Public Program Sangamner (India)

1987-12-22 Sangamner Public Program (Marathi) १९८७-१२-२२, मराठी सार्वजणिक कार्यक्रम, सगंमणेर – १/३ (मराठी भाषणाचे लिखीत रूपातंर) पर्मेश्वरी शक्तीला शोधंणार्‍या सर्व साधकांना, भाविकांना {मोठा विलबं (Big pause)….} आमचा प्रणिपात. एवढ्या थोड्या वेळातचं सगंमणेरला सहजयोगाची जी प्रगती पाहिली ते म्हंणजे एक फारचं मोठं समाधान आहे. कुंडंलीनी शास्त्र आणि चक्रे हे एक गुप्त शास्त्र होत. जनक राजाने एका नचिकेताला फक्त आत्मसाक्षातकांर दिला, इंद्राला सुद्धा आत्मसाक्षातकांर घ्यावा लागला अशी एक दोन उदाहरणे आपल्याला पुर्व काळात मिळतात. इतिहास सुद्धा असचं सांगतो की फारच कमी लोकनां आत्मसाक्षातकांर झाला होता. पण संत साधू हे वारंवार आपल्या कार्यासाठी भारतात आले, विशेष़तः महारा्ष्ट्रात आणि त्यांनी अनेकोपरी समजवून सांगितंल की आत्मानुभंवाशिवाय तुम्हाला काहीही मिळालेल नाही. आधंळ्याला जशी दृष्टी नसते तसीचं मानवला जोपर्यतं तो आत्म्याला प्राप्त होत नाही तोपर्यतं त्याला सत्य कळु शकत नाही, केवळ सत्य कळू शकत नाही. धर्मानी फारतरं फार मनुष्य सदाचरणी बनू शकतो. पण कोणत्याही धर्मातला मणूष्य मग कोणत्याही तो जातीचा असेना कां? कोणच्याही वर्णाचा असेना कां? कोणतेही पाप करु शकतो, त्याला कोणी रोकू शकत नाही कारण त्याला रोकणारी जी शक्ती ती आत्म्यामध्ये स्थित आहे आणि तो आत्मा अजून आपल्या चित्तात प्रकाशित झाला नाही म्हंणून सामर्थ्थ माणसांमध्ये नाही की त्या पापाच्या प्रलोभनातंन तो मुक्त होईल. सहजयोगाचे अनेक फायदे आहेत, पण सर्वात मुख्य म्हंणजे असे की, सदाचंरणानी मणूष्याला पुर्नत्व येऊ नाही. आत्मानुभंवातनं त्याला पुर्नत्व येतं. जो पर्यतं आत्म्याचा प्रकाश आपल्या चित्तात पडत नाही तो पर्यतं आपल्याला खरं आणि खोटं याचा पुर्ण अदांज, सपुंर्ण कल्पना येऊ शकत नाही, त्याशिवाय आत्मानुभंव म्हंणजे जिवा शिवाची भेट, म्हंणजे पर्मेश्वराशी संबंध, म्हंणजे पर्मेश्वरी शक्तिचा आपल्यामध्ये आलेला सबंधं प्रवाह. जशी आज आपण सगळीकडे वीज बघतो Read More …