Public Program

Sangli (India)

1986-12-30 Public Program Marathi, Sangli India DP-RAW, 95'
Download video - mkv format (standard quality): Download video - mpg format (full quality): Watch on Youtube: Watch and download video - mp4 format on Vimeo: Listen on Soundcloud: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

पब्लिक प्रोग्राम, सांगली, डिसेंबर 30, 1986, मराठी

Shri Mataji addressing the seekers and their questions. Below are the conversations. Seeker’s talk/ questions are in brackets. 

या इकडे या म्हणजे मी ऐकते. 

(श्री माताजींना प्रश्न विचारला ” श्री माताजी माझी जागृती झालेली आहे, पण मला व्हायब्रेशन फक्त हृदया चक्रापर्यंत जाणवतात, त्याच्यावरती जाणवत नाही. कृपा करून आपण मला मार्गदर्शन द्याल का?)
अर्थातच अगदी अगदी बसा आपण, मी सांगते आता. हे म्हणाले की कुंडलिनी त्यांच्या हृदयापर्यंत येऊन त्यांना जाणीव होते, आणि वर येत नाही म्हणजे विशुद्धी चक्रावरती दोष आहे. तर आता विशुद्धी चक्रावर काय दोष आहेत हे पाहिले पाहिजे. विशुद्धी चक्र कशाने खराब होऊ शकतं, जर तुम्ही खूप बोलत असाल, भाषण देत असाल तर घसा खराब होतो किंवा सिगरेट पीत असाल तंबाखू खाल्ले तर त्यांनी घसा खराब होतो किंवा सर्दी ने होऊ शकतो. कोणत्याही कारणाने जर घसा खराब झाला, विशुद्धी चक्र खराब झालं तर ही कुंडलिनी वर चढत नाही. पण ते आम्ही बघून टाकू, कुंडलिनी आम्ही चढवून टाकू, त्याची काळजी करू नका. त्याचा काही प्रॉब्लेम नाही. 

हा पुढे काय? आणखीन कोण? काय प्रश्न असतील तर विचारा 

Shri Mataji waiting 

काय आहेत का प्रश्न? काय म्हणता? इकडे या इकडे…… 

(आपले कुठे आश्रम आहेत का?) आश्रम? आमचे अजून कुठेच आश्रम नाहीत. अहो सांगलीमध्ये सुद्धा नाहीत. सांगलीमध्ये आपले तावडे साहेब आहेत ना, त्यांच्या घरी सध्या प्रोग्राम आणि सेंटर होतात. सध्या आमचे कुठेच आश्रम बसवलेले नाहीत. कारण तुम्हाला माहित आहे, आपल्या देशाची काय स्थिती आहे. नंबर एक भ्रष्टाचार, त्यामुळे कुठेही जमीन घ्यायची म्हटली, की ते म्हणतात तुम्ही किती ब्लॅकचे पैसे द्याल? तर मी म्हटलं आमच्याकडे ब्लॅक बिग चे पैसेच नाही आहेत. मी म्हटलं आम्ही लोकांनी पैसे एकत्र केलेत, फॉरेनर्स नि पैसे दिलेत. पण लज्जेची गोष्ट अशी की, ते म्हणतात की तुम्ही ब्लॅक ने पैसे दिलेच पाहिजेत. सरकारी जमीन घ्यायची झाली तर तुम्हाला ब्राईब दिलीच पाहिजे. पण म्हटलं आहो एक जागा तरी अशी असू दे – सत्याची. पण ते अजून काय झालंच नाही. ज्या दिवशी तुमचं नशीब उजडेल, आणि या देशात थोडा तरी भ्रष्टाचार कमी झाला, तर आश्रम होऊ शकेल. तसं आश्रम आहे एक हिमालयात. आता इथे आले होते ते योगीजी, त्यांनी हिमालयात – धरमशाला येथे  एक आश्रम – त्यांच्या घरीच त्यांची फार मोठी जमीन आहे, तिथेच एक आश्रम काढलं आहे. त्याच्यामुळे आत्ता कुठे आश्रम नाही आहे. पण तावडे साहेब आहेत, त्यांचा पत्ता घ्या आपण, आणि त्यांना जाऊन भेटा आणि ते आपल्याला सर्व काही सांगतील. आणि नंतर आपले प्रोग्राम कधी होतात?….. हा….. ( गुरुवारी संध्याकाळी सात वाजता)… हा पत्ता सांगा तुम्ही त्यांना ( sharing of address by sahajis ). 

