Puja Pune (India)
[The Marathi part starts at 16:50 on the audio clip] Puja date 3rd December 1990 – Place Pune Marathi speech starts at 16:49. काल मी सविस्तर सांगितलंच आहे कि आपल्याला अध्यात्म्याची एवढी संपदा मिळाली आहे त्याची आपल्याला कदर असायला पाहिजे. आपल्याला आपलीच कदर नाही तर आपल्या संपदेची काय कदर असणार. भारतातला प्रत्येक मनुष्य त्याहूनही महाराष्ट्रातला मनुष्य हा अत्यंत परमेश्वराच्या प्रेमाचा पुतळा आहे असं समजलं पाहिजे. आपल्याला आपलीच कल्पना नाही. आपण जर खेड्यांत राहतो आणि आपल्याला फार त्रास आहेत तर आपल्याला असं वाटतं मी काय क:पदार्थ आहे . तशातली गोष्ट नाही. आपला उपयोग फार होणार आहे. फक्त आपण काही काही गोष्टींना लक्षात घेतलं पाहिजे. सर्वप्रथम म्हणजे धर्माबद्दल आपण पूर्ण जागृत असलं पाहिजे. प्रत्येक धर्म जे आपल्या देशात आहेत किंवा दुसऱ्या देशात आहेत, त्या सर्व देशांमध्ये त्याचं नुसतं आपण असं म्हणू की यांत्रिकरण करून टाकलं आहे. किंवा सगळ्यांमध्ये पैसे कमावण्याची एक किमया बनवलेली आहे. हा काही धर्म असू शकत नाही. देवाला पैसे काही समजत नाहीत, त्याला बँक समजत नाही, काही नाही. मला जर कोणी म्हटलं की चेक लिहा तर मला समजत नाही. मी दुसऱ्याला म्हणते तुम्ही लिहा मी सही करते. तेंव्हा पैशाने जे लोक तुम्हाला लुटतात इथे देवाच्या नावावर, त्यांना एक एक कवडी देणं हे अगदी चुकीचं आहे. पहिली गोष्ट. आणि आपण कोणी मनुष्य भगवे वस्त्र घालून आला की लागले त्याच्यापुढे लोटांगण घालायला. तो मनुष्य तिथून जेल मधून सुटून आलेला आहे आणि तिथे भगवे वस्त्र घातलेला आहे, असं कुणाच्याही डोक्यात येत नाही. सरळ लागले आपण. खेड्यातले लोक साधे सरळ. मग त्याने सांगितलं की बघा, तुम्ही इतके पैसे दिले की तुमचं एवढं भलं Read More …