New Year Puja, You All Have to Become Masters in Sahaja Yoga (India)

Marathi  Transcription – New Year Puja 31st December 2000, Kalve  Marathi  Transcription – New Year Puja 31st December 2000, Kalve  मराठीत बोलायचं म्हणजे आपल्याकडे, बायकांना विशेष करून, सगळे सणबीण अगदी पाठ असतात. आणि प्रत्येक सणाप्रमाणे व्यवस्थित अगदी चाललेलं असतं. सकाळी चार वाजता उठून अंघोळ करून, बंबात पाणी घालून, मग बसायचं, कशाला – पूजेला. आणि इतके आपण लोक कर्मकांडी आहोत महाराष्ट्रात, की तिकडे दिल्लीला बरं. तिकडे लोकांना हे कर्मन्ड  कांड  नाही. म्हणून लाखोंनी लोक पागल. पण महाराष्ट्रात शक्य नाही. तिकडे, पंढरीला गेलच पाहिजे टाळ कुटत. आणि एकदा तुम्ही पंढरीला गेलात की पारच होत नाही. खरोखर व्हायला पाहिजे. पण जेवढे लोक पंढरीला जातात ते पार होत नाहीत. उलट वाजत राहतात. नाहीतर डोक्यावर तुळशीची एवढी मोठी घागर घेऊन, कुठे निघाले – आळंदीला. कशाला? कुणी सांगितलं? ज्ञानेश्वरांनी सांगितलं? त्यांच्या पायात वहाणा नव्हत्या, तर त्यांच्या पालख्या  घेऊन येतात.  त्या पालख्या घेऊन जायचं आणि प्रत्येक गावात जाऊन जेवायचं. म्हणजे स्वतःची काही इज्जतचं नाही. त्या ज्ञानेश्वरांच्या नावावर प्रत्येक गावात जायचं आणि जेवत बसायचं. आणि गाववाले म्हणतात, वा वा , आम्ही केवढं केलं पुण्य. अहो भिकारडे लोक आहेत. हे भिकारडे आहेत. ज्ञानदेवाच्या नावावर भीक मागत फिरतात. त्यांचं तुम्ही काय पोट भरता? अशा भिकाऱ्यांना जेववून तुम्ही कोणचा लाभ घेणार आहात? हे असे पुष्कळसे धंदे आपल्या महाराष्ट्रात चालूच आहेत. ते काही संपत नाहीत. रस्त्यानी जाल तर दिसतातच कुठे ना कुठे. तर हे सगळं बंद करा. स्वतः नाही दुसऱ्यांना सांगायचं. काय मूर्खपणा आहे हा ? कशाला हे करता तुम्ही?  कुठे लिहलंय , कोणच्या शास्त्रात लिहलंय? असं ज्ञानदेवांनी लिहलंय का? असं का करता? हे सगळं सुटायला पाहिजे.                आता हळदी कुंकू करायचं. त्या Read More …

Public Program Pune (India)

Public Program, Pune, India 7th March 2000 हिंदी भाषण आता मराठीत बोलते, कारण अजूनही आपण हिंदी भाषा काही आकलन केलेली नाही. ती करायला पाहिजे. ती आपली राष्ट्रभाषा आहे. ती भाषा अवश्य यायला पाहिजे. साऊथ इंडिया मध्ये सुद्धा लोकांना ती भाषा आली पण महाराष्ट्रात काही येत नाही. मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे. दुसरं असं आहे मराठी भाषेसारखी भाषा नाही हे मला कबुल आहे. फारच उत्तम भाषा आहे. त्या बद्दल शंका नाही. पण जी आपली राष्ट्रभाषा आहे त्याच्याशी जर आपण संबंधित झालो तर राष्ट्रभाषेबरोबर आपलीही भाषा वाढेल. आणि लोक समजतील की मराठी भाषा काय आहे. पण जर आपण त्याच्या बरोबर सोवळं पाळलं आणि फक्त आम्ही मराठी शिकणार; मग या देशाचे आपण एक नागरिक आहात, त्यातली जी राष्ट्रभाषा आहे तिला आत्मसात केलं पाहिजे. अहो आम्ही काय मराठी भाषेतच शिकलो, मराठी शाळेत शिकलो आणि मराठी मिडीयम मध्ये शिकलो. पण आमचे वडील मोठे भारी देशभक्त होते. त्यांनी सांगितलं, काही नाही, हिंदी आलीच पाहिजे. आणि मलाही व्यासंगच फार होताना, तेंव्हा आमच्या घरी सगळ्यांना हिंदी आणि मराठी दोन्ही भाषा येतात. तेंव्हा आपल्याकडे सुद्धा एक असं व्रत करावं की आम्ही हिंदी भाषा ही शिकून घेऊ. हि माझी विनंती आहे. आज आपल्या देशाचे अनेक तुकडे झालेले पाहून फार दुःख वाटतं. आणि विशेषतः महाराष्ट्रात, ती देशभक्ती नाही; जशी पाहिजे. आश्चर्याची गोष्ट आहे. शिवाजी महाराजांसारखे झाले जिथे थोर पुरुष तिथे ती देशभक्ती नाही. पैशाकडे लक्ष, कसेही करून पैशाकडे लक्ष घालायचं. पैशाने सुखी झालेला मनुष्य मी आज तरी पाहिलेला नाही. पैसे आले म्हणजे मग सगळे प्रकार सुरू. दारू प्या मग आणखीन करा, हे करा, जेवढे पैसेवाले लोकं आहेत त्यातला एखादाच मी दानवीर पहिला. Read More …

Shri Mahalakshmi Puja, The Universal Love (India)

Shri Mahalaxmi Puja, The Universal Love, Kalwe, India (1992-1230) [Shri Mataji speaks English] आता मराठीत बोललं पाहिजे, कारण पुष्कळ लोकांना इंग्लिश भाषा समजत नाही. काही हरकत नाही, इंग्लिश भाषेत काही राम नाहीये. मराठी भाषेसारखी भाषा नाही. आणि परत आत्म्याचं ज्ञान घ्यायला मराठी भाषा आहे. आणि इतकं संतसाधूंनी इथे कार्य केलंय, नाथपंथीयांचंच आम्ही कार्य करतो आहे कुंडलिनीचं. पण सांगायचं असं कि मराठी भाषा जरी फार उच्च दशेला असली आणि महाराष्ट्रात सर्व विश्वाची कुंडलिनी असूनसुद्धा महाराष्ट्रीयन लोकांचं डोकं मात्र आजकाल उलटं बसलेलं आहे ते कशाने ते मला माहित आहे. जे पोलिटिक्स मध्ये चाललेलं आहे तेच आपल्या आज घरोघर, सहजयोगामध्ये झालेलं आहे. ह्याचा पाय त्याने ओढायचा, त्याचा पाय त्याने ओढायचा, म्हणजे आहे तरी काय मला समजतच नाही. अहो जर तुमच्यामध्ये सामुहिकता आली नाही, समष्ठी आली नाही तर या वैष्टी स्वरूपासाठी का आम्ही इथे एवढे दिवस इथे मेहनत केली आणि संत साधूंनी हेच सांगितलं का? इथपर्यंत सांगितलं, ‘तेची सोयरिक होती’. अहो त्या ज्ञानेश्वरांनी एवढं कशाला सांगितलं? ते कोणासाठी सांगितलंय? मला समजत नाही. परदेशातल्या लोकांसाठी सांगितलेलं दिसतं. कारण इथं कोणावर परिणामच होत नाही त्याचा. तुमचे सोयरिक कोण? तेच सहजयोगी. पण ह्याचं हे चुकलं आणि त्याचं ते चुकलं आणि एवढी मोठमोठाली मला पत्र पाठवतात. मला हे ऐकून बरं वाटेल का? देवीला प्रसन्न केलं पाहिजे कि तिला अशा गोष्टी लिहून पाठवल्या पाहिजे? आता प्रत्येक वेळेला सांगायचं म्हणजे सुद्धा मला वाटतं कि मी कोणाशी बोलते. अहो तुम्ही संत, साधू, तुम्हाला साधू केलं मी, संत केलं, तुम्हाला इतक्या उच्च दशेला आणलं. धृवासारखं तुम्हाला नेऊन बसवलं त्या अढळ पदावर आणि तुम्ही आता कुठे इथे पडले आहात, मला समजतच नाही याला Read More …

Shri Lakshmi Puja Chalmala, Alibag (India)

लक्ष्मी पूजा – अलिबाग (भारत) १९९१ (श्री माताजींचे स्वागत गीत) माँ का नाम अति मिठा है, कोई गाके देख ले |  माँ का नाम अति मिठा है, कोई गाके देख ले || आ जाती है माँ कोई, बुलाके देख ले | माँ का नाम अति मिठा है, कोई गाके देख ले | माँ का नाम अति मिठा है, कोई गाके देख ले || आ जाती है माँ कोई, बुलाके देख ले | माँ का नाम अति मिठा है || (श्री माताजींचा जयजयकार) श्री माताजी निर्मला देवी की जय ………………………….. की जय………………………….. की जय ह्या चाळमाळ गावात अनेकदा आलोय आम्ही आणि मुंबईकर पण आले आणि सगळ्या जगातले लोक इथे आलेले आहेत. मला ऐकून आनंद झाला, की लोकांची दारू सुटली, हि फार मोठी गोष्ट आहे. ह्या कोकणात दोन त्रास आहेत. एक तर म्हणजे काळी विद्या फार आहे , जशी काय ती एक इंडस्ट्रीच आहे आणि आता ते कमी झालं आहे बरंच. काळी विद्या फारच कमी झाली. ही सहजयोगाची कृपाच म्हणायची की त्या काळी विद्येला बंध पडले. त्या बद्दल प्रचार करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे दारू पिणे, हा पण प्रकार फार झाला होता इकडे, कारण वेळ असला म्हणजे मग आणखीन काय करायचं तर बसून दारू लोक पितात. त्यामुळे किती नुकसान होतं , तिकडे विचार नाही, पैशे किती नासतात तिकडे विचार नसतो. तेव्हा तर सहजयोग असा पसरत गेला; मुंबईकरांनी थोडी मेहनत करायला पाहिजे, निरनिराळ्या इथल्या  खेड्यातन्– पाड्यातून सहजयोगाचा प्रचार केला पाहिजे. लोकांची जागृती झाली म्हणजे आपोआप त्यांच्या ह्या वाईट सवयी सुटून जातील आणि अत्यंत त्रासात आहेत ते. ह्या काळ्या विद्यामुळेच इथे लक्ष्मिचं स्थान, लक्ष्मिची Read More …

Shri Ganesha Puja (India)

Shri Ganesha Puja Date 15th December 1991: Place Shere Type Puja मी ह्यांना सांगत होते की आज आपण गणेशाची पूजा करूयात. गणेशाचे फार महत्त्वाचे कार्य आपल्या शरीरात होते. म्हणजे मन, बुद्धी आणि शरीर. सगळ्या गोष्टींवरती ताबा म्हणजे गणेश. गणेशाने जे आपल्याला विशेष दान दिलेले आहे, ते म्हणजे सुबुद्धीचे आहे. सुबुद्धी जी आहे, ती मागून मिळत नाही. कोणी म्हटलं, की मी तुला सुबुद्धी देतो, तर कधीच मानलं नाही पाहिजे. (इंग्लिशमध्ये बोलल्यानंतर मराठीत बोलतांना मला एकदम शब्दच मिळत नाहीत. दोन्ही भाषेत बोलायचे म्हणजे कंटिन्यूटी नाही येत. बरं, तर विज्डमला शब्द नाही मराठीत, काय हो?) सूज्ञता! सूज्ञता जरा गंभीर शब्द आहे. बरं, त्याला आपण सूज्ञता म्हणतो. सुबुद्धीपेक्षा सूज्ञता. त्या सूज्ञतेला आपण आपल्या अंगामध्ये बाणले पाहिजे. ती बाणायची कशी? तर वर्तमान काळांत रहायला शिकले पाहिजे. हे मी शिकवते. आता वर्तमानकाळात, ह्यावेळेला, आपण इथे बसलेलो आहोत. ही पूजा होते आहे. तर ह्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत. तर ह्यावेळेला सूज्ञता काय आहे? हे की आता पूजा होते आहे. पूजा करायची आहे. पण ह्याचवेळी आपण जर विचार केला पुढचा, की आता मला बस मिळेल की नाही? घरी जेवायला मिळेल की नाही? काहीतरी असे झाले तर! माझे जाणे झाले नाही तर? किंवा माझ्या मुलाचे असे. हे जर आपण विचार केले तर तुम्हाला पूजा लाभणार नाही. भूतकाळाचा विचार केला, हे असे झाले, तसे झाले, असे केले, तर मग परत घोटाळा होणार. तर हा जो सूज्ञपणा आहे, हा सूज्ञपणा आपल्यामध्ये बाणला पाहिजे. ते बाणण्याची एक पद्धत आहे. प्रत्येक वेळी आपण कुठेही असलो तरी, आता मी वर्तमानात आहे की भूतकाळांत आहे ते पाहिले पाहिजे. कारण भूतकाळ हा संपलेला आहे आणि भविष्यकाळ Read More …

Press Conference Kolhapur (India)

Press Conference, Kolhapur, India, 20-12-1990 काळापासून आपल्या देशामध्ये कुंडलिनी शक्ती आहे . असे वर्णन केले आहे.  आता किती अनादी पुस्तकात आहे ते मी तुम्हाला सांगते.  चाप्टर लिहून घ्या. कारण जे काय असते. संस्कृत वाचलेले नाही. त्याच्यामुळे माहिती नाही.  पान 427 आता हे पुस्तक घ्या. पुष्कळ आहे. हंस उपदेश  आता योग तुरा मनी, हे आधी शंकराचार्य यांनी  लिहले ते बघू या. योग तुरा मणी,  लिहिल्यानंतर त्याच्यात त्यांनी सात्विक चर्चा केली, वैचारिक चर्चा आहे. त्यात एक शर्मा म्हणून धर्ममार्तंड आहेत. त्यांनी त्यांचं डोकं खाल्लं, त्यांचं सोडा. मग त्यानंतर सौंदर्य लहरी म्हणून पुस्तक लिहिलं. ऋषी याग, ध्यान विद्या, योग सुख उपदेश, योग कुंडलिनी, उपनिषद म्हणजे कुंडलिनी जागरण.  कई उपनिषद, देवीभागवत, योग पुराण, लिंग पुराण, अग्नि पुराण, नंतर शंकराचार्यांची सौंदर्य लहरी .त्याशिवाय आपल्या महाराष्ट्रात मार्कंडेय. मार्कंडेय कुठ झाले माहित आहे का .आता आपल्याला माहितीच नाही. आपल्यात काय असते ते. ते झालं महाराष्ट्रात साडेतीन पीठ आहेत. आता हे हिंदी मध्ये लिहिलेलं कल्याण आहे. यांचा अभ्यास फार  चांगला आहे. आपण सगळं  जाणतो असं नाही. आपण मराठीत सगळं जाणतो पण या लोकांनी  हिंदीत पुष्कळ कार्य केले आहे .मराठी तेवढं कार्य झालेला नाही. आता यांनी लिहिले ओमकार स्वरूप साडेतीन सगुण शक्ती पीठ महाराष्ट्रात आहेत. कोण  कोणचं एक  मातार गड म्हणजे ज्याला आपण माहूरगड म्हणतो. एक गाणं आहे माहुर गडावरी तुझा वास, दुसरं कोल्हापूर मध्ये, तीन तुळजापूर. मातापुर ची महासरस्वती,तुळजापूरची महाकाली, कोल्हापूरची महालक्ष्मी, . त्यांचं सर्व काही यांनी दिलेल आहे काय काय ते. महाराष्ट्रात समर्थ रामदास यांनी  देवीला रामवरदायनी असं म्हटलं आहे. कारण शिवाजी महाराज तुळजापूर भवानी ला जात असत. तेथे त्यांना वरदान मिळाले ह्यांनी एवढे मोठे काम केले Read More …