Shri Mataji waiting for questions 

आणखीन काही प्रश्न आहेत? (गणपतीपुळ्याच्या प्रोग्राम ला येन्यासाठी परमिशन मिळेल का?) असं आहे तुम्ही सहजोगी असाल तर तुम्हाला परवानगी मिळेल. मला वाटतं एक तारखेपासून प्रोग्राम आहे, एक दोन तीन चार पाच. पाच दिवस प्रोग्राम आहे. आणखीन, तिथे राहण्याची व्यवस्था आहे, जेवणाची व्यवस्था आहे, सगळं काही आहे. आणखीन मला असं वाटतं की तीन दिवस तुम्ही येऊ शकता, म्हणजे – तीन चार आणि पाच. असे तीन दिवसाचे पण प्रोग्राम आहे आणि त्याचे 280 रुपये आहेत, तुमच्या जेवणाच्या आणि राहण्याच्या व्यवस्थासाठी. ( मित्राला आणू शकतो का?) पार झाला आहे का? ( नाही)  मग जरा कठीण दिसतंय. हे लोक त्याबद्दल फार – कारण नवीन व्यक्ती आला की तो उगीचच बडबडू लागतो. त्रासदायक आहे का? ( नाही) मग घेऊन या. सांगा माताजी नी सांगितलं. त्रासदायक असलं की, त्रास द्यायला लागला की, लोक ध्यान धारेणेसाठी आलेल्या असतात,  त्यात कुणी त्रास द्यायला लागलं की. तसं नकोय म्हणून त्या दृष्टीने फक्त सहजयोगी पाहिजे आणि दुसरं काही नाही. आणि आणखी पाच दिवसाचा पण प्रोग्राम आहे, जरी सबंध जर राहायचं असलं, तर त्याच्यासाठी किती पैसे लागतील ते. किती आहेत हो? ( 350 रुपये आहेत ). जेवून खाऊन सगळ्या प्रोग्रामचे,  म्युझिक ब्युसिक खूप छान आहे सगळं. घेऊन या तुम्ही त्यांना, सहजगी नसले तर तुम्ही पार करून आणा त्यांना. तुम्ही स्वतः सहजगी आहात तर त्यांना पार करायला काय झालं?( seeker talking )
बरं बरं, मग घेऊन या त्यांना, मस्त आहेत ते, अशी माणसं पाहिजेत आपल्याला. घेऊन या घेऊन या खूप समाधान होईल. पण नसते प्रश्न विचारायचे नाहीत. इथे सगळे सहज योगी असणार आहेत, निरनिराळ्या देशातून आलेले सहजी ध्यानाला बसणार आहेत आणि ते एक विचारांचे आहेत, त्यामुळे उगीचच राजकारण नको. आम्हाला काय राजकारण करायचं नाही आहे. आमची दिशा वेगळी आहे आपल्याला माहित आहे, त्यात त्यांना स्पष्ट सांगायचं की ते तिथे ध्यानासाठी येतात, वाटेल तितके दिवस येऊन रहा, फार आनंदाची गोष्ट आहे. 

आणखीन काही प्रश्न असतील तर सांगा? 

पण सांगली मध्ये आणि सांगलीच्या आसपास सुद्धा सहज योग पसरायला पाहिजे. तावडे साहेब एकटेच किती मेहनत करत असतात. तर सगळ्यांनी मदत करायला पाहिजे इथे. ( time at 7.12)
आपल्यातले सहजयोगी किती आहेत? हात वर करा बरं,  म्हणजे नवीन लोकं पण आले आहेत बरेच. मग आपण जागृतीची व्यवस्था करूया. 

