Talk

(India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

(1987-12-01_Unknown_Talk_Marathi_India_DP-Op…)

        आपण लोकांनी आमची स्तुती केली आणि सर्व देवतांचे आणि देवांचे हृदय आवरून घेतलेलं दिसतंय आणि सगळे अगदी पूर्ण आनंदात आले आहेत. परमेश्वराचं कार्य आम्ही सुरू केलेलं आहे आणि शुद्ध कार्य आहे. आपल्याला माहिती आहे की, पूर्ण हृदयानी ह्या लोकांनी आपल्याला हे अनुदान केलेलं आहे, कारण आपण आमची स्तुती केली. ही स्तुती खेडोपाडी पोहोचवली पाहिजे. लोकांना कळलं पाहिजे, संदेश दिला पाहिजे की कल्याणाचे मार्ग आता उघडे झाले आहेत. जे काही आजपर्यंत लोकांनी खोट्या गोष्टी पसरवून देवाला बदनाम करून ठेवलं आहे. ती आज अशी वेळ आली आहे की आपण परमेश्वराला सिद्ध करू शकतो. परमेश्वराला सिद्ध करण्याची ही फार मोठी वेळ आलेली आहे. मोहम्मद साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे, की ज्या वेळेला पुनरूत्थानाचाचे दिवस  येतील, त्याला त्यांनी कयामा म्हटलयं… त्यावेळेला तुमचे हात बोलतील, जसं आपल्या सहजयोगामध्ये आपल्या हातावरती कळतं कोणची चक्र धरली आहेत. तुमचे हात बोलतील आणि तुमचे पाय बोलतील आणि तुमच्या विरुद्ध साक्ष देतील की तुमच्यात काय चुका आहेत असे स्पष्ट त्यांनी म्हटलेलं आहे. प्रत्येकानी सहजयोगासाठी पुष्कळ कार्य केलेलं आहे. मच्छिंद्रनाथ पासून सर्वांनी. ते एकच आहेत. ते एकच जीव आहेत. त्यांनी अनेकदा जन्म घेतलेले आहेत. तेव्हा मोहम्मदसाब असोत किंवा दत्तात्रेय असोत किंवा मच्छिंद्रनाथजी असोत हे सगळे एकच जीव आहेत आणि त्यांनी दुसऱ्याही देशांमध्ये जन्म घेतलेला आहे. ह्याची प्रचिती आपल्याला येईल की मी हे जे म्हणते ते खरं आहे आणि त्यांनी अनेकदा जन्म घेऊन जगामध्ये धर्म स्थापना केली. पण शुद्ध आचरण ठेवून सुद्धा पूर्णत्व येत नाही. आत्मानुभावाशिवाय पूर्णत्व येत नाही म्हणून आत्मानुभव हा गांठला पाहिजे. शुद्धाचरण तरी का? असा प्रश्न जर केला तर त्याला म्हणायचं आत्मानुभवासाठी आणि आत्मानुभव कां तर आत्मानुभावाशिवाय पूर्णत्व येत नाही आणि आज ज्या दशेत आपण आहोत त्याला आपण मानवी दशा म्हणू. ह्याच्या पलीकडची जी दशा आहे ती आपल्याला जर प्राप्त करायची असली तर आत्मानुभव पाहिजे, आणि अनेक लोकांना हे होण्यासारखं आहे. आजचा सहजयोग हा सामुदायिक आहे. तेव्हा तुम्ही जर आपल्या घरी बसून म्हणाल की आम्ही भजन करतो, आम्ही माताजींची आरती उतरवतो किंवा आम्ही फोटोला आम्ही नमस्कार करतो त्यांनी होणार नाही. सामूहिकतेत…. सामूहिकतेमध्ये सहज योग केला पाहिजे. तो जर समष्ठीत होईल तरच तो वेष्ठीत उतरू शकतो असा हा सहज योग आहे.

                दुसरा आधी कळस मग पाया अशा पद्धतीने आम्ही सहजयोग बसवला आणि आपल्या मध्ये थोडासा प्रकाश दिला. त्या प्रकाशात आपण स्वतःचच बघू लागले वैगुण्य. मी काही म्हटलं नाही की असं करू नका, तसं करू नका. हळूहळू सर्व वैगुण्य आपोआप नष्ट होत गेलं आणि ह्या लोकांची तर ही कमाल आहे की एका रात्रीत सर्व व्यसनं ह्यांची सुटलीत, एका रात्रीत. हे मोठे लोक आहेत, मोठे जीव आहेत असंच म्हटलं पाहिजे. मोठे पिंड आहे आणि आपल्या महाराष्ट्रात सुद्धा अनेक अशे पिंड आहेत. तेव्हा त्यांना जागृत करा, त्याची त्यांना कल्पना करून द्या असा आमचा पूर्ण आशीर्वाद आहे आपल्याला आणि ह्या सर्वांच्या तर्फे प्रेमाचाच सगळ्यांना निरोप आहे आणि अत्यंत प्रेमाने ह्यांनी तुमचं ऐकून घेतलं आणि तुमच्या प्रेमाच्या भाषेला ह्यांनी बरोबर साथ दिली आहे आणि आपण सर्वच एक आहोत, एकाच आईची मुलं आहोत. आपण सगळ्या विश्वात एकच धर्मात आहोत असं समजून आपल्याला धन्य मानलं पाहिजे की जसं नामदेवांनी म्हटलं आहे की पूर्वजन्म आम्ही बहु पुण्य केले. ते सगळं पुण्य मला आता दिसून राहिलंय सगळ्यांचं आणि त्या पुण्यामुळे हे सगळं प्राप्त झालेलं आहे. आता फुल नाही फुलाची पाकळी म्हणून जे काय ह्यांना देता आलं ते त्यांनी दिलेलं आहे ते आपण स्वीकारावं.