Public Program Kolhapur (India)

1990-1219 PUBLIC PROGRAM, KOLHAPUR, INDIA  शोधणाऱ्या आपण सर्व सहजयोग्यांना, तसेच अजून जे सहजयोगी झाले नाहीत अशा सर्वांना आमचा प्रणाम नमस्कार!        आशा ठेवली पाहिजे की सत्य आहे तिथे आहे आणि आपण त्याची कल्पना करू शकत नाही, त्याच्यावर कोणचंच आरोप पण करू शकत नाही, किंवा आपण ते बदलूही शकत नाही. हे सत्य काय आहे? हे सत्य आहे की आपण मन, बुद्धी, अहंकार या उपाधी नसून आपण आत्मा आहोत, आणि दुसरं सत्य असं आहे की, चराचरामध्ये एक सूक्ष्म शक्ती जिला वेदामध्ये ऋतंभरा प्रज्ञा असं म्हटलेलं आहे. तसंच शास्त्रामध्ये तिला परमचैतन्य असं म्हटलेलं आहे. बायबलमध्ये त्याला ‘कूल ब्रीझ ऑफ द होली घोस्ट’ म्हटलेलं आहे. आदिशंकरानी तिला ‘सलिलं सलिलं’ म्हणून पराशक्तीचे वर्णन केलेले आहे. ही अशी शक्ती जी सर्व जिवंत कार्य करते ती जिवंत कार्य करणारी ही शक्ती आहे आणि तिला जाणणे तिचा बोध होणे हे अत्यंत आवश्यक आहे. मानवी चेतनेपर्यंत आपण आपल्यावर उत्क्रांतीमध्ये आलोत. एवोलूशन मध्ये आलो आहोत, पण अजून मानवी चेतनेत आपल्याला अजून केवल ज्ञान किंवा केवल सत्य मिळालेलं नाही. त्याचा अर्थ असा की प्रत्येकजण एकच गोष्टीला एक आहे असं म्हणत नाही. म्हणजे आता आपल्याला डोळ्यांनी दिसतंय मी आपल्यासमोर उभी आहे म्हणून तुम्ही म्हणू शकता की माताजी आमच्यासमोर उभ्या आहेत. पण विचारांच्या बाबतीत तसं नाही. प्रत्येकाचा विचार वेगळा वेगळा बनतो, त्यामुळे धारणा वेगळ्या आहेत, प्रणाल्या वेगळ्या आहेत. कुणाला कम्युनियम पाहिजे, तर कुणाला डेमोक्रेसी पाहिजे, कुणाला एक राजा असलेला तो चालेल, अशारीतीने अनेक तऱ्हेचे राजकारणातसुद्धा, समाजात प्रत्येक ठिकाणी एक-एक वेगळा विचार करतात.          लोकमान्य टिळकांचं असं म्हणणं होतं की आपण आधी स्वातंत्र्य घेतलं पाहिजे आणि आगरकरांचं असं म्हणणं होतं की नाही आधी समाजाची व्यवस्था ठीक Read More …

Sarvajanik Karyakram Shrirampur (India)

1990 -12-11Public Program, Shrirampur सत्याला शोधणाऱ्या आपण सर्व साधकांना माझा नमस्कार .सत्याबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सत्य  हे आहे तिथे आहे. आपण ते बदलु शकत नाही. ते आपल्या काबूत घेऊ शकत नाही. आणि काहीतरी त्याच्यातनं  सांगून ते सत्य आहे असं पटवून देऊ शकत नाही. आणि जे लोक असं  करतात  ते वास्तविकतेपासनं फार दूर आहेत. आणि स्वतःचं  नुकसान करून घेणं , समाजाचं नुकसान करून घेणं आणि उलट्या गतीनी ते आपल्या  नाशाला प्राप्त होतात .  याला कारण असं आहे की सत्य एक आहे ते म्हणजे  तुम्ही हे शरीर , मन , बुद्धी , अहंकार या उपाधी नसून शुद्ध स्वरूप आत्मा आहात .  दुसरं सत्य असं आहे की सर्व चराचरामध्ये परमेश्वराची प्रेम शक्ती जिला आपण ब्रह्मचैतन्य म्हणतो ती कार्यान्वित आहे . तेव्हा ह्या ब्रह्मशक्तीला  प्राप्त  होणं  हा  योग  आहे. आणि सहज म्हणजे सह म्हणजे तुमच्या बरोबर जन्मलेला असा ह्या योगाचा जन्मसिद्ध अधिकार तुमच्यामध्ये आहे. पण हे सगळं , मी सांगत असताना आपण माझ्यावर  अंधश्रद्धा ठेऊ नये. उलट एखाद्या वैज्ञानिकासारखं,  सायंटिस्टसारखं  आपलं मन उघडं  ठेवलं पाहिजे . डोकं उघडं ठेवलं पाहिजे. जर आपलं डोकं उघडं नसलं तर आपण वैज्ञानिक होऊच शकत  नाही आणि मी जे सांगते ते  जर अनुभवास आलं तर इमानदारी मध्ये  ते मानलं पाहिजे आणि त्यात उतरलं पाहिजे. कारण हा एक कल्याणाचा मार्ग आहे.  तो तुमच्याच कल्याणाचाच  नव्हे तुमचा मुलाबाळांचा , तुमच्या सर्व समाजाचा, भारताचा आणि सर्व जगाचा हा कल्याणाचा मार्ग आहे. उत्क्रातींमध्ये आपण आता मानव स्तिथीला आलो . या स्थितीतच आपण मान्यता केली की  फार उत्तम स्थिती  आहे तर हे कायिक बरोबर होणार नाही. या स्थिती मध्येच   अनेक Read More …

Puja Pune (India)

[The Marathi part starts at 16:50 on the audio clip] Puja date 3rd December 1990 – Place Pune Marathi speech starts at 16:49. काल मी सविस्तर सांगितलंच आहे कि आपल्याला अध्यात्म्याची एवढी संपदा मिळाली आहे त्याची आपल्याला कदर असायला पाहिजे. आपल्याला आपलीच कदर नाही तर आपल्या संपदेची काय कदर असणार. भारतातला प्रत्येक मनुष्य त्याहूनही महाराष्ट्रातला मनुष्य हा अत्यंत परमेश्वराच्या प्रेमाचा पुतळा आहे असं समजलं पाहिजे. आपल्याला आपलीच कल्पना नाही. आपण जर खेड्यांत राहतो आणि आपल्याला फार त्रास आहेत तर आपल्याला असं वाटतं मी काय क:पदार्थ  आहे . तशातली गोष्ट  नाही. आपला उपयोग फार होणार आहे. फक्त आपण काही काही गोष्टींना लक्षात घेतलं पाहिजे. सर्वप्रथम म्हणजे धर्माबद्दल आपण पूर्ण जागृत असलं पाहिजे. प्रत्येक धर्म जे आपल्या देशात आहेत किंवा दुसऱ्या देशात आहेत, त्या सर्व देशांमध्ये त्याचं नुसतं आपण असं म्हणू की यांत्रिकरण करून टाकलं आहे. किंवा सगळ्यांमध्ये पैसे कमावण्याची एक किमया बनवलेली आहे. हा काही धर्म असू शकत नाही. देवाला पैसे काही समजत नाहीत, त्याला बँक समजत नाही, काही नाही. मला जर कोणी म्हटलं की चेक लिहा तर मला समजत नाही. मी दुसऱ्याला म्हणते तुम्ही लिहा मी सही करते. तेंव्हा पैशाने जे लोक तुम्हाला लुटतात इथे देवाच्या नावावर, त्यांना एक एक कवडी देणं हे अगदी चुकीचं आहे. पहिली गोष्ट. आणि आपण कोणी मनुष्य भगवे वस्त्र घालून आला की लागले त्याच्यापुढे लोटांगण घालायला. तो मनुष्य तिथून जेल मधून सुटून आलेला आहे आणि तिथे भगवे वस्त्र घातलेला आहे, असं कुणाच्याही डोक्यात येत नाही. सरळ लागले आपण. खेड्यातले लोक साधे सरळ. मग त्याने सांगितलं की बघा, तुम्ही इतके पैसे दिले की तुमचं एवढं भलं Read More …

Shri Mahalakshmi Puja Sangli (India)

Shri Mahalakshmi Puja Date 31st December 1986: Place Sangli Puja Type सांगली जिल्ह्यामध्ये सहजयोग हळूहळू पसरत आहे. पण जी गोष्ट हळूहळू पसरते, ती जम चांगला धरते. आणि कोणतीही जिवंत क्रिया हळूहळू होत असते. तेव्हा एकदमच ती मोठ्या प्रमाणात होईल अशी आपण आशा ठेऊ नये. प्लॅस्टिकची जर आपल्याला फुलं काढायची असली तर त्यासाठी एक मशिन घातलं की झालं. पण जिवंत फुलं काढण्यासाठी वेळ लागतो. मशागत करावी लागते. मेहनत करावी लागते. सहजयोगाबद्दल अजून पुष्कळशा लोकांना काहीही कल्पना नाही आणि ज्यांना आहे ती भ्रामक कल्पना आहे. पैकी आपल्याकडे पुष्कळसे असे पंथ आहेत, संप्रदाय आहेत, जे आधीपासूनच कार्यान्वित आहेत. पण हे पंथ आणि संप्रदाय ह्यांचा आपल्याला काही फायदा झालेला नाही.       ‘इतके दिवस आम्ही पंढरीला गेलो, इतके दिवस आम्ही तुळजापूरच्या भवानीची सेवा केली, इतके दिवस आम्ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जात होतो, सगळं काही केलं आम्ही. व्रत- वैकल्य केली. सगळं करून माताजी, आम्हाला काही मिळालं नाही.’ त्यातून तुमची मुलं उद्या मोठी होतील आणि ती तुम्हाला म्हणतील ‘इतका तुम्ही वेळ घालवला, पैसे घालवले, मेहनत केली आणि शेवटी तुमच्या हाती काही आलेलं नाही. म्हणजे परमेश्वरच नाहीये.’ जर तुम्हाला सांगलीला यायचं आहे, तर  सांगलीच्या रस्त्यावर यायला पाहिजे. जर तुम्ही उलट मार्गाने गेलात तर तुम्ही सांगलीला पोहोचणार नाही. तेव्हा इतक्या वर्षानंतरही तुम्हाला सांगली मिळाली नाही,  याचा अर्थ असा आहे, की कोणत्यातरी चुकीच्या रस्त्यावर आपण चाललो होतो.  त्याच रस्त्यावर आपण भटकत आहोत.  त्यातून अजून आपल्याला मार्ग मिळालेला नाही. हा सुज्ञपणाचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. कारण आपल्याला अजून काही मार्ग मिळालेला नाही. काही साध्य झालेलं नाही. तेव्हा काहीतरी चुकलेलं आहे, असा एक  वेळ तरी  विचार करून सहजयोग काय आहे ते समजून लोकांना सांगितलं Read More …

Birthday Puja Mumbai (India)

Birthday Puja 21st March 1986 Date: Place Mumbai Type Puja आज आपण सर्वांनी माझा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. त्या बद्ल मी आपली आभारी आहे. वाढदिवस एकी कडनं वाढतो आणि एकी कडनं आयुष्य कमी होतं. पण सहज योग्यचं उलट आहे. वाढदिवस आला तर असं समजायचं कि आपल्या आत्मिक वृक्षाला एक आणखीन वाढ झालेली आहे. आपलं आत्मिक वृक्ष वाढत चाल्लय. जरी आयुष्य कमी होतं चाललं तरी सुद्धा आत्मयचा प्रकाश प्रत्येक क्षणी वाढतो आणी प्रत्येक प्रकाशाची किरणं आपल्या सर्व दालनात शिरून आपलं सर्व प्रांगण आलौकीत करून टाकतं. तेव्हा जो पर्यंत आपण जिवंत आहोत तो पर्यंत हा आत्मा अधिक आणि अधिक आपल्या चित्ता मध्य प्रकाश ओढवतो. आयुष्याचा विचार मनुष्याने केला नाही पाहिजे. योग मिळाल्यावर जे आता आम्हाला आयुष्य मिळालेलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. त्याचा एक एक क्षण महत्वाचं आहे प्रत्यक क्षणी आम्ही आपली वाढ करून देऊ शकतो. असं समजलं पाहिजे कि जसे बी ला अंकुर फुटतं आणि अंकुर फुटताना बी ला असं वाटतं कि आपलं आयुष्यं संपून गेलंय पण खरोखर त्याचं रूपांतर आता मुळांन मध्ये झालेलं आहे. योग्यांच्या आयुष्याचं महत्व हे आहे कि जेव्हा योग्यांना मरणं येतं तेव्हा त्यांचे अंकुर गौरवांचे अंकुर पृथिवीच्या बाहेर निघतात आणि झाडं कीर्ती रूपानं झळकू लागतं. म्हणजे देह त्याग झाल्या नंतर मनुष्य कीर्ती रूप उरतो तेव्हा योगानंतर जे आयुष्यं आहे ते अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपण आता संतांची किती लक्षणं सांगावी. ज्ञानेश्वरांना आपल्या हयातीत लोकांनी किती त्रास दिला, हा काय तरीच इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगतो असं सुद्धा लोकं त्यांना  म्हणाले. कबीरांना किती लोकांनी त्रास दिला. नानकांना किती त्रास झाला. तुकारामांना लोकांनी कधींच मान्य केलं नाही, नामदेवांना सुद्धा लोकांनी Read More …

Public Program Sangli (India)

Public Program Sangli, 6th January 1986 सांगली तसच कोल्हापूर दोन्हीही ठिकाणच्या सर्व साधक मंडळींना आमचा प्रणिपात . मागच्या वर्षी आम्ही इथे आलो होतो, आणखीन  सहजयोगाबद्दल  लोकांना माहिती दिली होती . आता आपण असा विचार केला पाहिजे , की  ह्या जगामधे आपण आलो ते कशासाठी ? त्याबदद्ल आपल्या मनामधे पुष्कळ भ्रम आहे . तो विचार आपण करू नये असे पुष्काळांचे मत आहे. कारण असा विचार करून फायदा काय होणार ? आपल्याला पुढचं काय ते काय माहीत नाही . पण जर आपण लक्षात घेतल तर अनेक हजारो वर्षांपासनं  आपल्या देशामधे विशेषत: ह्या महाराष्ट्रात  , ह्या संतभुमिमधे संतानी अस संगितलेल आहे  की, अवघाची संसार सुखाचा करीन ! इतकच नव्हे तर पसायदान म्हणून जे काही ज्ञानेश्वरांनी लिहलय ते सुद्धा वर्णन आपल्याला खर वाटत नाही की , जे जो वांछील ते तो लाहो ! हे कस होणार?, ह्याला मार्ग काय ? जी जी वर्णन अशा परमेश्वरी साम्राज्याची आपल्या शास्त्रात करून ठेवलीय . त्यासाठी मनुष्य नेहमी धडपडत असतो की, अस साम्राज्य आलं  पाहिजे .पण ते येणार कस ? आता कम्युनिस्ट लोकांच अस म्हणन आहे की , मार्क्सनी, मार्क्सवादी लोकांच अस  म्हणन आहे की मार्क्सनी अशी रचना केली होती की,असे विशेष लोक तयार होणार आहेत , की ज्यांना ग्व्हर्नमेंटची गरज नाही , ज्यांना पोलिसांची गरज नाही ,ज्यांना कशाचीही गरज नाही .पण ते कसे होणार ? त्याचा कुठे कोणी उल्लेख केलेला नाही. ते कसं घडून येणार आहे ?अस होणार तरी कसं  ? म्हणून त्यांनी जबरदस्ती केली ,कसतरी  करून कम्युनिझम आणला.पण त्याचा काही फायदा झाला नाही. मनुष्य होता तसाच आहे . तेव्हा त्याला काहीतरी कारण असलं पाहीजे  , ते Read More …

