Public Program Sangli (India)
पब्लिक प्रोग्राम, सांगली, डिसेंबर 30, 1986, मराठी Shri Mataji addressing the seekers and their questions. Below are the conversations. Seeker’s talk/ questions are in brackets. या इकडे या म्हणजे मी ऐकते. (श्री माताजींना प्रश्न विचारला ” श्री माताजी माझी जागृती झालेली आहे, पण मला व्हायब्रेशन फक्त हृदया चक्रापर्यंत जाणवतात, त्याच्यावरती जाणवत नाही. कृपा करून आपण मला मार्गदर्शन द्याल का?)अर्थातच अगदी अगदी बसा आपण, मी सांगते आता. हे म्हणाले की कुंडलिनी त्यांच्या हृदयापर्यंत येऊन त्यांना जाणीव होते, आणि वर येत नाही म्हणजे विशुद्धी चक्रावरती दोष आहे. तर आता विशुद्धी चक्रावर काय दोष आहेत हे पाहिले पाहिजे. विशुद्धी चक्र कशाने खराब होऊ शकतं, जर तुम्ही खूप बोलत असाल, भाषण देत असाल तर घसा खराब होतो किंवा सिगरेट पीत असाल तंबाखू खाल्ले तर त्यांनी घसा खराब होतो किंवा सर्दी ने होऊ शकतो. कोणत्याही कारणाने जर घसा खराब झाला, विशुद्धी चक्र खराब झालं तर ही कुंडलिनी वर चढत नाही. पण ते आम्ही बघून टाकू, कुंडलिनी आम्ही चढवून टाकू, त्याची काळजी करू नका. त्याचा काही प्रॉब्लेम नाही. हा पुढे काय? आणखीन कोण? काय प्रश्न असतील तर विचारा Shri Mataji waiting काय आहेत का प्रश्न? काय म्हणता? इकडे या इकडे…… (आपले कुठे आश्रम आहेत का?) आश्रम? आमचे अजून कुठेच आश्रम नाहीत. अहो सांगलीमध्ये सुद्धा नाहीत. सांगलीमध्ये आपले तावडे साहेब आहेत ना, त्यांच्या घरी सध्या प्रोग्राम आणि सेंटर होतात. सध्या आमचे कुठेच आश्रम बसवलेले नाहीत. कारण तुम्हाला माहित आहे, आपल्या देशाची काय स्थिती आहे. नंबर एक भ्रष्टाचार, त्यामुळे कुठेही जमीन घ्यायची म्हटली, की ते म्हणतात तुम्ही किती ब्लॅकचे पैसे द्याल? तर मी म्हटलं आमच्याकडे ब्लॅक बिग चे Read More …