Poem: To My Flower Children

(United States)

Upload transcript or translation for this talk

माझया फुलांसारख्या मुलांसाठी

तुम्ही जीवनावर रुष्ट आहात
जशी की लहानगी मुल॑ –
ज्यांची आई अंधारात हरवली आहे .

तुमचे उदास, म्लान चेहरे
दाखवताहेत दु:ख, निराशा –
कारण की तुमच्या प्रवासाचा अंत निष्फव्ठ आहे.

सौंदर्याला शोधण्यासाठी तुम्ही तर
कुरूपताच परिधान केली.
सत्याच्या नावाखाली

तुम्ही तर प्रत्येक गोष्टीला
असत्याचं नाव देता.

प्रेमाचा पेला भरण्यासाठी

तुम्ही तर भावनांनाच

रितं करून टाकलं आहे !

माझया सुंदर, गोड बाव्डंनो, माझया प्रिय लेकरांनो,
युद्ध लदून तुम्हाला शांतता कशी लाभू शकेल ?
युद्ध-स्वतःशी, स्वत:च्या अस्तित्वाशी

आणि स्वत:च्या आनंदाशी देखील !
आता कमब्ठच्या पाकब्ब्यांम ध्ये
तुमच्या वत्सल, कृपाव्दू आईच्या च्या कुशीत
विसावा घ्या !

मी फुलांच्या सुंदर बहरानं

तुमच्या जीवनाला सजवेन, शोभिवंत करेन.
आणि तुमचा प्रत्येक क्षण आणि जीवन
आनंदाच्या आमोदानं दरवव्दून टाकेन.

मी मस्तकावर तुमच्या

दिव्य प्रेमाचा अभिषेक करेन!

तुमच्या यातना आता

मला अधिक सहन नाही करता येत.

मला तुम्हाला प्रेमाच्या महासागरात डुंबवू देत
ज्यामुब्ठे तुम्ही तुमचं अस्तित्व

अधिक महान असणान्या ‘एका’मध्ये विरघव्ठवून टाकेन !
जो तुमच्या च्या आत्म्याच्या कब्ठीच्या या कोशातून शातून
मंद हास्य करतो आहे

आणि तुम्हाला सारखं सारखं चिडवायला

तो गुपचूप लपला आहे – तुमच्यातच !

जरा जाणीव होऊ दा, भानावर या.

आणि तुम्ही त्या ‘महान’ला शोधू शकाल,
तुमच्या कणाकणात, तंतू तंतूत, नसा-नसांमध्ये
परमानंदाच्या सुखान॑ स्पंदित करतो आहे तो !
आणि संपूर्ण विश्वाला प्रकाशानं व्यापून, लपेटून
झाकून टाकत आहे तो !

आई निर्मला