Public Program Sangamner (India)

Public Program, Kundalini and Bandhan, Sangmaner, India 24-02-1984 ज्ञानमाता विद्यालयाचे मुख्याध्यापक, श्री वटे साहेब तसेच संगमनेरचे सर्व भाविक साधक, सहजयोगी मंडळी सर्वांना आमचा प्रणिपात. आज विशेष्य करून फार क्षमा याचना करायची की इतका उशीर झाला. पण आजच एक प्रश्न उभा झाला आणि मला अहमदनगरला पहिल्यांदा जावं लागल. त्यामुळे इथ यायला इतका उशीर झाला तरी सगळ्यांनी उदार हृदयाने मला क्षमा करावी. इतका वेळ आपण वाट बघत बसलात त्यावरुन हे निश्चित आहे की आपण भाविक मंडळी आहात आणि आपण साधक आहात, परमेश्वराच्या शोधात आहात. आज पर्यंत ह्या भारत भूमीत विशेष्य करून या महाराष्ट्रात अनेक साधु संत झाले. श्रीराम सुद्धा या पवित्र भूमीवर अनवाणी चालले आणि त्यांनी पुष्कळ मेहनत केलेली आहे. त्या मेहनतीच्या वर्णनाला माझ्याजवळ शब्द नाहीत. त्यांना लोकांनी किती छळल, त्रास दिला त्यांना समजून नाही घेतल, त्यांची कोणत्याच प्रकारे मदत नाही केली तरी सुद्धा त्यांनी आपल कार्य अव्याहत चालवले. त्याला कारण त्यांना माहिती होत की एक दिवस असा येणार आहे की या भूमीवर असे मोठे मोठे लोक जन्माला येतील, जे पुण्यवान आत्मा असतील. मनुष्य पैशांनी मोठा होत नाही, यशाने मोठा होत नाही, सत्तेने मोठा होत नाही. कोणत्याही गोष्टीने मोठा होत नसतो पण ज्या माणसाला परमेश्वराची ओढ आहे, तोच खरा मनुष्य परमेश्वरी दृष्टीमध्ये मोठा असतो. आणि अशी परमेश्वराला शोधणारी अनेक मंडळी आहेत, जी आपल्या महाराष्ट्रात देशात विद्यमान आहेत. परमेश्वर हा आपल्या मध्ये, हृदयामध्ये आत्मा स्वरूप असतो अस सर्व संत साधूंनी सांगितलेले आहेत. ती सर्व साक्षात्कारी मंडळी होती आणि साक्षात्कारी मंडळींचे मुख्य म्हणजे अस असतं कि ते कोणचे  चुकीचे काम करत नाहीत. त्यांना सांगावे लागत नाहीत, त्यांच्यामध्ये धर्म जागृत असतो. ते धर्मातच असतात. त्यांना Read More …