Public Program (India)

Public Program Marathi Maheshwari Dharamshala India आपण सर्वानी थोडी वाट पाहिली . मला क्षमा करा मला माहित नव्हतं आज प्रोग्रॅम आहे म्हणून . आत्ता कळलं कि इथे प्रोग्रॅम आहे म्हणून . तेव्हा येन झालय तरी सर्वानी क्षमा करावी . सर्वप्रथम पैठण मध्ये आम्ही अलोत . आमचे पूर्वज ह्याच गावी रहात असत असे म्हणतात . ह्या गावाचं नाव पूर्वी प्रतिष्टान होत . आणि देवीला फार मानत असत असा हा देश विशेष आहे . त्यातल्या त्यात इथे बरेच वर्ष देवीची आराधना वैगेरे होत असे . आणि देवी बद्दल पुष्कळ माहिती लोकाना  होती . ज्ञानेश्वरांची सुद्धा कृपा झालेली आहे . सर्वानीच ह्या जागी फार कृपा केलेली आहे . आणि पैठण हे गाव सगळ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे . पण मला इथे इतके दिवस येता आलं नाही . इतकी इच्छा  असताना सुद्धा आणि आज आपण सर्वानी बोलावलं हि मी आपली कृपा समजते . आज जो विषय मी आपल्या समोर मांडणार आहे तो आपण कदाचित ऐकला असेल .  हा जो कि  ज्ञानेश्वरी मध्ये सहावा अध्याय जो ज्ञानेश्वरांनी वर्णिला आहे . आणि तो वाचू नये असं सांगण्यात आलं होत . आणि त्या मुळे पुष्कळांना ह्या गोष्टीची माहिती नव्हती . कि आपल्या मध्ये एक अशी सुप्तावस्थेत बसलेली अशी शक्ती आहे ज्या शक्तीने आपल्याला आत्मसाक्षात्कार मिळतो . हे वाचू नये असं का सांगितलं हे मला सांगता येणार नाही . कारण हि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे . सर्व आपण पूजा पाठ परमेश्वराबद्दल श्रवन ,ध्यानधारणा वैगेरे सर्व करतो पण तरीसुद्धा परमेश्वर मिळत नाही . त्या शिवाय पुष्कळशा लोकांनी ज्यांचा देवावर विश्वास नाही मला असा प्रश्न टाकलेला आहे कि जे देव देव म्हणतात त्यांच्या तरी आयुष्यात देव आलेला दिसत नाही . Read More …