Shri Mataji giving realization.
बरं डावा हात माझ्याकडे करायचा आणि उजवा जमिनीवर ठेवायचा. आता डावा हात म्हणजे आपली इच्छाशक्ती, आणि उजवा हात आपण जमिनीवर ठेवतो कारण इच्छाशक्ती ही जड शक्ती आहे म्हणून तिला जडतेत घालायचं. या पृथ्वीला विशेष करून महाराष्ट्रात साधू संतांनी फार कार्य केलंय. त्यांना सगळ्यांना स्मरण करून, गणेशाला स्मरण करून  उजवा हात जमिनीवर ठेवायचा. आता आपल्याबद्दल अशी कल्पना करायची नाही की आम्ही हे चुकलोय की किंवा आम्ही खूप पतित आहोत,  की आमची कशी कुंडलिनी
जागृत होईल? आणि काहीतरी चूक केली आहे, वगैरे वगैरे अशा आपल्याबद्दल न्यूनगंडाच्या भावना ठेवायच्या नाहीत. कारण असं आहे की आपल्याला हे माहीत नाही की मानव झाला हेच खूप उच्च प्रतीची गोष्ट आहे. भारतात तुम्ही, या योग भूमीत तुमचा जन्म झाला आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात झाला आहे, म्हणून तुम्ही काहीतरी विशेषचं असाल. त्यामुळे आपल्याबद्दल असले भलते विचार ठेवल्यामुळे ही लेफ्ट विशुद्धी पकडते कारण त्याला काय काय लोकांचा असा विचार सुरू आहे आम्हाला कशी होईल इतकं कठीण काम आहे  कुंडलिनीच जागरण. असं काही कठीण नाही आहे.
आता उजवा हात माझ्याकडे करायचा आणि डावा हात असा आकाशाकडे करायचा. उजवा हात म्हणजे आपल्या ज्या काय मानसिक आणि शारीरिक क्रिया होतात, त्याची जी क्रियाशक्ती आहे ती या उजव्या हातात आहे. म्हणून आपण उजवा हात असा केला आणि डावा हात वर केला म्हणजे आकाश तत्वात त्याच्यातल जे काय चुकीचं असेल ते निघून जाईल. हा असा हात ठेवायचा. ( Shri Mataji checking vibrations and balancing )
आता डोळे मिटून घ्यायचे आणि दोन्ही हात माझ्याकडे करायचे. लक्ष आपल्या ब्राह्मरंद्राकडे ठेवायचं, म्हणजे जिथे आपला टाळू असतो. आता डावा हात माझ्याकडेच राहू द्या, आणि थोडीशी मान वाकून डोक्यावर काय गार गार येतंय का बघा? मान वाकून घ्या, डोळे उघडून घ्या. डोक्यातून बघा काय गार गार येतंय का? आता उजवा हात माझ्याकडे करा आणि डाव्या हाताने बघा, इथे इथे बघायचं माण जरा खाली करून,  जरा अधांतरी हात धरा, अधांतरी हात धरून बघायचं. कोणा कोणाची वर पर्यंत येते असं आतून गार आल्यासारखं वाटेल. आता दोन्ही हात वर असे करायचे आणि विचारायचं “श्री माताजी ही ब्रह्म शक्ती आहे का?” मनामध्ये विचारायचं “हे परमेश्वराचे प्रेम आहे का? हेच ते परम चैतन्य आहे का?”असा प्रश्न विचारायचा मनामध्ये, दोन्ही हात वर करून मान पण वर करायची. आता हात खाली करा, आता बघा दोन्ही हातात तुम्हाला गार गार वाटेल. विचार करायचा नाही, माझ्याकडे बघून तुम्हाला विचार करता येणार नाही, निर्विचारीता येईल. एकदा कुंडलिनी आज्ञा चक्रावरून निघाली की निर्वीचारिता येते. आता ज्या लोकांच्या दोन्ही हातातून गार येतंय किंवा डोक्यातून गार येत आहे त्यांनी दोन्ही हात वर करावेत म्हणजे मला कळेल. सहज योगींचे आहेत, या लोकांचे नाहीत,  म्हणजे सांगलीमध्ये काहीतरी खोट आहे. हात खाली घ्या. आता ज्या लोकांचे नाही आलेत त्यांनी हात वर घ्या बर. आता असं करा तुम्ही, जर तुम्ही इकडे येऊन बसलेत ना ओळीण, हे लोक तुम्हाला पार करतील, एका मिनिटात पार करतील,  या बसून घ्या, आज पारच होऊन जायचं सगळे, चला बसून घ्या.
काल असतील सहा सात हजार माणसं, एकूण एक माणूस पार झाला. कमाल आहे. सांगलीचा काहीतरी दोष आहे – साधू संतांवर इथे काहीतरी जुलूम झाला असेल. असं बसा, तिकडे तोंड करून बसा, एक एक जागा सोडून, वरती बसा, या त्यांना पार करा ( in हिंदी ) I am really surprised, the sahaj yogis should have been here to give these people self realization… या इथे वर बसा, एक एक पायरी सोडून बसा. अरे अजून आले नाही का ते..london वाले. Are they still busy in shop?  Just now we need them the most of all, what happened? Are they coming? They had left the shops and all,I saw them.( Shri Mataji inquiring about the sahaj yogis and asking someone to get them to the venue. She asks to send the driver to locate them. Shri Mataji is giving bandhan to the misplaced sahajayogis and talking to the present sahajis, she is surprised by their absence as they knew about this public program at 6 pm.Inquiring about how far is the tawade residence? Driver leaves with the vehicle. Meanwhile the present sahajis are giving self realization to the seekers. ) 

