Public Program

Dhule (India)

1972-04-09 Public Program, Dhule Marathi, 71'
Download video - mkv format (standard quality): Watch on Youtube: Watch and download video - mp4 format on Vimeo: Listen on Soundcloud: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

1972-0409 Public Program

Note:

1) Please note that the brackets present in this transcript represents:  

a) […] = Unclear text/Missing audio  

b) [अबकड/अबकड] = Best guesses text1/text2 (text not confirmed) 

c) (abcd/अबकड) = Additional explanatory text

खरोखर म्हणजे राजकुंवर राऊळ सारखी बाई या धुळ्यात आहे, हे या धुळ्याचे मोठं भाग्य आहे. तिच्या प्रेमाच्या आकर्षणाने मी इथे आले. मी तिला म्हटलं होतं एकदा धुळ्यात अवश्य येईन. आणि या ठिकाणी किती भक्तिभाव आणि किती प्रेम आहे, त्याची सुद्धा मला आतून जाणीव होत आहे.

धर्माबद्दल आपल्या देशामध्ये, आदिकालापासनं सगळ्यांनी पुष्कळ लिहून ठेवलेलं आहे आणि चर्चा पुष्कळ झाल्या. मंदिरात सुद्धा आता घंटी वगैरे वाजत आहेत, चर्चमध्ये सुद्धा लोक जातात, मस्जिदीत जातात, धर्माच्या नावावर आपल्या देशामध्ये पुष्कळ कार्य झालेलं आहे. पण जे वास्तविक कार्य आहे, ते कुठंही झालेलं दिसत नाही. देवळात जातो आपण सगळं काही व्यवस्थित करतो, पूजा-पाठ सगळं व्यवस्थित करतो, घरी येतो, पण तरी सुद्धा असं वाटत नाही, की काही आपण मिळवलं आहे. आतली जी शांतता आहे, आतलं जे प्रेम आहे, आतला जो आनंद आहे, तो कधी सुद्धा मिळत नाही. कितीही केलं, तरीसुद्धा असं वाटत नाही, की आपण देवाच्या जवळ गेलो आहोत. किंवा आपल्याला ही माऊली मिळाली आहे, की जिच्या मांडीवर आपण डोकं ठेवून आरामाने म्हणू शकतो, की आता आम्हाला काही करायचं नाही. 

माझं असं म्हणणं  नाही, की देवळात माणसाने जाऊ नये. जावं, अवश्य जावं. […] मधाची ओळख पटवण्यासाठी पहिल्यांदा फुलाच्या गोष्टी करू, तर बरं होईल. म्हणून त्यांनी साकार देव काढले ते [सांगण्यासाठीच/चांगल्यासाठीच], म्हणजे फुलांची नावे सांगितली. विष्णू पासून ते शिवापर्यंत, तसचं मुसलमानांमध्ये अली पासून वलीपर्यंत, ख्रिश्चन लोकांमध्ये ख्रिस्तापासून त्याच्या आईपर्यंत, सगळ्यांची वंशावळ झाली. नावं सर्व कळली. फुलांची नावं कळून सुद्धा, मधाचा पत्ता लागला नाही! आपण साकार पूजा करतो, विष्णूचं नाव घेतो. बघा, त्याच्यासुद्धा वर्णना मध्ये त्यांनी सांगितलेले आहे – आपण विष्णूचा श्लोक ऐकला असेल – की “शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम्। विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम्। लक्ष्मीकान्तं कमलनयनं….।” आता इथपर्यंतचं वर्णन झालं. पण त्याची मख्खी कोठे आहे? “योगिर्भिध्यानगम्यम्।” योग्यानीं ज्याला ध्यानामध्ये जाणलेलं आहे, त्याचं हे वर्णन आहे. मी जाणलेलं नाही. प्रत्येक देवाच्याबद्दलसुद्धा “ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो।” “ध्यानात जाऊन जो ते बघतो, त्या देवाचं मी वर्णन करतो,” असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला इशारा केलेला आहे. पण होतं काय आपण इशाऱ्यावर थांबतो. 

आता आपल्याला, दुसऱ्या तऱ्हेचे धर्म जे सुरु झाले, म्हणजे ख्रिश्चन धर्म म्हणा किंवा मुसलमान धर्म म्हणा. याच्यात त्यांनी सांगितलं, की बघा, फुलांच्या गोष्टी केल्या म्हणजे मध मिळत नाही, तेव्हा आपण मधाच्या गोष्टी करूया. त्यानीं सांगितलं की परमात्मा जो आहे, निराकार आहे, साकार नाही आहे, निराकारात तुम्ही जा. पण जा कसे? त्याही गोष्टीच झाल्या. अहो, मधाच्या गोष्टी करा, नाही तर फुलांच्या करा, गोष्टी म्हणजे गोष्टीच आहेत. गोष्टींनी परमात्म्याला जाणता येत नाही. त्यामुळे झालं काय आहे की, गाडीच्या मागे घोडं बांधलेलं आहे आणि गाडी हाकत बसलोय आपण! म्हणायचं, “गाडी का नाही चालत, धर्माची?” धर्म आपल्या आतमध्ये आहे, सगळ्यांनी हे सांगितलेलं आहे. आपल्या आतमध्ये परमात्मा आहे, हे सुद्धा सगळ्यांनी सांगितलेलं आहे. पण होतं काय, कितीही सांगितलं असलं तरी ते सांगितलेलं असल्यामुळे ते सांगण्यावरच राहून जातं. 

परवा एका शिखांच्या ह्याच्यामध्ये (गुरुद्वारात) मी गेले होते. तर तिथे त्यांनी गाणं सुरु केलं, “काहे रे बन खोजन जायी। सदा निवासी सदा आलेपा तोहे संग समायी। पुष्पमध्ये जो बांस बसत है, मुकुरामां हि जब छायी। तैसेहि हरि बसे निरंतर घटहि खोजो भाई।” आता गात बसलेत “घटही खोजो, घटही खोजो।” “अहो,” म्हंटलं, “गाता काय?” तुम्हाला जर औषध घ्यायचं असलं आणि डॉक्टरांनीं(Doctor), वैद्यांनी औषध दिलं, “की बघा, तुम्ही थोडसं सुंठ-साखर घ्या, म्हणजे बरं वाटेल.” तर घरी येऊन तुम्ही सारखं, “मी सुंठ-साखर घेतो, मी सुंठ-साखर घेतो,” त्यानी काय औषध होणार आहे का? असं आपलं चालेलं आहे. की जे करायचं आहे ते आपण करत नाही, त्याबद्दल बोलतो. म्हणूनच, माझं म्हणणं आहे, की आपल्याला ध्यानात जायला पाहिजे. पण कसं जायचं? हे मात्र कोणी सांगत नाही. असे पुष्कळ बोलणारे आपल्याला भेटतील, की आपण प्रेम केलं पाहिजे, सर्व जगावर प्रेम केलं पाहिजे. अहो, प्रेम करायला शिकवता येतं का? तुम्ही काय इलेट्रिसिटीचं(electricity) प्रेम करू शकतात? प्रेम हे निसर्गतः आतमध्ये आहे आणि ते एकदम आपल्याला असं जाणवतं. आपल्याला आपल्या मुलांबद्दल प्रेम वाटतं, आपल्या वडिलांच्याबद्दल वाटतं, आईबद्दल वाटतं, पत्नीबद्दल वाटतं, पुरुषाबद्दल वाटतं, हे सगळं जे काही प्रेम आहे ते अकस्मात वाटतं. कुणाला शिकवून प्रेम येत नाही. तेव्हा धर्मसुद्धा शिकवून येत नाही. तो उपजतच आपल्यामध्ये आहे, त्याला जाणावं लागतं. आता कसं जाणायचं? हा सगळ्यांच्यापुढे, कसं जाणायचं? कसं त्या परमात्म्याला जाणून घ्यायचं? हे सांगा. आत्मसाक्षात्कार कसा करून घ्यायचा? पुष्कळसे लोक असं सांगतात, “हो, होऊ शकतो. असं करा, तुम्ही डोक्याच्या ह्याच्यावरती उभे रहा, रोज पंचवीस मिनिटे उभे राहून देवाचं नाव घ्या [म्हणे].” काही होणार नाही! खोटी गोष्ट आहे. “तुम्ही भगवी वस्त्रे घालून नाचा, उड्या मारा, त्याने देव मिळेल!” इतकं सोपं असतं, तर काय दोन रुपयाला साडी रंगवायची आणि नाचत सुटायचं, झालं, देव मिळाला! तिसरं कोणी सांगतील, “तसं होणार नाही. तुम्ही देवळात जा, नाव घेत बसा.” अहो, नावाचं असं आहे, तुलसीदाससारखा मनुष्य – एवढं मोठं रामायण लिहून ठेवलं – नाव घेत असे. स्वतः रघुवीर त्याच्याकडे तीनदा आले आणि त्याला त्यांनी टिळा लावला, चंदनाचा, आणि ओळखलं नाही.

आपले “हरे रामावाले, हरे कृष्णावाले,” मुंबईला माझ्याकडे आले. मला म्हणाले, “माताजी, तुम्ही नाव घेत नाही, देवाचं!” 

“अरे,” म्हंटलं, “नाव घेण्यासारखं तुम्हाला तरी काय कळलेलं आहे का? कुणाचं नाव घेता! उद्या तुम्ही माझ्या दारात येऊन ‘माताजी, माताजी,’ म्हणाल, आणि मला रस्त्यात परवा भेटलात, तर ओळखाल का मला? तुम्हाला पटणार आहे का माझी ओळख?” मी म्हणते, आतमध्ये या, आधी त्याला जाणा, एकदासुद्धा नाव घेणं कठीण जाणार [नाही/आहे]. 

मग म्हणायला लागले, “आम्ही सगळ्यांनी संन्यास घेतला, एवढा आम्ही त्याग केला आहे. हे करून, ते करून आम्ही जंगलात गेलो. अमूक करतोय, तमुक करतोय आणि तुम्ही आपलं घरात बसून, तुम्हाला मुलं-बाळं, नातिनी-बितिनी आणि तुम्ही कसं काय हे करता? तुम्ही काही सोडलं नाही?” 

मी म्हंटलं, “हे बघा, मी तुम्हाला एवढं सांगते, तुम्हाला चॅलेंज(challenge) आहे म्हटलं, माझ्या घरातलं कोणतंही सामान, कोणतीही वस्तू, त्या परमात्म्याच्या पायाच्या धुळी बरोबर काय त्याच्या धुळीच्या कणाबरोबर जरी असली, तरी उचलून न्या तुम्ही. मी तयार आहे.” इकडेतिकडे बघतात. म्हंटलं, “काहीही, तुम्हाला जे वाटलं ते उचलून न्या.” 

म्हणे, “त्याच्याबरोबरीचं काही नाही.” 

म्हंटलं, “मग त्याच्या बरोबरीचं काही नाही तर मग सोडलं काय तुम्ही आणि धरलं काय तुम्ही!” “अहो, आम्ही धरलंच नाही, तर सोडणार तरी काय?” 

आता उद्या हा समुद्र समोर आहे. आम्ही जर मनानेच ठरवलं की हा आमच्या नावावर आहे, आम्ही धरलाय, म्हणजे आमचा मूर्खपणा आहे की नाही! आणि मग म्हणायचं आम्ही हा धरलाय आणि आता आम्ही सोडलाय. आम्ही धरलंच नाही, आणि धरतं कोण, मेलो म्हणजे किल्ल्यासहित इथे सगळं राहून जातं. हे लक्षात नाही तुमच्या. धरतंय कोण आणि सोडतंय कोण? अशा मूर्खपणाने जर देव मिळणार असता, तर मग देवसुद्धा मूर्खच आहे म्हणायचा! 

