Talk

Mumbai (India)

1972-01-01 Public Program Thana Mumbai Marathi Pasq, 54'
Download video - mkv format (standard quality): Watch on Youtube: Watch and download video - mp4 format on Vimeo: Listen on Soundcloud: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

लहान मुलांना घड्याळ बघता येत नाही आणि रागवता येत नाही. माझी अशी इच्छा आहे,  या वेळेला, थोडं लहान मुलासारखं आपल्या मनामध्ये, आपल्या आईकडे कशी आपली दृष्टी असते, तसा दृष्टीने जरा घड्याळ बिड्याळ बाजूला काढून, डोक्यावरची सगळी ओझी एकीकडे उतरवून आरामात बसा. आपण आईकडे गेलो म्हणजे सगळं फेकून बेकून आईच्या मांडीवर डोकं ठेवतो – आता पुष्कळ झालं सगळं, आता थोडं आरामात राहू द्या आम्हाला. असं समजून, थोड्यावेळ आराम करायला आलाय, असं समजून सहज भावनेत बसा.

मी कधी कधी थट्टेनी सांगत असते, की काही अडाणी लोकं, ट्रेन मधून पहिल्यांदा चालले होते आणि आपल्या डोक्यावर पुष्कळस  सामान लादून घेतलं होतं. लोक म्हणाले हे काय करता तुम्ही? आम्ही हे ट्रेनचं ओझं जरा कमी करतोय. तसंच आपण घरातून पुष्कळ ओझी घेऊन आलोय, पैकी आठ वाजता इकडे जायचं दहा वाजता तिकडे जायचं आहे. देवाच्या घरात काही घड्याळ नाही, तेव्हा त्यांना म्हटलं अहो काय तुम्ही ओझी लादत्ता? तुम्ही ज्या ट्रेनमध्ये बसला आहात, तीच ट्रेन तुमचं सगळं वजन घेत आहे, तुमचही आणि तुमच्या डोक्यावर आहे त्याचाही. तसंच आपण आपल्या डोक्यावर उगीचच बोजी घेऊन सगळ्या जगाचं कर्तृत्व घेऊन बसले आहोत आणि कर्ता झालेलो आहोत 

खरं करणारा तर परमात्मा आहे, आपण काहीही करत नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल की उद्या हा माईक म्हणायला लागेल की मी भाषण देतो, आपण त्याच्यावर हसू पण आपली स्थिती ही तीच आहे. आपण नुसतं परमात्म्याच्या हातातले एक खेळणं आहोत.  ही जाणीव सामूहिक भाषणांनी, विवादांनी याने त्याने येत नाही. ही जाणीव फक्त एकदा झाली की आपण मोकळे होतो. जी मंडळी आम्ही म्हणतो की पार झाली, घरी जाऊन  घोडे विकून जसे झोपतात तसे झोपून जातात. कारण झालं पुष्कळ उचललं उगीचच. 

 तुम्ही असा विचार करायचा की  एखादं नाटक होतंय, आणि नाटकात आम्हीच शिवाजी आहोत. तलवार बिलवार काढून आम्ही तयार होतो तिकडे. इतक्यात नाटक संपतं आणि कळतं की आपण उगीचच काहीतरी नाटक आहे आणि लीला आहे. आणि ही सगळी लीला आपण करून ठेवली आहे. आपल्या मध्ये आणि मुलांमध्ये हाच फरक आहे की, मुले सगळ्याचा खेळ करतात आणि आपण खेळाचा उगीचच काहीतरी बागल बुवा करून सिरीयस बसलेलो आहोत. तसं काहीच नाही आहे, सगळी लीला आणि खेळ आहे. पण त्याच्यासाठी, ती मनाची स्थिती आणी आपल्या आंतरधारेत उतरल्यावर येणारी मानसिक शांती मिळायला हवी.

आज सकाळी मी आपल्याला थोडीशी कल्पना दिलेली, की आपल्या शरीरामध्ये जी शक्ती वाहत आहे, जिच्यामुळे हृदयाचा स्पंदन होत आहे, तिच्यामुळे साऱ्या सृष्टीचा पूजन आणि वहन होत आहे, ती प्रेम शक्ती परमात्म्याची आपल्याला जाण्याची आहे. लोक दचकतात हो, त्यांना जर म्हटलं की प्रेमाच्या शक्तीने परमात्म्याने सबंध सृष्टीचं सूर्जन केलं,  हे ऐकून दचकतात. हे काय श्री माताजी? काय म्हणतात? पण हे खरं आहे. जर परमात्म्याला प्रेम वाटलं नसतं त्याच्या हृदयामध्ये, प्रेमाचं स्पंदन झालं नसतं, तर त्या परमपुरुषोत्तमाला काय गरज होती ही सृष्टी तयार करायची? त्याला प्रेम वाटलं आणि ही रचना करावीशी वाटली, त्यामुळेच आज आपण या पृथ्वी तळावर आलेलो आहोत. आणि याच मानवातून परमेश्वराला आपलं सामर्थ्य प्रकट करायचा आहे,  म्हणून त्यासाठी आपल्याला सुद्धा संपूर्णपणे तयार केलेला आहे. ते कसं केलेलं आहे आणि तयार केलेला आहे हे मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगणार आहे. त्यासाठी हा फळाबिळा लावलेला आहे, तेव्हा आपण आता शाळेत आहोत अशी कल्पना करावी, आणि थोडं फळ्या बरोबर समजून सांगते.

थोडा विषय क्लिष्ट आहे, कारण त्याला असं आहे, आता माईक सुरू करायचं म्हणजे एक बटन सुरू केलं की तो सुरू होतो हे आपल्याला माहित आहे. पण या माईक मध्ये काय काय प्रकार असतात आणि कोणकोणत्या तारेने आणि कसं कसं हे काम करतं ते सांगणं म्हणजे क्लिष्ट होणार. तसंच सहजयोग सहज सांगता येतो, पण त्याच्या मागे फार मोठी गुंतागुंत आहे, वगैरे,  या गोष्टी आज तुम्ही नवशक्तीत वाचल्याच असतील. आणि ती गुंतागुंत काय आहे ते मी आज थोडक्यात सांगते. म्हणून कंटाळा करू नका कारण आता काही काही इथे बुद्धिवादी बसले आहेत, काही काही मोठे लोक आहेत, त्यांच्यासाठी थोडसं सांगते. 

