी जी मानसिक म्हटली पाहिजे किंवा धार्मिक म्हटली पाहिजे ती पुण्यभूमी ही पुण्याची आहे. या पुणेकरांवर एक मोठा भारी जबाबदारीचा भाग येतो. तो इतका मोठा जबाबदारीचा भाग आहे याची कल्पना सुद्धा तुम्हांला नसावी.कधी-कधी मला आश्चर्य वाटतं. पण दैवकृपेने येथे सहजयोग जमू लागलाय. हळूहळू त्याची पाळेमुळे जमू लागली आहेत. हे बघून मला फार आनंद होतो.  पूर्वी मला फार आश्चर्य वाटायचं की सर्व तऱ्हेचे दुष्ट प्रवृत्तीचे राक्षस या पुण्यभूमीला कशे प्राप्त झाले आणि येथे येऊन त्यांनी कशे लोकांवर अत्याचार केले. पाशवी प्रवृत्तीचे लोक तसेच दुष्ट, रानटी तऱ्हेचेबाबाजी वगैरे अशा तऱ्हेचे लोक येथे आले. त्या नंतर इतर ढोंगी आणि अशे लोक येऊन त्यांनी पुष्कळ आक्रमण केलं. पण तरीसुद्धा त्यांची पुण्याई ते जिंकू शकले नाहीत. आणि सगळ्यांना पराभूत व्हावं लागलं आणि त्यांना इथून कूच करावं लागलं. आज अशा परिस्थितीत आपण बसलेलो आहोत. इथे मला दोन तऱ्हेची लोकं दिसतात. त्यातील एक म्हणजे रूढीवादी लोक. अजून आपल्या रूढी आपल्यामध्ये इतक्या रुजलेल्या आहेत, ते आपण डोळे उघडून बघायला Read More …