Seek the Eternal Kuala Lumpur (Malaysia)

Public Program Day 1, Kuala Lumpur, Malaysia 01-11-1990 मी सर्व सत्याच्या साधकांना नमन करते. अगदी सुरुवातीलाच, आपल्याला एक गोष्ट माहित असणे आवश्यक आहे की सत्य तेच असते जे आपण आपल्या मानवी जाणीवेने संकल्पना मांडू शकत नाही किंवा त्याचे आयोजनही करू शकत नाही. जे होते ते आहे आणि जे आहे तेच राहील. तर ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला या मानवी पातळीपेक्षा आत्म्याच्या पातळीवर उतरावे लागेल. जोपर्यंत तुम्ही हे करत नाही तोपर्यंत तुम्ही जे काही विचार करता तसेच तुम्ही ज्या काही संकल्पना मांडतात त्यामुळे समस्या निर्माण होतात. म्हणूनच सर्व धर्मग्रंथांनी एक गोष्ट सांगितली आहे की शाश्वततेचा शोध घ्या आणि क्षणभंगुरतेला त्याच्या सर्व समज आणि मर्यादांसह हाताळा परंतु हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही आत्मा बनाल. सर्व संतांनी सांगितले आहे की तुम्ही स्वतःला जाणले पाहिजे, जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखत नाही तो पर्यंत भ्रम आणि अज्ञान दूर होणार नाही. जर आपण चिन मधिल कन्फ्यूशियस पासून ते लाओ-त्झे पर्यंत सर्व पाहिले तर या सर्वांनी याबद्दल बोलले आहे. ख्रिश्चनांसाठी, ख्रिस्तांनी तेच सांगितले आहे, शीखांसाठी गुरू नानकांनी सुध्दा तेच सांगितले आहे की तुम्ही सत्य शोधले पाहिजे. आणि जेव्हा या लोकांनी तुम्हाला सहजयोगाबद्दल या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत तेव्हा हे समजून घेणे फार महत्वाचे आहे की तुम्ही आमच्यापैकी कोणावरही आंधळे पणाने विश्वास ठेवू नका. अंधविश्वास तुम्हाला कुठेही नेणार नाही,  कारण तुम्ही सत्य शोधत आहात. त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला सत्य कळत नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याही गोष्टीवर अंधविश्वास ठेवू नका. जर तुम्ही एखाद्या गोष्टीवर आंधळे पणाने विश्वास ठेवत असाल किंवा एखाद्या गोष्टीमध्ये तुमचा जन्म झाला असेल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की त्याच्या पलीकडे काहीतरी आहे. शिवाय सहज म्हणजे ‘सह’ म्हणजे Read More …