अहो, तो सर्वशक्तिमान! किती शक्ती आहे त्याची! अत्यंत प्रचंड शक्ती असलेला जर लोहचुंबक एखाद्या ठिकाणी असला आणि त्या ठिकाणी आपण जाऊन लहान शक्तीचा लोहचुंबक घेऊन त्याच्यासमोर नाचलो नाही तर उड्या मारल्या, नाही तर डोक्यावर उभे राहिलो, हे करून जर तो आपल्याकडे येत असला, तर तुम्ही करा, पण ते शक्य आहे का? फक्त आपल्याजवळची जी थोडीशी शक्ती आहे ना, ती नुसती अशी सोडली की पटकन तो ओढून घेतो. बसलाच आहे ओढायला तिथे. त्याची एवढी शक्ती एवढ्यासाठीच आहे की आपल्याला आपल्यात ओढून घ्यायचं. पण त्याची अशी इच्छा आहे की, तुमच्या इच्छेमध्ये हे झालं पाहिजे. तुमची इच्छा असायला पाहिजे. जोपर्यंत तुमची इच्छा नाही, तोपर्यंत तो तुमच्यावर जबरदस्ती करणार नाही. म्हणजे माणसाला त्याने त्याच्या गौरवात उभं केलेलं आहे. त्याची संबंध इज्जत आहे. त्याची सर्व स्वतंत्रता आहे. 

आजकाल मुंबईला पुष्कळ हिप्नॉसिस(hipnosis) वगैरे लोक करतात, म्हणजे ते मोहिनी विद्या करतात. आणि लोकांना वेड्यासारखं त्यांच्यावरती मोहिनी मंत्र घालून नाचवणं, कुदणं, काय, काय… प्रकार! हजारो रुपये लोक खात बसलेत. आणि आम्हाला ते आवडतं, लोकांना! लोकांना, स्वतंत्रपणा नको, स्वतःचा गौरव नको आणि स्वतः म्हणजे काय आहात तुम्ही! केवढं मोठं आहे त्याच्यात! आता प्रधान साहेबांनी सांगितलं एका भिकारणीबद्दल. कधी कधी लोक भिकारणी होतात, ते जाणूनबुजून होतात, हे आपल्याला माहिती नाही. समजा एखाद्या जन्मात एखादी मोठी महाराणी असली, पण तिला नवऱ्यापासून, त्या राजापासून फार त्रास असेल, घराद्वारात फार त्रास, त्या राणीपणाचा बोजा तिला फार झाला असेल. तर ती म्हणू शकते की, “प्रभू, मला पुढल्या जन्मी भिकारीण कर, पण मला राणी करू नकोस!” पुढला जन्म तिचा भिकारणीचा होणार, पण आतून ती राणी आहे, तिची तब्येत राणीची रहाणार. तुम्ही पुष्कळसे श्रीमंत लोक पाहिले असतील इतके गरीब असतात, [इतके/नुसते] भिकारी. आणि काही काही गरीब किती श्रीमंत असतात आतून!

तेव्हा परमात्म्याला जाणण्यासाठी त्याची स्वतःची धडपड चालली आहे, तो स्वतः तुमच्यासाठी सर्व व्यवस्था करतो आहे. तुम्हाला परत-परत जन्माला घालून, तुमच्या आवडीनिवडी कमी करत… करत… करत…, शेवटी तो त्या ठिकाणी आणून पोहोचवतो, तिथे तुम्हाला धर्म दिसून येतो. म्हणजे असा एखादा मनुष्य अगदी कर्मनिष्ठ ब्राह्मण आहे [म्हणे], “आणि आता मी सगळ्या मुसलमानांना आणि सगळ्या म्लेंच्छांना अगदी माझ्या मनात द्वेष आहे”, असा विचार करून जर आज एक ब्राह्मण उभा राहिला, तुम्हाला आश्चर्य वाटेल की पुढल्या जन्मी तो जाऊन पक्का “मुसलमान” झाला पाहिजे! मी सांगते तुम्हाला. कर्मनिष्ठपणा करणारे लोक इथे…, आम्ही आता तेहरानला गेले होते. तेहरानमध्ये ध्यानामध्ये लोकांना बसवलं, तर मुसलमान लोक तिथे घंटी वाजवताहेत आणि आरत्या उतरवताहेत. इकडे आपल्या मुंबईला आम्ही ब्राह्मणांना बघते, ते तिकडे नमाज पढतात. काय वेडेपणा! एका अतिशयेला जातात आणि मग दुसऱ्या अतिशयतेला [जाता]. याला शिवायचं नाही, त्याला शिवायचं नाही, पुढल्या जन्मी तुम्ही “हरिजनच” जन्माला येणार! तुमचा अधिकार आहे का तुमच्या जन्मावर? पण तुम्ही जर कोणाशी द्वेष केला, उद्या तुमच्याशी जग द्वेष करेल. जे मी बोलते तेच माझ्याकडे परत येणार आहे. जो मनुष्य या अतिशयतेच्यापासनं बाहेर निघालेला आहे, त्याच्यासाठी माझा “सहजयोग” फारच सहज आहे. […] […] म्हणजे “सहजयोग”.

तुम्हाला जर मी सांगितलं, या बीजातून अंकुर काढून दाखवा, कोणी काढून दाखवू शकतं का आपल्यला? एकसुद्धा बीजातून आपण अंकुर काढू शकत नाही आणि काय माणसाला दिमाख आहे स्वतःचा! अहो, एक घर बांधलं, काय आहे? मेलेल्या विटा आणि मेलेलं घर! जिवंतपणा आहे का त्याच्यात? एक तरी जिवंत काम आपण करू शकतो का जगामध्ये? काय माणसाला दिमाख चढलेला आहे स्वतःचा! स्वतःला काय समजतोय तो! काहीही आपण करत नाही. सांगायचं म्हणजे जे काही आपण करतोय, ते नुसतं आपल्याला असं वाटतं, की आपण करत आहोत. खरं म्हणजे, आपण काहीही करत नाही, सगळं करतो “तो”. हे [तिथपर्यंत] आपल्याला जाणवणार नाही तोपर्यंत ते आपलं एक [सत्य/पक्के] होणार नाही, जोपर्यंत आपण त्याला शक्तीचा काही तरी अनुभव मिळला [नाही]. आंधळ्यासारखा माझ्या गोष्टीवर कोणीही विश्वास कृपा करून करू नये. अंधविश्वासाने परमात्मा मिळणं अशक्य आहे. 

जसं समजा, या खोलीमध्ये, आपण बाहेरून आलात, अंधार आहे. आता मी या खोलीची मालकीण आहे. मला या सगळ्या खोलीच्या खिडक्या, दारं सगळी व्यवस्था माहिती आहे. आपण आल्याबरोबर मी म्हणेन, “बघा, इथे बसा, इथे, आपल्यासाठी सतरंजी अंथरली आहे. इकडे दिवा आहे. तिकडे लाईटचा(light) तो स्विच(switch) आहे.”  आपण तो हळूहळू बघाल, आपल्याला समजेल, ते आहे तर विश्वास ठेवायचा, नाही तर मुळीच ठेवायचा नाही. म्हणून कधी कधी अस्तिकापेक्षा तो नास्तिक बरा! म्हणजे आस्तिक वाईट असतात अशातली गोष्ट नाही. माझं म्हणणे असं की एखाद्या गोष्टीला चिकटून बसलेला मनुष्य मुश्किलीने त्या समुद्रात उतरू शकतो. जर तुम्हाला समुद्रात उतरायचं आहे, तर जे काही तटावर आहे ते सोडायलाच पाहिजे. तुम्हाला या हॉलमध्ये(hall) यायला ज्या शिड्या आहेत त्या सर्व सोडाव्याच लागतील. म्हणजे शिड्या वाईट आहेत असा त्याचा अर्थ आहे का? शिड्या सोडल्याशिवाय तुम्ही आतमध्ये कसे येणार? 

मग दुसरा प्रश्न असा येतो, “की माताजी, असं कसं शक्य आहे? पूर्वी नुसते एका-दोन लोकांना आत्मसाक्षात्कार व्हायचा. आणि आता तुम्ही म्हणता हजारोंना होतो, हे कसं शक्य आहे?” का शक्य नाही? अहो, पूर्वी एखाद्या जर झाडांला एक-दोन फुलं येत होती, [आता ती] हजारो झाडांला फुले येऊन बहरली आहेत, तर हजारो फळे होणार नाहीत का? असं जीवनात तुम्ही पहिलं नाही का? काही तरी जीवनामध्ये वाढ झालेली असेल. आणि कलियुगामध्येच हे होणार आहे, नाही तर सत्ययुग येणार कसं? कलियुगाला बदलण्यासाठी, सत्ययुगाला आणण्यासाठी, असं काही तरी विशेष, सर्व जगतात […]मध्ये, अ मास(a mass) हे कार्य झालं पाहिजे, नाही झालं तर सत्ययुग येणे शक्यच नाही. उलट तिथे […] […] […]. 

आता अगदी अशा ठिकाणी जाऊन मनुष्य उभा आहे, की जिथे एकतर तो चांगल्याच्या याच्यामध्ये येऊ दे, तळ्यात किंवा वाईटाच्या, इव्हील ऍण्ड गुड(evil & good). जर माणसांनी ह्यावेळेला हा निश्चय केला नाही, की सत्ययुगच आम्हाला आणायचं आहे, तर सबंध संसाराचा संहार होणार आहे याबद्दल मला शंका नाही! पण डोक्यामध्ये आपल्या अजून जे पूर्वीचे बसलेलं आहे, ते थोडं रिकामं करायला पाहिजे. कारण असं आहे, पुष्कळांचे वाचन पुष्कळ झालं, “आम्ही पुष्कळ गुरु पाहिले, साधू आले होते, ते अमूक आले होते.” अहो, आले असतील! त्यांनी तुम्हाला काही दिलं आहे का? तुम्हाला आनंद दिला आहे का? तुम्हाला शांती दिली आहे का? तुम्हाला प्रेम सांगितलं आहे का, काय आहे? हातातून वाहिलं पाहिजे प्रेम, खट्…खट्…खट्…खट्, हातातनं असं जातं. 

आमची हे शिष्य आहेत ना इकडे बसलेले […] […] […]. तर मी म्हणे लोकांना बरे वगैरे करीत नसते, कारण जरा वेळ कमी असतो, माझी इच्छा आहे की मी डॉक्टर्स(Doctors) तयार करेन. आणि सगळे हे लोक नुसते हातांनी, असं हातांनी, ते देऊ […] […] […] […] […]. दृष्टी चिकित्सक नसावी, उघडी असावी, […] काय होतं काय नाही? जे सहज ते सहजयोग मिळाला. पण चिकित्सक दृष्टीचा मनुष्य फालतू काही तरी गोष्टींना चिकटून बसला, म्हणे त्याला समुद्रात ढकलायचं तरी कसं? ज्याला समुद्रात जायचं आहे, त्याने तट सोडलाच पाहिजे. आतापर्यंत तटावर भटकलात ही गोष्ट खरी, नाही तर कोणावर तरी आनंद दिसला असता, कोणावर तरी ते प्रेम वाहवलं असतं, कुठे तरी त्या शांतीचा उद्गम झाला असता, पण कुठेही मला दिसला नाही. मी इतके साधू, संन्यासी आणि एवढे सगळे पाहिले, एकाही माणसामध्ये ही गोष्ट दिसलेली नाही, जी गोष्ट आमच्या या शिष्यात आलेली [असल/दिसेल] आणि ती तुमच्यातही येईल. परवा वसईला मी गेले होते, शंभर माणसं पार झाली! तुम्हाला आश्चर्य वाटेल. आणि इतकी आश्चर्यजनक घटना आहे! इतकं अद्भूत आहे! की लोकांना असं वाटतं, असं शक्य कसं आहे? पण आहे. 

सांगायचं म्हणजे लहानपणापासनं माझा जन्मच अशा स्थितीत झाला होता, की माझ्याजवळ ही चेतना होती आणि जन्मजन्मांतरी चेतना माझ्या जवळ राहीली. पण या जन्मामध्ये, इथे, माझ्या हे लक्षात आलं, की या जन्मामध्ये जोपर्यंत मी, हे देणार नाही लोकांना, जी कायम [माझ्याबरोबर] नेहमी जन्माला येते आणि नुसती भाषणे देऊन चालणार नाही. लोकांना नुसतं सांगून की, “तुम्ही प्रेम करा, तुम्ही चांगले लोक बना!” त्याने काही काम बनणार नाही, असे सांगणारे पुष्कळ होऊन गेले. पुस्तकं लिहिणारे पुष्कळ होऊन गेले. पण […] काय झालं? हे करा, ते करा, ते करा! तर अशी व्यवस्था झाली पाहिजे की, जिथे मी ह्यांना, कुठेतरी, कसं तरी [कमीत कमी] पाचव्या माळ्यावर जर आणून मी सोडलं, तर ह्यांना वाटेल, की खरचं माताजींनी काही तरी आम्हाला शिकवलं आहे आणि याच्या पलीकडेसुद्धा, जे दिसतंय, त्याच्या पलीकडे आहे. जेव्हा ते दिसू लागेल, याच्या पलीकडचं दिसू लागेल, तेव्हाच तर त्यांना वाटेल की आहे, नाही तर देवाच्या गोष्टी म्हणजे तोथांड! 