Shri Mahaganesha Puja Ganapatipule (India)

Shri Mahaganesha Puja, Ganapatipule, India, 1986-01-01 आज आज आम्ही गणपतीपुळ्याला आलो. त्याचे फार  महात्म्य आहे. अष्टविनायका मध्ये, हे महा गणेशाचे स्थान आहे. महागणेश हा पिठाधीश आहे. आणि  ह्या पिठावर  बसूनच तो सर्व गणेशाचे रक्षण करतो. सर्व ओंकाराची चालना करतो. कारण त्याला गुरु तत्व मिळालेले आहे. वातावरणात सुद्धा आपण पाहिलं की, समुद्र  इतका सुंदर आणि स्वच्छ आहे. या गणपतीचे पाय  धुतो.  कारण समुद्र हा गुरु तत्व आहे.  आणि त्या गुरुतत्त्वानी  तो श्री गणेश यांचे पाय धुतो. तसेच सर्व सहज योग यांचे झाले पाहिजे. गणेश  स्तुती झाली, गणेश स्थापना झाली त्यानंतर महालक्ष्मी तत्त्वांनी तुम्ही महा गणेश झाले. ही स्थिती आहे ती लहान मुलांना, मोठ्या मुलांना, वयस्क, ,स्त्री.पुरुष सर्वांना सुलभ  मिळू शकते. जर त्याच्यामध्ये सरळ स्वभाव आला.  त्याला आपण सारल्या म्हणतो. मराठी भाषेत  ज्याला   अबोध धीता म्हणतात. इनोसन्स, याला म्हणतात, ते जेव्हा आपल्यामध्ये पूर्णपणे  बानुन  जाते तेव्हा आपल्याला गुरुपद येऊ शकते. कोणताही गुरु  त्याच्यामध्ये हि  सरलता आहे.  ते  हो ने  पण नाही. तो कधीही गुरु होऊ शकत नाही. त्याचं लक्ष फक्त परमेश्वरी शक्तीकडे आहे. तोच गुरु होऊ शकतो, जो सर्व साधारण माणसाचे लक्ष हे दूषित आहे. ते स्वच्छ नाही. त्याबद्दल ख्रिस्ताने  सांगितले की, तुमच्या डोळ्यात   कोणताही दूषित पणा  नसला पाहिजे. त्याचा अर्थ असा की, विचारांचे काहूर माजून जाते, व भलतेसलते विचार येऊ लागतात. किंवा हे आपल्याला का मिळाले नाही ? किंवा  हेवे- दावे .कोणत्याही वस्तूकडे बघून जर विचार आला तर तुम्ही आज्ञा चक्रा वर अजून मात केलेली नाही. कोणत्याही वस्तूकडे बघून निर्विचार इता आली पाहिजे. विशेष करून जेवढ्या परमेश्वरी संबोधित समृद्ध अशा देवी देवता आहेत त्यांच्याकडे पाहून तरी निर्विचारइता  आली पाहिजे.  Read More …

Devi Puja Brahmapuri (India)

Devi Puja Talk, India, 1985-12-27 Time: 26 minutes 56 seconds to 29 minutes 56 seconds. (26.56 To 29.56)               आता तुम्हांला काय सांगायचं तुमची स्तुतीच करत होते सगळ्यांना. सगळ्यांजवळ मी तुमची स्तुती करते, की तुम्ही मूर्खासारखे वागू नका, असं त्यांना सांगतेय मी. तेव्हा तुम्हांला तसं सांगायचं की तुम्ही ह्यांचं अंधानुकरण करायचं नाही. आपलं जे आहे ते फार मोठं आहे. आपला वारसा आहे तो सांभाळला पाहिजे. नुसतं आपण बाहेरच्या लोकांना बघून तसं वागायला लागलो तर आपण मूर्खात निघणार. त्यांना काही संतुलन नाही. त्यांच्या जीवनात काही संतुलन राहिलेलं नाही. एकीकडे वहावलेलं जीवन आहे ते. हे मी पाहून आले ना आता. बारा वर्ष तिथं राहून आले. तप केलं बारा वर्षाचं. बारा वर्षांत तप होतं म्हणतात. (हास्य) तसं तप झालं माझं. आणि आता त्यांचं अंधानुकरण करू नका एवढंच सांगायचं. पण ‘जुनं ते सोनं’ जरी असलं तरी जुनाट जे आहे ते चांगलं नाही. जुनाट नको. ‘जुनं ते सोनं’ पण जुनाट जे धरून बसले ते नको आणि जुनाट सुद्धा आत्ता आत्ताच आलेलं आहे, म्हणजे बायकांना छळणे मुसलमानांपासून शिकलो आपण. इंग्लिश लोकांपासनं डावरी देण्याचं शिकलोय. मुलींना डावरया दयायच्या, आता कशाला? आता आपला असा नवीन नियम झालेला आहे, त्या नवीन नियमांमध्ये आपल्याला काही डावरी दयायला नको. मुलीला अर्धी प्रोपर्टी दयायची, मुलींनी अर्धी प्रोपर्टी घ्यायची ही पद्धत बरोबर आहे. पण मुली घेणारही नाहीत आणि देणारही नाहीत. तेव्हा त्यांचं जे आहे ते शिकायचं. आपली जी नम्रपणाची वर्तणूक आहे तीच ठेवायची. व्यवस्थित राहायचं. जसं आपल्याला पूर्वजांनी सांगितलंय तसं राहायचं. पण जुनाट ज्या वस्तू झालेल्या त्या फेकून टाकल्या पाहिजेत. जुनाटातल्या पुष्कळ वस्तू आहेत त्या म्हणजे ब्राहमणांचं साम्राज्य जे पसरलंय देवळामधनं ते काढलं पाहिजे. Read More …

Public Program, Swacha dharma Pune (India)

1985-12-22 Public Program, Swacha Dharma, Pune. पाडवळीत गावातले सरपंच तसेच इथले ग्रामस्थ मंडळी त्यांनी हा कार्यक्रम इतका उत्साहाने योजला आहे की माझं हृदय  भरून आलं आहे . या पवित्र भुमीत श्री तुकाराम महाराज राहीले त्यांनी परमेश्वराची गाथा गायली .परमेश्वराची ओळख सांगितली . लोकांना अनेक प्रकारे आपल्या जीवनातून अत्यन्त मुल्यवान अशी माहीती  दिली .आज येतांना उशीर होत होता कारण रस्त्यामध्ये दुसरी गाडी फेल ( fail ) झाली तर तिकडे मला तुमच्या उत्साहाची आणखिन त्रासाची पूर्ण कल्पना येत होती .पण त्या वेळेला तुकारामांचा एक अभंग आठवला समयासी सादर व्हावे . समयाला सादर असलं पाहिजे. इतक्या सोप्या शब्दात फार मोठी गोष्ट तुकाराम बुवांनी सांगितली .समयासी सादर व्हावे म्हणजे आपण एकतर पुढचा तरी विचार करतो किंवा मागचा तरी विचार करतो .पण ह्या क्षणाला ,ह्या क्षणाला  काय मिळतंय ते आपण बघत नाही . वर्तमान काळात राहू शकत नाही , आज आता इथे काय आहे ते आपल्या लक्षात येत नाही .त्यामुळे जे विशेष आहे जे महत्वाचं आहे ,जे संपुर्ण आहे ते आपल्याला मिळू शकत नाही एवढी मोठी गोष्ट एका वाक्यामध्ये समयासी सादर व्हावे इतकं नम्रपणानी त्यांनी म्हटलेलं आहे .इतका उत्साह इतकं प्रेम तुम्ही आईला दिलंत त्यासाठी माझ्याजवळ शब्द नाहीत . आज एवढया धकाधकीच्या काळामध्ये आपल्या समाजात अनेक तऱ्हेचे  वैगुण्य आलेले आहेत .पुष्कळ खराबी आलेली आहे त्यामुळे प्रत्येकाला काहीना-काहीतरी दुःख आहे कुणाला शारिरीक दुःख आहे ,तर कुणाला मानसिक दुःख आहे ते नसलं तर एखाद्याला कौटंबिक दुःख पण फार आहे ,सामाजिक दुःख आहे .तरतर्हेचे त्रास एकदम जशे काही सगळेच्या सगळे एकत्र फोफावून उभे राहिलेत. माणसाला समजत नाही भांबावून गेलेला आहे की जावं तर जावं कुठे करावं तरी करावं Read More …

Shri Adi Bhoomi Devi Puja Pune (India)

Marathi Transcription – Bhoomi Devi Puja Date 4th February 1985: Place Pune – Type Puja (Starts at 12:48) इतकी सगळी व्यवस्था तुम्ही सर्व सहजयोग्यांनी मिळून केली, ते बघून असं वाटतं, की पुण्याला राहण्याचं जे आम्ही निश्चित केलं होतं, त्याला काहीतरी विशेष प्रेमाचं कारण असायला पाहिजे. तशी अनेक कारणं आहेत पण मुख्य मला असं वाटतं तुम्हा लोकांच्या प्रेमाच्या ओढीनेच या पुण्यनगरीत वास्तव्य करण्याचे आम्ही ठरविलेले आहे. एकंदरीत इथे जागा मिळणे, त्यात कार्य होणे वगैरे म्हणजे एक विशेषच घटना आहे. पण मुख्य म्हणजे पुण्याला अत्यंत पुण्याईचा साचा आहे, साठा आहे त्याचा. आणि साचा पण आहे. इथे मनुष्य पुण्याईत घडविली जाऊ शकतात. पण अनेक इथे उपद्रव झालेले आहेत आणि ते उपद्रव होणारच. कारण जेव्हा माणसं पुण्याईत घडविली जातात, तेव्हा त्यांच्यावरती आघात करायलासुद्धा, असुरी विद्या ही सगळीकडे कार्यान्वित असते. विशेषकरून अशा ठिकाणी, जिथे काहीतरी पुण्य घडविलं जातं. तेव्हा आपण आणखीन सचोटीने, आणखीन सतर्कतेने काळजीपूर्वक सहजयोग साधला पाहिजे. आणि पुणे हे महाराष्ट्राचं ब्रीद आहे. इतकंच नव्हे की पुण्य आहे, पण हे ब्रीद आहे. आणि ह्या ब्रीदामध्ये जर का चैतन्य फुंकल गेलं, तर आपल्या सबंध महाराष्ट्रात त्याचा परिणाम आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा तुम्हा सर्वांची ह्यामध्ये मला मदत पाहिजे.       सर्वप्रथम हे लक्षात ठेवलं पाहिजे, की घर बांधणं वगैरे हे काही विशेष महत्त्वाचं नाहीये आणि ते सोपं काम आहे. पण ह्या घराबरोबरच, जर पुण्यातले सहजयोगीसुद्धा बांधले गेले आणि त्यांना सुंदर स्वरूप आलं, तर मला फार आनंद होईल. ही एक फार मोठी गोष्ट आहे, की आज इथे आपण भूमीपूजनाला आलो, सगळे एवढे संत- साधू आले आहेत. भूमीपूजन करीत आहेत आणि ह्या भूमीपूजनाचा लाभ अनंत काळापर्यंत लोकांना मिळणार आहे. तेव्हा Read More …

Public Program (India)

Public Program,Vaitarna,India,16th January 1985 की ह्यात काहीतरी विशेष आहे. आपण जाणून घेतलं पाहिजे की ही मंडळी इतक्या लांबून इतक्या परदेशातून आली.  यांना इथे काय मिळतंय ते समजून घेतले पाहिजे. असा थोडासा आपण समजुतदारपणा ठेवला पाहिजे. <Pause >  कदाचित आम्हा लोकांच्या आर्थिक परिस्थिती मुळे आम्हाला लोकांना हा विचार शिवत नसेल. पण काहीतरी विशेष असल्याशिवाय ही चौदा  देशातली  मंडळी इथे का येतात असा आपण एकदा जर  मनात विचार घेतला तर पुष्कळ गोष्टींचा आपल्याला पत्ता लागू लागेल. अजून आपल्याला  आपल्या धर्माबद्दलच माहिती नाहीये मुख्य म्हणजे. आपला धर्म जरी अनादी होताय,  भारतीय धर्म जरी अनादी होता तरीसुद्धा त्याची अनेकदा पुनर्रचना  कर करून, शेवटी सहाव्या शतकात “आदिशंकराचार्य”  हयांनी अवतरण घेतलं आणि या धर्माची पुनर्स्थापना पूर्णपणे करून कुंडलिनी योगा वरती  त्यांनी  पुष्कळ  पुस्तक लिहिली. कुंडलिनी शिवाय आता मार्ग नाही असं ‘उघडपणे त्यांनी  “सत्य उघडे करूनी  सांगितले”. तसंच श्रीकृष्णाने सांगितलं होतं  की तुम्ही स्थितप्रज्ञ झालं पाहिजे म्हणजे , तुम्ही आत्मसाक्षात्कारी  झालं पाहिजे. आपल्याला हा शब्द समजतो आत्मसाक्षात्कारी ,पण ते म्हणजे काय हे  माहिती नाही. ते आज लोकांना देण्याची पाळी आलेली आहे. <Pause > पण आपला विचार सखोल नसल्यामुळे जे परंपरागत आपलं चालू आहे तेच चालू आहे. म्हणजे आता टाळ कुटत  जायचं पंढरी पर्यंत. अरे, पण त्याने आपल्या आई-वडिलांना काही मिळाले नाही. आम्हाला काही मिळालं नाही.  का आम्ही  टाळ कुटली ?    पंढरीनाथाला भेटायला.  पंढरीनाथाला भेटणं  म्हणजे देवळात जाऊन नुसतं डोकं फोडून घेणे नव्हे. हे समजलं पाहिजे.  जरी आपण अशिक्षित असलो तरी एक गोष्ट लक्षात येते.  उलट अशिक्षित लोकांच्या लवकर लक्षात यायला पाहिजे की तिथे देवळात जाऊन नुसती जर आपण डोकीफोड  केली तर आपल्याला परमेश्वर  मिळणार आहे का Read More …

Makar Sankranti Puja Mumbai (India)

