Devi Puja

Brahmapuri (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Devi Puja Talk, India, 1985-12-27

Time: 26 minutes 56 seconds to 29 minutes 56 seconds. (26.56 To 29.56)    

          आता तुम्हांला काय सांगायचं तुमची स्तुतीच करत होते सगळ्यांना. सगळ्यांजवळ मी तुमची स्तुती करते, की तुम्ही मूर्खासारखे वागू नका, असं त्यांना सांगतेय मी. तेव्हा तुम्हांला तसं सांगायचं की तुम्ही ह्यांचं अंधानुकरण करायचं नाही. आपलं जे आहे ते फार मोठं आहे. आपला वारसा आहे तो सांभाळला पाहिजे. नुसतं आपण बाहेरच्या लोकांना बघून तसं वागायला लागलो तर आपण मूर्खात निघणार. त्यांना काही संतुलन नाही. त्यांच्या जीवनात काही संतुलन राहिलेलं नाही. एकीकडे वहावलेलं जीवन आहे ते. हे मी पाहून आले ना आता. बारा वर्ष तिथं राहून आले. तप केलं बारा वर्षाचं. बारा वर्षांत तप होतं म्हणतात. (हास्य) तसं तप झालं माझं. आणि आता त्यांचं अंधानुकरण करू नका एवढंच सांगायचं. पण ‘जुनं ते सोनं’ जरी असलं तरी जुनाट जे आहे ते चांगलं नाही. जुनाट नको. ‘जुनं ते सोनं’ पण जुनाट जे धरून बसले ते नको आणि जुनाट सुद्धा आत्ता आत्ताच आलेलं आहे, म्हणजे बायकांना छळणे मुसलमानांपासून शिकलो आपण. इंग्लिश लोकांपासनं डावरी देण्याचं शिकलोय. मुलींना डावरया दयायच्या, आता कशाला? आता आपला असा नवीन नियम झालेला आहे, त्या नवीन नियमांमध्ये आपल्याला काही डावरी दयायला नको. मुलीला अर्धी प्रोपर्टी दयायची, मुलींनी अर्धी प्रोपर्टी घ्यायची ही पद्धत बरोबर आहे. पण मुली घेणारही नाहीत आणि देणारही नाहीत. तेव्हा त्यांचं जे आहे ते शिकायचं. आपली जी नम्रपणाची वर्तणूक आहे तीच ठेवायची. व्यवस्थित राहायचं. जसं आपल्याला पूर्वजांनी सांगितलंय तसं राहायचं. पण जुनाट ज्या वस्तू झालेल्या त्या फेकून टाकल्या पाहिजेत. जुनाटातल्या पुष्कळ वस्तू आहेत त्या म्हणजे ब्राहमणांचं साम्राज्य जे पसरलंय देवळामधनं ते काढलं पाहिजे. सगळ्यांनी मूर्खात काढलंय आपल्याला. हे करायचं, उपास करायचे. शंभरदा सांगितलं उपास-बिपास काही करायचा नाही. शरीराला जे उपयुक्त असेल ते करायचं, पण तरी माताजी उपास सुटत नाही. आणि सगळ्यात जी जुनाट घाणेरडी वस्तू आहे ती म्हणजे तंबाखू. ती आपल्याला सुटत नाही कारण आपल्यामध्ये तेवढी शक्ती नाही. तंबाखू, मिसरी हे सगळे घाणेरडे प्रकार, तंबाखू आणलं कोणी? तंबाखू हा शब्द आला कुठून? आपल्याकडे पूर्वी तंबाखू संस्कृतात हा शब्द नाही. आपल्याकडे तंबाखू होत नसे पूर्वी. इंग्लिश लोक घेऊन आले. इंग्लिश लोकांनी आणली तंबाखू, म्हणून आपण त्याला तंबाखू म्हणतो. tobacco पासून तंबाखू असं वापरू लागलो. आपल्या मराठी भाषेमध्ये कुठे आहे शब्द तंबाखू हा कुठलातरी बाहेरून आलाय तंबाखू. मुसलमान आणि मुसलमानांनी आधी ह्याची जराशी चाळण केली, पण तो एवढया जोरा-प्रमाणात तो आणला. सिगरेट वगैरे हे सगळं अं.. ह्या लोकांनी आणलेलं आहे आणि ह्यांच्या देशामध्ये खूप प्रबळ झालेलं आहे. त्यांनी जाऊन चायनामध्ये सुद्धा अशे अं.. गांजा-बिंजा हे केलं होतं तर आपल्या मराठी भाषेत गांजा, चरस वगैरे मी कधी ऐकलं नव्हतं पूर्वी शब्द गांजा, चरस हे ते ह्यांनी काढलं, आता तुम्ही पिवून बघा, आणि असं करून इंग्लिश व्हाल तुम्ही असं करायचं असेल तर करा तेव्हा जे दिलेलं आहे. (English) 