आता आपल्यामध्ये बघा, तरुण लोक किती कमी, फार कमी आहेत तरुण. आता तरुणांच्या ह्याच्यामध्ये, बडोद्याला मी गेले होते. युनिव्हर्सिटीमध्ये(University) माझं भाषण ठेवलं. तर […] आमच्या सगळ्या लोकांनी (सांगितलं), “आम्ही जाऊ देणार नाही म्हटलं, (श्रीमाताजी).’ “तर का बुवा, का? हा प्रकार आहे तरी काय?” उठलं-सुटलं हेच धंदे, कोणाची प्रेतयात्रा काढ, नाही तर कोणाला कंडेम(condem) कर, नाही तर मारून काढ, […] काढ! ही आपल्या मुलांची आज स्थिती, का? त्याला कारण आपण. [आम्ही] ज्या धर्माच्या नावावर एवढे पैसे खर्च केले, एवढी धावपळ केली, त्यांना माहित आहे की हे महामूर्ख त्यांनी [काय मिळवलं?] मग आम्ही तरी कशाला ह्या महामूर्खपणात पडायचं? काही तरी आपण दूसरं कार्य [काढायचं/करायचं], म्हणून त्यांनी दुसरं आपलं मारपिटीचे [कार्य] केलेलं आहे. अशा रीतिने आपल्या [इकडच्या] मुलांची ही स्थिती आहे. पण अमेरिकेतल्या तरुण मुलांची ही स्थिती नाही. अमेरिकेतील तरुण मुलांना ही समजली गोष्ट, की त्यांना […] […] […] […] केलं धर्म वगैरे… त्यांना कांही मिळालेलं नाही, नाहीतर एवढे संतापतात कशाला? त्यांच्यात किती दोष आहेत? […] […] […] […]. आणि धर्म धर्म काय? म्हणून त्यांनी सांगितलं की (हे सगळं) सोडा, आम्हाला घर नको, दार नको, आई नको, वडील नको, आम्ही आपलं सगळेजण मिळून-मिळून घोळक्या-घोळक्याने राहू आणि वाटेल तसं जीवन [काढू]. आम्हाला पैसा नको, काही नको, सगळं सोडा, ह्यांनी सगळे धंदे होतात, पैशांनी! म्हणून […], सोडून निघाले. पण [कोणाचा] फायदा होणार आहे त्यानी? 

काय समजा आम्हाला वाटलं आम्ही […] […], आम्ही हे तरी धरू, नाही तर ते तरी धरू. आम्ही जमिनीवर उभे आहोत. त्यावेळी, [मनुष्याने] काहीही सोडायचं नाही. कुठेही उभा आहे तरी तो मजेत उभा असतो. आपल्या आतमध्ये परमात्म्याने याची सबंध व्यवस्था आदिकालापासनं सुंदर करून ठेवलेली आहे, अति सुंदर करून ठेवलेली आहे. [पडा] त्यात. आपली साक्षात आई, आपल्या पोटात आहे. आपल्याला जन्म देण्यासाठी ती तिथे सारखी बसलेली आहे. आणि ती तुम्हाला पुनर्जन्म देऊन, त्या राज्यात घालणार आहे, जिथे तुम्ही दुसरे होणार. ती [साक्षात] तुमच्यात बसलेली आहे. पण लोकांना त्याची एक […] […] […]. आपली दृष्टी कुठे आहे? पैसे किती मिळतात आजकाल! नाही, तर मग, इलेक्शनला(election) उभं राहावं, नाही तर मग, कुठे तरी सेवा-बिवा करा लोकांची! याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही. पण जाऊ तसंही शकत नाही, प्रयत्न करूनसुद्धा आपण धर्मात [उतरू शकत नाही]. 

आजकाल लोक, घोड्यावर बसल्यासारखं, वेळ वाचवायची, वेळ वाचवायची…, कशासाठी वेळ वाचवताय? अहो, तिकडं [समाधान कोठे आहे] तो बघायाचा आहे आम्हाला. खरोखर ही जी वृत्ती देवाने दिलेली आहे, घड्याळसुद्धा देवाने दिलेलं म्हटलं पाहिजे. सगळं जे काही बाहेर आहे ते आतूनच आलेलं आहे. आणि त्यानी घड्याळ एवढ्यासाठीच दिलेले आहे की, तुम्ही वेळ वाचवा, कशासाठी? आपल्या आतमध्ये जाणा! जरासा वेळ रिकामा झाल्याबरोबर मनुष्य घाबरा होतो. पळतो तो कुठेतरी सिनेमाला(cinema) वगैरे…, त्याला वेळ एकटा बसून तो आपला घालवू शकत नाही. पाच मिनिटे त्याला म्हटलं तू एकटा बस, तो स्वतःला भेटू शकत नाही, पळतो तिथून! कारण, आपण स्वतः अत्यंत घाणेरडे आहोत, अशी त्याला कल्पना आहे. खरं म्हणजे इतकं आपण सुंदर आहोत स्वतः! मला जर आपण सांगितलं, ‘की तुम्ही तीन महिने इथेच खोलीत बसून राहा,’ आनंदात मी बसेन! मला कधीही त्याचा त्रास होणार नाही. मी सुंदर आहे म्हणून नाही, पण तुम्ही जे सुंदर आहात, ते सुद्धा मी तिथे बसून बघू शकते. आणि किती सौंदर्य आहे त्याची तुम्हाला कल्पनाच नाही!

आता, आजच्या सहजयोगाला, तुम्ही असं समजायचं साध्या भाषेत. म्हणजे असं आहे, कुंडलिनी शास्त्रावर पुष्कळ पुस्तके लिहिली गेली आहेत. पैकी, पुष्कळांचं असं म्हणणं आहे की कुंडलिनी बिघडते, कुंडलिनी कोणी उठवली की तिनं काय तरी होतं! त्यानं हे येतं, ते होतं! पुष्कळ तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी सांगतात. खरं म्हणजे काय आहे, की जे लोक कुंडलिनी उठवतात, ते त्याला असं समजतात की काही तरी यांत्रिक वस्तू आहे, मेकॅनिकल(mechanical) गोष्ट आहे. आणि नाही तर, त्याच्यावर सेक्ससारखा(sex) घाणेरडा आरोप करतात. ही तुमची “आई” आहे. आई, सगळे तुमचे खून माफ करू शकते. तुम्ही जर तिला मारून टाकलं तरी ती ब्र म्हणणार नाही; पण तुम्ही जर तिच्यावर सेक्सचा(sex) आरोप केला, तर ती चिडणार नाही तुमच्यावर? जितके असं बोलतात, की कुंडलिनी चिडते, ते सगळेच असल्या प्रकारचे आरोप त्या कुंडलिनीवर करतात, म्हणून! खरोखर म्हणजे जर अशी कोणी व्यक्ती असली, ज्याच्यामध्ये परमात्म्याचे प्रेम वहात असलं, तर सहजच त्याला असं, जरासं आपण जसं पाणी देतोना, झाडाला, तसं पाणी दिल्याबरोबर एखाद्या फुलाचं कसं सहज फळ होतं, तसं तुमचंसुद्धा फळ होऊ शकतं. पण पाणी द्यावं लागतं, जर तुम्ही त्याच्यावर रॉकेल(kerosine) ओतलं तर! पाणी हे जीवन आहे. रॉकेल हे मेलेलं आहे. मेलेल्या गोष्टींनी कुंडलिनी जागृत होऊ शकत नाही. “कुंडलिनी” म्हणजे साध्या शब्दात सांगायचे म्हणजे, आता हा माईक(mike) आहे नं माझा, ज्याच्यावर मी बोलतेय, त्याला आधी आम्ही तयार केलं व्यवस्थित. माणसालाही असं देवांनी व्यवस्थित सगळं तयार केलेलं आहे, प्रत्येकाला. मग तो शिक्षित असो, अशिक्षित असो, हिंदुस्थानचा असो, की इंग्लंडचा(England) असो, की अमेरिकेचा असो त्याचा काही फरक नाही. अशी जशी ही एक सुंदर पैकी मशीन(machine) तयार केली आहे, तसा मनुष्य, परमात्म्याने तयार करून त्याच्यामध्ये हे एक कनेक्शन(connection) आहे नां, ते लावून ठेवलं आहे. आता, हे जे कनेक्शन(connection) आहे ते परत त्या परमात्म्याला लावायचं, एवढं कार्य म्हणजे ‘सहजयोग’. अगदी साधी गोष्ट समजावून सांगायची म्हणजे अशी. 

आता त्याचं पुष्कळ शास्त्र आहे म्हणा. मी पुस्तकं पण लिहित आहे त्याच्यत, जर कोणाला इच्छा असली तर त्याने ते वाचावं. पण मी पुस्तक सुद्धा लिहिताणा आजपर्यँत का, का-कू करत होते? की पुस्तक लिहिलं, की बसले (हातात) बायबल घेऊन, या याच्यामध्ये हे लिहिलेलं आहे, या याच्यामध्ये हा मंत्र आहे, मंत्र पाठ करत बसले परत! म्हणून पुस्तक लिहायचीसुद्धा मला थोडीशी चोरी वाटते. भाषणाच तसचं आहे. भाषणामध्ये सुद्धा असे पुष्कळ लोक असतात, की त्यातलं तेवढंच धरून घेतात, की ज्याने आपला अटकाव बाहेर राहील. मी म्हणते की, माझं भाषणसुद्धा विसरा, सगळं काही विसरा – जसं सबंध तुम्ही जी पायरी चढून आलात, [विसरलात] आणि आतमध्ये आलात – तसं सगळं विसरायचं. मंत्र म्हणायचा नाही, गुरु म्हणायचा नाही, जप करायचा नाही, जाप करायचा नाही, सगळे विचार आहेत. दोन विचारांमध्ये एक लहानशी जागा असते, तिथूनच मला तुमचं हे जे लक्ष माझ्याकडे आहे, ते आतमध्ये घेऊन जायचं आहे. तेव्हा कोणताही विचार – मग तो गुरु असेना का किंवा धर्म असेना का किंवा देवाचे नाव असेना का – सबंध तुमच्यासाठी तो विचारच आहे. आणि तो एकदा झाल्यावर मग गुरूला अर्थ येतो, मग रामाच्या मूर्तीला अर्थ येतो, प्रत्येक गोष्टीला अर्थ येतो. आता मी ह्याच्यावर बसलेली आहे, ह्या शॉलमध्ये सुद्धा माझे व्हायब्रेशन्स(Vibrations) आहेत. माझ्या पायाचे फोटो नुसते घेऊन सुद्धा या लोकांनी पुष्कळ रोगी बरे केले. म्हणजे अर्थ येतो त्यात. पाणी जर माझ्या पायांचे धुऊन नेले, त्यानी पुष्कळ रोगी बरे झाले. खरी गोष्ट आहे! मला काही आश्चर्य वाटत नाही, तुम्हाला वाटत असेल. कारण, ही जी परमात्म्याची शक्ती आहे तिने सर्व सृष्टीची जर रचना केली आहे, तर या लहान-लहानशा गोष्टी करण्यामध्ये काय वैशिष्ट्ये आहे! सगळे रोग जाऊ शकतात. पण पहिल्यांदा आपल्या आतली शक्ती प्रत्येकाने मिळवली पाहिजे. आणि संपूर्ण स्वतंत्रेतेत मिळाली पाहिजे. 