Makar Sankranti Puja Date 14th January 1985: Place Mumbai Type Puja आता तुम्हा लोकांना सांगायचं म्हणजे असं की इतकी मंडळी आपल्याकडे पाहणे म्हणून आली आणि त्यांना तुम्ही सगळ्यांनी एवढ्या ह्याने बोलावलंत, आणि त्यांची इतकी व्यवस्था केली. त्याबद्दल कोणीही, काहीही मला असं दाखवलं नाही की, आम्हाला अशी मेहनत पडली किंवा आम्हाला असा त्रास झाला. आणि मुंबईकरांनी विशेष करून फारच मेहनत केलेली आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या तर्फे, ह्या सर्वांच्या तर्फे मला असं म्हणावं लागेल, की मुंबईकरांनी फार आघाडी मारलेली आहे. पण जे ह्यांना सांगते तेच आपल्याला सांगते. आज आपण तिळगूळ देतो. कारण सूर्यापासून जे त्रास आहेत ते आपल्याला होऊ नयेत.  पहिला त्रास, सूर्य आला म्हणजे मनुष्य चिडचिडा होतो. एक दुसऱ्याला उणंदुणं बोलतो. त्याच्यामध्ये अहंकार बळावतो. सूर्याच्या खाली राहणाऱ्या लोकांना फार अहंकार आहे. म्हणून अशा लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा मंत्र आहे, की ‘गोड गोड बोला. ‘ तिळगूळ घेतल्याबरोबर अंगात गरमी येते आणि लागले वसकन् ओरडायला. म्हणजे झालं! अहो, आत्ताच तिळगूळ दिला. निदान तेवढं तरी तुम्ही गोड बोला माझ्याशी. ते सुद्धा जुळत नाही. तिळगूळ घेतला नी लागले ओरडायला. कसला तिळगूळ तुमचा, फेका तिकडे. तेव्हा आजच्या ह्याच्यामध्ये आपण असं ठरवून घ्यायचं, की ही फार सुसंधी आहे. माताजी आल्या आणि माताजींनी आम्हाला कितीही सांगितलं तरी ते आमच्या डोक्यात जाणार नाही. जर आमच्या डोक्यात गरमी असली तर काहीही जाणार नाही. ही गरमी निघायला पाहिजे. आणि ही गरमी आपल्यामध्ये कुठून येते ? तर ती अहंकारामधून येते. पूर्वीच्या काळी जेव्हा आम्ही सहजयोग सुरु केला, तेव्हा सगळ्यांच्या भांडाभांडी असायच्या. म्हणजे इथपर्यंत की डोकी फोडली नाही हे नशीब! बाकी डोकी शाबूत आहेत सगळ्यांची आता. पण भांडणं फार. कुणाचं कशावरून Read More …

Public Program (India)

1984-12-02 Public Program, Pen Village, Maharashtra India  पेणच्या सर्व भक्त आणि प्रेमी जनांना आमचे वंदन असो. मुंबईला सर्व कार्यक्रम ठरवण्यात आला, त्यात काही पेणची मंडळी आली होती आणि अत्यंत प्रेमाने त्यांनी म्हटलं माताजी तुम्ही पेणला का येत नाही? आतूनच मला फार ओढ वाटली. मी म्हटले या वेळेला पेणला जायचं माझा प्रोग्रॅम ठरवा तुम्ही दोन तारखेला. ती ओढ का वाटली त्याचं आज प्रत्यंतर दिसलं. ओढ मलाही होती आणि ओढ तुम्हालाही, उशीरही झाला आणि वाटत होतं आणि म्हटलं हि सगळी तिष्ठत बसली असतील, पण हा प्रेमाचा सोहळा बघून सगळी काही माझी चिंता दूर झाली.  ह्या महाराष्ट्र भूमीच वैशिष्ट्य हे आहे, भक्तीचा इतका ठेवा आपल्याला संत साधूंनी देऊन ठेवलेला आहे कि जसं काही सगळीकडे भक्तीची फुलं विखुरलेली आहेत.  वृक्षाला सुरुवातीला एक दोनच फुलं येतात आणि त्यांना पुष्कळ  हालअपेष्टा आणि त्रास सहन करावा लागतो तसंच आपल्या संत साधूंचं झालं पण त्यांनी जी आपल्यासाठी मेहनत केली त्याची हि फळं आपल्याला दिसतात कि इतकी मंडळी भक्तिभावाने स्वतःचा आत्मसाक्षात्कार मिळवण्यासाठी इथे एकत्र झालेली आहेत. आत्मसाक्षात्कार हा शब्द फार मोठा वाटतो आणि तो म्हणायला सुद्धा बराच वेळ लागतो. पण तुमची कुंडलिनी मात्र तत्क्षण, एका क्षणात जागृत होते. झाली पाहिजे. कारण जे फार महत्वाचे आहे ते अगदी सहजच घडले पाहिजे. आपण जो श्वास घेतो तो जर कठीण झाला किंवा त्यासाठी आपल्याला चार पुस्तके वाचावी लागली, किंवा सल्ला मसलत घ्यावी लागली तर किती लोक जिवंत राहतील. जे अत्यंत आवश्यक असे जीवनाला आहे, सर्वात महत्वपूर्ण जे आहे ते सहजच मिळाले पाहिजे. जर ते सहज मिळाले नाही तर ते कुणी मिळावूही शकणार नाही. सगळं संसारातील जेवढं झालेलं आहे. हि जी सृष्टीची रचना Read More …

Public Program Kolhapur (India)

Public Program. Sadoli in the Kolapur area of Maharashtra (India). 5 March 1984. (Dots indicate that the content is unclear) सहजयोगी १ :   साडोलीच्या भूमीमध्ये आज हा अभूतपूर्व योगायोग आहे. महालक्ष्मी,  महासरस्वती,  महाकाली असे त्रिगुणात्मक कुंडलिनीचा अवतार माताजी आज तुम्हाला पावन करण्यासाठी आल्या आहेत.  नवीन पर्व आले.  नवीन विचार आले. भारत वर्षामध्ये,  भारत देशामध्ये फार मोठी योग भूमी समजली जाणारी.  फार मोठे योगी होऊन गेले. फार मोठे तपस्वी होऊन गेले.  विश्वामित्रासारखा,  राम जन्माच्या अगोदर रामायण लिहिणारा,  महर्षी भूमी आहे.  तरीसुद्धा हा जो माताजींचा सहज योग आहे,  हा या जगामध्ये पहिलेच काम आहे कारण मला असं वाटतं लोकांनी भक्ती केली, जप केलं,  ग्रंथ वाचले,  पारायणं केली.  सगळा देश तूडविला. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत,  रामेश्वरापर्यंत पदयात्रा काढली.  तरी सुद्धा त्यांना दैवी शक्तीबद्दल जितकं समाधान मानायला पाहिजे होतं ते मिळालं नाही आणि त्याच गोष्टींचा मी सुद्धा ………………………पण गगनगिरीनी सांगितलं……नाही.  योगी नाही व्हायचं.  संसार करून परमार्थ करायचा. राम राम करत रहा.  ठीक आहे.  श्रद्धा,  नम्रता अशा जोडीला, अशा तऱ्हेचा जोडीला विचार घेऊन मी जवळ-जवळ १७ वर्ष गगनगिरीनी सांगितलं ते केलं. अनेकदा प्रत्यय आला की माझी तळमळ होती ती काही नाही………. ही तळमळ माझ्या अंतकरणात होती जी समाधान देऊ शकत नाही.  परमार्थाच्या विचाराला,  हृदयाला समाधान मिळायला पाहिजे.  दैवी शक्तीने जे समाधान मिळायला पाहिजे ते मिळत नव्हतं.  तरीसुद्धा माझं भाग्य समजतो मी की मागील वर्षी ८३ च्या १ जानेवारीला १ तारखेला माझ्या १७ वर्षाच्या तपश्चर्येच्या फळाला फळ आलं आणि त्यादिवशी माताजींची आणि माझी गाठ पडून मी पार झालो. कुंडलिनी शक्ती जागृतीचा प्रयोग आणि पार झाल्यानंतर,  समाधान झाल्यावर माताजींकडे मी गेलो. माताजींकडे बघितलं.  माताजी मला बोलायचं आहे मी बोललो.  Read More …

Shri Mataji at sugar factory reception after program (India)

Shri Mataji at sugar factory reception after program, Shani Shingnapur, India, 1984-02-25 सहजयोगी – यांची स्मरण शक्ती सर्व गेली होती  सहजयोगी – क्रायसिस ने सहा-सात टाके पडले होते  श्री माताजी – बरं  सहजयोगी – नऊ टाके पडले होते  श्री माताजी – अच्छा  सहजयोगी – complete परत पूर्वीसारखं  श्री माताजी -अ  सहजयोगी -अर्धी बॉडी श्री माताजी पॅरलाईज्ड (paralysed) झालती कम्प्लिट (complete )   श्री माताजी – कोणाची?  सहजयोगी -यांची  श्री माताजी -हो का ? सहजयोगी -आणि मी सहज नेत्रे वकील आहेत ते भेटायला म्हणून गेलो. आणि मी व्हायब्रेशन दिले तर हालचाल चालू झाली त्यांची नंतर आवडीने आले मला ऐकून होते (अस्पष्ट) करत होते ते म्हटलं एवढा सच्चा माणूस आहे तर या मनुष्याला परमेश्वर बरोबर मिळणार दिली जागृती मग त्यांना मग ते… श्री माताजी -एखादं पत्र त्या सकाळच्या मूर्खांना  लिहून टाका.  सहजयोगी- विस्मृती झाली होती. श्री माताजी- त्यांना म्हणे, आम्ही तुम्हांला पाच हजार रुपये देऊ मला जर तुम्ही आजार ठीक कराल तर आहो (श्री माताजी हसतात)) सहजयोगी -पाच हजार रुपये (सहजयोगी हसतात) श्री माताजी – असं मूर्खासारखं लिहून पाठवलं होतं. तुम्ही आता लिहून कळवा की, माझं सगळं ठीक केलेलं आहे. एकही पैसा घेतला नाही माताजींनी, एक कवडी सुध्दा घेतली नाही.  सहजयोगी – हिटलरला आत्मसाक्षात्कार दया असं म्हणण्यासारखं आहे.  श्री माताजी – अरे बापरे!  सहजयोगी – खिचडी आहे .  श्री माताजी- खिचडी सुध्दा आहे का ? मग झालं आजचं संबंध जेवणच संपवून टाका तुम्ही आमचं अं.  सहजयोगी- (हास्य) सहजयोगी – कोण आहे रे खाली? बोलणं झालं कशाला करताय मग त्यांनीच सांगितलं की, फराळ वगैरे काहीतरी केला पाहिजे. ठीक आहे आता काहीतरी पाहुणचार घेतला पाहिजे. Read More …

Public Program Sangamner (India)

Public Program, Kundalini and Bandhan, Sangmaner, India 24-02-1984 ज्ञानमाता विद्यालयाचे मुख्याध्यापक, श्री वटे साहेब तसेच संगमनेरचे सर्व भाविक साधक, सहजयोगी मंडळी सर्वांना आमचा प्रणिपात. आज विशेष्य करून फार क्षमा याचना करायची की इतका उशीर झाला. पण आजच एक प्रश्न उभा झाला आणि मला अहमदनगरला पहिल्यांदा जावं लागल. त्यामुळे इथ यायला इतका उशीर झाला तरी सगळ्यांनी उदार हृदयाने मला क्षमा करावी. इतका वेळ आपण वाट बघत बसलात त्यावरुन हे निश्चित आहे की आपण भाविक मंडळी आहात आणि आपण साधक आहात, परमेश्वराच्या शोधात आहात. आज पर्यंत ह्या भारत भूमीत विशेष्य करून या महाराष्ट्रात अनेक साधु संत झाले. श्रीराम सुद्धा या पवित्र भूमीवर अनवाणी चालले आणि त्यांनी पुष्कळ मेहनत केलेली आहे. त्या मेहनतीच्या वर्णनाला माझ्याजवळ शब्द नाहीत. त्यांना लोकांनी किती छळल, त्रास दिला त्यांना समजून नाही घेतल, त्यांची कोणत्याच प्रकारे मदत नाही केली तरी सुद्धा त्यांनी आपल कार्य अव्याहत चालवले. त्याला कारण त्यांना माहिती होत की एक दिवस असा येणार आहे की या भूमीवर असे मोठे मोठे लोक जन्माला येतील, जे पुण्यवान आत्मा असतील. मनुष्य पैशांनी मोठा होत नाही, यशाने मोठा होत नाही, सत्तेने मोठा होत नाही. कोणत्याही गोष्टीने मोठा होत नसतो पण ज्या माणसाला परमेश्वराची ओढ आहे, तोच खरा मनुष्य परमेश्वरी दृष्टीमध्ये मोठा असतो. आणि अशी परमेश्वराला शोधणारी अनेक मंडळी आहेत, जी आपल्या महाराष्ट्रात देशात विद्यमान आहेत. परमेश्वर हा आपल्या मध्ये, हृदयामध्ये आत्मा स्वरूप असतो अस सर्व संत साधूंनी सांगितलेले आहेत. ती सर्व साक्षात्कारी मंडळी होती आणि साक्षात्कारी मंडळींचे मुख्य म्हणजे अस असतं कि ते कोणचे  चुकीचे काम करत नाहीत. त्यांना सांगावे लागत नाहीत, त्यांच्यामध्ये धर्म जागृत असतो. ते धर्मातच असतात. त्यांना Read More …

Public Program (India)

Public Program in Anjaneri, the birthplace of Shri Hanuman (Marathi). Maharashtra (India). 19 February 1984. श्री हनुमानांनी मिळवलं होतं, जसं अंजनी देवी नं मिळवलं होतं. त्या अंजनी देवी सारखं, हनुमानासारखं, जर आपण आपल्या हृदया मध्ये बसलेल्या आत्म्याचं दर्शन घेतलं, जर आपल्याला आत्म साक्षात्कार झाला तर आपल्या पुढे कोणाताही प्रश्न उभा राहणार नाही. सर्व, दुःख, दैन्य, दारिद्र्य दूर होऊ शकतं. आपल्या मध्ये अनेक तत्वे आहेत, ती अजुन झोपलेली आहेत, ती जागृत व्हायला पाहिजे. ती जागृत झाल्या शिवाय, आपल्याला काही अर्थ लागलेला नाही. म्हणजे असं आहे की, अजून आपला संबंध परमेश्वराशी झालेला नाही. जो पर्यंत आपला संबंध परमेश्वराशी होत नाही तेव्हा आपण त्याच्या साम्राज्यात कसे येणार.आणि त्याचं जे काय वरदान आहे ते आपल्याला कसं मिळणार. म्हणून आपला संबंध परमेश्वराशी झाला पाहिजे, आणि सातत्याने राहिला पाहिजे, हे मुख्य गोष्ट आहे की तो सातत्याने राहिला पाहिजे. परत उगीचचं आपण जर सारख विठ्ठलाला बोलवलं, आणि तो जर धत्त येऊन उभा जरी झाला तरी तुम्ही ओळखणार कसे त्याला, तेव्हा जी अपरा भक्ति आहे, जी परमेश्वराला न पाहता, न जाणता केलेली भक्ति आहे. तिच्या फळाला आज आमचा सहजयोग. ( श्री माताजी थांबले आहेत) गणेशाला आपण म्हणतो की सहज पडलो प्रवाही तेव्हा तू मोक्षाच्या वेळेला आमचं रक्षण कर. ती मोक्षाची वेळ आज आलेली आहे ती गाठून त्यात सातत्याने आपण राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी काही पैसे द्यावे लागत नाही, परमेश्वराला पैसे कशाशी खातात ते माहित नाही. हे पुष्कळ लोकांना माहित नसेल की परमेश्वराला पैसा काय आहे ते समजत नाही. आता आम्ही खेडे गावात गेलो आणि त्यांना सांगितले हे बघा तुम्ही आम्हाला पैसे वगेरे काही द्यायचे नाही, तर ते म्हणतात बर Read More …

