Public Program Ganapatipule (India)

Sarvajanik Karyakram 3rd January 1986 Date: Ganapatipule Place Public Program Type गणपतीपळे आणि मालगुंड ह्या पवित्र परिसरात राहणाऱ्या सर्व साधकांना आमचा प्रणिपात असो! गतवर्षी सहजच गणपतीपुळेला येणं झालं आणि इथलं पवित्र वातावरण पाहन ही परमेश्वरी सोन्याची खाण इतके दिवस का लक्षात आली नाही हेच मला समजलं नाही. आणि ह्या ठिकाणी जी मालगुंडची मंडळी राहतात आणि गणपतीपुळ्याची मंडळी राहतात त्यांना तरी ह्या खाणीची माहिती आहे की नाही असा मला प्रश्न पडला, तेव्हा काहीही झालं तरी आम्ही आमचा प्रोग्रॅम गणपतीपुळ्यालाच घेऊ या, असं मी सर्वांना सांगितलं आणि सर्व कार्यकर्त्यांनी हा शब्द उचलून धरला. नागपूरहन इथे मंडळी आली. तसेच इतर ठिकाणाहून, फार लांबून, दिल्लीहून, कोलकाताहून, फार लांबून मंडळी इथे आली. मद्रासची पण मंडळी इथे आली. माताजींनी गणपतीपुळ्याला एवढ महत्त्व दिलं तेव्हा काहीतरी विशेष असलं पाहिजे, असा विचार त्यांच्या मनात होता. पण इथे आल्याबरोबर त्यांना मोठा आश्चर्यजनक आनंद झाला. कारण हे वातावरण इतक शुद्ध आणि पवित्र आहे, की ते एका आत्मसाक्षात्कारी माणसालाच जाणवू शकतं. ही जाणीव व्हावी लागते. नुसतं असं म्हणून की आम्ही गणपतीपुळ्याला गेलो, ह्या अष्टविनायकाला गेलो, तिथे गेलो, असं केलं, तसं केलं, त्याला काही अर्थ रहात नाही. तुम्हाला काय मिळालं? असं विचारलं, तुम्ही अष्टविनायकाला गेलात, तुम्ही इतकी तीर्थयात्रा केलीत, तुम्हाला काय मिळालं? जसेच्या तसेच. इकडे गेलो, हे खर्च केले. तिकडे गेलो, हे केलं. दानधर्म केला, अमुक केलं, तमुक केलं, तीर्थयात्रा केल्या, पण का केल्या आणि तुम्हाला मिळालं काय? आता हे अष्टविनायक कोणी शोधून काढले? अष्टविनायक आहेत हे कोणी सिद्ध केलं? ही फार पुरातन गोष्ट आहे. आजची गोष्ट नाही. फार पुरातन गोष्ट आहे. तेव्हा त्या वेळेला जे आत्मसाक्षात्कारी मोठे लोक झाले, त्यांना लोक Read More …