गुरु तरी आजकाल काय आहे? पायलीचे पन्नास म्हणतात तसे निघाले आहेत. उठल्यासुटल्या प्रत्येक गावोगावी गुरु निघालेले आहेत. अमेरिकेला यांचे पेव फुटलेले आहे. तिथे जाऊन हे करतात काय? मोहिनी विद्येने तुमच्यावर अस्त्र घालून – ही एक आहे पद्धत – अस्त्र घालून तुम्हाला मोहित करून घेतात. तुमच्या जवळ जेवढे पैसे असतील, हे असेल, ते असेल, ते सगळं नागवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर व्यवस्थित चंगळ करायची! मी असं म्हणते, की देवाच्या ह्या कार्याला, पैसा कशाला पाहिजे? एक सरळ गोष्ट आहे. अहो, हे फुकटात झालचं पाहिजे. जे काही महत्वपूर्ण आहे ते फुकटच होतं. उद्या आपला जो श्वास चालतो आहे, आपलं जे हृदय चालतं आहे, कुणाला विचारा हे कसं चालतं? डॉक्टरांना(Doctor) विचारा, ते [म्हणतील, हे सगळं] स्वयंचलित आहे. मग तो ‘स्वयं’ कोण? तो स्वयं कोण आहे, सांगा? जो हे चालवत आहे, हृदय आणि किती सहज! अगदी सहज. [तसंच] हे महत्वपूर्ण कार्य झालचं पाहिजे. हे जर कठीण असलं, तर होणारच नाही. आपण अति सहज होऊच शकत नाही. आपल्याला इकडून जेवता येत नाही; इकडून जाऊन, तिकडून जाऊन, चार-पाचदा हातपाय तोडून जेव्हा आपण जेवतो, तेव्हा आपल्याला वाटतं जेवलो, नाही तर इतकं सहज कसं बुवा जेवलो! 

मी साधे एक आईचं उदाहरण देते. मी स्वयंपाक केलाय तुमच्यासाठी, व्यवस्थित. तुम्हाला भूक आहे का? तर, ताट वाढलंय, जेवायला बसा. भूक असली तर सरळ बसा. नाही तर म्हणा, “आई, कुठे गेली होतीस गं तू? कुठून आणलस तू? कसं केलस हे?” उद्या मी तुम्हाला जर एक रेडिओ(radio) बक्षीस दिला, तर तुम्ही काय लगेच उचलून बघाल की बघा, छानपैकी आईने आम्हाला एक रेडिओ(Radio) दिला आहे, ऐकावं त्याचं. की तुम्ही त्याचे सगळं इंजिनियरिंग(engineering) आधी बघत बसाल? “आधी इंजिनियरिंग(engineering) सांगा नाही तर आम्ही रेडिओ(radio) ऐकत नाही?” (असे म्हणाल). संसाराच्या गोष्टींबद्दल माणसाला हा उहापोह नाही. समजा, उद्या जर मी म्हंटलं की, “इथे हिरा पडलेला आहे.” दिल्लीला जर असं अनाऊन्स(announce) झालं, तर दिल्लीहून लोक इथे प्लेनने(plane) येतील तो हिरा बघायला! हिरा [असाच तयार आहे तो घेऊन] तर बघा, मग बघूया! धर्माच्या बाबतीत माणूस उलटा चालतो. “इतकं तुम्ही पैशा शिवाय कसं देता? इतकं सोपं कसं?” उलटं [असतं]. 

मी आताच सांगितलं की सगळं जेवढं महत्वपूर्ण आहे, ते सोप असलं पाहिजे. आणि पुष्कळांनी अमेरिकेला मला सांगितलं की, “माताजी, प्रत्येक मनुष्य आमच्याकडनं दीडशे ते तीन-तीनशे डॉलर्स(dollars) घेतात आणि तुम्ही इथे (एक) पैसा घेत नाही, हे कसं काय?” म्हंटलं, “हे बघा, तुम्ही मला सांगा याची किंमत किती लावायची? मला तर समजत नाही याची किंमत काय? तुम्ही लावा किंमत?” म्हंटलं हे (सगळे) उपटसुंभ लोक आहेत. तुम्हाला मुर्खात काढायला इकडे आले आहेत आणि तुम्ही मूर्खासारखे त्यांना पैसे देता. तुम्हाला मिळालं काय? व्यवस्थित तुमच्या अंगावरती भगवी वस्त्र घातली, आपल्या माळा घातल्या आणि सगळीकडे ऍडव्हर्टाइजमेंट(advertisement आपली जाहिरात) करत फिरत आहेत. आणि तुम्हाला आंनद वाटतो, वा! आम्ही देवासाठी केवढे [उरतो/उडतो]!. मग जेव्हा तुम्ही वेडे व्हाल, दहा वर्षानंतर, तेव्हा माझ्याकडे [सहज/परत] याल. 

सांगायचं म्हणजे, सगळे हे प्रकार परलोक विद्येने होतात. जितके बाबाजी लोक आहेत, सगळे परलोक विद्या करतात. भुतांचे तुमच्यावरती स्थान बनवून, त्या भूतांकडून ही सर्व कार्ये करून घेतात. सबंध (तुमचा) पैसा काढून घेतील, तुमच्या मुलाबाळांची नासधूस करून तुम्हाला सबंध अगदी रस्त्यावर उभं केल्यावरती आणि आपलं गाठोडं बांधायचं आणि अमेरिकेला निघायचं! चंबुगबाळं बांधून तिथे बसलेले पुष्कळसे इथले, असे क्रिमिनल्स(criminals, अनेक गुन्हेगार आज) तिथे आहेत. लोकांच्या आता लक्षात येतंय, की धूळ फेकण्याची यांना कला (अवगत) असल्यामुळे, ते लोकांच्या लक्षात येत नाही! आणि आपल्याला आश्चर्य वाटेल या कलियुगामध्ये पाच राक्षस आणि पाच राक्षसिणी जन्माला आलेल्या आहेत! रावणापासून-नरकासूरपासून सगळे जन्माला आलेले आहेत. आणि आपले, आपले रंग दाखवत आहेत. पण स्वतःला ते रावण म्हणणार नाहीत! ते स्वतःला देव, भगवान, असं, तसं म्हणवून घेतील! तुम्हाला ओळखायला पण यायचे नाहीत ते! मायावीपणा आहे त्यांच्यामध्ये! आपण ऐकले असेल की, मायावी राक्षस! ते सगळेच्या सगळे जन्माला आले आहेत आणि आपण महामूर्खासारखे, “अहाहा! बाबाजी आ गये, बाबाजी आ गये और हमको दो सौ रुपया निकाल के दे दिया।” अरे, भाई, दो सौ रुपया दे दिया, तो तुमको काहे को दिया? तुम तो करोड़पति हो! किसी गरीब को दो नां! सगळ्या श्रीमंतांच्या गळ्यामध्ये एक एक हिऱ्याच्या माळा दिलेल्या आहेत. त्यांच्याकडे काय हिरे कमी आहेत? द्यायचे तर गरीब लोकांना वाटा? 

एक आमचे नातलग आले आणि मला म्हणे, “बाबाजींनी आम्हाला अंगठी दिली, हिऱ्याची!” श्रीमंत आहेत फार! 

मी म्हणाले, “किती, किती आहेत तुमच्याकडे, हिऱ्याची (अंगठी)?” 

“होगी, दस-बारा होगी!” 

म्हंटलं, “तो ये और तेरहवी काहे को ले ली? अगर दस-बारह से तुमको आनंद नहीं आया, तो ये तेरहवी से आनेवाला है क्या? इसको काहे को ले ली, भाई?” 

कहे, “नहीं, नहीं, वो तो मेरे भक्ति को देख के दिया।” 

मैने कहा, “अरे, भक्ति का क्या है? इनाम क्या बाज़ार में मिलती है क्या? पागल हो! [ये/की] कितने भी रुपये में जा के बाज़ार में खरीदो!” 

(ते म्हणाले,) “नहीं, कुछ ऐसे रुपये ज़्यादा नहीं दिये। मैंने कुछ पाँच-छ: हज़ार रूपये ही दिये उनको। बाद में मेरे मन में आया की इनको रुपया, कुछ तो देना चाहिये […], अंगूठी दे दी है।’ 

त्या लालचीवर भूत बसविलेले आहे त्यांनी. हे अंगठी फिरवताहेत आणि ते भूत सगळं सांगत आहे तिकडे. ही [मोठीवाली] विद्या आहे, परलोक विद्या! आणि सगळेच्या सगळे राक्षस या कलियुगात आलेले आहेत. आणि इकडे मी एकटी फक्त, प्रेमाच्या गोष्टी सांगतेय लोकांना! आणि म्हणते की, “सहजयोगात या. आपल्यामध्ये आपला दीप जाळा,” म्हणजे अंधार सगळा जाणार. त्या अंधाराला मारून ओरडून नाही जाणार आहे? हा अंधार आपल्या दिपाने जाणार आहे. तुमच्या प्रत्येकामध्ये असा भयंकर दीप (एवढा प्रखर दिवा) आहे, (जो) या सगळ्यांना जाळून पोळून खतम करून (संपवून) टाकले. आणि तोही प्रेमाचा! आणि प्रेमाचे वैशिष्ट्य हे आहे की, समुद्राची जशी [ढाल] असते, तशा कितीही समुद्र आला तरी ती मोठी होत जाते, तसं प्रेम मोठं होतं जातं. प्रेमाचं अस्त्र सर्व अस्त्रांच्यावरती वर आहे. त्या अस्त्रापुढे सर्व जग हारलं. आणि तेच अस्त्र तुमच्यातनं वहायला सुरुवात झाली की, बघा, सगळे पळतात की नाही आपले चंबूगबाळं घेऊन! [सर्वजण] या संसारातूनच गेले पाहिजेत! मी तर इतपर्यंत म्हणेन, की जर श्रीकृष्ण आला “आता कंसाला मारू नकोस बाबा, मेला तरी परत-परत जन्म घेतोय” आणि राम आला तरी, रावणाला मारून तरी शरीरच मारतोयस ना, परत-परत तो जन्माला येतोय. त्या पेक्षा एखाद्याचं कल्याण कर (त्याचे परिवर्तन)! म्हणजे पुढल्या जन्मी तरी [साधू बनेल]. अशी स्थिती आलेली आहे. 

आपल्याला, धुळ्याला, बघूया कसं काय जमतं ते! इथे, पुण्याई बरीच ऐकली आहे मी. व्यासांचे पण जवळपासच म्हणे, स्थान आहे. इथल्या वातावरणामध्ये असे तरंग आहेत, ते मला आतून जाणवत आहेत, कार्य होऊ शकतं. पण मी एकच-दोन गोष्टींच्या विषयी म्हणते, “की हट्ट करू नका!” हट्ट करून मुलगा बसला, की आईला फार त्रास होतो! समजावून सांगितलं, किती समजावलं तरी हट्ट करतात मुलं! आता फार झाला हट्ट! आम्ही आलो आहोत तेव्हा घेऊन टाका. जेव्हा दारात गंगा आली तेव्हा तुम्ही घेतलं नाही, मग केव्हा घेणार? पण तुमची जर घागर भरलेली आहे, तर गंगा तरी काय करणार? सूर्य तुमच्या दाराशी येऊन जरी आला, आणि तुम्ही जर उघडलं नाही आपलं दार, तर सूर्याचा दोष नाही त्याच्यात!

परवा एक गृहस्थ आले, मला म्हणे, ‘माताजी, बघा, ही माझी मुलगी इतकी आजारी आहे. तिला तुम्ही जर बरं केलं तर मी तुम्हाला मानेन!’ म्हंटलं, “मी कोणाला बरं-बिरं करीत नसते. ही तुम्हाला कल्पना आहे, मी कुणाचं काहीच करीत नसते! मी नुसती मधे उभी आहे.” मी नुसती मधे उभी आहे, जसा हा माईक(mike) मध्ये उभा आहे आणि मी बोलते आहे. आता हा माईक(mike) उद्या म्हणेल, ‘मी बोलतोय!’ मी काही नाही, मी मधे उभी आहे. त्याला बरं करायचं असेल तर ‘तो (परमात्म)’ करेल, नाही तर नाही करणार! माझं काही नाही. माझे काही उपकारही नाहीत आणि माझं काही देणं-घेणं ही नाही. मी नुसते मधे उभी आहे. 