Public Program Pune (India)

Public Program, Pune, India या पुण्यभूमीवर आधीही पुष्कळ आक्रमण झालेले आहे. इतर राक्षसी प्रवृत्तींनी अनेक वेळेला याच्यावरती आक्रमण केलं. शिवाजी महाराज असताना सुद्धा आपल्याला माहिती आहे; येथे पुष्कळ अशा घटना झाल्या ज्या इतिहासात अद्वितीय आहेत. म्हणजे इथल्या जनतेने नेहमी सत्याचाच भाग उचलून धरला. त्या साठी झगडले. त्याचं ध्येय नेहमी सत्याला धरून राहणं असं होतं. नंतर आपल्या भारतामध्ये जो स्वातंत्र्याचा लढा झाला त्यात सुद्धा इथे वीरत्वाने लोक लढले आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं. तसंच सामाजिक पातळीवर सुद्धा फार महत्वाची कामगिरी केलेली आहे. तेव्हा खरं म्हणजे महाराष्ट्राची मानसिक भूमी ही पुणे. जरी मुंबईला आपण म्हणतो की राजधानी आहे, पण आर्थिक राजधानी असली तरी जी मानसिक म्हटली पाहिजे किंवा धार्मिक म्हटली पाहिजे ती पुण्यभूमी ही पुण्याची आहे. या पुणेकरांवर एक मोठा भारी जबाबदारीचा भाग येतो. तो इतका मोठा जबाबदारीचा भाग आहे याची कल्पना सुद्धा तुम्हांला नसावी.कधी-कधी मला आश्चर्य वाटतं. पण दैवकृपेने येथे सहजयोग जमू लागलाय. हळूहळू त्याची पाळेमुळे जमू लागली आहेत. हे बघून मला फार आनंद होतो.  पूर्वी मला फार आश्चर्य वाटायचं की सर्व तऱ्हेचे दुष्ट प्रवृत्तीचे राक्षस या पुण्यभूमीला कशे प्राप्त झाले आणि येथे येऊन त्यांनी कशे लोकांवर अत्याचार केले. पाशवी प्रवृत्तीचे लोक तसेच दुष्ट, रानटी तऱ्हेचेबाबाजी वगैरे अशा तऱ्हेचे लोक येथे आले. त्या नंतर इतर ढोंगी आणि अशे लोक येऊन त्यांनी पुष्कळ आक्रमण केलं. पण तरीसुद्धा त्यांची पुण्याई ते जिंकू शकले नाहीत. आणि सगळ्यांना पराभूत व्हावं लागलं आणि त्यांना इथून कूच करावं लागलं. आज अशा परिस्थितीत आपण बसलेलो आहोत. इथे मला दोन तऱ्हेची लोकं दिसतात. त्यातील एक म्हणजे रूढीवादी लोक. अजून आपल्या रूढी आपल्यामध्ये इतक्या रुजलेल्या आहेत, ते आपण डोळे उघडून बघायला Read More …

Procession and Public Program Satara (India)

Public Program, Satara, India 1984-02-06 प्रार्थना! ओम असतो मा सद्गमय।  तमसो मा ज्योतिर्गमय।  मृत्योर्मा अमृतं गमय। ओम शांतिः शांतिः शांतिः।। ओम तत्सत् श्री नारायण तू, पुरुषोत्तम गुरु तू ।। सिद्ध बुद्ध तू, स्कंद विनायक, सविता पावक तू ।। ब्रह्म मजद तू, यहव शक्ती तू, इशू पिता प्रभू तू ।। रुद्र विष्णू तू, रामकृष्ण तू, रहीम ताओ तू ।। वासुदेव गो-विश्वरूप तू, चिदानंद हरी तू ।। अद्वितीय तू अकाल निर्भय, आत्मलिंग शिव तू ।।   ओम तत्सत् श्री नारायण तू स्वागत गीत…… श्री माताजी: मागच्या वेळेला आपण म्हटलं होतं “आदिमा”, म्हणाल की नाही या लोकांना फार आवडतं.  फॉरेनर्स तर शिकलेत. सहजयोगी:  मुली म्हणत असतील तर…… श्री माताजी: यांना येतं का? सहजयोगी: हे म्हणणारे नाहीत. ते आले नाहीत. श्री माताजी: नाही. या आमच्या फॉरिनर्सना बोलावून म्हणायला सांगायचं? सहजयोगी: हो. श्री माताजी: बोलवा. अलेक्झांडर अलेक्झांडर… Come along here about 2 – 3 persons who could sing with him the “Adima”, the song that they sung last time. ते हल्लीचंच होतं. शिवाजीरावांनी बसवलं होतं. शिवाजीराव, तुमचं गाणं ह्या लोकांनी इतका छान बसवलं होतं. तुमचे भाऊ नाही आले? आलेत? सहजयोगी:  हार्मोनियम पाहिजे? श्री माताजी: हो. हार्मोनियम तर पाहिजे. तबला ही पाहिजे. हार्मोनियम पाहिजे. सहजयोगी: आता कृपा करून कोणी बोलू नये. शांत रहा सगळ्यांनी. श्री माताजींकडे हात करून शांत बसावे. दोन्ही हात मांडीवर ठेवावे आणि शांत बसावे. श्री माताजी: “आदिमा”, भाऊ कुठे तुमचे? शिवाजीराजांचे भाऊ कुठे आहेत? या बरं. सहजयोगी: एस. पी. देसाई सर सापडले. कोणीही उभं राहायचं नाही. खाली बसून घ्या कृपा करून. श्री माताजी: You all could sing wherever you are, I think and you Read More …

Public Program (India)

 Public Program, Ahmadnagar, India 22nd January 1984 राहुरी कारखान्याचे सन्माननीय अध्यक्ष श्री सर्जेराव पाटील तसेच मित्र संघ संस्थेचे संचालक लोक, आपण येथे जमलेले सर्व राहुरीकर आणि मागासलेले लोक, म्हणजे तसं म्हणायचं मला बरं नाही  वाटत  कारण  सगळी  माझीच  मुलं  आहेत . सगळ्यांना माझा नमस्कार . दादा साहेबांची एकदा अचानक भेट झाली आणि मी तेव्हाच ओळखून पाहिलं  की , ह्या मनुष्याला  खरोखर  लोकांच्यासाठी कळवळा आहे . ज्याच्या हृदयामध्ये कळवळा  नाही त्यांनी समाज नेते होऊ नये. ज्यांनी समाजकार्य केलं  नाही त्यांनी राजकारणात येऊ नये .ज्यांनी समाजकार्य केलयं ते जर राजकारणात आले तर त्यांना कळवळा राहील लोकांसाठी पण  बहुतेक लोक समाजकार्यासाठी  एवढ्यासाठी करतात  की  आपण राजकारणात येऊन पैशे  कमवू . ते  मला सगळं माहित आहे . मी लहानपानापासनं  आपल्या देशाची स्थिती पाहिलेली आहे. तुम्हा सगळ्या मध्ये कदाचित माझे सगळ्यात वय जास्त असेल. माझे वडील सुद्धा फार धर्मनिष्ठ ,  अत्यंत उच्चप्रतीचे  समाजकर्ते , देशकर्ते, राष्ट्रकर्ते आणि परत डॉक्टर  आंबेडकरांच्या बरोबर अत्यंत मैत्री ,अत्यंत मैत्री होती. जिव्हाळ्याची मैत्री होती. आमच्या घरी येणं-जाणं सगळकाही.. मी यांना लहानपणापासून पाहिलं  होतं . मी त्यांना काका म्हणत असे. तेव्हा अत्यंत जवळचे नात त्यांच्याबरोबर राहिले ल आहे .आणि अत्यंत तेजस्वी, उदार अशे ते होते. माझे वडील गांधीवादी होते . आणि हे थोडसं गांधीजींच्या विरोधात होते. तेव्हा त्यांचा वादही चालत असे, संघर्षाची जी गोष्ट म्हटली ती . पण आपापसात अत्यंत मैत्री होती ,फार मैत्री . माझे वडील जेलमध्ये गेले की यायचे आमच्या घरी विचारायला की कसं काय चाललंय ठीक आहे की नाही . अशा सर्व मोठ्या मोठ्या लोकांच्या बरोबर माझं लहानपण गेलेल  आहे . मी गांधी आश्रमातही  वाढली आणि त्यांच्या  संघर्षातूनच Read More …

Public Program (India)

Public Programme in Shahapur, Maharashtra. माहित नव्हतं.आणि इतक्या लांबून यायचं, म्हणजे  एकदम मला असं वाटलं की सहाच्या नंतर प्रोग्राम आहे वगैरे त्यामुळे थोडा उशीर झाला. तरी हरकत नाही  जेव्हा वेळ यायची असते तेव्हाच ती येते, असं आम्ही आत्तापर्यंत सहजयोगात  पाहिलेलं आहे.  आता सहजयोग म्हणजे काय आणि सहजयोगाचा उपयोग काय वगैरे वगैरे अनेक विषयांवर आपण आधीच ऐकलेलं असेल, आणखी पुस्तकही आहेत त्याची ती  वाचलीही असतील.  सांगायचं म्हणजे असं, की आजकालच्या या  धकाधकीच्या काळामध्ये मनुष्य नुसता म्हणजे घाबरून गेलेला आहे.  त्याला आतली काही  शांती म्हणून नाहीये.   आणि  आतली शांतता नसल्यामुळे बाहेरही तो शांत राहू शकत नाही.  बाहेरही तो बंडखोरासारखा  वागतो किंवा अगदीच वाह्यात पणाने काहीतरी  बोलत राहतो किंवा भांडणं करतो किंवा त्याच्या वर गेला  जुलमी जर झाला तर खून पाडतो, सगळ्या तर्‍हेचे जुलूम करायला मनुष्य शिकलेला आहे, ह्या अशा धकाधकीच्या काळामुळे.  जर त्याच्या मनामध्ये शांतता असली,  त्याच्या हृदयामध्ये जर शांती असली,  तर तो बाहेर सुद्धा शांती राखू शकतो.  पण जरआतच  शांतता नाहीये तर बाहेर कशी शांतता राखायची ?  तेव्हा  कुणी जर सांगितलं  की बुवा तुम्ही आता शांत राहा आणि समाधानी राहा, तर लोकांना असा प्रश्न पडतो की ह्या अशा काळामध्ये, मनुष्याने शांत तरी कसे राहायचं ?  सगळीकडनं जसा काही  वणवा पेटावा असं वाटायला लागतं.   इकडे बघितलं तर राजकारणात सुद्धा  मनुष्याला असं दिसतं की काहीही ह्याला भविष्य नाही.  ह्या राजकारणाला काही भविष्य दिसत नाही.  मारामारी, दंगल ,नाही तर एक इलेक्शनला हरले मग दुसरे जिंकले, म्हणजे होणार तरी काय या भारताचं  असं लोकांना वाटू लागतं.  तिसरं म्हणजे घरांमध्ये सुद्धा  भांडण, तंटे, आपापसांमध्ये  मोठमोठाले झगडे ह्या सर्व गोष्टींमुळे मनुष्य खरोखर म्हणजे आज वैतागून Read More …

Public Program, Dharmachi Durgati Jhali aahe Dhule (India)

 Public program, Day 2, Dhule, India, 17-01-1983   नाशिकचे मान्यवर कलेक्टर साहेब तशेच सहजयोगी व्यवस्थापक आणि नाशिकची भाविक मंडळी या सर्वांना माझा नमस्कार. आम्ही बाहत्तर साली नाशिकला आलो होतो, त्यावेळेला सहजयोग नुकताच सुरु झाला होता, आणि बरीच मंडळी त्यावेळेला इथे साक्षात्कार पावून पावन झाली होती आणि त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन सहजयोग वाढवला, पण नाशकाला कार्य मात्र तसंच राहिलं. आता डॉक्टर साळवी इथं आलेले आहेत, आणि मधून मधून इतर मुंबईची मंडळी सुद्धा इथं येत असतात, त्यामुळे मला पूर्ण आशा आहे की सहजयोग इथे सुद्धा फोफावेल. सर्व प्रथम, सर्व गोष्टी विसरून धर्म आदी किंवा सायन्सच्या वगैरे एक मनुष्याने असा विचार केला पाहिजे की आम्ही ह्या संसारात कशासाठी आलो? आमच्या जीवनाचं लक्ष्य काय आहे? जर आम्ही एका अमिबापासून आज मानवस्थितीला आलो तर ते कशासाठी? या जीवनाला काही अर्थ आहे किंवा नाही? अर्थात या भारतभूमीमध्ये विशेषतः महाराष्ट्रात जिथे आपली साडे तीन पीठे बसली आहेत, विश्वाची सर्व कुंडलिनी आहे, अशा महान देशामध्ये जन्मलेल्या लोकांना हे तर माहीतच आहे की या संसारातून ज्याला आत्मसाक्षात्कार मिळाला तो महान झाला तेच सगळ्यात मोठं मिळवायचं आहे. त्यातून काही नवीन नवीन मंडळी पाश्चिमात्य देशात जाऊन शिक्षण घेऊन आली आणि त्यांना असा प्रश्न पडलेला असतो की देव वगैरे काही नसतो, आहे की नाही किंवा हे जे काही कुंडलिनी बद्दल एवढं मोठं लिहिलेलं आहे, ते ज्ञानेश्वर आपल्या सहाव्या अध्यायात सांगून गेलेत. तुकारामांनी ज्या परमात्म्याला मिळवण्याच्या गोष्टी केल्या. नामदेव आदी अनेक संतांनी या भूमीवर परमेश्वराच्या बद्दल जे सृजन केलेले आहे ते खरं होतं की खोटं होतं? ते खरे होते किंवा भ्रमित होते? त्यांनी जी गोष्ट केली त्याच्यात काही अर्थ होता की उगीचंच त्यांनी काहीतरी Read More …

Public Program Kolhapur (India)

