Public Program (India)

ताराराणी हायस्कूल चे संचालक , तसेच शिक्षक वृंद , कोल्हापूरचे अबालवृद्ध आणि आसपास च्या खेड्यापाड्यातून आलेल्या सर्व साधकांना आमचा प्रणिपात असो . आजचा विषय सहजयोग तर आहेच आणि सहजयोगावर मी पहिल्यांदा पण तुम्हाला सांगितलं आहे कि सहजयोग म्हणजे तुमच्या बरोबर जन्मलेला योगाचा जन्मसिध्द अधिकार . सहज म्हणजे सह म्हणजे तुमच्या बरोबर आणि ज म्हणजे जन्मलेला . हि जिवंत क्रिया आहे . आणि ती जिवंत क्रिया आपल्या मध्ये घाटीत होते त्या साठी काहीही क्रिया करावी लागत नाही . अक्रियेत ते घडत हे मागच्या वेळेला तुम्हाला समजावून सांगितलं होत . पण महालक्ष्मीच्या परिसरात बसल्यावर हि महालक्ष्मी कोण ?तिचा आपला काय संबंध? ,आपण देवळात जाऊन काय मिळवायचं ? वैगेरे ह्या गोष्टींची कुणाला माहिती नाही . देवळात जायचं खणानारळानीं ओटी भरायची एव्हडं जे साधुसंतांनी सांगितलेलं आहे तेव्हड आपण करतो . तिच्या परिसरात राहून तिच्या आशीर्वादाने हि सश्यशामला भूमी पुनीत झालेली आहे तिचा पूर्ण उपभोग घ्यायचा ती आपली एक प्रवृत्ती आहे . तरी सुध्दा हि महालक्ष्मी कोण ?हि महालक्ष्मी तत्व रूपाने आपल्या मध्ये वास करत असते . आणि जी सुषुम्ना नाडी अशी जी आपल्या मध्ये जी मधोमध आपल्या मध्ये आहे ,जिच्यातून कुंडलिनीच उत्थापन होत त्या नाडीला महालक्ष्मीची नाडी असं म्हणतात . डावी कडे महाकाली आणि उजवी कडे महासरस्वती ह्या दोन्हीच्या मिलनानी बनलेल जे मधोमध अशी पोकळी आहे ह्या पोकळीला सुषुम्ना नाडी असं म्हणतात . म्हणजे महालक्ष्मी हि सुषुम्ना नाडी आहे आणि तिच्यातूनच कुंडलिनीच उत्थापन होत म्हणून जरी हि महालक्ष्मी आहे तरी तिच्या समोर जाऊन आपण उदे उदे आंबे असं म्हणतो . अंबा हि कुंडलिनी आहे . जो आपण जोगवा म्हणतो तेही तेच आहे . ग्रामीण विभागा मध्ये जोगवा म्हंटला जातो ते हि Read More …