Public Program Akluj (India)

यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष आणि इतर संचालक वर्ग ह्या तालुक्यात राहणारी सर्व साधक मंडळी अबालवृद्ध सर्व भक्त मंडळांना तसेच अत्यंत सुंदर स्वरात भजन गाणाऱ्या ह्या सर्व भजन मंडळींना आमचा नमस्कार असो . सर्व प्रथम फार उशीर झाला आपल्याला वाट पाहावी लागली याच मला फार वाईट वाटत . त्या बद्दल मी क्षमा मागते सर्वांची . पण जे व्हायचं असत जी वेळ योगायोगाची असते त्या वेळेस ते कार्य घडत . असं मानून तुम्ही सर्वानी मला क्षमा करावी . ह्या कारखान्याचे दिग्दर्शन झाल्या पासून मला फार ह्या देशा बद्दल आशा वाटू लागली आहे . कारण आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती खरोखरच फार हालाकीची आहे . आणि जरी थोड्या जागी हि परिस्थिती सुधारली आहे तरी सर्व देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रात अजून पुष्कळ स्तिती सुधारायची आहे . पण तरी सुद्धा अशा संस्था निघाल्या मुळे आर्थिक परिस्थिती हि सुधारू शकते आणि त्यांनी सुधारून इथे नंदनवन उभं केलं आहे हे पाहून मला खरोखर फार आनंद झाला . पण हे लक्षात ठेवलं पाहिजे कि नुसती आर्थिक परिस्थिती सुधारून सगळं ठीक होत नाही . आम्ही परदेशात फिरत असतो आणि माझ्या बरोबर चौदा देशातले परदेशी पाहुणे इथे आलेले आहेत . अर्थात ते इथे नाहीत साताऱ्याला सरळ गेले ,पुढल्या वेळेस त्यांना इथे घेऊन येईन . त्या लोकांना पाहिल्यावर हि गोष्ट लक्षात येते कि आर्थिक परिस्थिती जरा ठीक झाली तर माणूस वाईट मार्गाला लागतो . त्याच लक्ष मग अशा मार्गावर जात कि जिथून त्याच पतन सुरु होत . ह्या देशांची स्तिथी जरी वरून चांगली दिसते कारण यांच्या जवळ चांगली घर आहेत ,मोटारी आहेत ,सगळी व्यवस्था आहे दळणवळणाची ,काही अशे हालअपेष्टा नाहीत. पण तरीसुद्धा यांच्या मनाच्या Read More …