1982-1230-Public Program (Malharpeth) Marathi कलियुगा मध्ये जन्म घेणं आणि तेही आई’च्या रूपाने म्हणजे फार कठीण काम आहे. गुरु म्हटला की त्याचा आपोआपच सगळ्यांना वचक असतो, आई म्हटली की प्रत्येक मानवरासारखच (मानवासारख) आपल्या जी हक्काची आई आहे आपण कसंही तिच्याशी वागलं तर ती आपल्याला क्षमाच करणार तेव्हा सहज योग आई’च्या रूपाने साध्य करण तर व्हावंच लागतं कारण त्याच्याशिवाय होणारच नव्हतं आईच व्हायला पाहिजे दुसऱ्या कोणाच्या शक्तीततच नव्हत हे काम. तर मल्हार पेठेत सत्कार बघून आईचा या कलियुगात फार आश्चर्य वाटतं आणि फार आनंद झाला म्हणजे कलियुग बदलून कृतयुगाला सुरुवात झाली आहे असं पंचांगात आहे ते खरं आहे हे आज मला मात्र पटलं. आम्ही एक स्त्री आहोत तेही एक आई आहोत म्हणजे एकतऱ्हेचा दुबळेपणा आहे हृदयाला तुमचं काही वाईट झालं तर तेही दुखतं ,घनिष्ठ आहात तुमचं चांगलं व्हावं म्हणून इतका आटोकाट प्रयत्न असतो की कसंही करून यांना एकदा मिळालं पाहिजे कारण आईला स्वतःचं काहीच नसतं तिला आपली मुलं ठीक झाली, त्यांना शक्ती मिळाली त्यांचं जे काही आहे ते त्यांना मिळालं त्याच्या पलीकडे काय यायला नको .तेव्हा एक फक्त देण्याचं जे काम आहे ते झालं म्हणजे कृतार्थ वाटतं त्याच्या पलीकडे आणखीन आम्हाला काही नाही ,आपण इतकी मंडळी मल्हार पेठेत सहज योगाच्या कार्यक्रमाला आलात म्हणजे किती भाविक आणि किती सात्विक लोक, परत संत तुकारामांच्या नावाने इथे एवढी सुंदर शाळा काढलेली आहे याबद्दल मला इथले मुख्याध्यापक जे आहेत ते मला दिसले नाहीत कोण आहेत ते .तर त्यांना अत्यंत त्यांचे आभार मानायचे आहे संत तुकाराम म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आमचेच आत्मिक स्वतःचे आहेत त्यांनी तर सहज योगाची व्यवस्था आधीच करून ठेवलेली होती त्याचीच तयारी आपल्या Read More …

Shri Durga Puja Rahuri (India)

Shri Durga Puja. Rahuri (India), 1 February 1982. आजची अष्टमी आहे आणि सकाळी रथसप्तमी आजची अष्टमी आहे आणि सकाळी रथसप्तमी! अष्टमीच्या दिवशी पूजन मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि राहुरीला, हे माझं माहेरघर आहे. या ठिकाणी पूजन झालं हे त्याहून विशेष आहे. ह्या अष्टमीच्या दिवशी, आपण तो दिवस साजरा करतो, जेव्हा देवीने अष्टभुजा देवी बनून जगात फार पराक्रम केले. मुख्य पराक्रम म्हणजे जे मोठे मोठे दुष्ट राक्षस होते त्यांचं हनन करणं, त्यांचा नाश करणं. तिला नवचंडी असं म्हणतात, चण्डिका ही अष्टभुजा आहे. दुर्गा.. वगैरे तिची अनेक नावं आहेत. आणि तिने ह्या सर्व चंड-मुंड आदी ह्या अशा नवचंडांचा नाश केलेला आहे , म्हणून तिला नवचंडी म्हणतात. इतकंच नव्हे, महिषासुरासारख्या राक्षसाचासुद्धा तिने वध केलेला आहे. त्याच्यानंतर, महिषासुराला मारल्यावर देवांनी तिची फार भक्ती केली आणि तिचं भजन केलं. पण ज्या भक्तांनी तिला बोलवलं ते अत्यंत धार्मिक, सात्विक आणि अत्यंत गुणी होते. त्यांच्या गुणावर प्रसन्न होऊन देवीने अवतार घेतलेला आहे. तेव्हा आपल्यामध्येही ते गुण बाणले गेले पाहिजेत. आपला देवीवर काय अधिकार? ‘माताजी, आम्ही तुमची पूजा ठेवली आहे. म्हणजे जसं काही आम्ही एखादा कार्यक्रम ठेवलेला आहे, तिथे तुम्ही या, प्रेसिडेंट बनून,’ तसा काहीतरी प्रकार आहे. म्हणजे पुष्कळदा म्हणतात, माताजी आम्ही पूजा ‘ह्या’ वेळेला ठेवली. तसं ठेवून चालायचं नाही. तशी ठेवता येत नाही. आम्ही असलो प्रसन्न तर बसू पूजेला, नाहीतर नाही. आमच्या ह्याच्यावर अवलंबुन असतं, तर म्हणून देवीला आधी बोलवावं लागतं, आमंत्रण द्यावं लागतं. पाचारण असतं, वगैरे वगैरे … ती काय अशी येऊन बसत नाही- “आता तुम्ही ठेवली आहे तर आम्ही बरोबर घड्याळाला येऊन बसलो बुवा, करा आमची पूजा!” कारण देवीला पूजेची गरज नाही, पूजेची Read More …

Ekadasha Rudra Swayambhu Shilanyas (India)

Ekadasha Rudra Swayambhu Shilanyas (Marathi Transcript) आफ्टर सहस्रार   सो ब्युटीफुल , इट्स त्रिगुणात्मिका ,  सी ,वन टू, थ्री .. कॅन यु सी द   त्रिगुणात्मिका. .धिस इज आज्ञा हियर.    ब्युटीफुल !  व्हेन आय से दॅट, इट इझ इव्हन मोर ! (सामूहिक हास्य ). नारळ वगैरे  फोडा इथे. सहजी :  हो. फोडतो ना. श्री माताजी  :  जे साधू संत सांगू शकतात , ते कोणी सांगू शकत नाही. आता हे सगळे साधू संत आलेत , तुम्हाला इथे  सांगायला. .ह्याचं नाव काय ठेवणार तुम्ही? देवळाचे ? कारण हे सहस्रार आहे. सबंध सातही देव आहेत.  सहज योगी  :  ह्यांनी आता काय प्राचीन काळापासून म्हसोबा म्हटलं आहे .  श्री माताजी  :  काय ? सहज योगी :  म्हसोबा . श्री माताजी  :  म्हसोबा? तर म्हसोबा का झालं ? सहज योगी :  अनेक दैवत म्हणून  म्हसोबा त्याला नाव आहे . श्री माताजी : अनेक दैवत म्हणून म्हसोबा. एकादश रुद्र . एकादश रुद्र . म्हसोबा म्हणजे एकादश रुद्र आहे …थोडंसं म्हसोबा म्हणजे कसं आहे . ते काही सगळ्यांना समजत नाही. सहज योगी :  अवघड आहे . श्री माताजी :  तेंव्हा एकादश रुद्र म्हटलं तरी चालेल . किंवा सहस्रार आहे हे. म्हणजे सातही देवता आहेत पण प्रसन्न आहेत. पण एकादश रुद्र म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह पॉवर आहेत. अकरा. त्रिगुणात्मिकाचीही . नाव काहीही दिलं तरी काय ते समजलं पाहिजे. तत्व त्याच्यातलं काय आहे…… काय आहे, तीन आहेत ना आपल्यामध्ये?             सहज योगी  : हो. श्री माताजी  : महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. पैकी ( श्री माताजी स्वयंभू कडे निर्देश करून म्हणतात ) ही मधली महालक्ष्मी आहे आणि ही ,ही महाकाली आणि ही महासरस्वती . अश्या Read More …

Puja, Be Thankful To God (India)

Be Thankful to God; Count Your Blessings 27th Jan. 1982, Kolapur, Maharasthra India .आता ह्यांना जे सांगितलं ते तुम्ही ऐकलेलंच आहे. पण तरीसुद्धा जरी तुमची खूप स्तुती केली, तरीसुद्धा हे समजलं पाहिजे की आपल्या हिंदुस्तानात सुद्धा अनेक तरतऱ्हेचे प्रकार आहेत. ज्यांनी आपण बांधले जातो. ह्यांच्यात श्रद्धा नाही आणि तुमच्यात आंधळी श्रद्धा, पहिली गोष्ट आंधळी श्रद्धा आहे. ती आंधळी श्रद्धा नीट केली पाहिजे. आता माताजीनी सांगितलं, की समजा असं सांगितलं, की बघा काळयामध्ये  काळं घालू नका, की लगेच माझ्यावरती सगळे दंडे घेऊन येतात, का माताजी म्हणे, अरे मी काय, मी कशाला सांगते?  ज्या गोष्टीला मी मना करते ते का करते?  उगीचच सांगत नाही. काळं घातलं म्हणजे त्याने त्रास होतो, ते करायचं नाही. नाही, हे माताजी आम्ही ते ही करतो आणि हेही करतो, तसं चालायचं नाही. दोन्ही करता येणार नाही. सहजयोग करायचा म्हणजे तो शुद्ध स्थितीत केला पाहिजे. ह्यांच्यामध्ये अश्रद्धा आहे, पण तुमच्यामध्ये आंधळी श्रद्धा आहे आणि हट्टी आहात त्याबाबतीत. तेव्हा ते ही ठीक नाही. आता युगधर्म आपण म्हटलेलं आहे. म्हणजे या युगामध्ये, सहजयोगाची धारणा, आपण धारण करायची असते. त्याच्यासाठी शहाणपण असायला पाहिजे. शहाणपण जर नसलं,  हट्ट  जर केला,  तर काहीच करता येण्यासारखं नाही. हट्ट नाही करायचा. बघायला पाहिजे, माताजी जे म्हणतात ते खरं होतं की नाही. झालं ना एकदा, कळलं ना तुम्हाला, व्हायब्रेशन्स आले नं,  हे सगळं लिहिलेलं नं देवीचे महात्म्य, की माताजींच्या पायावर तुम्ही कुंडलीनी पाहिली ना असताना, तर झालं ना, आता मला पुढे सांगायला कशाला पाहिजे. जर हे साक्षात आहे, तर मग कळलं पाहिजे आपल्याला, की माताजी जे म्हणतात ते केलं पाहिजे. सहजयोगात जे म्हटलंय ते केलं पाहिजे, जर ते तुम्ही करणार नाही, तर सहजयोग तुमच्यात वाढणार नाही. नाही वाढला की मग माताजींवर दोष लावायचा की Read More …

Puja Pune (India)

मंगळवार, जानेवारी 19th, 1982 महाराष्ट्राचं प्रेम अगाध आहे आणि ते माझ्या नुसतं हृदयात भरून येतं. इतकं प्रेम तुम्ही लोकांनी दिलेलं आहे, कि त्या प्रेमातच सर्व संसार बुडाला, तर आनंदाच्या लहरी, किती जोरात वाहू लागतील याची मला कल्पना सुद्धा करवत नाही. त्या प्रेमासाठीसच   धडपडत  ही मंडळी तुमची भाषाही त्यांना येतं नाही, तरी सुद्धा इतक्या लांबून दुरून धडपडत महाराष्ट्रात जायचे म्हणून येतात. असं प्रेम जगात कुठेही नाही. हे अगदी खरं आहे. जरा मराठी भाषा सडेतोड आहे, जरा दांडगी आहे, खणखणते जास्त. पण हृदय मात्रं प्रेमाने भरलेलं आहे. भाषेमध्ये खोटा दांभिकपणा नाही. पण एकंदरीत प्रेमाची व्याख्या सुद्धा मराठी भाषेतच करता येते. किती तरी शब्द शोधून मला बाहेर सापडत नाहीत. जशी आपल्या मराठी भाषेत आहेत. कारण हृदयामध्ये जो प्रेमाचा प्रवाह वाहत आहे , त्याच्याच लहरी आदळून, आपटून, नवीन नवीन शब्द बनवतात. आणि त्या शब्दांचे तुषार, त्यातनं संगीत जाणवतं. हे असलं अबाधित प्रेम सदा सर्वदा महाराष्ट्रात राहिलं पाहिजे. ज्या लोकांचा संबंध बाहेरच्या लोकांशी आला आहे, अश्या लोकांमध्ये मात्र, थोडासा फेरबदल झालेला आहे. त्यामुळे प्रेम काय आहे हे लोकांना कळत नाही. प्रेमामध्ये मनुष्याला त्याग म्हणजे हा जाणवतच नाही. एखाद्या आईला आपल्या मुलाबद्दल आस्था वाटते. विशेषतः जर एखादं मूल आजारी असलं तर तिचा जीव नुसतं कासावीस होतो त्या मुलासाठी. हे कसं? केवढं तिच्यासाठी हे धन आहे मोठं, स्वतःचा जीव आतमध्ये घालून, डोक्यात घालून, रात्रंदिवस ती त्या मुलाच्या सेवेसाठी असते. हे कुठून येतं? हे एवढे त्यागाचे जीवन पण वाटते का त्याग आहे? कसंही करून मुलगा ठीक झाला पाहिजे माझा. तसंच आपल्या नवऱ्याबद्दल मुलांच्या बद्दल हीच आस्था ह्या देशात बायकांना आहे. आणि आहे. अजून  पुष्कळांना आहे. तेंव्हा बाहेरचं Read More …

Seminar Part 3 Akurdi (India)

Public Program, Marathi, Penicillin Factory, Akurdi, Pune 1980-12-09 Akurdi session       मागच्या वर्षी आकुर्डीला आमचा प्रोग्रॅम झाला, तेंव्हा मी म्हटलं होतं सहजच  की पेनिसिलीन फॅक्टरी मध्ये बघा प्रयत्न करून, बरीच मंडळी पार होतील  . तेंव्हा लोकांच्या लक्षात आलं नाही की माताजींनी पेनिसिलीन फॅक्टरीचं नाव का घेतलं?  त्याला कारण असं की माझ्या भावाच्या लग्नात मी आले होते इथे पुण्याला. आणि तुमच्या गेस्ट हाऊस  मधेच थांबले होते. तेंव्हा सकाळी उठून इकडे खूप अनवाणीने  फिरले, आणि माझी अशी इच्छा होती , की ही जर जागा सुद्धा चैतन्यमय झाली, तर जी कामगार मंडळी इथे येतील, त्यांच्यावर या वातावरणाचा अवश्य परिणाम होईल. आणि त्याचा आज मात्र दृश्य दिसलं. तेंव्हा सीता आणि राम या महाराष्ट्रामध्ये अनवाणी  का फिरले, त्याचंही कारण आपल्या लक्षात येईल.      परमेश्वरानी  फार कार्य केलेलं आहे. त्याची आपल्याला जाणीव नाही, की आपल्यासाठी परमेश्वरानी काय काय कार्य केलेलं आहे. सबंध सृष्टीच बघा किती सुंदर परमेश्वरानी रचली. रोजच्या आपल्या व्यवहारात सुद्धा आपण बघतो पण आपल्या लक्षात येत नाही की आपण जे अन्न खातो, जी आपण फळं खातो, ही फळंसुद्धा ,परमेश्वरानी आपल्यासाठीच तयार केलेली आहेत. एका फुलातनं आपण फळं काढू शकत नाही. एक सुद्धा आपण जिवंत कार्य करू शकत नाही.      सायन्सचं असं म्हणणं आहे की आम्ही अमीबा पासनं माणसं झालो. ते तरी परमेश्वरानीच केलेलं आहे. अनेक वेळा या संसारामध्ये परमेश्वराचं अवतरण झालं. विष्णू स्वरूपात . आणि त्यांनी हे उत्क्रांतीचं कार्य हे इवोल्युशनचं कार्य केलेलं आहे. पण जेंव्हा जेंव्हा ही  अवतरण  संसारात झाली तेंव्हा लोकांना हे समजलं नाही की याचा आपल्याला काय लाभ होतो. त्यामुळे आपल्यामध्ये कोणची अशी बांधणी नव्हती. त्यामुळे कोणची आपल्याला अशी वरची पायरी नव्हती. श्री विष्णूनी कशाला Read More …

Seminar Mumbai (India)