इथे चित्र काढलेला आहे. जेव्हा लहान मूल आईच्या गर्भात असतं, जवळ जवळ  दोन-तीन महिन्याचा असताना, तेव्हा जी जडशक्ती असते, ती जडशक्ती पूर्णपणे आपलं कार्य करून ठेवते. म्हणजे मनबुद्धी, अहंकार,  चित्त  वगैरे, सर्व गोष्टी तयार असतात. पण त्याचा प्रकाश, म्हणजे त्याच्या मध्ये जी शक्ती आहे, त्याचं पूर्ण पणे यंत्र तयार केलेल आहे. पण याला शक्ती येण्यासाठी आम्हाला प्लग लावावा लागतो की नाही? तसल्या तर्हेचा इथे – एक दोन आणि तीन – अशा तीन रेघांनी दाखवलेली जी आकृती आहे, या त्या परम प्रेमशक्ती चे किरणे आहेत. जडशक्ती आणि प्रेम शक्ती ह्या  अगदी वेगळ्या आहेत. चैतन्य शक्ती आणि जड शक्ती . चैतन्य म्हणजेच प्रेम शक्ती आहे. या अगदी दोन वेगळ्या शक्त्या आहेत. पैकी जड शक्ती वरती चैतन्य शक्तीचा पूर्ण अधिकार असून ती सबंध त्याच्या पूजनाला चालना देते. ती मनुष्याला तयार करून, त्याच्यामध्ये त्याचं शरीर, मन, बुद्धी हृदय जे  काही आहे, ते सर्व बनवून ती तयार ठेवते. आणि नंतर हे जे प्लग लावण्याची गोष्ट आहे, त्याच्यामध्ये जी शक्ती येते,  जी खरोखर येते, आतून कार्यप्रवण होणारी शक्ती, जिला मी चैतन्य शक्ती म्हणते किंवा तुम्ही प्रेम शक्ती म्हणा, ती त्याच्यामध्ये अश्या रितीने मेंदूवर पडते. आता हा आपला मेंदू आहे, आणि मेंदू हा काचेच्या लोलका सारखा  असल्यामुळे, आपल्याला माहित आहे की काचेच्या लोलकावर सूर्याचे किरण पडले की तर त्याचे सात रंग निघतात. त्यामुळे जे मधोमध पडतात ते बरोबर मधूनच जातात आणि बाजूला पडलेले ते असे फिरून, रिफ्रॅक्शन म्हणतात त्याला, बाजूनी जातात. अशा रीतीने आपल्या शरीरात चार शक्त्या तयार होतात. पैकी इथे मी फक्त तीनच शक्त्यान  बोलणार आहे. कारण चौथी शक्ती इतकी महत्त्वपूर्ण नाही.

जी पहिली मधोमध जाते, ती जाऊन आपल्या पाठीच्या कण्यातून निघून खाली त्रिकोणा कार आपल्या शरीरामध्ये अस्थी आहेत त्याच्यामध्ये जाऊन साडेतीन वेटोळे घालून बसते. ती कुंडलिनी आहे. आता तुम्ही म्हणाल हे डॉक्टरांना का कळत नाही? नाही कळत, मी स्वतः डॉक्टरी शिकलेली आहे. त्यांना जर तुम्ही विचारलं की पॅरा सिमफथेटिक नेर्वोस सिस्टिम बद्दल काय माहित आहे, ते म्हणतील फार कमी माहित आहे आम्हाला, काय जास्त माहित नाही. तर ही पॅरा सिमफथेटिक नेर्वोस सिस्टिमच आहे. ती जेव्हा मध्यातून जाते तेव्हा तिला आम्ही कुंडलिनी म्हणतो आणि त्या मार्गाला सुषमना म्हणतो. पण तिचा प्रादुर्भाव किंवा तीच प्रतिबिंब बाहेर येतं त्याला आम्ही पॅरा सिमफथेटिक नेर्वोस सिस्टिम म्हणतो. तिला लोक म्हणतात स्वयं चालीत, ती आपोआप चालते. म्हणजे तुमचे हृदयाचे ठोके कमी होतात – तुमचा श्वास कमी होतो, त्या स्वयं चालीत पॅरा सिमफथेटिक नेर्वोस सिस्टिम ला, डॉक्टरांच असं म्हणणं आहे की आम्ही हात घालू शकत नाही कारण ती स्वयं चालीत आहे – ऑटोनोमस आहे. तिच्या काही काही ओळखी दिलेल्या आहेत – पॅरा सिमफथेटिक नेर्वोस सिस्टिम जर चाली तर हृदयाचे ठोके कमी होतील, ब्लड प्रेशर कमी होईल, पोटामध्ये जर कॉन्स्टिपेशन वगैरे असेल तर उलट डायरिया होईल. म्हणजे काय आहे कोणतेही….10.30. नंतर तुमच्या डोळ्याच्या आतली जी भुबळं आहेत ती सुद्धा मोठी होती – डायलते होतील, अशा पुष्कळशा तिच्या निदान आहेत आणी आपण सांगू शकतो की याची पॅरा सिमफथेटिक नेर्वोस सिस्टिम चालू आहे.

बर आता दुसरी ह्या ज्या दोन आहेत, त्यांना आपल्या शरीर शास्त्रामध्ये सिमफथेटिक नेर्वोस सिस्टिमच्या नावाने ओळखतात. अर्थात ते लोक सगळं बाहेरच बघतात, आणि जो भ्रष्ट असतो तो आतल बघतो. जसं हाताच सेंटर आपल्या डोक्यामध्ये आहे, तसंच सिमफथेटिक आणी पॅरा