काय तावडे, लाईट घ्या, या लोकांना लेफ्ट साईडची पकड आहे,  कुंडलिनी चढवा. ( Shri Mataji inquiring about the foreign sahajis. Does the driver know the way? They should have asked me, why didnt they ask me? ) 

काय आलं का? काय तावडे? येतेय येतेय, त्यांना लेफ्ट आहे
हे झाले का? हे.. बघा?… हो झाले (time 22.31)
आलं का?…. आलं का हातात… गार आलं?… बसा बसा
What about him? Is he allright?… This gentleman? Ok… Let him be seated.
आलं न गार, आता असं ध्याना बसायचं. आता ज्यांना झाला नाही ती लोकं या इकडं. ज्यांना झालं ती तिकडे.  तुम्ही या इकडे आपण बघू. जी मंडळी झाली नाही ते इकडे या, लक्ष माझ्याकडे द्या, हात असे ठेवा आणि विचार नाही करायचा. या बसा बसा. ( look at them,  not to come like this. This is too much) इकडे येऊन बसा इकडे येऊन बसा, सगळे येत आहेत तुम्हाला पार करायला. 

Seekers start coming to Shri Mataji to ask about their personal problems. Below are the conversations. Seeker’s talk are in brackets. 

(श्री माताजी मी रोज दुर्गा मातेचा जप करतो. माझा धंदा बंद आणि मी बँकेकडून पाच हजाराचा लोन घेतला. लोकांचे 25 हजार देण आहे) बोला की श्री माताजी तुम्ही दुर्गा आहात. तुम्ही साक्षात दुर्गामाता आहात. माताजी तुम्ही दुर्गामाता आहात आणि माझे कर्ज देऊन टाकावे.
(माताजी तुम्ही दुर्गामाता आहात आणि माझे कर्ज देऊन टाकावे. माताजी तुम्ही दुर्गामाता आहात आणि माझे कर्ज देऊन टाकावे. माताजी तुम्ही दुर्गामाता आहात आणि माझे कर्ज देऊन टाकावे.) बरं वाटलं? बसून घ्या.
( time 30.22) सांगलीला काहीतरी दोष असावा, इथे कुठे साधू संतांना छळलं होतं का? छान आलं ना? गार वाटलं ना? मग काय पार झालात. 

(श्री माताजी, येथून 25 किलोमीटरवर एक गाव आहे, नाव आहे सुई. तिथे आम्ही एक सेंटर सुरू करायचं म्हणतोय. साडोलीच्या अभय पाटलांनी आम्हाला कल्पना दिली ही.)अरे वा, करा करा अगदी सुरू करा. अवश्य करा, खेडेगावात खूप लवकर सुरू होतं. सडोलीला पण सेंटर आहे, त्यांनी सडोली ला खूप काम केलं. खेडेगावात सोपं असतं शहरापेक्षा. कोल्हापूर मध्ये पण आम्ही केलं,पण तिथेही नाही. सांगलीला जर लोक उभी झाली तर होईल. कोल्हापुरात काय आहे, ब्राह्मणांनी देवाच्या नावावर खूप अत्याचार केलेत, म्हणून मग देव रुस्त तिथे. कोल्हापुरात समजू शकते, पण सांगलीला का नाही? इथे कोणाला छळलय आहे का? 

(झाला होता अत्याचार. गणपती मंदिरातल्या पाटणकर पुजारींना  काढून दुसऱ्या जोगळेकर पुजारींना लावलं राणीसाहेबांनी. आणि दरवर्षी गणपती मिरवणूकित भांडण होतात) हो का! मग त्याची ही फळ आहेत, मी म्हणते सांगलीला हे असं का व्हावं? मूर्खपणाच्या गोष्टी आहेत, गणपती काय त्यांचा आहे का स्वतःचा? सांगलीच्या राणी कोण आहेत? पद्मिनी बाई, मी ओळखते त्यांना. 