शेवटी, एक गोष्ट सांगते, मजेदार, राधा आणि कृष्णाची. एकदा, राधेला ईर्षा झाली मुरलीची (बासरीची) आणि म्हणे की, “का गं, तू अशी कृष्णाच्या तोंडाला का? तुझ्यात काय आहे वैशिष्ट्य?” तर [मुरली] म्हणाली, “अगं  वेडे, माझं वैशिष्ट्य एकच आहे की मला काहीच वैशिष्ट्य नाही. मी [आतून] अगदी पोकळ झालेली आहे, माझ्यात काहीही राहिलेलं नाही. ‘तो’ वाजवतो, नुसती मी ऐकते आणि बघते. मी साक्षी झालेली आहे. नुसती पोकळ झालेली आहे मी. मधे जर मी कुठे उभी राहिले तर त्याचा स्वर बिघडणार नाही का?” तसचं तुम्हाला पोकळ व्हायचं आहे. पोकळ झाल्याबरोबर आपल्याला कळेल की, आपल्यामध्ये किती मोठं सुंदर संगीत आहे, आणि काय सौंदर्य आहे तुमच्याकडे सुद्धा! आनंदमय! सारखं ओझरत, पाझरत आपल्यात येत असतं, त्या प्रवाहाला नुसतं सुरु करून देणं म्हणजे “सहजयोग” आहे. 

मला आशा आहे की, आपण सगळेजण, विशेषतः मुलांना याचा फार लवकर फायदा होतो. फार मुलांना इतक्या लवकर फायदा होतो, कारण साधी-भोळी जीव असतात, चटकन पार होतात. आणि पार झाल्यावर उभं राहून मला सांगतात, “माताजी, इधर से जा रहा है, इधर से नाहीं जा रहा है, इधर से जा रहा है।” अगदी बरोबर [उठून] सांगतात, [चटकन]! सांगायला सुरुवात करतात. आता मुंबईला एक दहा वर्षाचा मुसलमान मुलगा आहे, शब्बीर, तो पार झाला, म्हणजे अगदी मस्त आहे तो! बरोबर सांगतो. आणि आपल्यला आश्चर्य वाटेल एखाद्यावर बाधा असतील तर बरोबर हाताला चटके बसतात. आणि जेवढे बाबाजींचे हे शिष्य लोक आहेत, त्यांच्या हाताला तर […] […] […] काही काही लोकांच्या हाताला तर – आपल्याला आश्चर्य वाटेल, ज्याला म्हणतात – ब्लिस्टर्स(blisters) येतात, चांगले फोड! मोठे मोठे फोड येतात. ह्या सर्व शक्त्या आहेत आणि काम करत आहेत. तुम्हाला जर आपल्याला यांच्यापासनं वाचवायचं असेल तर [पहिल्यांदा आत्मसाक्षात्कार मिळवला पाहिजे.] […] […] […].

आजकाल महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे, तेव्हा लोकांच्या असं अगदी डोक्यात चाललेलं आहे, असं मला माहित आहे काही लोकांच्या डोक्यात काय चाललेलं आहे ते. की अशा या दुष्काळामध्ये, या गरिबी स्थितीमध्ये हे कसं काय [दिसणार/घटणार]? एका अर्थाने मी म्हणते दुष्काळ आला, थोडं बरं झालं. एक दिवस अशीच गोष्ट करत असताना, मी एका महाराष्ट्राच्या फार मोठ्या मिनिस्टरला(Minister) म्हटलं होतं की, “तुम्ही, इथं विहिरी का खणत नाही?” [विहिरीसाठीचाच] मिनिस्टर(Minister) होता, “विहिरी खणल्या पाहिजेत, पंजाबात किती आहेत विहिरी?” तर म्हणाला, “अहो, त्याला पैसा फार लागेल. असं होईल, तसं होईल…” आता बघा! तर श्रीमंती आणि गरिबी आणि विपत्ती आणि दुःख […] […] आहे. एखादा मनुष्य फार श्रीमंत असतो, तो खरं म्हणजे मानाने जराही श्रीमंत नसतो! आमचा ड्रायव्हर(Driver) आहे मुंबईला, मी त्याला म्हणते, हा राजा आहे मनुष्य आणि होता, तो पूर्व जन्मी राजा होता. आणि त्याने पाहिले की, “माझ्या रथाचा जो सारथी आहे, तो माझ्यापेक्षा जास्त सुखी आहे.” त्याने देवाजवळ असं म्हटलं, “की, हे देवा, मला पुढल्या जन्मी सारथी कर बरं! मला कंटाळा आला आहे राजेपणाचा!” तेव्हा तो या जन्मी ड्रायव्हर(Driver) झाला, पण तब्यतीने राजा आहे. तेव्हा श्रीमंती ही गोष्ट काय आहे! एखाद्याजवळ […] तर तो श्रीमंत झाला आणि  एखाद्याजवळ जर […] तो गरीब झाला. अशा या श्रीमंती आणि गरिबीचे नुसते नाना प्रकार आहेत. खरोखर म्हणजे जो मनुष्य खरंच [शांता] होऊन जातो, त्याला कशाची गरज [असत नाही], सगळं त्याच्या पायाच्या ठोकरीवर असतं. काय चांदी, नि काय सोनं, नि काय हिरा! काय, हो दगड आहेत नुसते! [काय ही श्रीमंती आहे का]? श्रीमंती ही मनाची असते. 

आता माझचं उदाहरण सांगायचं म्हणजे, आमचा नोकर आहे माझ्यापेक्षा दहा [पट] जेवतो. मला जर दिवसभर एकदा जेवायला घातलं तरी आशीच्या अशी [राहते], काही मला होत नाही. तरी तो भूकाच राहतो! एक […] जरी तू त्याला जिलेबी खायला घातली तरी परत एक […] पेडा [खायलाच] आहे. […] […] गरीब आहे! आणि मी. त्याला झोपायला पलंग पाहिजे, व्यवस्थित, पंखा पाहिजे! मला जर तुम्ही जमिनीवर घातलं, मस्त झोपी जाते. रस्त्यावर घातलं तरी झोपेन. आम्ही शहेनशा आहोत, आम्हाला काय? अहो, शहेनशाला आराम काय? आराम त्याच्या पायाशी असतो. जो आरामाच्या वर बसला, […च्या] वर बसला, तो खरा “शहेनशाह”! [म्हणूनच] गरिबी आणि श्रीमंती हे [खाली] आपल्या डोक्याचे [विचार] आहेत. आपल्या प्रकृतीमध्ये [पाहीलं] पाहिजे. एखादी बाई अगदी गरीब असते, पण तिच्यात केवढी दान शक्ती असते! आणि एखादी बाई एवढी श्रीमंत असूनही इतकी, एका कवडीसाठी नुसती मरत असते. असे आपल्याला पुष्कळ अनुभव आले असतील कंजूस लोकांचे. तेव्हा सांगायचं म्हणजे असं, ह्या सर्व गोष्टीनां (गरीबी आणि श्रीमंती) आत सोडून त्या परमात्म्याला भेटून घ्या, जो तुम्हाला आतूनच सबंध श्रीमंती देतो. आणि सबंध ते, जे त्या सृष्टीत झालेले आहे ज्याला आपण पैसा, अडका आणि एवढं मोठं वैभव म्हणतो, ते त्याच्या पायाच्या बोटाबरोबर किंवा करंगळी बरोबर सुद्धा नाही. [जसं] बोट फिरवलं की लक्ष्मीच [तर तुम्ही]!. 

सत्ययुग आला पाहिजे. सत्ययुग आल्याबरोबर, काय कमाल होणार आहे! मी त्या युगाची वाट पहात आहे. पण अगोदर तो हिंदुस्थानात येईल, की अमेरिकेत येईल याबद्दल जरा थोडासा मला प्रश्न वाटतो! हिंदुस्थानातली माणसं अजून पुष्कळ चक्रातन निघायची आहेत असं वाटतं मला, पुष्कळदा! विशेषतः, आमच्या मुंबईची! बघूया, धुळ्याला कसं काय जमतं ते! जमण्यावर आहे. त्याची कृपा आणि त्याचं प्रेम, सतत वहात आहे. 

आम्ही मुंबईला ध्यानाचे प्रयोग करतो. आपली जर इच्छा असली तर ध्यानात जायचं. ध्यानामध्ये फक्त आपल्यला डोळे मिटून बसायचं आहे, काहीही करायचं नाही. करायला निघाले म्हणजे देवापासून आपण दूर जाणार, हे समजून घ्यायचं! काहीही करायचं नाही. आरामात बसायचं, जेवायला बसतो तसं, सहज वृत्तीने बसायचं. जी शक्ती माझ्यातून धावते आहे ती तुमच्यात धावत जाईल; जर तुम्ही आजारी असाल तर तुम्ही बरे व्हाल, जर तुम्हाला काही त्रास असेल तर ती आम्हाला कळवेल आणि, जर तुमची शरीर प्रकृती ठीक असली आणि तुम्ही एखाद्या गोष्टीला काही चिकटून बसलेला नसाल, तर सहजच तुम्ही निर्विचार व्हाल. विचारांच्या पलीकडे जाल. खरोखर म्हणजे विचारांच्या पलीकडे जाणं अत्यंत कठीण गोष्ट आहे! असं लोक म्हणतात. मला तसं वाटत नाही. आता, इथून जो मनुष्य बडोद्याला जायचा असला तर अमेरिकेला जाऊन, जपानला जाऊन मग बडोद्याला पोहोचला असेल, तो असंच म्हणणार. पण आम्हाला रस्ता माहीत असल्यामुळे, अत्यंत सोपं आहे. […][…][…][…], अगदी सहज मार्गाने, अगदी सहज होण्यासारखं आहे ते! अत्यंत सहज आहे. अत्यंत सहज भावाने तुम्ही बसा, हळूच तुम्हाला असं वाटेल, की आपण निर्विचार झालो. निर्विचार झाल्याबरोबर, आपण हात वर करायचा. आमची मंडळी जाऊन बघतील, की झालं आहे की नाही? जर ठीक झालं असलं (निर्विचार झाला असलात) तर आपल्या कानात सांगतील. 

आज इथे पुष्कळशी मंडळी अशी आली आहेत की ज्यांना रोग आहेत, आजार आहेत. त्यांच्या पैकी जर लहान मुले असली, जर फारच लहान असली तर त्यांना बाहेर घेऊन जा. कारण ती रडतील वगैरे… आणि दुसऱ्यांना त्रास होईल. पंधरा-वीस मिनिटात(minute) काय तो निकाल लागेल, तेव्हा काहीही काळजी करण्यासारखं नाही. कोणालाही आजपर्यंत एवढाही त्रास झालेला नाही, यत्किंचीतसुद्धा! तेव्हा, तो आपल्यालाही होणार नाही. हजारो माणसांच्या कुंडलिनी (जागृत) झाल्या आणि [कितीही] हजारो माणसे अशी पार झालेत, लोकांना आत्मदर्शन झालेले आहे, तेव्हा कोणालाही काहीही होणार नाही. (पहिली अनुभूती ही की तुम्ही निर्विचार व्हाल).

सायन्समध्ये(Science) ज्यांची नुसती चर्चा केलेली आहे, त्याच्याबद्दल सगळं तुम्ही एकदम जाणू शकता. तसं ते अगदी सोपे आहे. परवा मी सांगितलं होतं, की या खोलीमध्ये जर अंधार असला आणि तुमचे डोळे बंद असले आणि तुम्ही बाहेरून एकदम आतमध्ये आलात, तर तुम्हाला काही सुचायचं नाही. हात धरून कोणी तुम्हाला सांगितलं, की इकडे दिवा आहे, इकडे बसा वगैरे…, हळूहळू काही तरी चाचपडत लागेल. तरी सगळी खोली लक्षात येणार नाही. पण समजा, एखादा कर्ता असा असला, सब्जेक्ट(subject) असला, तर तो सबंध खोलीचा जसा लाईट(light) घालू (लावू) शकतो, की तुम्ही सगळेच्या सगळं पाहू शकता. तेव्हा जर समजा असा एखादा कर्ता असला, तर तो तुमचे डोळे खाडकन उघडू शकतो आणि तुम्हाला सगळेच्या सगळं आतमध्ये [दिसू शकते]. अमेरिकेमध्ये लोकांचे डोळे फार उघडलेत, आपल्या मानाने. कारण त्यांना सगळं झालं आता पैसे झाले, घर झालं, द्वार झालं.