              दुसरं असं की आमच्यातर्फे हे आपण जर इथे आलांत तर मी आपल्याला देईन म्हणजे हे आम्ही ते एक गाव होतं. त्याला…. मियाँ की टाकळी म्हणून एक गाव होतं. त्या गावी जाऊन आम्ही लेक्चर देत होतो. त्या वेळेला सात वेळेला माझ्यावरती हा प्रकाशाचे झोत आले आणि त्या सातही…. त्याचं चित्र एका बाईच्या हातून सहज त्याच्यात आलं तर परवा कॅमेरा मध्ये माझे आठ हात अष्टलक्ष्मीचे आले. तर अशा तरतऱ्हेनी फोटोमध्ये अनेक गोष्टी दिसतायत आणि ह्या लोकांच्या वरती असं दिसलं जसं की काय फुलासारखे अशे प्रकाश ह्यांच्यातन निघतांना दिसले. तेव्हा हे सगळे प्रकार होतय आणि आपले कॅमेरा जो आहे तो हे धरतोय त्यामुळे हे साक्षांत होतंय. इतकंच नव्हे पण आकाशात माझे फोटो आलेत. आकाशामध्ये यांनी एक ढग पाहिला. तो ढग असा त्यांना वाटलं की गणपती सारखा दिसतोय. त्यांनी फोटो घेतल्यानंतर त्याच्यात ना असे  तार निघाले आणि ते जाऊन माझे अशे दोन फोटो आकाशात आले. ते सुद्धा फोटो ह्यांनी घेतलेले आहेत. अशे आज कालच्या कॅमेरामध्ये ह्याचा दृष्टांत होतो आहे कारण ह्याच्याशिवाय नास्तिकाचं डोकं ठिकाणं होणार नाही. पण तरी ते म्हणतील तुम्ही कांही खोटं नाटं केलंय. ज्याला नाही मानायचं त्याच्यासमोर काय? म्हणून आपण एवढं लक्षांत ठेवलं पाहिजे की आता पुष्कळ तर्हेनी आपल्याला सिद्ध होतयं. आजचच उदाहरण मी सांगते मी महालक्ष्मीच्या देवळाजवळ ह्यांच्यासाठी सगळ्यांसाठी चांदी विकत घेत होते लग्नासाठी. त्यावेळेला जेव्हा मी परत यायला लागले…मी पाय उच…. माझा एक पाय आंतमध्ये मोटारीत गेला दुसरा पाय उचलेना. म्हटलं होतंय काय माझ्या पायाला? असा काय जड झाला? कुणी धरून ठेवलं? पृथ्वीनं मला का धरून ठेवलंय? परत मी उतरून बाहेर आले. आल्यावर बघते तं घंटा चालू होती आणि आरती चालली होती. महालक्ष्मीनीच पाय धरले की कुठे चाललीस तू म्हणून? त्याच्यानंतर घंटा संपली, आरती संपल्याबरोबर एकदम पाय सोडला आणि मी वर येऊन बसले. अशातऱ्हेनी अनेक चमत्कार आणि सहजयोगात तुम्हाला इतके चमत्कार दिसतील पण ते अशे कांही हिरे देणं वगैरे अशा प्रकारचे चमत्कार नाहीत पण पदोपदी तुम्हाला वाटेल की परमेश्वर तुम्हाला बघतोय. मुलांना त्यांच्यामध्ये सुबुद्धी येणार. आमच्या सहजयोगातली मुलं नेहमी क्लासमध्ये फर्स्ट येतात. सगळे स्कॉलरशिप मिळवतात. मोठ्या मोठ्या ह्याच्यावरती गेलेत. सर्वसाधारण एक कोळी मुलगा सुद्धा, एक साधारण कोळी मुलगा सुद्धा आज ग्रॅज्युएट झालेला आहे आर्ट्समध्ये आणि त्याला स्कॉलरशिप्स मिळाली. म्हणजे फार ह्याचे चमत्कार होतात. हे पण काहीच नाही आहे. हे नुसती प्रलोभनं आहेत. खरं म्हणजे काय आहे की पूर्णत्वाला उतरणं आणि परमेश्वराच्या आनंदात…. आनंदाच्या डोही…. आनंदाच्या डोही आनंद तरंग तशातली स्थिती आहे आणि त्याच्यात येऊन सगळ्यांनी आनंदात राहावं, मजेत राहावं, सगळ्यांनी सुखी व्हावं हीच एक आईची इच्छा आहे. इतकच की आमची सगळ्या शक्त्या तुम्ही घ्या, त्या सगळ्या वापरून घ्या आणि त्याच्यावरती तुम्ही सगळी, सबंध तत्व ते जाणून घ्या. इतकच नव्ह पण त्याच्यावरती सगळी मस्टरी घ्या असाच आमचा सगळ्यांना आशीर्वाद आहे. 

असो…  

श्रीमाताजी: धिस इज अ महामाया फोटोग्राफ? (This is a Mahamaya Photograph)?  कुठली आहे ती पूजा?

सहजयोगी: सहस्रार

श्रीमाताजी: आता ऑस्ट्रेलिया मध्ये आमची पूजा झाली होती. सहस्त्रारच्या दिवशी तर त्याचे हे फोटो आहेत. ते सगळ्यांना आपण घ्या. त्याच्यात चैतन्य आहे. त्याच्यासमोर बसून कसं ध्यान करायचं वगैरे ते समजून घ्या… आपड्या..(समजलं नाही.. अस्पष्ट) आणि हे बॅजेस आहेत. हे बॅजेस मध्ये तोच फोटो आहे ज्याच्यामध्ये पहिल्यांदा किरण माझ्या डोक्यावर येऊ लागलेत..…दोघंही या…