 सिमफथेटिक चे जे सेन्टर आहेत ते आपल्या मज्जा रज्जू मध्ये आहेत 11.11

आत मध्ये बरोबर त्याचे तीन असे भाग आहेत. पैकी मधल्या भागाला सुशुमना नाडी म्हणतात. आणि ह्या दोन्हीला इडा आणि पिंगला म्हणतात. यांना चंद्र नाडी आणि सूर्य नाडी असंही म्हणतात. पुष्कळ लोक त्यांना उजवा डावा असेही म्हणतात. तऱ्हे तऱ्हे ची नावे यांना देऊन ठेवलेली आहेत. सिमफथेटिक नेर्वोस सिस्टिम ची ओळख अशी असते, कि या इड्या आणि पिंगल्या चालल्या की काम, आता आपण इथे बघत आहात की चार ते सहा मध्ये ही जी पॅरा सिमफथेटिकमधली सुशुमना आहे तिच्यामध्ये जागा आहे. जेव्हा मुलाची नाड कापली जाते, मुलांच्या बाबतीत, तेव्हा ही मधली जागा अशी फुटू लागते 12.00 जस आपल्या मध्य तंतू मध्ये आहे, तसं बाहेर सुद्धा पॅरा सिमफथेटिक नेर्वोस सिस्टिम मध्ये, हे जे सहा नंबर च स्वादिष्टान चक्र आपल्या मज्ज तंतु मध्ये आहे आणि बाहेर त्याला…… Plexus म्हणतात, आणि वरती जे अनाहत  चक्र आहे, त्या अनाहत  चक्राच आम्ही बाहेर…. प्लेक्सस म्हणतो, आमच्या मेडिकल टर्म्समध्ये.  या ह्याच्या मध्ये पण आपल्याला एक जागा बाहेर दिसते, डॉक्टर सुद्धा म्हणतील आहे अशी जागा आहे. तिथे एक अशी पोकळी आहे – ती जागा आणि सिमफथेटिक नेर्वोस सिस्टिम ज्या ह्या दोन इडा आणि पिंगला, या चालू झाल्या म्हणजे काय होतं – त्याच असं आहे, या दोन्ही चालू झाल्या की, पैकी जर उजव्या हाताचा मनुष्य जर असला, त्याच्या डावीकडची जर चालू झाली, तर तो अति कर्मी होतो. म्हणजे आपल्याला कुठेही काहीही काम लागलं समजा, इमर्जन्सी म्हणा – उद्या माझा हात इथे दुखू लागला, मी दुसऱ्या हाताने दाबतीये दाबतीय दाबत आहे, शेवटी अत्यंत त्रास व्हायला लागला तर सिमफथेटिक नेर्वोस सिस्टिम आपलं कार्य दाखवेल आणि तिथे काहीतरी असं निर्माण करेल रस, त्या रसाने तिथलं दुखणं जाईल. दुःख जाण्यापेक्षा तिथले जे दंतू आहेत, त्यांना असं वाढवून टाकेल की ते गोळे होतील, पोटात होतील कुठेही होतील.  कुठेही जरासा बाधा सारखं वाटलं – अडथकल वाटली, त्या ठिकाणी, ही शक्ती कार्य करते, आपण हिला कार्यशक्ती म्हणूयात. ही शक्ती कार्य करून, तिथे असं काहीतरी बनवून देते, की ज्याच्या मध्ये कार्यशक्ती, इतर सर्व शरीराच्या मानानी जास्त होते. आणि अशाच याला इन बॅलेन्स म्हणतो आपण – म्हणजे ज्याच्यामध्ये तोल राहत नाही. अशा बिनतोल कार्यशक्तीमुळे कॅन्सर सारखा रोग होतो. कुठे तुम्ही पोटात काहीतरी खाल्लं, वारंवार तुम्ही जर मिरच्या खाल्ल्या आणि त्याचा त्रास जर पोटात होऊ लागला, तर त्याला कसं तरी तुम्ही जिंकण्यासाठी म्हणून, ही शक्ती कार्य प्रवीण होते – त्याला म्हणतात ओव्हर ऍक्टिव्हिटी ऑफ द सिमफथेटिक नेर्वोस सिस्टिम आणि तिथे गोळा तयार होतो. आणि तो गोळा तयार झाला की एकच बाजू वाढत जाते. एखाद्याच्या पोटात वाढतं, कोणाच्या छातीत वाढतं तर कोणाच्या हातात वाढू शकत. कुठेही तसा गोळा येतो. आणि तसा गोळा आला की डॉक्टर त्याला मालिग्नन्ट म्हणतात, कॅन्सर म्हणतात. पण ते काही नसून, फक्त, ही जी शक्ती आहे, तिचीच, कार्यतत्वता आहे.

आजवर कॅन्सरचा रोग फार बळावलेला आहे. आता मी परवा पुण्याला म्हटलं तर सगळे लोक जरा घाबरले – की कॅन्सरचा इलाज सहज योगा शिवाय दुसरा काहीही नाही. हे दहा वर्षानंतर येणार आहे – अमेरिकेवरून येईल, इथे लोक आपल्या डोक्याने घेणार नाहीत. जरी आम्ही कितीही कॅन्सर बरोबर करून दाखवला, तरी म्हणतील तुम्ही ही केस ठीक करा, पैसे मात्र डॉक्टर लोक उकळत आहेत. त्यामुळे आम्हाला आलाय कंटाळा, मी म्हणते डॉक्टर लोकांनी पार होऊन, याची पूर्णपणे माहिती घेतली आणी लोकांना जर कॅन्सरचा उपाय केला तर दुसऱ्या कारणांसाठी आम्ही डॉक्टर तयार करू. पण  सगळे म्हणतात की तुम्ही कॅन्सर ठीक करताना मग आमचा कॅन्सल ठीक करा, आम्ही कॅन्सर ठीक करत नाही, आम्ही जी मधली शक्ती आहे, जिच्यातून आपल्यामध्ये प्रेम शक्ती आलेली आहे, या शक्तीला चालना देतो. आणि जेव्हा ही शक्ती वरचड होते, डॉमिनेट करते, तेव्हा या दोन्ही शक्त्या शांत होतात.

