Talk, Paane ke baad dena chaahiye swagat samaroh

New Delhi (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

1999-12-05 Talk in Delhi: Paane ke baad dena chaahiye swagat samaroh

[Marathi translation Hindi talk, (excerpt) scanned from Marathi Chaitanya Lahari]

सत्याच्या प्रकाशात आलेल्या सर्व सहजयोग्यांना नमस्कार, इतक्या मोठ्या संख्येने तुम्हाला इथे एकत्र जमलेले पाहून माझे हृदय खरोखरच भरून आले आहे. शिवाय माझ्या जीवितकालामध्ये एवढे सहजयोगी जगभर झाले याचेही मला मोठे समाधान आहे. सत्य जाणल्याशिवाय मानवी जीवन अर्थशून्य आहे; तो प्रकाश मिळत नाही तोपर्यंत मनुष्य आयुष्यभर भरकटतच राहतो. पण मी हा माणसाचा दोष समजत नाही. दोष असेल तर त्याला व्यापून राहिलेल्या अंधाराचा. म्हणूनच सहजयोगामधून प्रकाश मिळाला, तो सहजयोग आणखी खूप लोकांना द्या, तुम्हाला जे मिळाले आहे ते इतरांना वाटा म्हणजे सहजयोग आणखी पसरेल, त्याच्यातूनच या भूतलावर एक सुंदर शांतीचा स्वर्ग निर्माण होणार आहे. ही तुमचीच जबाबदारी आहे. भारतात आता है कार्य खूप जोराने चालले आहेच. तशी ही भारतभूमि योगभूमि आहे आणि इथे हे होणार हे खूप पूर्वीचं भाकित केले गेले आहे. भारत ही माझी मातृभूमि आहे आणि इथे येण्याचा आनंद शब्दांतून व्यक्त करणे अवघड आहे. तुम्हा सर्वाना भेटल्यावर तर हा आनंद द्विगुणित होतो. त्यातूनच इथे खन्या अर्थाने स्मरमय अर्थात आत्म्याचे राज्य प्रस्थापित होईल; स्व-तंत्राचा अर्थही तोच व हेच आता इथे घटित झाले आहे. म्हणूनच तुमच्यासारखे आणखी लोक सहजयोगात आणण्याचे कार्य तुम्हाला करायचे आहे. नुकतेच मला समजले की काही परदेशीय सहजयोगी इथे आले आणि सहजयोगाचे कार्य करण्यासाठी ओरिसात गेले; तिथे नऊ कंद्रे त्यांनी सुरू अलिकडे झालेल्या भीषण वादळात तेथील सहजयोग्याचे कसलेही नुकसान झाले नाही. तुर्कस्थानमध्येही (तिथे दोन हजार सहजयोगी आहेत) भूकप झाला तेव्हा तेथील सर्व सहजयोगी वाचले, कुणालाही कसलाही अपाय झाला नाही. तेव्हा सहजयोगात तुमचे पूर्ण संरक्षण होणार आहे हा मी पुन्हा सांगत असते की तुम्हाला जो केली. एकाही

स्वतःमधील परमात्मा जाणला पाहिजे असे ते सांगत, त्या विश्वास बाळगा. तुम्ही आता ध्यानामधून चांगल्या स्थितीला आले आहात तेव्हा ही इच्छा तुमच्यानध्ये प्रबळ झाली पाहिजे. त्या इच्छापूर्तीचा ध्यास तुम्हाला लागला पाहिजे. म्हणजे सांसारिक जबाबदारी सांभाळूनही कार्य करणे हे प्रत्येकाचे परम कर्तव्य आहे हे तुमच्या लक्षात येईल. त्यातूनच या भारतवर्षातही कार्य होईल. हे अवघड नाही कारण दुसर्यांची कुंडलिनी जागृत करण्याची शक्ति तुम्हाला मिळालीच आहे. एरवी त्या शक्तीचा काय उपयोग ? प्रत्येकाने कमीत कमी एक हजार लोकांना जागृति देण्याचा निश्वय केला तर किती प्रचंड कार्य होईल हे बघा. त्यामध्ये कसला संकोंच वाटायची जरूर नाही, अगदी राजरोसपणे लोकाना सहजयोग चला म्हणजे सगळीडें काळच्या थोर संतांच्या कविताही त्यांनी गुरु-ग्रंथामध्ये समाविष्ट केल्या. आपण सहजयोगांतही कुणा एका संतालाच मानतो असे नाही तर सर्व थोर संतांचा आदर राखतो. शीख धर्मात नंतर-नंतर पंथ-भावना बळावली व शिखांचे वेगळे असे विशिष्ट रुप-पेहराव इ. दिसू लागले. त्यामुळे बाह्य स्वरूपाला व कर्मकाण्डांना जास्त महत्त्व येऊ लागले आणि अंतरात्म्याचा शोध क्षीण होऊ लागला, पण शीख समाजाला सहजयोगात आणणे अवघड नाही कारण गुरु नानक साहेब सहजचीच भाषा बोलत होते. उदा. ते म्हणत ‘सहज समाधि लागो. कुण्डलिनीवद्दलही त्यांनी लिहून ठेवले आहे. सहजयोगात आपण ते प्रत्यक्ष अनुभवतो. पण त्यांनी फक्त त्यांच्या दोनच शिष्यांना आत्मसाक्षात्कार दिला, म्हणून त्याचा फारसा उपयोग झाला नाही व लोकांचा बाह्यातील कल वाढत गेला. म्हणून ते स्वतःला मुसलमानांचा पीर तसाच शिखांचा गुरु असे म्हणत. पण त्याचा गर्भित अर्थ लोकांच्या लक्षात आला नाही. खूप खूप पसरलेल्या अ-गुरुचा सांगत सुळसळाटही कमी होईल, आणि त्यांच्या कचाट्यात अडकलेल्या लोकांची सुटका होईल. जास्तीत जास्त लोकांबरोबर आपल्याला सहजयोगाचा आनंद कसा मिळवता येईल इकडेच तुमची दृष्टि वळली पाहिजे. अशा स्थितीत येण्याचा तुम्ही सतत प्रयत्न केला पाहिजे. आज गुरु नानक साहेबांचा जन्मदिवस आहे व भारतात सगळीकडे तो उत्साहाने साजरा होत आहे. गुरु नानक सहजबद्दलच बोलायचे, धर्मामध्ये उपास-तापास, तीर्थ-यात्रा, ग्रंथपठण इ. अवडंबर त्यांना मान्य नव्हते. उलट प्रत्येकाने पुढच्या वेळेस मी भारतात परत येईन तेव्हा याच्यापेक्षाही खूप पटीने जास्त लोक सहजयोगात असतील अशी मी आशा करते सर्वांना अनंत आशीर्वाद.