Public Program (India)

 सांगलीचे चीफ इंजिनिअर श्री जगताप साहेब तसेच ह्या शाळेचे मुख्याधापक ,इथे राहणारे सर्व आबालवृध्द ,सत्याच्या शोधात आलेले सर्व साधक या सर्वाना आमचा प्राणिपाद असो . कुंडलिनीचा विषय थोड्या शब्दात किंवा थोड्या वेळात मांडणं हे सोपं काम नाही . पण तरी सुध्दा आपण असा विचार केला पाहिजे कि हि जी मानव आकृती तयार झाली ती का झाली . हा मानव निर्माण करताना इतका वेळ घालवला अनेक योनीतुन आपण संचार केला शेवटी ह्या मानव स्तीतीला आपण आलो . तेव्हा ह्या मानव स्तितीत येऊन पुढे काही आहे किंवा नाही हा एकदा विचार मनात जरूर डोकावतो . आणि जेव्हा हा प्रश्न डोक्यात उभा राहतो त्या वेळी साधक तयार होतात . आणि हे साधक परमेश्वराच्या शोधात, सत्याच्या शोधात ,निर्गुणाच्या शोधात कुठेना कुठे तरी भटकत असत . त्या साठी श्री कृष्णाने फार सुंदर विश्लेषण करून सांगितलं आहे . कि जगामध्ये तीनच जाती आहेत . तीनच तऱ्हेचे लोक आहेत म्हणजे एक तामसिक ,एक राजसिक आणि एक सात्विक . तामसिक मंडळी म्हणजे ती कि जे चूक असेल त्याला सत्य मानायचं आणि त्याच्या मागे धावायचं . ज्याचं काही महत्व नसेल ते महत्वपूर्ण करायचं आणि त्यासाठी संबंध आपलं आयुष्य घालवायचं . त्या बद्दल विचार करायचा नाही ,त्या बद्दल कोणचंही संतुलन ठेवायचं नाही . नुसतं वेड्यासारखं त्याच्या मागे लागायचं . जी आज पाश्चिमात्य देशांची स्तिती आहे ते राजसिक लोक आहेत . राजसिक लोक ते ज्यांना बरोबर काय आणि चूक काय ते समजत नाही . शुध्द काय आणि अशुध्द काय ते समजत नाही . पवित्र काय आणि अपवित्र काय ते समजत नाही . दोन्हीही चांगलं असं ते आपल्या अहंकाराच्या दमावर म्हणतात . तर राजसिक माणसाचा अहंकार फार बळावलेला असतो Read More …