Public Program Pimpri, Pune (India)

आता आपल्या समोर श्रीमती उमाशंशी भालेराव यांनी इतकं सुंदर भजन म्हंटल आहे , कि त्या भजना मध्ये जे काही सांगायचं ते आधीच सांगून टाकलेलं आहे . तुम्हा सगळ्यांच्या तर्फे आणि इथे जमलेल्या सहजयोगांच्या तर्फे ,पिंपरीच्या सर्व सहजयोग केंद्रांच्या तर्फे मी त्यांचे आभार मानते . आणि परत परत असं सुश्राव्य भजन भाषणा ऐवजी ऐकायला मिळेल अशी मला आशा आहे . कारण मी भाषण देऊन देऊन आता कंटाळून गेले आहे . आणि किती भाषण दिली तरी ती डोक्यात केव्हा येणार आहेत असा विचार येतो . सहजयोगा बद्दल अनेकदा पिंपरीला प्रोग्रॅम झाला आणि आपण सर्व मंडळी तिथे आला होतात . त्याच्यावर आपण विचारविनिमय केला आहे .  सहजयोग म्हणजे तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे . सहज म्हणजे तुमच्या बरोबर जन्मलेला ,असा हा योग तुम्हाला प्राप्त करण्यासाठी काहीही करावं लागणार नाही अशी परिस्थिती आता आलेली आहे . सहजच ते घडत सुद्धा म्हणून मराठीत सहजला दोन अर्थ आहेत सहज म्हणजे तुमच्या बरोबर जन्मलेला आणि सहज म्हणजे अगदी सहजगत्या ,विनासायास . आणि जे आपल्या बरोबर जन्मलेलं आहे ते सगळं सहज आहे . आपल्या डोळ्यांनी आपण काही बघतो ते किती सहज बघून आपण जाणतो कि हे काय आहे . कानांनी आपण ऐकतो ते किती सहज जाणतो कि ते किती सुश्राव्य आहे . अशा प्रकारे सहजयोग सुद्धा अत्यंत सहज असून तो तुमच्या बरोबर जन्मलेला एक योग आहे . आता हा सहजयोग प्रत्येकाला उपलब्ध का व्हावा हे पुष्कळांनी विचारलं . कारण पूर्वीच्या काळी  कुंडलिनी जागरण म्हणजे  काहीतरी बागुलबुवा होता . अशी सगळ्यांनी कल्पना केली होती . कुंडलिनी जागरण म्हणजे काही सोपं काम नाही ,कुंडलिनी जागरण व्हायचं म्हणजे काही काही प्रकार होतात . सहावा अध्याय म्हणजे Read More …