हे मनसुद्धा किती मजेदार आहे बघा, तुमचचं वाहन आहे आणि तुमचा गुरुसुद्धा आहे! तुम्ही म्हणाल, की मला आता एक घड्याळ विकत घ्यायचं आहे, तर तुम्हाला वेड्यासारखं धावेल त्या घड्याळासाठी! घड्याळ घेतल्याबरोबर, “काही मजा नाही येत आजूनसुद्धा!” मग पुढे काही तरी दुसरीकडे धावायचं, मग तिसरीकडे धावायचं! सारखी धावपळ आपली चालली असते, आपलं चित्त जिथे जाईल तिथे तो आपल्याबरोबर जातो. पण प्रत्येक वेळेला, आनंद त्याला येत नाही. प्रत्येक वेळेला तो सांगतो की, “मला आनंद आलेला नाही. मला आनंद मिळालेला नाही. मला विराम मिळालेला नाही.” तेव्हा काही तरी दुसरं शोधायचे आहे, अशी कल्पना तुम्हाला असते आणि ते काय शोधायचे आहे…? तर, हे मन तुम्हाला सारखं इकडून तिकडं पळवत असतं. पण त्याला जर तुम्ही दाबून ठेवलेलं असलं, त्याच्यावर अत्याचार केलेले असले, तर हे मन शेवटी मदत करणार नाही. तर, या मनाचे प्रकार तऱ्हेतऱ्हेचे आहेत! ध्यानाला सुद्धा जेव्हा तुम्ही बसलेले असता, तेव्हासुद्धा मी बघते, की हे मन मधेच कुठे तरी उभं राहून तुम्हाला काही तरी सांगतं आणि बघतं. घोडा बघतो की मालिक कुठपर्यंत जाऊ शकतात! जर मालकाने घोड्याला सांगितले, “हे, बघ,” त्याच्याबरोबर मैत्री करून, “हे बघ, मला अमक्या ठिकाणी जायचे आहे”, की लगेच घोडा त्या गोष्टीला तयार होतो की, “बरं चला, तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे जाऊ.” पण घोड्याबरोबर मैत्री केली पाहिजे. हे मनोवैज्ञानिकांचेही म्हणणे आहे की घोड्याबरोबर मैत्री केली पाहिजे. पण कुठे जायचे आहे? कसं जायचं आहे? हे कुणालाही माहिती नाही! कोणालाही हे माहिती नाही की, तिथे जायचं कसं? ते आपोआप होतं, आपोआपच ते जमतं, हे कोणालाही माहिती नाही. 

दुसरी सायन्सची(Science) बाजू पाहायची म्हणजे, शरीरदृष्टया बघा, सायन्समध्ये(Science) डॉक्टर(Doctor) लोक […] […] विचारतील की हे असतं कुठं, कुंडलिनी वगैरे? तर, जेव्हा मूल आईच्या पोटामध्ये दोन महिन्याचं असतं, तेव्हा ही जीवशक्ती, त्या जीवात्म्यामध्ये शिरते (येते). या इथून शिरते. डोक्याच्या टाळूमधनं खाली (आत) शिरून, मेंदूच्या मधोमधून खाली या पृष्ठवंशीरज्जू जो आहे त्याच्यातंन जाऊन – स्पायनल कॉर्ड(spinal cord) ज्याला म्हणतात – आणि खाली हा त्रिकोणाकार जो हिस्सा (अस्थी) आहे, तिथे जाऊन बसते. ही कुंडलिनी शक्ती जेव्हा जाते, तेंव्हा मधे मधे थांबत जाते, त्याच्यामुळे चक्र बनतात. आणि ती चक्र आतमध्ये सेंटर्स(Centers) म्हणून राहतात आणि बाहेर त्यांना डॉक्टर्स(Doctors) लोक प्लेक्सेस(Plexuses) म्हणतात, म्हणजे पॅरासिंपथॅटिक नर्वस सिस्टीम(Parasympathetic nervous system) म्हणतात. या पॅरासिंपथॅटिक नर्वस सिस्टीमलाच हे लोक स्वयं चालीत, ऑटोनॉमस नर्व्हस सिस्टिम(Autonomous nervous system) म्हणतात. त्यांना विचारलं की, ‘हा स्वयं कोण? हा ऑटो(auto) कोण? जो हे हृदय चालवतो, हा कोण?’ तर डॉक्टर त्याचे उत्तर देत नाहीत. 

अमेरिकेला पुष्कळ न्यूरॉलॉजिस्टला(Neurologist) मी भेटले, तर ते मला म्हणाले की, “कॅन्सरला(cancer) आम्ही एवढ्यासाठी ठीक करू शकत नाही, की या पॅरासिंपथॅटिक नर्वस सिस्टीमला चालना कशी द्यायची. हे आम्हाला कसं जमणार? ते आपोआपच चालू असतं.” मी जेव्हा त्यानां दाखवलं – प्रॅक्टिकल(practical) करून – तेव्हा त्यानां फार आश्चर्य वाटलं, की तुम्ही पॅरासिंपथॅटिक नर्वस सिस्टीम कशी चालवता! त्याची ओळख बाहेर एक-दोन प्रकार आहे. त्यापैकी एक, म्हणजे डोळे डायलेट(dilate) होतात, मोठे होतात डोळे. तुमचे सगळे जे लोक रियलाईज्ड(realised) आहेत, त्यांचे तुम्ही डोळे बघा, त्यांची बुबुळे मोठी झालेली आहेत काळी-काळी. आता विचार हा करा, की याच्या पेक्षा मोठा चमत्कार जगामध्ये काय असू शकतो! [हा वरून/हात हलवून] दोनशे-तीनशे रुपये काढणं हा काही चमत्कार नाही, अंगठ्या वगैरे काढणं हा काही चमत्कार नाही. हे भूत प्रकारण आहे! 

एकदा, एक खूप मजेदार गोष्ट झाली. म्हणजे, एका ब्राह्मणांच्याकडे वरात आली. आणि यूपीला आपल्यला माहिती आहे [वरातीच] केवढं प्रस्थ असतं! आल्याबरोबर त्यानीं सांगितलं, तर वरात आली, वरातीत काही लोक खोडकर होते, त्यांनी सांगितलं, हिवाळ्याच्या दिवसामध्ये, “की, आज आम्हाला दहीवडेच पाहिजेत!” आता दहिवडे करणं काही सोपी गोष्ट नाही आणि तिकडे यूपीला ब्राह्मण लोकांमध्ये, हिवाळ्यामध्ये दहिवडे करत नाहीत. तर तिथे एक बाबाजी होते, त्यांना निरोप गेला की ते अशा वस्तू आणून देत असत. त्यांना निरोप गेला की, “तुम्हाला जेवढे रुपये हवे आहेत, तेवढे घ्या पण आम्हला दहिवडे आणून द्या.” तर बाबाजी गडबडले! म्हणे, “हे बघा, मी दहिवडे मागवून देतो, पण मी इथे राहणार नाही. पैसे घेऊन मी आपला चालता होणार.” “बरं,” म्हणे, “तुम्ही पैसे घ्या आणि चालते व्हा.” त्यांनी त्याला पैसे मोजून दिले आणि बाबाजींनी दहिवडे मागवले. खोली बंद केली, आतमध्ये दहिवडे होते. सगळ्यांनी दहिवडे चांगले खाल्ले आणि बाबाजी पसार! पैसे घेऊन सगळे पसार! दुसऱ्या दिवशी सकाळी मांगवाड्यातले काही मांग आले – आपल्याकडे वाजंत्री वगैरे… वाजवतात, तसे तिकडेही असतात – आणि आले, की मग उष्टे वगैरे काढतात. तर ते म्हणाले, “आमच्या तिथले हे कुल्लड़ कोण घेऊन आला? आमच्या तिकडे दहिवडे केले होते, हे कोणी आणून ठेवले इकडे?” सगळे ब्राह्मण चिडले. सगळी वरात रुसली. की आम्हाला तुम्ही [मांगवाड्यातले दहिवडे] का खाऊ घातले? आता, हे कार्य करणं […] […]. म्हणजे, जी भुते असतात ती सूक्ष्म (असली कार्ये करतात) असतात, ती आपली सूक्ष्मता कोणत्याही जड पदार्थावर घालून त्याला सूक्ष्म करतात आणि [समोर] आणून ठेवतात आणि तुम्हाला ते दिसत नाही, जो पर्यंत मेस्मरिज्म(mesmerism) [आहे तोपर्यंत]. ही भूतविद्या! पण […] ते काय करतात […] ते काय स्वस्थ बसणार आहेत? आज तुम्हाला खाऊ घालून, [उद्या त्याच्यावरही बसतात ते!]. अहो, आपणच आहोत, आता बघा, आपण कोणाला दोन पैसे दिले तर जन्मभर लक्षात ठेवतो, “अहो, त्या दिवशी ते आले होते, तेव्हा मी त्यांना दोन पैसे दिले आणि त्यांना जरासुद्धा माझा उपकार नाही.” तर ती काय भुतं विसरणार आहेत का त्यांचा उपकार! त्यांनी जर तुमच्यावर जराही उपकार केला असेल, समजा एखाद्या माणसाला बरं [करायचं असेल]….

इंग्लंडला तर असं आहे, एक मनुष्य होता डॉक्टर लँग(Dr. Lang) म्हणून, तो मेला. आणि त्याचं भूत, एका सोल्जरवर(soldier सैनिकावर) जाऊन बसलं. आणि त्या सोल्जरला त्यांनी सांगितलं की तू माझ्या मुलाकडे जा. तो इथे राहतो, तिथे राहतो आणि त्याला जाऊन सांग की “मी त्याचा बाप आहे म्हणून.” तो सोल्जर तिथे गेला तर त्या मुलाला मोठं आश्चर्य वाटलं! तो मुलगा म्हणाला, “बरं, तुम्ही मला दोन-चार खुणा सांगा.” त्यांनी बरोबर खुणा सांगितल्या, “अशा खुणा आहेत, तशा खुणा आहेत, हे आहे, ते आहे, सगळं!” त्या मुलाला अगदी ओळख पटली, त्याने सांगितलं (विचारलं), “बरं, मग आता काय करायचं?” ते (भूत) म्हणाले, “तू माझं क्लिनिक(Clinic) उघड आणि सगळ्यांना सांग, की आम्ही ज्याला काही आजार असेल त्यांनी जरी पत्र लिहिलं, तरी आम्ही तिथे येऊन शस्त्रक्रिया करून देऊ. आम्ही तुम्हाला बरं करू.” आणि सुरु झालं हे [क्लिनिक/भूत] प्रकरण. त्या डॉक्टरचे पुष्कळसे मित्र, पुष्कळसे डॉक्टरसुद्धा भूते होती आणि ते सगळे मिळून कार्य करू लागले. पण एक काम केल्यावर त्याचा उपकार ते आपल्यावर लावणारच. म्हणजे त्यांची भूते आणखी दहा तुमच्या घरात आली! मग तुम्ही माताजींच्याकडे, “माताजी, हा काय [गुन्हा/त्रास] आहे.” असल्या तऱ्हेतऱ्हेची भूतं, आजकाल पसरविणारे मोठं मोठे एजंट्स(Agents) आलेले आहेत. काही लोक तर नुसत्या भाषणाने तुमच्यावर भूतं घालू शकतात. भाषण दिलं की लोक [झुमायला/घुमायला] लागतात, [झुमून/घुमून] नाचायला लागतात. त्यांची स्तुती करू लागतात. आणि त्यांना असे लोक पाहिजेत, पैसे कमवायला! सत्ता कमवायला! 