आता ही जी दुसरी शक्ती आहे, तिच्याबद्दल डॉक्टरांचा असं म्हणणं आहे, की काही शक्ती चालत नाही. मेडिकल्ली तिला दोर्मनंट म्हणतात, म्हणजे चालत नाही. तर उजव्या हातांच्या माणसाची जी उजव्या हाताची शक्ती आहे ती काही हालत नाही. त्यांच्यामध्ये ती काही चालत नाही ती शांत असते. ती शांत नसते, आपल्या शरीरात कोणतीही वस्तू अशी नाही जी कार्याशिवाय ठेवली आहे, हे डॉक्टरांचच म्हणणं आहे. मग ही शक्ती कशाला शांत राहणार आहे? ही शक्ती आपल्यामध्ये जे काही मेलेलं असतं त्याचा संचय करते. त्याला सायकोलॉजिस्ट म्हणतात लिबिडो. पण सायकोलॉजिस्ट ना डॉक्टर समजत नाही आणी डॉक्टर ना  सायकोलॉजिस्ट समजत नाही, अशी आपली स्थिती आहे. तेव्हा, दोन्हीही गोष्टी खरे आहेत – सायकोलॉजिस्ट लिबिडो ला बघतो आणि डॉक्टर या स्थितीला बघतो.  आता जेव्हा ही शक्ती, किंवा हे पेट्रोल आपल्यामध्ये भरलं गेलं, त्याच्यानंतर जेव्हा या दोन शक्ती आपापले  अनुभव देऊ लागले, तेव्हा यांच्या दोन्ही टोकाला, आपल्यामध्ये इगो आणि सुपर इगो – अहंकार आणि अति अहंकार, अशा दोन संस्था तयार होतात. आणि ते फुग्यासारख्या इथं अश्या वाढून ते आपल्या डोक्या वरती  इथे ब्रह्मरंद्रा वरून, या 

ब्रह्मरंद्रातुन या  टाळू मधून आपल्यालाही शक्ती मिळालेली असते, तिच्यावरून येऊन असे बसतात. बसल्याबरोबर इथे, जसं काही एखादं झाकण बंद करावं, तसं आपलं झाकण बंद होता. आता आपण असं समजतो की ‘मी’ आहे, खरोखर म्हणजे ‘मी’ नाही आहे. मी त्या शक्तीतला एक अंश आहे. पण तो कापला गेल्यामुळे असं वाटतं की तो मी आहे आणी  मग असं काहीतरी वाटतं की मला काहीतरी करायचं – अहंकार, मला काहीतरी करायचंय. करायचं काही नाही त्या शक्तीला परत शोधायचंय, ते एवढ्यासाठी की आधी माणसाची सबंध चेतना तयार झाली पाहिजे, जसं हे सबंध मशीन तयार झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याला मेन्स शी लावलं पाहिजे. म्हणून हे सबंध चेतना तयार करायला, हा इगो आणि अहंकार तुमच्यात येतो, त्याच्याशी भांडायची गरज नाही. हे देवानेच केलेली कीर्ती आहे, की तुम्ही त्या अहंकारात सगळं काही जगातलं समजून घ्या. तुमची चेतना अगदी व्यवस्थित तयार होऊ द्या आणि संवेदनशील, असं व्यक्तित्व जेव्हा तुमचं तयार होईल, आपोआप ही संस्था  तुमच्या शरीराची आहे ती वर येईल आणि सगळीकडे पसरलेल्या या प्रेम शक्तीशी एकरूप होईल. हे कुंडलिनीच जागरण आहे.

 पण तसं होत नाही. आज पर्यंत आपण हजारो पुस्तक कुंडलिनी जागरणा  बद्दल वाचली आहे. कुंडलिनी साठी लोक वेडेही झालेले आहेत, होणारच. कारण ज्याला आपण जागृती म्हणतो, ते लोक जागृती करत नाही. मी तरी अजून एकही असा माणूस बघितला नाही ज्यांनी बरोबर जागृती केली आहे. आणि म्हणूनच त्याला मी एक शोध म्हणते. आम्हीच हे कार्य पूर्वी केलेलं आहे, पण हे असं असतं हे आम्हाला माहीत नव्हतं. या जन्मातच जेव्हा हे मिळालं, तेव्हां मी कार्य सुरू केलं.

मला लहान असताना प्रश्न यायचा, की माणसांच काय कसं  होणार? अशी कल्पना करा की एक लहानशी मुलगी लोकांच्या इथं पोटात बघते, आणि हा जो खळगा आहे पोकळी आहे, तेव्हा तिला हा प्रश्न होता की ती पोकळी कशी भरायची? साधारण लहान मुलींना असे प्रश्न नसतात, पण मला सतत यायचा.  या पोकळीला कसं भरून काढायचं? म्हणजे माझं कुठेही दुसरीकडे लक्ष नसायचं. अभ्यासात खाण्यात पिण्यात कशातही नसायचं. अख्ख लक्ष इकडे. आणि हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्यासमोर होता, की ही खळगी कशी भरून काढायची? आता बाकी लोक जी जागृती करतात ते काय? कारण आपण इथे पाहिलेलं आहे, ही जी मधली आहे संस्था, त्याने आपल्याला ती शक्ती येते. आता ही शक्ती तरी खर्च करायला पाहिजे ना, आणि या दोन शक्त्या – कार्यशक्ती आणि दुसरी ही झोपलेली शक्ती तिला आपण लिबिडो म्हणूया, या दोन्ही शक्त्या कश्या वापरतात. पण सगळं जर पेट्रोल संपलं तर कसं होणार? तेव्हा, या दोन्ही शक्ती कशा वापरायच्या?  त्याच्यातून ती शक्ती ओढून ओढून कार्यरत्न होते, तेव्हा प्रश्न असा होता, हा जो खळगा आहे तो कसा भरायचा? मनुष्याची जागृती तरी कशी होणार, ही खालची कुंडलिनी वर येणार तरी कशी? ती जराशी वर उठली तर ती इकडेतरी किंवा तिकडं तरी येईल. म्हणजे या बाजूची जी आहे, कार्यरत्न, म्हणजे मनुष्य धर्माच्या बाबतीत तो गेला, तर कार्यरत्न होईल. जबरदस्ती जर तुम्ही कुंडलिनीला त्रास द्यायला सुरुवात केली, तर तो मनुष्य काहीतरी करेल, म्हणजे नाचेल उड्या मारेल, काहीतरी बकबक तरी करेल किंवा मंत्र तरी म्हणेल किंवा काहीतरी करेल. जे काही करण्याचा आहे हे माणसाच्या हातात आहे. पण परमात्मा  माणसाच्या हातात नाही आहे, तेव्हा तुम्ही काहीही करून परमात्म्याला मिळवाल, ही चुकीची आपल्याला भ्रांती आहे. आपण काहीही करून त्या  परमात्माला मिळवू शकत  नाही. फक्त आपली जेवढी शक्ती आहे ती आपण त्याला समर्पण करायला पाहिजे. सगळं जिवंत कार्य आहे, समजा एक जर बी मी पाण्यात लावलं, तर मी डोक्यावर उभी काय किंवा नाच केला काय, ते जेव्हा झाड यायचं झालं तेव्हा ते आपोआप योगायोगाने येणार. सगळे जिवंत कार्य आपोआप होतात, जितकी महत्त्वपूर्ण कार्य आहेत ती सगळी आपोआप होतात, फक्त आपल्याला असं वाटतं की ते आम्ही केलं ते. खरं कर जितकं काही महत्वपूर्ण आहे, ते फुकट आहे. हवा आता बघा – हवा आपली फुकट जाते आणि येते. आपण श्वास काय काढतो धरतो – जसं काय श्वास घेणं आपल्या अधिकारच आहे. ते आपोआप होत आहे. श्वास आत मध्ये येतो काय जातो काय – सगळं शरीरातलं जिवंत कार्य आपोआप होतात. तेव्हा आपण काहीही करायला घेतलं तर आपण या साईडच्या कुंडलिनी वर येतो आणि कार्यरत होतो. म्हणजे देवळात जायला सुरुवात होते – आता तुम्ही बघितलं असेल पुष्कळशे लोक अत्यंत देवळात जातात ते थोडेसे असतात. खरोखर त्यांच्यासारखं शहाणपण कुणाला नाही, त्यांच्यासारखी शांती कोणाला नाही, त्यांच्यातला सगळा खोटेपणा गेला पाहिजे. आणि आत मध्ये तेजस्वीपणा यायला पाहिजे. त्याच्या उलट हे असं का? म्हणून आपली तरुण पिढी रागवून बसली, की याच्यात काही नाही. हे काहीतरी चूक आहे, ही अशी गोष्ट नाही आहे. कोणतीही गोष्ट चुकीची नाही आहे, पण त्याचं अति करणं आणि परमात्म्याला गाठणं मात्र आपली भ्रांती आहे – जर कोणाला असं वाटत असेल, की आपण अतिशय काहीतरी करून परमेश्वराला हट्टाने  गाठू, तर ते चुकीचं आहे.