Time: 34 minutes To 38 minutes 15 seconds. (34.00 To 38.15 seconds)   

     आता आपल्याकडे साड्यांची पद्धत आहे की चांगलं काठा- पदराच्या साड्या घालायच्या ती चांगली पद्धत आहे. काठा-पदराच्या साड्या घातल्या म्हणजे काय असतं काठ असले म्हणजे आपल्याला मर्यादा राहतात म्हणून बायकांनी काठा-पदराच्या मुलींनी कशेही घातले तर ते चालेल पण बायकांनी, लग्न झालेल्या बायकांनी काठा पदराच्या साड्या घालायच्या. आता तुम्ही जर काठा पदराच्या साड्या सोडल्या तर तुमचं सगळी कला जाणार. तुमच्या सगळ्या साड्यांची कला जाणार. लोकांचं ते जे विणकामाचं जे आहे ते जाणार. पूर्वीच्या पद्धतीने जर आपण घरं बांधली तर जुनं, जुन्या पद्धतीने जे काही आपल्याकडे सुंदर कलाकारी होती ती आता जाणार जर तुम्ही नाही वापरले तशे तर, ह्या लोकांना तुमची जुनाटंच घरं आवडतात. ती जुनी आहेत ती घरं आवडतात. नवीन नाही आवडत त्यांना. त्याला कारण काय त्याच्यामध्ये सौंदर्य आहे ते सौंदर्य आता जाणार म्हणून आता कायतरी बांधून ठेवायचं. पूर्वीच्या झोपडया ह्यांना बऱ्या वाटतात. ते पुढे होण्यापेक्षा आता आपल्या हातातनं सर्व कला गेल्यावर मग काही जमणार नाही, म्हणून कलापूर्ण जे आपलं जुनं आहे ते ठेवलं पाहिजे आणि ते सुंदर असतं तर आत आपल्याकडे टोकपदराच्या साड्या किंवा त्याला आपण बुगड्या म्हणायचो. काय काय तर-तऱ्हा असायच्या. बायकांना ते शब्दही माहित नसणार म्हणून आपण नेहमी अश्या साड्या वापरल्या पाहिजेत, ज्या आपल्याकडे विणलेल्या असतात, त्या बरं आहे आणखी विशेषतः लग्न झालेल्या बायकांना तर ते शोभतं जास्त. मला तरी वाटतं काठ पदर नसला तर शोभत नाही. लग्न झालेल्या बायकांनी काठ पदराच्याच साड्या वापरायच्या. ती काही जुनाट पद्धत नाही. जुनं आहे ते सुंदर आहे ते दिसायला छान दिसतं, भरदार दिसतं. त्याला एक तऱ्हेची सभ्यता आहे आपली. आपली संस्कृती आहे ती. त्याला सोडून आपण ह्यांच्यासारखं व्हायचं नाही. ज्या संस्कृतीत आपल्याला उतरायचंच नाही. आपली संस्कृती फार मोठी आहे. पण त्या संस्कृतीतनं जे त्यांचं जे चुकलेलं आहे ते समजून आपण वाटचाल केली तर आपली फार प्रगती होणार आहे. सायन्स करा त्याला हरकत नाही, पण आपली संस्कृती नाही सोडायची. सोडली की ह्यांच्यासारखी स्थिती होणार. मुलं-बाळ मारून टाकतात. नवरा-बायको दोन वर्ष सुद्धा बरोबर राहत नाहीत. सगळे शेवटी जाऊन अनाथाश्रमात राहतात, मरणाची वाट बघत. तेव्हा आपला जो समाज आहे त्याच्यातलं जे चांगुलपणाचं आहे ते ठेवलं पाहिजे. सगळं वाईट आपण शिकून घेतलं पहिलं, शिकून घेतलेलं आहे. मुसलमानांचं शिकले आता ह्यांचं आलं ते, त्यांचं शिकले त्यांची जेवढी घाण होती तेवढी आपण घरात आणून ठेवली आहे, त्याने आपल्यात कशी स्वच्छता राहणार? आपण इतके स्वच्छ, चांगले लोकं होतो. सगळं हे वाईट आपल्यामध्ये आलेलं आहे ते काढून टाकलं पाहिजे. आता पूजेचं महत्त्व काय आहे ते समजून सांगितलंय ह्यांना मी तसंच तुम्हांलाही माहित आहेच ते सांगायला नको तुम्हांला. पण त्यामध्ये श्रद्धा असायला पाहिजे. आता पूजेत सुद्धा हमरा-तुमरीवर यायचं नाही. कोणी पूजा केली याला सहजयोगाला काही महत्त्व नाही. कुणी केली तरी सगळ्यांना एकसारखीच पावते. फक्त तुमच्यात श्रद्धा किती आहे? तुमच्यात श्रद्धा किती आहे? जेवढी तुमच्यात श्रद्धा आहे तितकंच ते भरणार आहे.