(नमस्कार, म्हणजे माझ्या डोक्याला त्रास होतो. चिडायला होतं)
कुणा गुरुजींकडे गेली होती का? (  नाही) तुला लिव्हरचा त्रास आहे. ( घरात अशी शांतता नाही, आई, भाऊ आणि चार बहिणी आहेत. वडील नाही. भावाचं दारूचं व्यसन वाढलय) भावाचं चे लग्न झालंय का ( नाही अजून) मग कमवतो कोण घरात? ( आई, आई भांडी घासते) सगळे लग्न का नाही करत? ( सगळ्यांचे झालेले आहेत, फक्त माझं नाही ) मग का नाही करत? आम्ही सहज योगात तुझं लग्न लावून देऊ, चांगला मुलगा बघून, फुकटात. आईला विचार ( मी आईला विचारते), तुझं नाव काय? (शिंदे) बोलव आईला, काय शिकलीस तू? ( सातवी शिकले आणि आता सर्विस करतात, कापड दुकानात. भावाचा विचार आला की मला टेन्शन येतं, आणि डोकं दुखतं)( conversation with seeker’s mother and her) आम्ही तिचं चांगलं लग्न करून देऊ, पण आम्ही जात-पात मानत नाही, हुंडा पण घेत किंवा देत नाही ( चालतंय की. पण ही खूप चिडते, चिडली की समोर असेल ते फेकते, थोडाही माझा – आईचा विचार करत नाही. लहानपणापासून अशीच आहे) बर बघते मी आत्ता तिला, आणि पार बीर झाली तर ठीक होईल, मग लग्न करून घेऊ ( आणि शिक्षण) काही गरज नाही, हरकत नाही, परदेशातल्या चांगल्या मुलाशी लग्न करून ड्यू , त्याला सगळं सांगू, स्पष्ट सांगू, शिक्षण नाही पैसे नाही. तो जर राजी असेल तर लग्न करायला हरकत नाही. ( इतक्या लवकर मला लग्न करायचं नाही) तू 17 वर्षाची आहे म्हणून आता तर लग्न करायचं नाही, पुढच्या वर्षी बघू. एक वर्ष ती ध्यान करू दे ह्यांच्याकडे येऊ दे आणि मग एक वर्षांनी बघू, इतक्यात कसं लग्न करणार? लग्न काय सोपी गोष्ट नाही, तुम्ही म्हटलं तर थोडी होणार. ( पण हिचा राग नडतो, लग्न केलं पण काय गोंधळ करून परत घरी आली तर? भयंकर चिडखोर आहे, मला माझंच काही सुधरत नाही) अगोदर आम्ही तिला एक वर्ष ठीक करतो – तुझा आजार. आणि ठीक जर झाला नाही तर कोणाच्या गळ्यात मला धोंड बांधायचं नाही. तुम्ही काय करता?    ( मी भांडी घासते, नवरा दोन वर्षांपूर्वी गेला. मुलगा संगतीमुळे दारू प्यायला लागला, सर्विस आहे पण घरात पैसे देत नाही) बर तू बस, तुला जागृती देतो…तुम्ही पण करून घ्या… चला बसा. 

(पंधरा दिवस झालेत माझे डोळे दुखतात. गेले आठ दिवस लाल झाले आणि पाणी येतं). तुम्ही काजळ कोणत लावता? झोप येते का रात्री? (  मी काजळ नाही लावत, रात्री झोप येत नाही आणि दिवसा बरोबर झोप होत नाही). तुमच्या घरी कोणी गुरु आहेत? ( नाही, आम्ही करतो सहज योग दीड वर्षापासून). मग असं करा तुम्ही, मागच्या बाजूला दिवा लावून  ध्यान करा. ( ते दोन-तीन दिवस करत आहे),  तरीसुद्धा डोळे जळजळतात? बर तुम्ही उद्या येणार आहात ना पूजेला, मी देते तुम्हाला काजळ. ( मेणबत्ती तून खूप काळ निघत) काळ दिसते अजूनही, काढायला पाहिजे. बर तुमचं लग्न झालं? मुलं बाळ आहेत? ( हो तीन).. बरं चल मग (  time 40.40) 

(श्री माताजी, मगाशी जागृती घेताना, माझं अंग खूप कापत होत. एक्दम गार पडलं, मणका दुखल्या सारखा झाला ). आता बरं आहे ना? हे काळ काय लावल? काळ नाही लावायचं, त्यांनी झालं असेल. कोणाची आराधना करतोस? ( पांडुरंगाची ). आता विचारा ” माताजी तुम्हीच साक्षात पांडुरंग आहात का? ( माताजी तुम्हीच साक्षात पांडुरंग आहात का?माताजी तुम्हीच साक्षात पांडुरंग आहात का? माताजी तुम्हीच साक्षात पांडुरंग आहात का?) आलं का? गार आलं का? आता काय कुठे जायला नको, ते काळ ही लावायला नको. ते भाह्मण लावतात का काळा बुक्का? मग तुम्ही कशाला लावायचं? ते तुम्हाला मुर्खात काढतायेत. आता सहज योग करा. 

Music program begins. Around the time 1.10.10, a marathi bhajan ends in the video and it is translated into English by a sahaji. The meaning of this bhajan is very insightful as it signifies the importance of the presence of sahajis during the awakening of kundalini. Also, we now understand as to why Shri Mataji was so concerned, earlier, about the absence of the foreigner sahajis during the public program.