Public Program Satara (India)

सत्याला शोधणाऱ्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार . सत्य म्हणजे काय आणि आपण ते का शोधतो हे समजून घेतलं पाहिजे . सत्य म्हणजे जे संत साधूंनी आणि अवतारणा मध्ये सांगितलं आहे . तुम्ही हे शरीर ,मन ,अहंकार ,बुध्दी या उपाधी नसून शुध्द आत्मा आहात . हे सत्य आहे . आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सर्व सृष्टी मध्ये व्यापलेली अशी अत्यंत सूक्ष्म शक्ती जिला आपण परमचैतन्य अस म्हणतो . हे दोन सत्य आपण शोधून काढले पाहिजेत . आणि ते का आपण शोधतो कारण आजच्या काळात या कलियुगात विशेषतः आपण बघतोआहे कि प्रत्येक तऱ्हेनी आपल्याला त्रास होत आहे . जर माणसा जवळ पैसा असला तरी  तो बेकार जातो आणि नसला तरी तो त्रासात असतो . ज्या देशानं मध्ये अत्यंत विपुल असा पैसा आहे त्या देशातले लोक आज इथे आपल्या कडे आलेले आहेत . त्यांच्या जवळ मोटारी ,गाड्या सगळं काही ,श्रीमंत लोक आहेत . ते ह्या महाराष्ट्रात एव्हड्या साठी आलेत कारण पैशाच्या धुंदीत तसच विज्ञानाच्या घमेंडीत त्या फुशारकीत एकाकी जीवन झालं आहे . त्या एकाकी जीवनाला ते कंटाळले कारण त्यामुळे अनेक त्रास झाले आहेत . अमेरिके सारख्या देशामध्ये आज तुम्हाला आश्चर्य वाटेल कि ६५ टक्के लोक घाणेरड्या रोगाने पीडित आहेत आणि लवकरच ते ७० टक्के होतील अस भाकीत आहे . त्यातून त्यांना सुटका नाही . तरतऱ्हेचे रोग त्यांना झाले आहेत . रोगाचं नव्हे तर तिथे हिंसाचार फार बोकाळला आहे . तुम्ही कोणत्याही गावात ,खेडेगावात अस बसू शकत नाही . किंवा रात्रीच्या वेळेस एकट कुठ जाऊ शकत नाही . न्यूयार्क ला जायचं म्हंटल तर आपले दागिने ,मंगळसूत्र सगळं काढावं लागत नाहीतर लपवाव लागत . तिथं कुणी तुम्हाला सोडणार नाही . इतकी तिथे हिंसाचाराची वृत्ती वाढली Read More …