1980-12-09 Seminar India (Marathi) Sahaj Seminar Date : 9th December 1980 Place Mumbai Туре Seminar & Meeting Speech-Language Marathi CONTENTS | Transcript Marathi 02 – 15 English Hindi || Translation English Hindi Marathi FINAL TRANSCRIPT MARATHI TALK  सर्व संसारिक गोष्टींकडे लक्ष, जसे माझ्या मुलीचं लग्न, झालं माताजींचे पाच तास त्याच्यात. इथे जागृती नाही. लंडनला हृदय आहे. इथे लोकांना हृदय राहिलेलं नाही. हृदय गेलं त्यांचं, संपलं. ते मागेच पार वितळून गेलेलं दिसतं कुठेतरी. संपलय. ते हृदय नाही, फ्रोजन हार्ट , थिजलंय हृदय त्या लोकांचं. झालं. तिसरं झालं, युरोप, ते दारूने सबंध भरलंय! तिथलं लिव्हर कसं असणार? तेव्हा ही दशा झालेली आहे विराट पुरुषांची.  आता तुम्ही जागृत व्हावं. तुमचं लक्ष परमेश्वराकडे वेधलं पाहिजे. काही नाही, आम्ही जातो की हनुमानाला. एखादा नमस्कार घातला की झालं. सकाळी जातो ना! बरं बुवा झालं. पुष्कळ झालं. आम्ही नमस्कार तर करतो. आहे आमचा विश्वास हं परमेश्वरावर! अगदी उपकारच आहेत परमेश्वरावर सगळ्यांचे! अहो, तुम्हाला काही मिळवायचं आहे की नाही असा प्रश्न चार लोकांना विचारायला पाहिजे. सहजयोग्यांचं मुख्य कार्य म्हणजे असं आहे, की प्रकाश मिळाला दिव्याला, तर तो काय करतो? सहजयोगानंतर मग काय करायचं? प्रकाश द्यायचा असतो. किती लोकांना प्रकाश दिला आम्ही? केवढा सुगंध आहे तुमच्यात. केवढा आनंद आहे तुमच्यामध्ये! तो वाटला का तुम्ही का स्वत:च आनंदात बसले. माझी साधना चांगली असली म्हणजे झालं. ‘मी साधना खूप करतो माताजी, माझ्या घरी बसून. आणि काहीच प्रगती होत नाही.’ होणार कशी? पसरायला पाहिजे नां! जोपर्यंत कलेक्टिव्हिटी येणार नाही, जागतिकता येणार नाही, सार्वभौमिकता येणार नाही, तोपर्यंत तुमच्या सहजयोगाला काहीही अर्थ नाहीये. अगदी बेकार आहे. जंगलामध्ये जर एखादं फूल आलं, आणि त्याला कितीही Read More …

The Meaning Of Nirmala Rahuri (India)

  The Meaning Of Nirmala, 1980-01-18 आपण अशे भेटलो म्हणजे आपापल्या हितगुजाच्या गोष्टी करू शकतो, आणि त्याबद्दल जे काही बारीक-सारीक असेल हे सुद्धा आपण सांगू शकतो एकमेकांना, कसं आपण स्वतःला स्वच्छ केलं पाहिजे कारण आपल्या आईचं नावंच मुळी निर्मला आहे. आणि या नावामध्ये पुष्कळ शक्त्या आहेत. पहिला शब्द ‘नि’ आहे. ‘नि’ म्हणजे नाही, नाही जे नाही आणि जे आहे त्याला म्हणतात महामाया. तुम्ही जे नाही आहे वास्तविक, पण आहे असं भासतं, त्याचं नाव आहे महामाया. तसंच हे सर्व संसाराचं आहे. हे दिसतं आहे म्हणून, पण हे काही नाहीच. ह्याला जर आपण बघितलं आणि ह्याच्यात आपण फसलेलो असलो, की असं वाटतं की हेच आहे, हेच आहे व्यर्थ आहे. आर्थिक परिस्थिती वाईट आहे, सामाजिक परिस्थिती वाईट आहे, संसारिक परिस्थिती वाईट आहे. सगळं वाईट दिसतं. चांगलं काही दिसत नाही. समुद्राच्या वर वरच्या थरावर जे पाणी असतं, ते अत्यंत गढूळ, घाणेरडं, त्याच्यामध्ये काय काय वस्तू तरंगत असतात; पण खोल गाभाऱ्यात त्याच्यात गेलं की, इतकं सौंदर्य त्याच्यात, एवढी संपदा शक्ती सगळं काही असतं. तेव्हा ते वरचं काही होतं हे सुद्धा लक्षात राहत नाही. पण सांगायचं म्हणजे हा सगळा भ्रम आहे. हे जे काही बाह्यातलं आहे हे सगळं भ्रम आहे. हे नाही, हे पहिल्यांदा लक्षात ठेवले पाहिजे. ‘नि’ शब्दाची जर तुम्ही आपल्यामध्ये स्थापना केली, हे नाही, हे नाहीय इथून सुरुवात करायची. ‘नेति नेति वचने निर्मोही (अस्पष्ट) हे नाही, हा विचार नाही, हा विचार नाही. परत हा विचार नाहीय असं म्हणत गेलं पाहिजे. ‘निः’ शब्द जो आहे तो विसर्गासहित ‘निः’ आहे त्याचा अर्थ लागतो, तर कायतरी दुसरं आहे. जो भ्रम आपल्याला दिसतो तो भ्रम नाही, तर काहीतरी त्याच्या Read More …

Public Program Akurdi (India)

1980-01-11 Program at Akurdi, Pune आता आपण परम पूज्य माताजींनी पुणे जवळी चिंचवड येथे आकुर्डी गावी केलेला उपदेश ऐका.  हा उपदेश दिनांक ११ जानेवरी १९८० रोजी केला होता. मी आता काय बोलणार आहे हेच माझ्या लक्षात येत नव्हतं. कारण हे सारं प्रेमाचं कार्य आहे. परमेश्वराचं  मानवावर अत्यंत प्रेम आहे. इतकं कोणत्याही वस्तूवर नाही. सृष्टी सबंध निर्माण केल्यावर , सर्व सृष्टीला आपल्या शक्तीच्या जोरावर पूर्णपणे  सुसज्ज  केल्यावर त्यांनी मनुष्याची निर्मिती केली. फार मेहनत घेऊन ही निर्मिती केलेली आहे, आणि ह्या मानवाच्या हातातून , काही तरी विशेष घडणार आहे, एक लहानसा अमीबा आज मानव स्थितीला पोहचला तो कशासाठी? ह्या दिव्याची तयारी हजारो वर्षांनी परमेश्वराने केली आहे.  अनेक वेळेला अवतरणं ह्या संसारात  आली.  त्यांनी हे महान कार्य करून मानव निर्माण केला. त्या नंतर धर्माची सुद्धा स्थापना केली. मानवामध्ये धर्म स्थापन करून त्याला पूर्ण पणे स्वतंत्रता देण्यात आलेली आहे. वाटलं तर त्याने अधर्मात जावं, वाटलं तर त्याने धर्मात राहावं. माणसाला त्याची बुद्धी वापरण्याची पूर्ण मुभा आहे. हे एवढ्यासाठी, की जेव्हां त्याला परमेश्वराच्या साम्राज्यात प्रवेश मिळणार त्या वेळी तो स्वतंत्र असला पाहिजे. आपल्या स्वतंत्रेत त्याने धर्म स्वीकारला पाहिजे. जबरदस्तीने नाही. धर्म हा हितकारी आहे, मंगलमय आहे हे त्याने आपल्या स्वतंत्रेत जाणलं पाहिजे. चुका होतील, उलट मार्गाला सुद्धा जातील, पण शेवटी त्यांनी स्वतःच्या धर्मात बसलं पाहिजे. अशा स्थितीमध्ये आज हा सहज योग, महायोग्याच्या पूर्ण (अस्पष्ट) जन्माला आलेला आहे. महायोग म्हणजे, आता आम्ही मुंबईहून आलो पुण्याला. पुण्याहून, ह्यांनी सांगितलं आकुर्डीला जायचंय माताजी, तरी योग घडला नव्हता, थोडा आराम केला, अजून योग घडला नाही, माझी मुलं वाट बघत बसली आहेत, अजून आम्हाला त्यांचं दर्शन झालेलं नाही. तो पर्यंत योग Read More …

Navaratri Celebrations, Shri Kundalini, Shri Ganesha Mumbai (India)

Kundalini Ani Shri Ganesha 22nd September 1979 Date: Place Mumbai Seminar & Meeting Type आजच्या ह्या शुभ प्रसंगी अशा ह्या सुंदर वातावरणामध्ये इतका सुंदर विषय म्हणजे बरेच योगायोग जुळलेले दिसतात. आजपर्यंत कधी पूजनाचा विषय कुणीच मला सांगितला नव्हता, पण तो किती महत्त्वपूर्ण आहे ! विशेषत: या योगभूमीत, या आपल्या भारतभूमीत, त्यातल्या त्यात महाराष्ट्रातच्या या पुण्यभूमीत,  अष्टविनायकांची रचना सृष्टी देवीने केलेली आहे, तेंव्हा गणेशाचे महात्म्य काय आहे, या अष्टविनायकांचे महत्त्व काय आहे वगैरे गोष्टी फारशा लोकांना माहीत नसतात याचे मला फार आश्चर्य वाटते. कदाचित जे सर्व काही समजत होते, ज्यांना सगळे काही माहीत होते असे जे मोठेमोठे साधुसंत ह्या आपल्या संतभूमीवर झालेले आहेत, त्यांना कोणी बोलायची मुभा दिली नसणार. किंवा त्यांचे कोणी ऐकून घेतले नसेल, पण याबद्दल सांगावे तितके थोडे आहे आणि एकाच्या जागी सात भाषणे जरी ठेवली असली, तरीसुद्धा श्री गणेशाबद्दल बोलतांना मला ती पुरणार नाहीत.  आजचा सुमुहर्त म्हणजे घटपूजनाचा. घटस्थापना ही अनादि आहे म्हणजे ज्यावेळेला या सृष्टीची रचना झाली, अनेकदा. एकाच वेळी सृष्टीची रचना झालेली नाही तर ती अनेकदा झालेली आहे, जेंव्हा या सृष्टीची रचना  झाली तेव्हा आधी घटस्थापना करावी लागली. घट म्हणजे काय? हे अत्यंत सूक्ष्मात समजले पाहिजे. पहिल्यांदा म्हणजे ब्रह्मतत्व म्हणून जी एक स्थिती, परमेश्वराचे वास्तव्य असते, त्याला आपण इंग्लिशमध्ये entropy म्हणू.  जेंव्हा काहीही हालचाल नसते.  त्या स्थितीमध्ये जेव्हा इच्छेचा उद्भव होतो किंवा इच्छेची लहर ‘परमेश्वराला’ येते तेव्हा त्याच्यामध्ये ही इच्छा समावते.  आता काहीतरी संसारामध्ये सृजन केले पाहिजे. क्रिएट केलं पाहिजे.  त्यांना ही इच्छा का होते? ही त्यांची इच्छा. परमेश्वराला इच्छा का होते हे समजणे माणसाच्या डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. अशा पुष्कळशा गोष्टी डोक्याच्या बाहेरच्या आहेत, पण Read More …

Seminar in Dole Rahuri (India)

1979-0227 Seminar Dhule , Maharashtra  [ 1 ] ही पुण्यभूमी आहे. राऊल बाई सारख्या योगिनी जिथे वास करतात, ती भूमी आम्हाला फार पूजनीय आहे. तसेच राहुरी चे धुमाळ साहेब जे आपल्या समोर आज भाषण देत होते, त्यांनीसुद्धा क्रांती घडवून आणलेली आहे खेड्यापाड्यातून. त्यांच्याबरोबर राहुरीहून अनेक सहजयोगी आलेले आहेत.  आणि एक एक हिऱ्यासारखे तासलेले सुंदर सहजयोगी आहेत. हे किती विद्वान आहेत आणि किती परमेश्वरतत्वाबद्दल जाणतात हे जर बघायचं असलं तर त्यांच्यासोबत थोडीशी चर्चा करून बघितली पाहिजे. सहजयोग म्हणजे सहज, सह म्हणजे आपल्याबरोबर, ज म्हणजे जन्मलेला. सहजयोग हा एक महायोग आहे. हा आपल्याबरोबर जन्मलेला आहे. [ 2 ]   असे हात करून बसा, कुंडलिनी जागृत व्हायची तर असे हात करून बसा साधे, टोप्या जरा काढा, काळे कारगोते असतील तर काढून घ्या, म्हणजे बरोबरच होईल ते काळे. काही गळ्यात माळाबीळा असतील तर काढून ठेवलेल्या बऱ्या, कारण त्याने रुकते, कुंडलिनी तिथे थांबते.  आता आपल्यामध्ये कुंडलिनी ही संस्था आहे असं अनादी काळापासून लोकांनी सांगितलेलं आहे. विशेष करून आदिशंकराचार्यानी, मार्केंडेयस्वामींनी त्याच्यावर विस्तारपूर्वक लिहिलेलं आहे. त्यानंतर कबीर, नानक यांनीसुद्धा याच्यावर विस्तारपूर्वक लिहिलेल आहे. ही तुमची आई आहे आणि आई हे फार पवित्र स्थान आहे. आता फ्रॉईड सारख्या घाणेरड्या माणसाने आपल्या आईशी घाणेरडा संबंध ठेऊन आणि फारच घाणेरडी स्थिती काढलेली आहे. आणि त्यामुळे आज पाश्चिमात्य देशामध्ये त्यांची जितकी हानी झालीये ती जाऊन बघावी आणि मग आश्चर्य वाटत कि ह्या राक्षसांनी, हिटलरनी तर नुसता लोकांचा शिरच्छेद केला पण याने सगळ्यांची ही कुंडलिनीच फिरवून टाकलेली आहे कारण कुंडलिनी ही आई आहे आणि ती पवित्र आई आहे. आईचं पवित्रपण भारतीय माणसाला सांगायला नको. जे लोक आईचं पवित्रपण जाणत नाही त्यांना सहजयोग लाभू शकत Read More …

Puja Pune (India)