दुसऱ्या बाजूला जी ती लिबीडो आहे, मधे खळगा असल्यामुळे, तुम्ही इकडे तरी जाल किंवा तिकडे तरी जाल. त्या लिबिडो वर आपण केला तर काय होईल? जे काही मेलेलं आहे, सौंसारात मेलेलं आहे – कलेक्टिव्ह सुबकॉनस्कीऊस म्हणतात त्याला, त्या संबंध सुप्त चेतना मधलं जेवढं काही आहे, त्याच्याशी तुमचा संबंध येतो. म्हणून तुम्ही पाहिलं असेल, की एखादा मनुष्य देवाला टाळ कुटत बसला, तर कधी कधी त्याच्यातून हार जाऊन देवाच्या गळ्यात पडतो. ते देवाने केलेलं नाही, देव काय मी जरी बसलेले असेन, आपल्या गळ्यात आपण हार घालू का? तर देव कशाला आपल्या गळ्यात हार घालेल? तेव्हा कोणीतरी करतं ते कार्य. ते जे करतं ते कोण आहे? कोणी एखादा मेलेला संत, किंवा मेलेली एखादी व्यक्ती की जी तुमची श्रद्धा सांभाळून आहे, ते तसं कार्य करते. सकाळी मी जरा याबद्दल बोललेली आहे, आता जास्त बोलणार नाही, पण आत्ताच मला एकीने सांगितलं की, इथे भानुमतीचा प्रकार बराच झाला आणि कप बश्या उडाला लागल्या, सामान इकडे तिकडे व्हायला लागलं. आणखी दारे उडाला लागले. हे काय परमात्म्याला काय धंदा नाही का? तिकडनं तिकडनं कप बश्या फिरवायला त्याला काही अक्कल नाही आहे का? हे काय देवाचं कार्य नाही हे भूतांचे कार्य आहे. भूत म्हणजे वाईटच असला पाहिजे अशातली गोष्ट नाही, काय काय राक्षस असतात अति राक्षस ही असतात, पण एखादा संत सुद्धा असू शकतो. संतांमध्ये जे परमहंस झालेले आहेत, किंवा जे निर्वानाला झालेले आहेत, आत्मजात आहेत – किंवा जे पार झालेले लोक आहेत, ते कधी कोणाच्या शरीरात शिरत नाहीत. कारण ते स्वतंत्र असतात आणि त्यांना दुसऱ्यांची स्वतंत्रता कळते आणि त्याचा ते मान ठेवतात. पण जी  मंडळी नुसती संत आहेत, देवाची पूजा बिजा करतात, त्यांना असं वाटतं की या माणसांमध्ये यावं आणि काहीतरी याची मदत करा. ते करतात, थोडी बहोत करतात.

