Public Program Atit (India)

सत्याला शोधणाऱ्या सर्व साधक मंडळींना आमचा प्रणिपात असो . अतीत बद्दल मी ऐकल होत कि इथे पुष्कळ साधक आहेत आणि सहजयोग चांगलाच रंगलेला आहे . इथे आल्याशिवाय ते सत्य द्रीष्टी समोर आलं नाही . आणि पाहून मला मोठं आश्चर्य वाटलं कि या ठिकाणी प्रथमच मी आले आणि लोकांचा उत्साह त्यांचं प्रेम किती भव्य आहे किती मोठं आहे . आपण नेहमीच सत्याला शोधत असतो . जाणता जाणता आपण शोधत असतो ते सत्य . कारण सत्य हेच प्रेम आहे . एखाद्या बद्दल आपल्याला जर प्रेम वाटलं तर आपण त्याच्या बदल सगळं काही असेल ते जाणतो ,जे सत्य आहे ते जाणतो . बाह्यतः सुद्धा . आणि ते प्रेम आनंददायक असत . तेव्हा ते सत्यच आनंदाचा स्रोत आहे . आपल्याला असं वाटत कि सत्य म्हणजे काहीतरी कोरड असेल कारण जे सत्यवचनी असतात ते करारी लोक ,बाणेदार लोक आणि हातात नेहमी तलवार धरूनच असतात . त्यांच्या जवळ जायचं म्हणजे अगदी विचार करावा लागतो . त्यांच्या जवळ जायचं तरी कस एखादा तडाखा दिला तर कस होईल आपलं . सत्य हे प्रेममय आहे ,आनंदमय आहे . ,सौन्दर्य शाली आहे . सुखमय आहे . ते आपण सत्य शोधत असतो . पुष्कळसे लोक असं समजतात कि आम्ही जर मोठ्या मोठ्या पदव्या मिळवल्या तर आम्हाला आनंद होईल . पुष्कळसे लोक भौतिकतेत पडतात त्यांना वाटत कि आम्ही जर मोठमोठाले बंगले बांधले किंवा मोठाल्या गाड्या ठेवल्या श्रीमंत झालो म्हणजे आम्हाला आनंद मिळेल . सुख दुःखाचा हा फेरा आहे . हा आनंदाचा सागर नव्हे . सुख तेव्हा होत जेव्हा माणसाचा अहंकार बळावतो . एखाद्या माणसाने उदोउदो केला म्हणजे माणसाला सुख वाटत . आणि Read More …