Public Program in Shri Ram Temple (India)

Public Program in the Shri Ram Temple (Marathi), Phaltan near Satara, Maharashtra (India). 7 March 1984. फलटणच्या सर्व सात्विक भाविक साधकांना आमचा नमस्कार! आज हृदयापासून तुमची क्षमा मागते, पण माझा काही दोष नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुमच्याही पेक्षा जास्त उत्कंठतेने तुम्हाला भेटण्यासाठी धावत येत होते, पण रस्ते महाराष्ट्रातले कसे आहेत त्याचा अनुभव येतो. त्यात रस्त्यात इतके अपघात झालेले की जीव नुसता अगदी घाबरून जातो. मग कुठे जर गाडी तुमची फेल झाली तर रस्त्यात एक दुकान नाही की एक जागा नाही की कोणी मनुष्य नाही की ज्याला म्हणता येईल की ‘बाबा, आमच्या गाडीला एक वस्तू पाहिजे ती दे.’ ही आपल्या देशाची खरोखरच हलाखीची स्थिती आहे. आणि त्यामुळे कुठे टेलिफोन नाही की तुम्हाला कळवायला की कसं पोहोचायचं? कसं झालंय. म्हणजे फार परिस्थिती अजून सुद्धा अशी आपली झालेली नाही की जिथे आपण कधी म्हणू की आम्ही यावेळेला पोहोचू, त्यावेळेला पोहोचू, पाहोचले तर नशीब! आदळत, आपटत. एका शरीरात जर पोहोचले (काहीही इजा न होता) तर स्वत:ला मानायचं की बाबा पोहोचलो! पण अशा परिस्थितीत सुद्धा भारतीय जीवन पुष्कळ सुखी आहे. आणि लोकांमध्ये एकतऱ्हेचे समाधान, शहाणपण आहे. कारण अजून आपण आपल्या धर्माला जागून आहोत. जर अशी स्थिती परदेशात कुठेही असती, तर लोकांनी सगळ्यांना उडवून दिलं असतं. एकही रस्ता असा असता तर सगळ्यांनी उडवून दिलं असतं. पण आपल्या देशात लोक समाधानी आहेत आणि जसं असू दे बाबा, परमेश्वराचं नाव घेत असतात. आज इतके एकानंतर एक प्रश्न आले की त्या प्रश्नांना ठीक करता करता शेवटी मी फलटणला जाते की नाही अशी सुद्धा मला शंका आली होती. आजचा विषय ‘सहजयोग आणि कुंडलिनीची जागृती’ असा आहे. तुम्ही कुंडलिनी हा Read More …