इतकंच काय,  तर परवा लंडनला डॉक्टर लॅन म्हणून एक गृहस्थ होते, ते वारले. खूप प्रसिद्ध गोष्ट आहे, इंटरनॅशनल त्यांचं लॅन क्युरेटिंग सेंटर म्हणून प्रसिद्ध आहे. आणि ते वारल्यावर त्यांना अशी इच्छा झाली की, मी एवढं सगळं कार्य केलं आहे, पण माझा काय पुरेपूर लोकांना फायदा झाला नाही. तर एका सोल्जर कडे त्यांचं लक्ष गेलं, तो एकदा  युद्धाला गेला होता आणी घाबरला होता. हे डॉक्टर या सोल्जर मध्ये घुसले, आणि त्याला सांगितलं की ताबडतोब तू लंडनला चल आणि माझ्या मुलाला आणि भावाला माझ्याबद्दल सांग. तर मग हा गेला आणि त्यांनी सांगितलं की हे डॉक्टर माझ्या मध्ये आलेले आहेत. ते दोघं म्हणाले की आम्ही कसा विश्वास ठेवायचा? तो सोल्जर म्हणाला मी सगळं तुमच्याबद्दल सांगतो, आणि मग त्यांनी सगळं सांगितलं की तुझा जन्म कधी झाला, नंतर त्याने सांगितलं की काय काय त्यांच्यामध्ये गुप्त गोष्टी झालेल्या. तर ते आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले बरं ठीक आहे. आम्ही आता डिस्पेन्सरी उघडतो आणि हे इंटरनॅशनल लॅन सेंटर उघडतो. ते डॉक्टर लॅन  बरोबर बाकी डॉक्टर मेलेले होते, ते आधीही मेले असते, ते म्हणाले आम्ही तुझी मदत करतो. डॉक्टर लहान कडे अशी पद्धत असते, की तुम्ही त्यांना पत्र लिहायचं की आम्हाला असा असा त्रास आहे. शारीरिक त्रास आहे समजा आम्हाला पोटात दुखतं , ते तुम्हाला वेळ देतील, की बरोबर संध्याकाळी दहा वाजता तुम्ही लाईट लावायचा आणि कॉन्सन्ट्रेट करून बघायचं. कॉन्सन्ट्रेट करून बघायचं म्हणजे हे आज्ञा चक्र, याच्यातून भुतं  दिसतात. तेव्हा त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करायचा, आणि लगेच तुम्हाला वाटतं की आत मध्ये काहीतरी झालं, घाम आला, हे झालं ते झालं. आणि असं ऑर्गनायझेशन सगळीकडे पसरलेला आहे. आणि आता तुम्ही त्या माणसाला जो ठीक झालेला आहे माझ्याकडे आणलं आणि म्हटलं ‘ माताजी याला रिअलायझेशन द्या ‘, हे आपल्याला जमायचं नाही. मनुष्य आपल्या पायावर स्वतंत्र उभा राहिला पाहिजे जर त्याला परमात्म्याला मिळायचा असेल तर. तुमच्या डोक्यावर एक भूत बसलेल आहे, तुमच्यात काय परमात्मा येणार आहे भुताच्या खाली? स्वतः विचार केला पाहिजे. तेव्हा अशा रीतीने पण लोकं ठीक होतात, पण ते फारच भयान दिसत. फार तर फार शरीर यावर्षी गेलं, पुढच्या वर्षी गेलं, नाहीतर मेलं तरी दुसऱ शरीर आपल्याला मिळू शकतात. पण जर का आपल्या कुंडलिनी मध्ये असं एखादा भूत बसलं, जन्म जन्मानंतर आपल्या मागे लागला, तर आपल्या कल्याणाचा मार्ग बंद होता. तर असले  लोकं थोडं बहुत जेव्हा  बरं करतात, इतकं करतात की एखाद्या माणसाला उगीचच मारतात, त्याच्यातला प्राण काढून त्याचे दोन भाग करतात आणि तो मनुष्य मेल्यासारखा पडतो आणि त्याचे प्राण बाहेर काढतात, त्याच्या सूक्ष्म शरीराला बाहेर काढून घेतात. आणि तुम्हाला सांगते हा मेलेला आहे ना, आधीच पाठवतात त्याला, चमच्या चमच्याला मारून ठेवतात. मग त्याचा मुलगा धावत आला – बाबाजी आमचे ते वडील वारले (….. Unclear speech… 28.51 )

तो मारू शकतच नाही तो मनुष्य (….unclear speech )

हे सगळे असले प्रकार अत्यंत भयानक आहेत, स्मशाना विद्येचे आणि प्रेत विद्येचे प्रकार या कलयुगात इतके वाढलेले आहेत की दिसत असून लोकांना समजत नाही. फक्त एक प्रश्न विचारला तर सगळ्या गोष्टी लक्षात येतील – परमात्माला याच्यात काय इंटरेस्ट असणार? परमात्माला काय आहे तुम्ही मेला किंवा जिवंत राहिला, त्याला माहित आहे की तुम्ही (…. Unclear speech..29.25)

परमात्मासाठी काय महत्त्वपूर्ण आहे – तुमच्या मध्ये ती नवीन ज्योत कधी येईल? तुमच्यामध्ये त्या शक्तीचा प्रादुर्भाव कधी येईल आणि तुम्ही कधी शक्तिशाली व्हाल? हीच फक्त परमेश्वराची इच्छा आहे. बाकी तुम्हाला पैसे मिळाले नाहीत, किंवा तुम्हाला कोणी मारून टाकला – त्याला काय? तो आपला पायाच्या टोकारीने अशा हजार लोकांना जन्म देऊ शकतो, त्याला काय पडलेलं आहे तुमचं शरीर तरी ठीक करायला? परमात्म्याला ज्याला मिळवायचा आहे त्यांनी परमात्म्याचे गोष्टी केल्या पाहिजेत आणि परमच घेऊन गेलं पाहिजे. 

आता ही पॅरा  सिमफथेटिक नेर्वोस सिस्टिम जी मधोमध आहे, हिच्यावर कसं यायचं? एक तर इकडे गेलं तर परलोकात, इकडे गेल तर अति करमात – कॅन्सर सारख्या भयंकर रोगात फसतो….. (Unclear speech 30.23)

