Public Program Sangamner (India)

परमेश्वराला  शोधणाऱ्या सर्व साधक मंडळींना आमचा प्रणिपात असो . ह्या भारत भूमीत ह्या योगभूमीत महाराष्ट हे एक विशेष प्रकारचं राष्ट्र  आहे . आणि अनादी काळापासून याला महाराष्ट्र असं म्हंटल आहे . महाराष्ट्र का म्हंटल असं कुणाला विचारलं तर लोकांना ते सांगता येत नाही . आणि केव्हा पासून म्हंटल ते सुध्दा त्यांना सांगता येत नाही . असे अनादी नाव कोणत्याही देशाला आजपर्यंत महाराष्ट्र असं दिलेलं नाही . तेव्हा ह्या महाराष्ट्रात आपला जन्म झाला तेव्हा काहीतरी विशेष असलं पाहिजे असं आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे . म्हणजे एव्हड्या मोठ्या राष्ट्रात जर जन्म झालेला आहे ,हे राष्ट्र संबंध पृथ्वी तलावावर महान मानलं जात तेव्हा याच जे आपण मोठं नाव ठेवलेलं आहे किंवा नाव आहे त्याला साजेस काहीतरी आपल्यामध्ये असलं पाहजे . राजवाड्यात जे राहतात त्याना रजवाडे म्हणतात . तसच ह्या महाराष्ट्रात जे राहतात त्यांना महाराष्ट्रीयन म्हणतात . किंवा महाराष्ट्र वासी म्हणतात . पण त्यातलं ब्रीद काय आहे ते ओळखून घेतलं पाहिजे . त्याच्या शिवाय स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणवून घ्यायचं नाही . कारण सत्य हे आहे कि हा देश अत्यंत महान आहे . आणि आधी मी आपल्याला सांगितलं आहे कि सर्व विश्वाची कुंडलिनी  ह्या महाराष्ट्रा च्या पठारामध्ये जशी त्रिकोणाकार अस्थी मध्ये आपल्यात  ती बसलेली आहे तशीच हि कुंडलिनी आपल्या ह्या महाराष्ट्रात बसलेली आहे . हि महान आदी कुंडलिनी ह्या महाराष्ट्रात आहे . तिची तीन पीठ आपल्याला माहीतच आहे .   महाकालीच ,महासरस्वतीच आणखीन महालक्ष्मीचं . पण जे मुख्य आहे ते सप्तशृंगीचं अर्धमात्रा , ती आदिशक्ती आहे . ती नाशकाच्या जवळ आपल्याला माहित आहे . अशी साडेतीन पीठ ह्या भूमातेच्या पाठीच्या कणावर महाराष्ट्रात आहेत . म्हणजे इथे चैतन्याच्या नुसत्या लहरी वहात आहेत . चैतन्य नुसतं उफाळून आलेलं Read More …