Public Program Rahuri (India)
श्री पंडित राव जाधव ,गौतम पब्लिक स्कूल चे मुख्य संचालक ,उपसंचालक तसेच शिक्षक वृंद , फॅक्टीरीतले माननीय डिरेक्टर्स तसेच इथे जमलेले इतर ह्या शाळेचे सहाय्यक लोक ,सहजयोगी जे बाहेरून आलेले आहेत आणि इथे आहेत ते पण . सगळ्यात मुख्य म्हणजे इथे जमलेला हा सुंदर बालवृन्द . इतकी सुंदर व्यवस्था आपण केलेली आहे प्रेमाची कि काय बोलावं ते च समजत नाही . प्रेमाला भाषा नसते हे मी जाणते . पण नुसतं इतकं हृदय भरून येतंय कि त्यांना शब्दात घालून कस सांगायचं ते मला समजत नाही . हि अबोध ,निष्पाप मूल इथं बसलेली आहेत हीच उद्या आपल्या या महान देशाची नागरिक सेना आहे . आपल्या देशांनी हजारो वर्षांपासून तपस्या केलेली आहे . आणि त्या तपस्वितेचं फळ म्हणजे अनेक संतसाधु ह्या भारताच्या सुंदर प्रांगणामध्ये आले त्यांनी आशीर्वाद दिला . लोकांना हिताचा उपदेश केलेला आहे . आता आपला देश प्रगतीपर होत आहे . आपण प्रगतीकडे वाढत आहोत . हि फार मोठी गोष्ट आहे कि देश जो कि ३०० वर्ष गुलामीत खितपत पडला होता तो आज स्वातंत्र्याच्या नवीन विचारांनी आज वाढत आहे . ह्या वेळी मला शिवाजी महाराजांची आठवण येते , त्यांनी सांगितलं होत कि स्व च तंत्र ओळखलं पाहिजे . स्वतंत्र व्हा . तसच ज्ञानेश्वरांनी म्हंटल आहे जेव्हा त्यांनी पसायदानातून परमेश्वराला प्रार्थना केली तेव्हा सांगितलं कि आता विश्वात्मके तोषावे ,तोषोनि दयावे पसायदान . पसायदान म्हणजे काय ?त्यांनी सांगितलं कि सगळ्यांना आत्मबोध झाला पाहिजे . आत्मबोध होताच हातातून ज्या चैतन्याच्या लहरी वाहतात ते पसायदान . त्यांनी तो शब्द वापरला जो शिवाजी महाराजांनी वापरला होता “विश्व स्वधर्म सूर्य पाहो “, स्वधर्म सूर्य पाहो ,स्व म्हणजे आत्मा त्या धर्माचा जो सूर्य आहे तो ह्या विश्वानी पाहो असं एक सुंदर भाकीत Read More …