तेव्हा, शास्त्रीय दृष्ट्यासुद्धा, शारीरिक दृष्ट्यासुद्धा जेवढे आपल्यामध्ये प्लेक्सस(Plexuses) आहेत बरोबर तेवढीच आपल्यामध्ये चक्रे आहेत. आता, हे ऋषीमुनींनी पुष्कळ वर्षापूर्वी लिहिलेली चक्रे आणि त्याच्यातलं बघा, अगदी एकसारखं आहे! आता मूलाधार चक्र बघा. मूलाधार चक्राला इंग्लिशमध्ये(english) पेल्विक प्लेक्सस(plevic plexus) म्हणतात, इथे कोणी डॉकटर्स असतील तर त्यांना कळेल मी काय म्हणते आहे ते. पेल्विक प्लेक्ससला, चार सबप्लेक्सस(sub-plexuses) असतात. मूलाधार चक्राला बरोबर चारच, चतुर्दलम्, चारच त्याला […] आणि त्या कमळाच्या चारच पाकळ्या असतात. पेल्विक प्लेक्सस(plevic plexus) जेव्हा मनुष्य अगदी साधारण स्थितीत असतो, तेव्हा नुसत्या त्याच्या धारा दिसतात. पण जो मनुष्य पूर्णपणे प्रकाशित झालेला असतो, त्याचे पेल्विक प्लेक्सस(plevic plexus) अगदी बरोबर कमळाच्या चार पाकळ्यांसारखे आणि मधे असा गोल दिसतो. आणि त्या गोलात तुम्ही बघायला गेलात – म्हणजे तुम्हाला दिसणार नाही सध्या पण एक सांगते आमच्यासारख्यांची गोष्ट – आतमध्ये [त्याच्यावरती] दृष्टी आपण ठेवली, तर त्या गोलाकारामध्ये एक असा बिंदू फिरतो आणि त्या बिंदूमध्ये दिसतं काय, तुम्हाला आश्चर्य वाटेल, गणेश! श्री गणेश, हा काही आम्ही केलेला देव नाही. आम्ही काहीही केलेलं नाही, सगळं आतूनच आलेलं आहे. श्री गणेश इथे दिसतो, स्पष्ट. तर श्री गणेश दिसायच्या आधी त्याची सोंड दिसते आणि पुष्कळशा द्रष्ट्यांनी त्यालाच कुंडलिनी समजलेलं, म्हणजे केवढी मोठी चूक झाली! म्हणून सेक्स(sex), जे पेल्विक प्लेक्ससचे एक अंग आहे, तिथे कुंडलिनी बसलेली आहे असा उलटा हा (प्रचार) करून, सबंधच घोटाळा करून ठेवलेला आहे. आणि तो घोटाळा इतका मोठा झाला आहे, की स्वतः तुमची आई (कुंडलिनी), […] […] जिचा सेक्ससी(sex) काहीही संबंध नाही अशी बसलेली आहे, तिच्यावर सेक्सचा(sex) आरोप केल्याबरोबर ती चिघळते! आणि ती चिघळून जेंव्हा तुमच्यावरती त्याचे मोठं-मोठाले आगीचे [बंब] फुटल्यासारखे फोड येतात, तेव्हा तुम्ही पुस्तकं लिहिता की कुंडलिनीला हात लावू नका, ती तुमच्यावर चिघळते, ती चिघळणारच! कारण, ती तुमची साक्षात आई आणि तिच्यावर तुम्ही हा काय घाणेरडा आरोप करता! 

बरं आता तिथे हे […] श्री गणेशाचं [कार्य] किती सुंदर आहे बघा. गणेश! श्रीगणेश, हा अगदी चिरबालक आहे, इटर्नल चाईल्ड(Eternal Child), चिरबालक आहे. तर, काय आपल्याला आपलं अचेतन मन सांगतं किंवा प्रभू जो आपल्या आतमध्ये बसलेला आहे, तो काय सांगतो? की जेव्हा तुम्ही स्वतःच्या अध्यात्मिकात उतराल, अध्यात्मामध्ये सेक्सच्या(sex) बाबतीत तुमची भावना अगदी लहान मुलासारखी [हवी]. आपल्या आईकडे दृष्टी लहान मुलाची असेल, जेव्हा तुम्ही लहान मुलासारखे व्हाल, तेव्हाच तुमची आई तुम्हाला भेटेल, नाही तर भेटणार नाही! ज्या माणसांना अशी घमेंड असते, “आम्ही म्हणजे काय विद्वान! आम्ही हे पुस्तक वाचलंय, ते पुस्तक वाचलंय…,” कधीही त्यांचे रिअलायझेशन(Realisation) व्हायचे नाही! आईचं, असं आहे, रामदास स्वामींनी म्हटले म्हंटलं आहे की, “आई […] […]” जरासे मोठे झाले म्हणजे बघू काय करता ते! पण जेव्हा लहानसं बाळ असतं तेव्हा त्याला कसं वेळेवर आई दूध देते आणि त्यांचे संगोपन करते. तुम्ही जर लहान बाळासारखे झालात – की जे काही वाचलं आहे ते बेकार आहे, जे काही आम्ही जाणलं आहे ते बेकार आहे आम्ही लहान मुलं आहोत – ते आई समजते, खट्कन तुमचे रिअलायझेशन(Realisation) [होतं/होईल]. पुष्कळांचं होत नाही, म्हणजे लोक म्हणतात, “माताजी, असं कसं, तुमची इच्छा झाली म्हणजे झालंच पाहिजे!” आम्हाला इच्छाच होत नाही कसली! ही आश्चर्याची गोष्ट आहे. आम्हाला तुम्हाला रिअलायज्ड(Realised) करायची इच्छा नाही, ते करायची इच्छा नाही, म्हणजे कसलीच इच्छा आम्हाला नाहीच आहे, निरीच्छ! पण त्याला करायचं आहे म्हणून “तो” मधून येऊन करतोय माझ्याकडनं, दिसायला मी समोर आहे तुमच्या. आतून त्याचे काम चालू आहे. तो (पार) करत नाही तुम्हाला, त्याला कारण काय ते मी सांगू शकते. आणि त्याला कारण हे, की तुमच्यामध्ये जी बाल्य स्थिती आलेली आहे, स्वतःला काही तरी शिष्ट समजून, मोठं समजून बसायचं असेल तर बघा, रिअलायझेशन(Realisation) व्हायचं नाही! तुम्ही असाल मोठे शेठ कुठले? देवाच्या समोर तुम्ही कोण? त्याला भिकारीही चालत नाही आणि शेठ ही चालत नाही. त्याला एक लहान मुलगा जो भिकारी नाही, चालतो. एखाद्या लहान मुलाला तुम्ही विचारा बरं, अगदी सरळ गोष्ट आहे. 

आमच्या शेजारी एक मुलगा होता. तो फार लवकर बोलू लागला. लोकांनी सांगितलं की लहान मुलाला [साक्षात] असतो देवाचा! तर मी त्याला विचारलं, “मुन्ना, तुम कौन हो? तुम हिंदुस्तानी हो?” 

म्हणे, “नहीं।” 

“तुम जपानी हो?” 

“नहीं।” 

“तुम क्या हिंदू हो?”

“नहीं।” 

“मुसलमान हो?” 

“नहीं।” अगदी [घाबरून], 

तर म्हंटलं, “हो कौन तुम, बताव?” 

(तो म्हणाला), “माँ, तुम भूल गयी। मैं तुम्हारा मुन्ना हूँ।” 

किती सत्य आहे! एकच सत्य आहे की, “माँ तुम्हारा बच्चा हूँ।” याच्यापेक्षा आणखीन दुसरं सत्य नाही, हे सगळे खोटे लावलेले लेबल्स(labels) आज हिंदुस्थानात जन्मले म्हणून हिंदुस्थानी झाले, उद्या पाकिस्तानात जन्मले म्हणून पाकिस्तानी झाले. जेव्हा जन्मता तेव्हा काय तुमच्या डोक्यावर लिहून आलेलं आहे? हिंदुस्थान तरी बनवला कोणी? माणसांनीच बनवला. त्या देवालासुद्धा आश्चर्य वाटत असेल की, “अरे, बाबा कधी मी हे बनवलं नाही, हे झालं [कुठनं/कसं]!” अहो, त्याला रंग भरायचे [असे] चित्र भरून टाकलं, सर्व सृष्टी त्याने रचली. त्याला आपण एकाला हिंदुस्थान केला, एकाला अमेरिका केला, एकाला हे केलं, ते केलं…, काय फायदा आहे? त्याच्यावरनं भांडणं आणि वाद-विवाद; आम्ही ब्राह्मण, आम्ही हिंदू, आम्ही मुसलमान, आम्ही अमुक, तमुक…, तुम्ही कोण? कोणीही नाही, तुम्ही. तुम्ही […] आहात, [मुलं आहात] सगळे एक इथून तिथपर्यंत. आता आपल्याकडे बायकांचं सुद्धा असतं जरा थोडं बहुत, हे पुरुष व आम्ही बायका, “आम्हाला शिवायचं नाही, अमुक नाही, तमुक नाही,” हा एक वेडेपणाच दुसरा!

एकदा, मीरा, वृंदावनला गेली होती. तिथे, तुलसीदासजी मोठे ब्रह्मचारी बनून – काही ते रिअलाइज्ड(Realised) नव्हते म्हणा असते तर असं नसते म्हणाले – आले आणि मीराबाईने निरोप पाठविला की, “मला तुम्हाला भेटायच आहे.” त्यांनी सांगितलं, “मी बालब्रह्मचारी आहे,” – म्हणजे खोटं आहे […] ते, बालब्रह्मचारी नव्हते, त्यांच्या बायकोनी त्याला काढलं [त्याबद्दल] ब्रह्मचारी झाले – “आणि, म्हणून मी बायकांचे तोंड बघत नाही.” म्हणजे घाबरतात वाटतं बायकांना! तर, मीराबाईंनी उत्तर म्हणून पाठवलं त्यांना, “या वृंदावनात माझ्या कृष्णाशिवाय सुद्धा कोणी पुरुष राहत असेल, असं मला वाटलं नाही. माझी सगळी मुलंच राहतात इथे.” तेव्हा लाज वाटली त्या माणसाला आणि मग सांगितलं, “आई मला क्षमा कर.” हा आपल्या दृष्टीतला फरक आहे. हा सगळा आपल्या दृष्टीतला फरक आहे. ज्या बाईला सर्व संसार आपला मुलगा झाला त्याला [काय लहान] आहे मुलगा. माझी मुले आहेत. सगळ्यात मोठा मुलगा ९२ वर्षाचा होता. होता, म्हणजे आता परवाच गेले ते. [ही सगळी] मुलं, त्यांना पुनर्जन्म दिला की झालं. तेव्हा आपल्या वृत्तीत जर काही पाप नसलं, तर सगळी आपली मुलं आहेत, हे [वृत्तीतलं] आहे. 

पण स्त्रीला, स्त्री असायला पाहिजे; पुरुषाला, पुरुष असायला पाहिजे. असं नाही की स्त्रीयांनी पुरुष व्हायचं आणि पुरुषांनी बायका व्हायचं! हा प्रकार चालायचा नाही आमच्या सहजयोगाला, असली जी मंडळी असतात पुरुष, बाईसारखे आणि बाई, पुरुषासारखं असं चालायचं नाही. सहजयोगाला पुरुषांनी, पुरुषच असलं पाहिजे, दणकट आणि बाईने सौम्यच असलं पाहिजे, बाई सारखे. […] अमेरिकेत बायका मला म्हणाल्या, “वा! वा! वा! तुम्ही म्हणजे पुरुषांचेच आमच्यावर राज्य लादता!” “अरे,” म्हटलं, “काय राज्य करतील ते! आम्ही राण्या आहोत खरं म्हणजे!” कशा? ही [पत्नी] आहे घरात, सगळ्यांचा बोजा उचलते. कशी उचलते? [काय?]. […] […] ज्या बाईमध्ये शक्ती [आहे तीच उचलू शकते] बोजा. शांत असली तर काय झालं, शक्तिशालीनी तीच आहे. 