सहजयोग्यांशी हितगुज पुणे, २५ फेब्रुवारी १९७९ आता सगळी इथे सहजयोगी मंडळी जमलेली आहेत. त्यामुळे हितगुज आहे आणि भाषण नाही. हितगुज हा शब्द मराठी भाषेत इतका सुंदर आहे की जे हितकारी आहे, जे आत्म्याला हितकारी आहे ते सांगायचे. आणि पूर्वी असे म्हणत असत, की ‘सत्यं वदेत, प्रियं वदेत.’ यांची सांगड कशी घालायची? सत्य बोलायचे तर ते प्रिय होत नाही आणि प्रिय बोलायचे तर ते सत्यच असले पाहिजे असे नाही. याची सांगड बसायची म्हणजे फार कठीण काम. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याचा दुवा काढला आणि सांगितले, की ‘सत्यं वदेत, हितं वदेत आणि प्रियं वदेत’ म्हणजे जे आत्म्याला हितकारक आहे, हित म्हणजे आत्म्याचा संतोष. ते जरी अप्रिय असले तरी शेवटी ते प्रिय होते आणि ते सत्य असते. समजा, उद्या जर एखादा मनुष्य इथे राजवाड्यांच्याकडे आला आणि त्याने येऊन असे विचारले, की अमका मनुष्य इथे लपलेला आहे का ? आणि हातात सुरा घेऊन आलेला आहे. तर राजवाड्यांनी काय सांगावे त्याला. ‘तो लपलेला आहे’ हे सत्य आहे. ते त्याला सांगायचे का, की ‘तो इथे लपलेला आहे.’ किंवा ते सत्य जर सांगितले तर ते ठीक होईल का, ते हितकारक होईल का? असा प्रश्न पुढे उभा राहतो. तेव्हा पहिली गोष्ट त्याला अशी की ही अनाधिकार चेष्टा आहे. त्यांनी जर म्हटले, की ‘त्या माणसाचा मला पत्ता सांगा,’ तर ‘हा कोण विचारणारा?’ तुम्हाला विचारणारा हा कोण? ही अनाधिकार चेष्टा आहे. तेव्हा कोणत्याही अनाधिकार चेष्टेला तुम्ही उत्तर दिलेच पाहिजे, हे काही हितकारी होणारच नाही मुळी . अधिकार असावा लागतो. तसेच सहजयोगात आहे. जरी आम्ही पूर्णपणे आपल्यावर प्रेम करतो आणि ही आमची हार्दिक इच्छा आहे, की सगळ्यांनी सहजयोगामध्ये परमेश्वराचा आशीर्वाद घ्यावा आणि परमेश्वराच्या Read More …

Seminar Ahmednagar (India)

कुण्डलिनी शक्ती आणि सात चक्र अहमदनगर, २३ फेब्रुवारी १९७९ अहमदनगरच्या नागरिकांनी इतक्या प्रेमाने आम्हाला आमंत्रण पाठवलं त्याबद्दल आम्ही सर्वच आपले फार आभारी आहोत. त्यातूनही अहमदनगर जिल्हा म्हणजे काही तरी मला विशेष वाटतो. कारण राहुरीला जे कार्य सुरू झालं आणि जे पसरत चाललं त्यावरून हे लक्षात आलं की या जिल्ह्यामध्ये काहीतरी विशेष धार्मिक कार्य पूर्वी झालेलं आहे. तसेच महाराष्ट्र हा एक आध्यात्मिक परिसर आहे. म्हणून अनेक संतांनी इथे जन्म घेऊन अनेक कार्य केलेली आहेत. सगळ्यात शेवटी सांगायचे म्हणजे साईनाथांनी आपल्याला माहिती आहे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये फार सुंदर कार्य केलेले आहे. ही सगळी तयारी अनादिकालापासून मानवामध्ये झालेली आहे.  मनुष्य हा एक अमिबापासून वाढत वाढत आज या दिशेला पोहोचलेला आहे की तो परमेश्वराबद्दल विचार करू लागला. तो अमिबापासून या दशेला का आला ? एवढी मेहनत त्याच्यावर का घेतली गेली? तो आज मानव स्थितीत येऊन तरी पूर्णत्वाला आलेला आहे की नाही ? ज्यासाठी त्याला अमिबापासून त्या स्थितीला आणून सोडलेले आहे त्या स्थितीत येऊन तरी काय त्याला सगळे माहीत झालेलं आहे? परमेश्वराबद्दल जे त्याच्यामध्ये कुतूहल आहे, काहीतरी उत्कंठा आहे, जिज्ञासा आहे. परमात्मा म्हणून कोणी तरी शक्ती संसारात आहे, असं प्रत्येक मानवाला वाटत असतं. ते त्यानं कसं जाणलं, कुठून जाणलं? त्याबद्दल त्याने पुष्कळ पुस्तकं लिहिली आहेत, संतांची पूजा केलेली आहे. त्रास ही दिलेला आहे. अशा या मानवाला काहीतरी अर्थ असला पाहिजे. वायफळ कुणीतरी इतकी मेहनत केलेली नसणार. निदान परमेश्वराने तरी केलेली नसणार. जर समजा आम्ही हे एक यंत्र बनवलं. त्याचा आधी पाया घातला, त्याची सबंध व्यवस्था केली तर सहजच आपण विचाराल की ‘माताजी, कोणासाठी? काय आहे हे? काय बनवणं चालवलंय तुम्ही? याच्यातून काय होणार?’ हे सगळं Read More …

Seminar (India)

Aapan Dharma Janla Pahije Date 19th January 1979 : Place Kalwe Seminar & Meeting Type Speech Language Marathi लंडनहुन मुंबईला यायचं म्हणजे फार बरं वाटतं कारण लंडन फारच गजबजाटातलं आणखीन अत्यंत यांत्रिक शहर आहे आणि तिथल्या लोकांची एकंदर प्रवृत्तिसुद्धा यांत्रिक झालेली आहे. मग मुंबईहन कळव्याला यायचं की त्याहून बरं वाटतं. कारण शहरातून जी स्थिती आज लोकांच्या मनाची आणि श्रद्धेची होत आहे ती पाहून असं वाटतं की कुठूनतरी दोन-चार मंडळी खऱ्या श्रद्धेची असतील अशा ठिकाणी जावं . आमचा सहजयोग हा खेड्यापाड्यातून होणार आहे , शहरातून होणार नाही. हे मागे मी बोलले होते आणि त्याची प्रचिती आम्हाला येते. आता तुम्ही मुंबईच्या जरा जवळ असल्यामुळे थोडंबहूुत शहराचं वातावरण आलं आहे तुमच्यात, पण तरीसुद्धा ह्या प्रसन्न, नैसग्गिक वातावरणात रहाणाऱ्या लोकांना परमेश्वराची जाणीव सतत असते. परमेश्वर आहे किंवा नाही त्याबद्दल आपण आजपर्यंत जे काही वाचत आलो होतो त्यात काही अर्थ आहे की उगीचच आपल्याला काहीतरी भुलवण्यासाठी म्हणून लोकांनी हे ग्रंथ लिहिले आहेत, हे पडताळून पहाण्याची आणि त्याची पूर्णपणे प्रचिती घेण्याची ही वेळ आहे कारण आपण देवाच्या नावावर अनेक उपटसुंभ लोकच बघत असतो. देवळात गेलं की तुम्हाला पैसे द्यावे लागतात. दोन पैसे द्या तेव्हा तुम्ही जवळ राहणार. एखादा श्रीमंत मनुष्य जर देवळात आला की लगेच पहिल्यांदा त्याच्या गळ्यात हार, सगळ्यात मोठा हार देवाचा त्याला घातला जातो. जसं काही देवालासुद्धा पैशाचं फार समजतं ! त्यातनं जर तो एखाद्या मोठ्या मोटारीतून आला तर त्याला आणखीनच फार जवळ समजलं जातं. पण देव हा भावाचा भूकेला आहे. त्याला पैसा, अडका आणि बाहेरची श्रीमंती समजत नाही. त्याला श्रद्धेची श्रीमंती समजते. तो श्रद्धेचा भुकेला आहे आणि श्रद्धाच त्याला ओळखू शकते. आता श्रद्धेचा Read More …

Sahaja Yoga is a big blessing (India)

Sahajayogacha Upyog Saglyani Karun Ghyava ICI 25th March 1977 Date : Place Kalwe Public Program Type Speech Language Marathi यांनी हा सुंदर योग घडवून आणलेला आहे, की मी आज आपल्याला सर्वांना भेटायला इथे खारे गावात आलेली आहे. असे योगायोग जुने असतात. जन्मजन्मांतरातले असतात ते. आणि त्यांची पुनरावृत्ती अशी कशी कशी होते ते आपल्या एवढं लक्षात येणार नाही, कारण आपल्याला आपले पूर्वजन्म माहीत नाहीत. पण हे पूर्वजन्माचेच योगायोग आहेत. आणि त्यामुळेच आज परत, या जन्मातसुद्धा आपणा सर्वांना भेटण्याचा, हा उत्तम योग आलेला आहे. इथे येण्यात मला इतका आनंद होत आहे की तो मी खरंच शब्दांनी वर्णन करून सांगू शकत नाही. ग्रामीण विभागात, सहजयोग, फार उत्तम तऱ्हेने पोहोचला जाईल हे मला माहीत आहे. कारण शहरात राहणारे हे लोक, ही मंडळी स्वत:ला फार शहाणी समजतात. एक तर बहुतेक पढतमूर्खच असतात. पढतमूर्ख नसले तर पैशाच्या व सत्तेच्या दमावर स्वत:ला काही तरी विशेष समजतात. त्यांना असं वाटतं की सगळं जग त्यांनीच निर्माण केलेलं आहे. हे आकाशसुद्धा त्यांनीच निर्माण केलेले आहे आणि तेच परमेश्वराच्या ठिकाणी आहेत आणि परमेश्वर नावाची वस्तु काही जगात नाही. कधीही त्यांना कोणतंही वाईट काम करताना परमेश्वराचा विचार येत नाही, की आपण हे अधर्माचं कार्य करीत आहोत. अजून आपल्या देशातली ग्रामीण वस्ती किंवा ग्रामीण मंडळी परमेश्वराला आठवून आहेत. आपली भारतभूमी ही एक योगभूमी आहे आणि रामाने आणि सीतेनी पायी प्रवास करून सर्व भूमीला पुनीत केलेले आहे, पवित्र केलेले आहे. ग्रामीण समाजामध्ये, जो एक साधेपणा, भोळेपणा आणि परमेश्वराची परम भक्ती आहे, त्याचा दुरुपयोगसुद्धा लोक करतात म्हणजे पुष्कळसे लोक खोट्या गोष्टी सांगून पैसे उकळतात. काही तरी भोळ्याभाबड्या लोकांना भिववून काही तरी देवाबद्दल गोष्टी सांगून त्यांच्यामध्ये Read More …

Sahajayoga Baddal Sarvanna Sangayche Mumbai (India)

Sahajayoga Baddal Sarvanna Sangayche,Bombay (India), 27 May 1976. सहजयोगावर एका सहजयोग्याने म्हंटले आहे की , ‘माताजी, तुम्ही आधी कळस मग पाया देता, आधी तुम्ही आमचा कळस बांधता.’ आणि खरोखर ही गोष्ट खरी आहे. म्हणजे समाधीला आत्तापर्यंत साधारणपणे जे काही लोकांनी केलं, मेहनत केली वगैरे वरगैरे, योग म्हणा, हठयोग म्हणा, काही राजयोग म्हणा, जे काही केलं असेल ते, अर्थात त्याच्यातले काही खरे आणि काही खोटे असे सगळे मिळून त्या लोकांनी जे काही साधलं किंवा केलं, ती पद्धत म्हणजे ज्याला द्राविडी प्राणायाम म्हणतात, त्याच्यापेक्षा जास्त जबरदस्त त्रास आहे आणि ते काढायचं, तर त्याला एक पुराण लागेल सगळें काही सांगायचं म्हटलं. अर्थात् एक पुस्तक पातंजली योगशास्त्र एवढं मोठं आहे. ते एक हं मात्र. बाकी अनेक असतील अशी. आणि पुष्कळ असे शास्त्र वगैरे लिहिले गेले, मनुष्याने अध्यात्म कसा घडवून आणायचा आणि अध्यात्माने वर कसं यायचं आणि उंची कशी गाठायची, वगैरे वरगैरे अनेक पुराणं आपल्याकडे लिहिली गेलेली आहेत. त्यापैकी काही खरी आहेत, काही खोटी आहेत. काही घोटाळे आहेत आणि काही म्हणजे मूर्खपणा पण आहे. त्यात कारण असं, की जे शोधणारे होते, ते मुळात आंधळे होते. पण शोधता शोधता जेव्हा त्यांना सापडलं, तेव्हा डोळस झाले आणि डोळस झाल्यावर आम्ही आंधळेपणातून हे सगळे काही मिळविलेले आहे, तेव्हा तसंच सगळ्यांनी मिळवावं किंवा तसेच मिळेल. अशा पद्धतीने त्यांची मांडणी केली. ते बरोबरच आहे. त्यांच्या दृष्टीने ते बरोबर आहे. आता असं आहे की जो मनुष्य बैलगाडीतून नेहमी प्रवास करतो, त्याला एरोप्लेनच्या प्रवासाची काय कल्पना येणार! कितीही कितीही कल्पना केली तरी त्याला काय कल्पना येणार? तसंच आहे आमच्या या सहजयोगाचं! अध्यात्मामध्ये ज्यांनी नुसतं आपल्या तंगड्या तोडल्या, डोक्यावर उभे राहिले वर्षानुवर्ष. श्वासोच्छवास Read More …

Public Program Rahuri (India)

1976-0314, Public Program,Rahuri  महात्मा फुले विद्यापीठाचे प्राध्यापक साहेब, प्राध्यापक वर्ग तसेच परदेशातून आलेले अनेक सहज योगी आणि सर्वात मान्य म्हणजे उद्याचे नागरिक तुम्ही सर्व विद्यार्थी वर्ग यांना माझा नमस्कार. (टाळ्यांचा आवाज)सगळ्यात आधी क्षमा मागायला पाहिजे कारण दैवी कार्य आणि मनुष्याचं कार्य याचा मेळ कधीकधी बसत नसतो आणि प्रत्येक गोष्टीची बंधनं असतात. तुमचं घड्याळ एका प्रकारे चालतं आणि परमेश्वराचं दुसऱ्या प्रकारे चालत आहे तेव्हा त्याचा मेळ बसला पाहिजे. मी पुष्कळ प्रयत्न करते कधीकधी असा उशीर होऊन जातो. नंतर त्यांची कारणं कळल्यावर आपण मला खरंच क्षमा करा. असो आपल्यापुढे आज (अस्पष्ट) भाषण दिलंय (अस्पष्ट) एक तास, त्यानंतर एक तास चव्हाण साहेब बोलले असं त्यांनी मला सांगितलं. विषय बोलण्याचा नाहीच आहे मुळी किंवा वाद-विवाद करण्याचा सुद्धा नाहीय. तुम्ही एक साधी गोष्ट की आपण अमिबा पासून माणसं झालोत तर आपण कोणता वाद-विवाद केला, कोणती पुस्तकं वाचली, कोणचं शास्त्र त्यात घातलत, कोणचं आपण टेक्निक लावलत. आणि इतकी आपलं टेक्निक शास्त्रीय ज्ञान वाढल्यावर सुद्धा आज सायन्स अगदी पराकोटीला आपण पोहोचलोय म्हणतो तरीसुद्धा विध्वंसक शक्ती मात्र आपल्याजवळ खूप हातात आलेली आहे पण अशी अजून एकही आपण किमया गाठली नाही की ज्यांनी आपण जिवंत कार्य करू शकतो. आता आपण शेतकरी आहात आपण बघता की बी-बियाणं दिसायला जिवंत दिसत नाहीत पण पृथ्वीच्या पोटात घातल्या बरोबर तिला जिवंतपणा येतो आणि जिवंत कार्य घडू लागते, घडतं, ते करू शकत नाही, आपण त्यासाठी जर समजा एखाद्या बी- बियाणा पुढे मी लेक्चर दिलं तर ते येईल का? ते जमेल का? त्याला अंकुर फुटेल? सगळी जेवढी जिवंत कार्य आहेत ती आपोआप त्याला इंग्लिश मध्ये स्पाँट्यानुएस्ली म्हणतात ते. त्याच्यासाठी काही तुम्ही प्रयत्न करतो म्हटलं तर तो नुसता स्वतःचा एक मनाचा विचार किंवा एक मनाचं समाधान Read More …