      I would to say for ladies can sit little bit of this side. जरा ह्यांना जागा दया. It’s very hot for you, move forward specially people are so hot do not sit that side. असं करा त्या बायकांना बसू दया थंड, तुम्ही बसा एवढं त्यांना ऊन नाही चालणार पाहुणे आहेत ना!

        Come along this side. If you had put something them, could have manage it little bit also one must understand that we are doing everything. You must do something about. Everything they arranged just come and sit down that’s not good thing is it? You could have such a lot time. Why didn’t you put something there to protect yourself. Not difficult now for these you come from this side also you can come this side come.

       जरा ह्यांना जागा दया थोडी मागे होऊन घ्या. You get up from there. Hello, you get up three of you come this side the ladies were…you are … are you alright? Alright behind you these people can come this side. Little bit move this side. जरासं थोडसं उन्हात नको पण असं बसलेच आहेत उन्हातच. थोडसं इकडं आडोसा केला असता. Is it alright? जराशे बसू दया थोडसं सावली आहे तिकडे समोर बसा ना. सावली आहे. अहो! समोर बसा ना! बसून घ्या. Hello you come this side there is there is place for you. Yes come here. Ladies go that side, come this side. बसून दया ह्यांना इकडे. The men can come this side. Yes, the men can come this side. No, no you better come this side. Why don’t you move this side a little bit. Also we must think what we can arrange what we can help them like yesterday how they were arrange when I went they didn’t know I was going to think come back how (not clear)  for me. How they were running. I am also your mother am I not? We should think about that what we can do? How we can help them. Everybody should. जाऊ दया आता जाऊ दया. राहू दे, राहू दे. आता काय करता, त्यांनी काय व्यवस्था नाही केली तर बसू देत. You can move a little bit this side. Hello, you move this side a little bit. You can also move a little bit. I don’t want to get in the sun you have trouble, but they can move the sound equipment little aside. Just move it a little bit. As soon as the sun comes up you see should be alright but still. असं सावलीतच बसा, इतके सावलीत बसलेत तेवढेच बरे. इकडे सावली नसेल तर समोर बसा, सावलीत बसलेलं बरं. सावलीत पूजेला बरं असतं. मी वरच आहे इथे उभी, असं काही नको. इकडे बसा अशे समोर बसले तरी चालेल. सावलीत घाला तिकडे.