 या दोन्ही पद्धती चुकीच्या आहेत, त्यामुळे कुंडली जागृती बद्दल आपण पुस्तक वाचले असतील, तर लोक येणार पण नाहीत इतका भयंकर प्रकार सांगितला आहे. कुंडलिनी जागरण सांभाळून करावं, असं करावं तसं करावं, हे केलं तर ते होतं, मनुष्य बेशुद्ध होतो! एकदम चक्कर येते, इथून डोक्यातून हे मोठं मोठं  निघतं काय म्हणतात – बलिस्टर्स, भाजल्यासारखे फोडं. मी बघितला असे घडलेलं, एक रोज तर ध्यानात बेडकासारखे उडायला लागले. मी विचारलं हे काय हो? ते म्हणाले आमच्या गुरुजींनी आम्हाला जागृती दिली आणि त्यांनी सांगितले की ह्याच्यात बेडकासारखा उडायचं. त्यांनी संस्कृततात मला एक श्लोक पण सांगितलं. मी म्हटलं हे काय हो?! बेडकासारखं उडून तुम्हाला देव मिळणार आहे का? आणि तुम्हाला बेडका सारखा उडवायला त्याला काय अक्कल नाही का? म्हणजे देवाला तरी गाढवात काढायचं, या पलीकडे आपण बुद्धीचा कुठला सदुपयोग केला आहे? तेव्हा या कर्म गोष्टी कुंडलिनी मध्ये होत नाही. आम्ही हजारो लोकांना कुंडलिनीची जागृती दिली आहे, भारतातच नाही तर बाहेर पण. पुष्कळअण्णा जागृती दिली गेली आहे. जागृती दिली आहे पण पार कमी झालेत. पण असले कधी प्रकार झाले नाहीत. आणी ज्यांना होतात, ते त्या गुरु लोकांनी त्यांनी लावून दिलं आहे, ते सयंफाठेटिक वर आधीच सगळे असल्यामुळे, ती आम्हाला उतारावी लागते. आमच्या प्रेमाची बंधनं घालावी लागतात, तेव्हा जाऊन ते थंड होतात. नाहीतर हलतात डूलतात, आपल्याकडे देवी येते ना तसले प्रकार. ती देवी बेबी पण काय? त्या देवीला काय काम नाहीत एखाद्या बाईच्या अंगात याला आणि घुमायला. त्या सगळ्या मेलेल्या सवासना बायका आहेत, त्यांना वाटतं की आम्ही सावसण्या मेलो, तेव्हा मग काहीतरी कुठेतरी दाखवलं पाहिजे. ( unclear speech ). पण पुष्कळाना ते सोडवत नाही, त्याला कारण म्हणजे – जेव्हा तुमच्यावर दुसरी शक्ती येऊन बसते, तेव्हा तिच्या भ्रमात तुम्ही येता, म्हणजे एखादा साधू जर तुम्हाला अंगठी देईल,  आता तुम्ही त्याला सगळ्या घरातल्या अंगठ्या द्याल, सगळं घरातलं सामान देऊन टाकाल, संपत्ती त्याला द्याल. साधू लोक जेव्हा आपली संपत्ती घेतात, तेव्हा आपलं डोकं उघडत ठेवून आपल्याला विचार केला पाहिजे, की हे साधू आहेत तर यांना संपत्ती कशाला लागते? पैसे कशाला लागतात? असा विचार आला, तर आपल्याला पॅरा  सिमफथेटिक ची मदत मिळते. 

