Poem: To My Flower Children (United States)

माझया फुलांसारख्या मुलांसाठी तुम्ही जीवनावर रुष्ट आहातजशी की लहानगी मुल॑ –ज्यांची आई अंधारात हरवली आहे . तुमचे उदास, म्लान चेहरेदाखवताहेत दु:ख, निराशा –कारण की तुमच्या प्रवासाचा अंत निष्फव्ठ आहे. सौंदर्याला शोधण्यासाठी तुम्ही तरकुरूपताच परिधान केली.सत्याच्या नावाखाली तुम्ही तर प्रत्येक गोष्टीलाअसत्याचं नाव देता. प्रेमाचा पेला भरण्यासाठी तुम्ही तर भावनांनाच रितं करून टाकलं आहे ! माझया सुंदर, गोड बाव्डंनो, माझया प्रिय लेकरांनो,युद्ध लदून तुम्हाला शांतता कशी लाभू शकेल ?युद्ध-स्वतःशी, स्वत:च्या अस्तित्वाशी आणि स्वत:च्या आनंदाशी देखील !आता कमब्ठच्या पाकब्ब्यांम ध्येतुमच्या वत्सल, कृपाव्दू आईच्या च्या कुशीतविसावा घ्या ! मी फुलांच्या सुंदर बहरानं तुमच्या जीवनाला सजवेन, शोभिवंत करेन.आणि तुमचा प्रत्येक क्षण आणि जीवनआनंदाच्या आमोदानं दरवव्दून टाकेन. मी मस्तकावर तुमच्या दिव्य प्रेमाचा अभिषेक करेन! तुमच्या यातना आता मला अधिक सहन नाही करता येत. मला तुम्हाला प्रेमाच्या महासागरात डुंबवू देतज्यामुब्ठे तुम्ही तुमचं अस्तित्व अधिक महान असणान्या ‘एका’मध्ये विरघव्ठवून टाकेन !जो तुमच्या च्या आत्म्याच्या कब्ठीच्या या कोशातून शातूनमंद हास्य करतो आहे आणि तुम्हाला सारखं सारखं चिडवायला तो गुपचूप लपला आहे – तुमच्यातच ! जरा जाणीव होऊ दा, भानावर या. आणि तुम्ही त्या ‘महान’ला शोधू शकाल,तुमच्या कणाकणात, तंतू तंतूत, नसा-नसांमध्येपरमानंदाच्या सुखान॑ स्पंदित करतो आहे तो !आणि संपूर्ण विश्वाला प्रकाशानं व्यापून, लपेटूनझाकून टाकत आहे तो ! आई निर्मला

Talk Mumbai (India)

लहान मुलांना घड्याळ बघता येत नाही आणि रागवता येत नाही. माझी अशी इच्छा आहे,  या वेळेला, थोडं लहान मुलासारखं आपल्या मनामध्ये, आपल्या आईकडे कशी आपली दृष्टी असते, तसा दृष्टीने जरा घड्याळ बिड्याळ बाजूला काढून, डोक्यावरची सगळी ओझी एकीकडे उतरवून आरामात बसा. आपण आईकडे गेलो म्हणजे सगळं फेकून बेकून आईच्या मांडीवर डोकं ठेवतो – आता पुष्कळ झालं सगळं, आता थोडं आरामात राहू द्या आम्हाला. असं समजून, थोड्यावेळ आराम करायला आलाय, असं समजून सहज भावनेत बसा. मी कधी कधी थट्टेनी सांगत असते, की काही अडाणी लोकं, ट्रेन मधून पहिल्यांदा चालले होते आणि आपल्या डोक्यावर पुष्कळस  सामान लादून घेतलं होतं. लोक म्हणाले हे काय करता तुम्ही? आम्ही हे ट्रेनचं ओझं जरा कमी करतोय. तसंच आपण घरातून पुष्कळ ओझी घेऊन आलोय, पैकी आठ वाजता इकडे जायचं दहा वाजता तिकडे जायचं आहे. देवाच्या घरात काही घड्याळ नाही, तेव्हा त्यांना म्हटलं अहो काय तुम्ही ओझी लादत्ता? तुम्ही ज्या ट्रेनमध्ये बसला आहात, तीच ट्रेन तुमचं सगळं वजन घेत आहे, तुमचही आणि तुमच्या डोक्यावर आहे त्याचाही. तसंच आपण आपल्या डोक्यावर उगीचच बोजी घेऊन सगळ्या जगाचं कर्तृत्व घेऊन बसले आहोत आणि कर्ता झालेलो आहोत  खरं करणारा तर परमात्मा आहे, आपण काहीही करत नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल की उद्या हा माईक म्हणायला लागेल की मी भाषण देतो, आपण त्याच्यावर हसू पण आपली स्थिती ही तीच आहे. आपण नुसतं परमात्म्याच्या हातातले एक खेळणं आहोत.  ही जाणीव सामूहिक भाषणांनी, विवादांनी याने त्याने येत नाही. ही जाणीव फक्त एकदा झाली की आपण मोकळे होतो. जी मंडळी आम्ही म्हणतो की पार झाली, घरी जाऊन  घोडे विकून जसे झोपतात तसे झोपून जातात. कारण झालं पुष्कळ उचललं उगीचच.   तुम्ही Read More …