Navaratri, Shri Gauri Puja Pune (India)

1986-10-05 Navaratri, Shri Gauri Puja (Hindi/Marathi) मराठी भाषा फार चांगली आहे कारण तिला तोड नाही. विशेषकरून सहजयोग हा मराठी भाषेतच समजवता येतो. आणि या ज्या गोष्टी मी हिंदी सांगितल्या त्याला कारण असे आहे की हिंदी लोकांमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल आपल्या संस्कृतीबद्दल फार कमी माहिती आहे. त्यांच्या भाषेतच नाही. त्यांना काही माहीतच नाही. पुण्य म्हणजे काय ते माहीत नाही. तेव्हा थोडेसे हिंदीत बोललेले बरे कारण तुम्हाला सगळे आधीच पाठ आहे, सगळं माहिती आहे. सगळे पाठ आणि नंतर सपाट तसाही प्रकार आहे म्हणा. पण तरीसुद्धा असे म्हटले पाहिजे की आपल्याला फार मोठी संतांची इथे शिकवण जी मिळालेली आहे हा एक इतका मोठा आशीर्वाद आहे. त्या आशीर्वादाने संस्कृती म्हणजे काय ते आपल्याला माहिती आहे. पुण्य म्हणजे काय ते आपल्याला माहिती आहे. हे चांगले-वाईट काय ते आपल्याला माहिती आहे. कळतं पण वळत नाही. कळतं सगळं की हे सांगितलेले आहे, वाईट आहे. असा पुण्यसंचय आपण पुष्कळ केलेला आहे. म्हणूनच या पुण्यामध्ये, या पुण्यनगरीमध्ये आपला जन्म झाला हे कबूल, पण तरीसुद्धा इतर लोकांना बघून आपल्याला असं वाटतं की आम्ही पुणेकर म्हणजे काही जास्त श्रीमंत नाही, मुंबईकर जास्त श्रीमंत आहेत. त्याच्याहून असं वाटतं की मुंबईपेक्षा दिल्लीचे लोक अधिक श्रीमंत. त्यांच्याजवळ पैसे जास्त असतात. तिथे दिल्लीला तख्तच असल्यामुळे तिथे त्यांच्याजवळ मान, बुवा पान, आदर हे सगळे काही बाह्यत: पुष्कळ दिसतं. तेव्हा असं वाटतं केवढे मोठे लोक आहेत हे. ह्यांचे केवढे मोठे पण आमचं काय, आम्ही गरीब अजून. पण तुम्ही पुण्यवान आहात. पण ह्या पुण्यातच असे लोक आहेत देवालाच मानत नाहीत. मोठे मोठे धुरंधर मी पाहिले. मोठे, मोठे विद्वान लोक मी पाहिले ते देवालाच मानत नाही म्हणजे इतके शिष्ट Read More …