Shri Chandrama Puja Vaitarna (India)

Shri Chandrama Puja, Vaitarna (India), 18 February 1984. आता तुम्हां लोकांना सांगायचे म्हणजे असे की आज तुम्ही पुजेला आलात ना तर पुजेचा उपयोग असा झाला पाहिजे कि तुमच्यामध्ये ज्या काही देवी देवता आहेत त्या जागृत झाल्या पाहिजेत. आणि त्या देवी देवता जागृत होण्यासाठी आजची पूजा आहे. तेव्हा वेगळया वेगळया देवी देवतांना कसे लोक जागृत करतात? ते शिकून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही जरा मोठे झाले की तुम्हाला मंत्र शिकवून देऊ. मग तुम्ही दुसऱ्यांनाही जागृती देऊ शकता. मग तुम्हाला हे कळेल की त्यांच्यामध्ये कुठे काय धरलेले आहे? त्यांना कोणचे त्रास आहेत? ते कसे स्वच्छ करायचे? हे तुमच्या लक्षात येईल. मग आलं म्हणजे तुम्हीसुद्धा योगीजनच झालात ना ! तुम्हीसुद्धा नुसते असे हात फिरवून त्यांची कुंडलिनी जागृत करू शकता! आणि त्यांच्या डोक्यावरती थंड येईल. तुम्ही बघाल, आताही तुम्ही कुणावरती करून बघा. तुम्हाला दिसेल कि तुमच्या हातातून अशी कुंडलिनी तुमच्या हातातून वाहते आहे. तुम्ही जरासं असं वरती केलंत कि तुम्हाला वाटेल डोक्यावरती थंड थंड आलं. तीनदा उचलली कि तुम्हाला वाटेल थंडच येईल. पण हयाच्यासाठी म्हणून नेहमी पूजन करावं लागतं. आता तुम्हाला फोटो वगैरे नसले तर तुम्ही फोटो घ्या. त्याला थोडेसे कुंकू लावायचे सकाळी, त्याला नमस्कार करून आणि शाळेला जायचे. घरी झोपायच्या आधी फोटोवरती एक दिवा ठेवायचा लहानसा. दोन्ही हात फोटोवर ठेवायचे, पाय पाण्यात ठेवायचे थोडेसे, आणखी नंतर मीठ घालायचे त्या पाण्यात, थोड़ा वेळ असं बसायचं फोटोकडे हात करून आणि मग पाय पुसून सुकवायचे. बस एवढंच ध्यान आहे. दुसरं काहीही करायचे नाही. पाच मिनीटं संध्याकाळी आणि पाच मिनिटं सकाळी.. सकाळच्या वेळी एक हात आधी फोटोकडे असा करायचा. डाव हात जेव्हा फोटोकडे असेल तर उजवा हात खाली. आणि Read More …