Public Program Deolali Pravara (India)

स्वधर्म सूर्य विश्व पाहो , स्व म्हणजे आत्मा . त्याच्या धर्माचा सूर्य सर्व विश्वानी पहिला पाहिजे . असं त्यांनी सांगितलं होत . शिवाजी महाराज नेहमी म्हणायचे कि स्वधर्म जागवावा . शिवाजी महाराज सुध्दा एक साक्षात्कारी पुरुष होते . त्याशिवाय एव्हडं संतुलन एखाद्या माणसात येऊ शकत नाही . एव्हडा धर्म अंगात बाणवू शकत नाही . आणि इतकं संतुलन त्याच्या मध्ये होत ते येऊ शकत नाही . आणि त्यांच्यावर देवीची विशेष कृपा होती . त्यांनी सुद्धा स्वधर्म जोडावा ,नेहमी ते स्वधर्म जोडावा असं म्हणायचे . आता स्वातंत्र्य हा शब्द पण आपण पहिला तर स्व च तंत्र जाणणे हाच अर्थ होतो . स्व म्हणजे आत्मा त्याच तंत्र जाणल्या शिवाय आपल्या भारतात तरी काहीही साध्य होणार नाही . म्हणून भक्तीचे मार्ग काढले ,भक्ती करा ,परमेश्वरात रत राहा . वाईट मार्गाला जाऊ नका ,वाईट काम करू नका . त्याच्यात पण एकांगी पणा करायचा . भक्ती म्हणजे भक्ती . म्हणजे एखाद्या घाण्याला बैल बांधावा आणि त्याला झापड घालावी तशी आपण गोलगोल त्यालाच फिरत आहोत .  तेव्हा संतांनी स्पष्ट लिहिलं आहे कि जगामध्ये तीन तऱ्हेच्या प्रवृत्या आहेत . एक असते ती तामसिक दुसरी असते ती राजसिक आणि तिसरी जी उत्तम असते ती सात्विक . तामसिक लोक जे आहेत ते एखाद्या कोणत्या तरी चुकीला धरून बसतात किंवा कोणत्या तरी एका कडेला जातात आणि ते धरून तेच तेच करत बसतात . म्हणजे ती तामसिक वृत्ती . आता आपल्या कडे कोणत्याही गोष्टीला धरलं म्हणजे उपास करायचा म्हणजे सगळे दिवस उपास करायचा . हे कुणी सांगितलं आहे . देवांनी तर सांगितलं नाही ,कुठेही तुम्ही शास्त्रात  आधार दाखवा मला ,तुम्ही उपास करा देवाच्या नावाने असं लिहिलेलं नाही . Read More …