Public Program Kamhala (India)

 कामहाला गावचे सरपंच साहेब तसेच उपसरपंच ,नंतर इथली जी सेवक मंडळी आहेत ,इथले रहिवाशी आहेत सगळ्यांना आमचा प्रणिपात . हि हनुमानाची जन्मभूमी आणि अंजनी देवीचं  हे स्थान  आहे . त्यामुळे त्या वेळच वर्णन करावं तितकं थोडं आहे . आम्ही सहजयोगा मध्ये अंजनी देवींना महासरस्वतीच स्थान मानतो . फार उच्च स्थानावर आहेत त्या . जी परमेश्वराची शक्ती जी आदिशक्ती जिचे तीन अंग आहेत पैकी जीनी सर्व सृष्टी रचली ती महासरस्वतीची शक्ती आहे . आणि तीच अंजनी देवी आहे असं आम्ही मानतो आणि ते खर आहे . आता त्यांचा इतिहास सांगायची आज वेळ नसली तरी त्यांच्याच कृपेने आणि हनुमानाच्या आशीर्वादाने च आज मला इथे येता आल . त्याबद्दल आता परत दिलगिरी दाखवली पाहिजे कि मी त्या दिवशी म्हंटल होत त्या दिवशी येऊ शकले नाही ,पण आज हि संधी मिळाली आणि तुम्हा सर्वाना भेटून मला आज फारच आनंद झाला आहे . बघितलं म्हणजे अगदी जीव भरून येतो . आणि काय बोलावं आणि कस सांगावं ते समजत नाही . कि आपल्या देशाची काय हालाखीची स्तिती आहे ती लोकांना काही माहीतच नाही असं वाटलं . ते बघतच नाहीत कशे लोक राहतात त्यांची राहणी खाणी कशी आहे ,घरदार कशी आहेत ,कशा परिस्तितीत राहतात ,कस तरी आयुष्य काढून राहिले . ओसाड जमिनी पडलेल्या आहेत ,त्यांनी तरी काय करायचं कस जगायचं ?. पण तिकडे कुणाचं लक्ष दिसत नाही मला वाटत . म्हणून एकच मी असा प्रयोग करायचा ठरवला आहे . तो जर जमला तुमच्या ह्या गावच्या जमिनीत ,जर ती मिळाली वेळेवर, तर पंचानी वैगेरे ठराव ठरवून त्यांची कबुली दिली असली तरी अजून ते व्हायला किती वेळ लागेल ते सांगता येत नाही पण जर का Read More …