आता मधली जी जागा आहे, ही कशी भरायची हा प्रश्न होता. आणि तेच मी शोधून काढलेलं आहे. ते जे प्रेम आहे ते दिव्य परमात्म्याचा प्रेम आहे, ते नाही ते माझ्या मुलाचं, माझ्या आई बद्दल जे वाटतं ते, देशाबद्दल जे वाटतं ते, ( unclear speech). सूर्याच्या किरण्यासारखं जे प्रेम वाहत असतं, आणि ते जर इथे भरलं, जो माणूस फक्त रिऍलिज्ड असेल तोच भरू शकेल. ज्याच्यामध्ये ही शक्ती वाहते तोच बनू शकतो.  ये जर इथे भरलं, तर कुंडलींनी सरळ वर जाते. आणि इथून जाऊन, इथे थोडसं डोकं जड होतं, कोणा कोणाचं तेवढे सुद्धा भासत नाही. आणि खाली येऊन परत वरती जाऊन छेदून एकाकार होते त्या परमशक्ती बरोबर आणि मनुष्य निर्विचारितेत उतरतो. पहिली ओळख अशी की तो निर्विचार होतो, विचारांच्या पलीकडे जातो परमेश्वराच्या राज्यात. तिथे त्या शक्तीचा वास आहे. दोन विचारांच्या मध्ये एक छोटीशी जागा असते, त्याला विलंब असे म्हणतात. त्या जागेमध्ये सटकन आपलं चित्त आत जातं, जसं आपलं चित्त माझ्याकडे आहे, मी म्हणीन आपल्याकडे घाला, आपण घालू शकत नाही. हे चित्त सटकन जातं कारण आत मध्ये काहीतरी घटना घडते.  पण काहीही त्रास होत नाही, ज्या लोकांना या चक्रांमुळे काहीतरी अडथळा येतो, ज्याला आम्ही एक शब्द ‘बाधा’ म्हणून वापरतो, त्या लोकांना थोडा बहुत त्रास होतो. त्रास म्हणजे थोडंसं हातात जड वाटतं, ते सुद्धा ठीक करून वर जाऊ शकतो. पण त्याच्यामध्ये आपण काहीही करत नाही. एखाद्या मनुष्याला पोहायला येत नसेल, तर त्यांनी शांत राहावं म्हणजे पोहणारे त्याला मदत करतील. तो जर  धडपड करू लागला तर, काहीही कार्य चालत नाही. तसंच आमच्या सहजोगाच आहे, या योगामध्ये आपण अगदी शांत बसायचं. पोहणारे आहेत, ते आपलं कार्य करतील, त्यांना आपली कुंडलिनी ( unclear speech ). एक नवीन मानव तयार करायचा आणि काय याची मर्यादा आहे, ते मी आपल्याला पूर्णपणे सांगू शकणार नाही. प्रथम म्हणजे आपल्याला कुंडलिनीची जाणीव होते, आपले चक्र कुठे आहे, आपल्या शरीरात कुंडलिनी कुठे कुठे जाते, आणि दुसऱ्याची कुंडलिनी कुठे अडकलेली आहे. तिला कसं वर आणायचं आणि त्यांना ही परम शांती कशी द्यायची हे सगळं या व्हायब्रेशन्समुळे कळतं. या बोटांवरून कळतं, या बोटांवर बरोबर, म्हणजे ही पाच बोटं आणि ही पाच बोटं, राईट आणि लेफ्ट, सिमफाठेयीक  नर्व्हस सिस्टम चे प्रतीक आहेत. आणि बरोबर जर आपल्या या बोटावरती आलं, म्हणजे गरम गरम जर आलं, तर समजून घ्यायचं की आपल्या आज्ञा चक्रवर्ती काहीतरी अडथळे आहेत. आणि आज्ञा चक्र आम्ही फिरवल्याबरोबर याचं गेलं.  मणिपूर चक्रावर म्हणजे नाभीचक्रावर असलं तर हे बोट जड होतं. चटके सुद्धा बसतात कधीकधी ब्लीस्टर  सुद्धा येतात या लोकांना. आणि जर या चक्रावर असलं तर याचा अर्थ विशुद्धी चक्रावर आहे. ज्याला इंग्लिश मध्ये सुद्धा सर्वीकल फ्लेक्सस म्हणतात. या सगळ्यांना इंग्लिश मध्ये सुद्धा नाव आहेत.  त्यामुळे डॉक्टरांना सुद्धा माहित आहे, त्या तिथे जर त्रास होत असेल आणि आम्ही जर बोट ठेवलं तर तो अडथळा जाईल. त्याप्रमाणे सगळ्या लोकांना आणि हे मुलाधार चक्र इथे आणि मधोमध या ठिकाणी जर अडथळा आला ( unclear speech ). आणि मुलं सुद्धा सांगू शकतात इथं जळतंय माताजी. लहान लहान मुलं सुद्धा बरोबर हात ठेवतात. आमच्याकडे एक सात वर्षाची मुलगी पार झालेली, कविता तिचं नाव आहे. ती एकदा ग्वालियर ला गेली होती, आणि लहान मुलं फार लवकर पार होतात. आणि त्याला कारण असं आहे की त्यांची सिमफाथेटिक फार चालत नाही, फार संस्कार जनक जे असतं, ते लिबिडो मध्ये असतं आणि जे अत्यंत अतीकर्मी असतं ( unclear speech ). आणि लहान मुलं अत्यंत अबोध आणि अतिक्रमी किंवा संस्कार अशा चक्रात सापडलेली नसतात. त्यामुळे त्यांना रिलायझेशन देणं फार सोपं जातं. आणि ते चटकन सांगतात, माताजी हे झाले ते झाले, त्यांना मी सगळ्यांना सांगते ते आमचे व्हाईस चान्सलर्स आहेत, त्यांना विचारा. आमच्या इथे एक छत्रे म्हणून आलेत त्यांचा लहान मुलगा आहे प्रसाद, त्याला मी समोर बसते आणि या सगळ्यांना सांगते त्याला विचारा त्याचं सर्टिफिकेट घ्या. त्याला मी विचारते झालं का, तो सांगतो नाही माताजी नाही झालं आणि ती खरी गोष्ट असते. कारण मुलांना खोटं बोलणं वगैरे कशाला कळत नाही, झालं किंवा नाही झालं थोडीशी प्रॅक्टिस करून लगेच कळतं. आणि लोकांना बरं करणार (unclear speech). आता या मुलीचं संगीताचं सांगायचं झालं, या मुलीने पुष्कळ लोकांना बर केल. लोकांनी पत्र पाठवून विचारपूस केली की या माताजी कोण आहेत? या मुलीला एवढ्या क्यूरेटिव्ह पॉवर कशा दिल्या? क्यूरेटिव्ह पावर  nahit, काय आहे पॅरा सिमफाथेटिक नेर्वोस सिस्टिम आहे ना, तिच्यामध्ये हे प्रेम भरलं जात. आणि लगेच ही संस्था तुमच्या ताब्यात येते आणि ताब्यात आल्यावर या संस्थांमुळे झालेले जितके रोग आहेत, चक्रांचे, म्हणजे संबंध जे प्लेक्सस आहेत, खालून बघितलं तर पहिलं पेलविच प्लेक्सस, नंतर नाभीचक्राला सोलार फ्लेक्सस, नंतर कार्डियाक फ्लेक्सस, नंतर सर्वाइकल फ्लेक्सस, पण आज्ञा चक्राला मात्र (unclear speech ) पण आपण त्याला असं म्हणूया की आपल्या डोळ्याचे ज्ञानसंतू आहेत जे आपापसात क्रॉस करतात, त्याला हे लोक ऑप्टिक शाजम  म्हणतात. याच्यावरती डॉक्टरांच असं म्हणणं आहे की 982 नसा आपल्या डोक्यामध्ये आहेत. जसं कमळासारखा पसरलेल्या दिसतात. त्याला ते सहस्रार म्हणतात, आपल्या (unclear) हिशोबाने ते 1000 आहेत. आता मी काय मोजत बसले नाही 1000 किंवा 982, उगीचच नसता वाद घालण्यात अर्थ नाही. पण मी पुष्कळ साऱ्या असल्या आपल्या डोक्यामध्ये असलेल्या, जशा काही आगीच्या जिभा, असं म्हटलं तर भयंकर वाटतं, पण तसं नाही. आगीच्या जिभा पिवळ्या रंगाच्या गुलाबी किंचित जांभळ्या ऑरेंज रंगाच्या अशा अशा करत असताना पाहिलं आहे. आणि त्या सगळ्याच्या सगळ्या एखाद्या कमळासारख्या  एकत्र बांधलेले दिसतात आणि खालचा देठ सुद्धा आपण जर टेलिस्कोप पाहिला असेल तर अशा तऱ्हेने देठ (unclear). आणि मी हे सुद्धा पाहिलं की कुंडलिनी अशी वर उठते. आणि त्याच्यानंतर सहज योग पण कसा घडतो ते सुद्धा मी पाहिलं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी मी पाहते हजारो लोकांवर आणि त्याचा मी अनुभव घेते…. (Unclear )…. 

48 वर्षाची असताना मला योगा बदल सगळं कळलं. (Unclear). पूर्वी मी कलेवर बरेच भाषण दिलेली आहेत, एज्युकेशन वर पण दिलेली आहे आणि फिल्म बोर्डावर भरपूर सोशल वर्कही केलं पण कधी धर्मावर मी बोलत नसे.  लोकांना आश्चर्य वाटतं की माताजींना एवढं धर्मा बद्दल माहित असून, ते त्या धर्माबद्दल कधी बोलल्या का नाहीत?  त्यांनी कधी धर्माबद्दल थोडीशी चर्चा केली असती तर बर झालं असतं. ( unclear)

इतकी पुस्तकं लिहिलेली आहेत पण त्याचा काही उपयोग नाही. काही प्रॅक्टिकल मिळाल्याशिवाय बोलले नाही मी. प्रॅक्टिकल आणि करून दाखवायला पाहिजे. आता  माताजी प्रॅक्टिकल करून दाखवत आहेत, इतकं तरी आपल्या डोक्यात यायला पाहिजे. ( Unclear time 41.57)