Public Program Shrirampur (India)

श्रीरामपूरच्या सर्व साधकांना आमचा प्रणिपात . ह्या सुंदर स्वागतपर गायना नंतर अगदी गहिवरून आलं . तसच वडाळ्याला इतकी मंडळी एकत्र जमली होती . आणि दोन क्षणात सगळेजण पार झाले हे बघून असं वाटत कि ह्या महाराष्ट्र भूमी मध्ये इतकी शक्ती आहे आणि त्यातून इथे लोकांमध्ये इतकी भक्ती आहे त्याच सार्थक झालं पाहिजे . आणि ते सहजच होत . आजकालच्या काळात देवाचं नाव सुद्धा लोकांना ऐकावंस वाटत नाही . पुष्कळांच असं म्हणणं आहे कि देव नाहीच आहे . पण हि काही शास्त्रीय प्रवृत्ती झाली नाही . जे सायन्टिफिक  लोक आहेत त्यांनी जर असं आपलं ठाम मत करून ठेवलं कि हि गोष्ट नाहीच आहे म्हणजे ते सायन्टिफिक नाही . कारण त्यांचं डोकं उघड असलं पाहिजे . मुभा असली पाहिजे . विचारांना मुभा असली पाहिजे . कोणाचाही विचार बांधून आणि त्यावर विश्वास ठेऊन काम करण  हे आंधळे पणाचे लक्षण आहे . म्हणूनच संतसाधुनी ह्या महाराष्ट्रात आपलं रक्त ओतलं आहे . काहीतरी विशेष ह्या भूमीत असलं पाहिजे . आणि वारंवार त्यांनी सांगितलं आहे कि परमेश्वर हा आहे फक्त तुमच्यातला परमेश्वर जागृत झाला पाहिजे . ते काही आजकालचे भ्रामक भामटे लोक नव्हते . त्यांनी जे सांगितलं ते सत्य सांगितलं तंतोतंत ते खर आहे . हे सिद्ध करण आज शक्य आहे त्यावेळी शक्य नव्हतं . म्हणून लोकांनी त्यांना छळलं त्यांचं ऐकलं नाही . पण आज ते शक्य आहे .  ह्या धकाधकीच्या काळामध्ये चारीकडे माणसाला जेव्हा वणवा पेटल्या सारखा वाटतो आणि कुठे जाऊ आणि काय करू अशी त्याची स्तिती झालेली आहे . अशा ह्या भ्रमित स्तिती मध्ये तो विचार करू लागतो कि परमेश्वर आहे तर तो आहे तरी कुठे ?. आणि मग तो माझी का मदत करत नाही . पुष्कळशे Read More …