सीतेचं उदाहरण घ्या. रामाने, सीतेला सांगितलं की, “तू वनात जा.” आता मॉडर्न(modern) असती सीता, तिने फिर्याद ठोकली असती, [चार/दहा] लोकांच्यासमोर लग्न करून मला घेऊन आला आणि आता मला वनात जा म्हणतोस. हा अन्याय आहे आणि मला आता मुलं होणार आहे, म्हणून डबल फिर्याद ठोकली असती. आणि दोन मुलं झाली असती तर आणखी [दोन-चार फिर्यादी ठोकल्या असत्या]. ही मॉडर्न(modern) लोकांची कामं! पण सीतेच कार्य बघा, (ती) चुपचाप (वनात) निघून गेली. […] काढलंच तर काढलं, काय हरकत नाही. सबंध कलंक [सोसून] राहिली ती. काही हरकत नाही, कितीही अपमान झाला तरी काही हरकत नाही, मान्य आहे मला. मुले झाली, त्यांचे संगोपन केलं. नवऱ्याचा राग तिने मुलांवर काढला नाही. आपल्याकडे बायका नवऱ्याचा राग मुलांवर काढतात. या काय बायका झाल्या! ते पुरुष. याचा राग त्याच्यावर काढणे ही पुरुषांची रीत, बायकांची नाही. बायका म्हणजे राग गिळून आनंद देणाऱ्या, त्या बायका! त्या नारी! त्यालाच म्हणायचे, “यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता:।” ज्या पूजनीय स्त्रीया आहेत त्या सगळे [जीवनातल्यामध्ये] आणि आनंदाचा जो वर्षाव करतात, त्या बायका! पुरुषांशी [कॉम्पिटिशन(compitition)] करायला नको. आणि पुरुषांनी त्या धोब्यासारखे वागायला नको, ज्याने सीतेला काढलं होतं. सीता आपली निघून गेली, वनात राहिली. तिची शोभा जशीच्या तशी! [तिला कोण हात लावील]? तिच्या पावित्र्याला [कोण हात लावील]? एवढा मोठा रावण पण तो धजला नाही तिच्या समोर! पण ती वनात राहिली. इतके दिवस आपल्याला कदाचित माहिती नसेल, कि सीता, परत जेव्हा मिळाली, तेव्हा रामाने तिला हाक मारली, बोलावलं, त्या वेळेला तिने सांगितलं, “झालं, तुझा त्याग तो आणि माझा त्याग बघ!” आणि तिने त्याग केला. निघून गेली. ती पृथ्वीत सामावली, काहीही बोलली नाही. रामावर एकसुद्धा कोणी कलंक लावला नाही, काय झालं नाही! सामावून गेली ती आपली पृथ्वीमध्ये. शेवटी, रामाने आत्महत्या केली असं म्हणतात, शरयू नदीवर सीता, सीता… म्हणून. ही पुरुषांची रीत झाली. पुरुषांनी, पुरुष रहायला पाहिजे. बायकांनी, बायका रहायला पाहिजे. त्याच्यात सगळं सौंदर्य आहे. बायका […] कशा सुंदर दिसतात? थोडा उशीर होईल त्यांना, लगबग होणार, एवढं व्यवस्थित नाही चालायचं! एवढं [बुद्धीवरनं इतकं] चालायचं नाही, त्यांचं […] असतं, म्हणजे [तोघनात्मक] वागणं असतं. समजा एखाद्या माणसाविषयी त्यांना वाईट वाटलं, की तो वाईट आहे म्हणजे तो वाईटच आहे. पुरुषांना समजत नाही, “पण कसं म्हणतेस तू?” “पण ते आतून वाटलं, तो वाईट आहे म्हणजे वाईट आहे.” ते बरोबर आहे त्यांचं आणि पुरुषांच आपलं बरोबर आहे. 

आपल्या इथे बायकांची काही काही उदाहरणे आहेत. नूरजहानच उदाहरण घ्या. काय बाई होती ती! नूरजहानचं प्रेम बसलं होतं सलीमवर, त्याच्याशी लग्न करायचं असं तिचं ठरलेलं होतं. पण राजाने म्हणजे त्याच्या बापाने – अकबराने – तिचं लग्न एका दुसऱ्या माणसाशी लावून दिलं. तर ती निघून गेली, कलकत्त्याच्या जवळ बंगालमध्ये, तिथे जाऊन ती राहिला. मग तिने त्याची पूर्ण सेवा केली. पूर्ण पातिव्रत्यानी राहीली तिथे. पण हा सलीम जेव्हा राजा झाला, [जहांगीर], तेव्हा त्याच्या राज्यकारकीर्दीत तिचा नवरा मारला गेला. तिला असं वाटलं की ह्यानी मारलं! आता ते खरं की खोटं देवालाच ठाऊक! पण हिची वर्तणूक बघा! आता ती मुसलमानच होती ना! पण बघा तिची वर्तणूक, काही सीतेपेक्षा कमी नाही! तर हा गेला तिच्याकडे आणि तिच्या पायावर पडला; पण ती म्हणाली, “मी येणार नाही.” मग तिला अटक करून घेऊन आला, तेव्हा ती म्हणाली, “खबरदार! माझ्या अंगाला हात लावलास तर, दूरचं राहा.” त्याची हिम्मत झाली नाही. मग त्याने जाऊन तिला अटक केली आणि ती जाऊन एकीकडे एका लहानशा घरात राहत असे. मग हा आजरी पडला तिच्या विरहामध्ये. तेव्हा त्याच्या आईला फार दया आली आणि ती गेली आणि तिला सांगितलं, “बाई, तुझी मी सेवा करते.” तिला माहिती नव्हतं, ही त्याची आई आहे म्हणून. तिने तिची फार सेवा केली. तर ती म्हणाली, “[…] तुला काय हवे असेल ते माग. आज माझी तब्येत [खुश] आहे. काय मागशील ते देईन.” ती म्हणाली, “काय मागशील ते देशील?” तर म्हणे, “हो, माझ्या हातात असेल तर देईन!” ती म्हणाली, “माझं मागणं एवढच आहे, की माझ्या या मुलाशी तू लग्न कर.” ती म्हणाली, “हो, करते.” एवढा मोठा शहेनशहा, त्याच्याशी लग्न करायला तयार नाही! पण हिच्या मुलाशी लग्न करायला तयार, ह्या गरीब बाईच्या, ही गरीब बाई बनून गेली होती ना तिथे, लग्नला तयार झाली. लगेच तिला मग नंतर कळलं, की हा तो शहेनशहाच आहे, त्याच्याशी लग्न मग केलं. काय हे बघा! काय हे बायकांचं, एक एका देशामधलं काय! अनुकरणीय काय म्हणा किंवा काय अद्वितीय सगळं काही या बायकांचं! या बायकांच्या दमावर सारी सृष्टी थांबलेली आहे. काय पुरुष कुणावर जुलूम करू शकतात? कितीही करू देत, या बाईंच्या हिम्मतीपुढे त्यांना काय […] आणि तरी प्रेमाचाच वर्षाव करीत राहील, तीच खरी बाई! तेव्हा, धर्मामध्ये अशी माणसे, जी की पूर्णपणे बाईच्या स्वरूपाला जी बाई आलेली आहे, आणि पूर्णपणे पुरुषाच्या स्वरूपाला जो पूर्ण पुरुष आलेला आहे, असे लोक आमच्या धर्मामध्ये येऊ शकतात. पण जे अर्धवट लोक असतात, ते [नाचता येत…] – आजकाल तुम्ही ऐकलं असेल [नागवे] होऊन नाचतात वगैरे… – […] […] ह्या अर्धवट लोकांची ओळख अशी आहे, लगेच [नागडे] होतात! 

तेव्हा, धर्मामध्ये, मनुष्याला कसं असलं पाहिजे… आणि शास्त्रीय दृष्टयासुद्धा, जे मी सांगते आहे ते सबंध आपल्या शरीरात आहे. सबंध प्लेक्सेस (plexuses) आपल्या शरीरामध्ये आहेत. तेव्हा [त्याबद्दल] बुद्धिनेसुद्धा त्याला तुम्ही तशी मान्यता दिलीच आहे. आता मी प्रयत्न करतेय, तुम्हाला समजविण्याचा. तुम्हाला कितीही सांगितलं की मधाची चव अशी आहे, मध असा मिळतो, कुठनं आणला जातो, असं होतं, त्याच्यामध्ये हे असतं ते असतं आणि त्यांनी असा शरीराला फायदा होतो. कितीही तुम्हाला [सांगितलं], तरीसुद्धा जो पर्यंत तुम्ही त्याचा [अनुभव] घेणार नाही, त्याचा स्वतःवर परिणाम पाहणार नाही, तोपर्यंत माझं भाषण व्यर्थ आहे! पुराव्याला म्हणून मी सांगू शकते, की सायन्समध्ये(science) ज्याला आपण पॅरासिंपथॅटिक नर्व्हस सिस्टीम(Parasympathetic nervous system) म्हणतो, [मी/ही] जी कुंडलिनी म्हणते आहे, तीलाच मी जागृत करते, ती [मी] कंट्रोल(control) करते आहे. धर्म दृष्टीने […] […], तर सबंध कुंडलिनीचे वर्णन, तिचं उठणं, उत्थापन वगैरे, वगैरे… आणि त्यापासून मिळणारे वेगळे, वेगळे आनंद आणि त्यापासून दिसणाऱ्या वेगळ्या, वेगळ्या आकृती आणि त्यातनं आपल्याला होणारे फायदे. […] काय आपल्यामध्ये होऊन जातं, आपल्यात काय काय फरक होतो वगैरे, वगैरे… सर्व [गोष्टींचे] विवेचनात्मक, मी एक पुस्तकच लिहिणार आहे. पण एवढं सबंध पुस्तक वाचूनसुद्धा, “तो” मिळाल्याशिवाय [त्या पुस्तकातूनसुद्धा] मजा येणार नाही. म्हणून ते आधी मिळवून घ्यायचं. ज्यांना मिळतं आहे त्यांनी […] ते आणखीन मिळवून घ्यायचं, ते वाटल्याशिवाय मिळणार नाही. पुष्कळशा श्रीमंत लोकांच्या घरामध्ये [अशी स्थिती असते], की कोणी तरी मेलं आहे की काय! इतके श्रीमंत घरात, […] पैसा सगळं सबंध घरातच असतं; पण बापरे, बाप! असं वाटतं की आपण स्मशानात आलो की काय! […] वाटता यायला पाहिजे. अरे, जे प्रेम आहे [ते वाटा,] पैसे वाटू नका, पैसे काय वाटता! प्रेम वाटा. 

आपल्याकडे लक्ष्मीचे रूप बघा किती [सुंदर] […] आहे. लक्ष्मीला, सबंध शरीराला स्त्रीचे रूप दिलेले आहे, म्हणजे काय, ती माँ (आई) स्वरूप असायला पाहिजे. ज्या माणसामध्ये लक्ष्मी आहे, त्याला माँ (आई) स्वरूप असलं पाहिजे. आई तुमचे किती अपराध पोटात घेते आपल्या! लक्ष्मीस्वरूप मनुष्य जर आपल्या नोकराला झोडपतो, तर तो लक्ष्मी (पती) नाही, तो पैसेवाला! मग तिच्या हातामध्ये दोन कमळे आहेत. कमळांचा अर्थ काय आहे? तर [ती] शोभा असायला पाहिजे, कमळासारखी [त्याच्या हसण्यात], त्याच्या चेहऱ्यावर, त्याच्या वागण्यात, बोलण्यात, प्रत्येक गोष्टीमधे, ती शोभनीय असायला पाहिजे. तोंडातनं भराभर शिव्या निघत आहेत आणि म्हणे लक्ष्मीपती! कसले लक्ष्मीपती हे! लक्ष्मीपतीने [कमळासारखं] असायला पाहिजे. आणि कमळासारखं घर किंवा त्याची रहाणी अत्यंत सुंदर आणि त्याच्यामध्ये आरामशीर, जसा आतमध्ये जाऊन भुंगा जसा आरामात झोपतो, तसा कोणीही [त्याच्या] दारात आला तर त्याला आराम मिळाला पाहिजे. नाही, तर घरातल्या चार कुत्र्यांबरोबर लक्ष्मीपती भुंकायला लागल्याबरोबर […] […] […] दिसणार नाही. […] […] […]. 

लक्ष्मीपतीची ओळख पुष्कळ आणखी दिलेली आहे, ती म्हणजे एक हात असा आणि दुसरा हात असा त्या लक्ष्मीचा असतो. या हाताचा अर्थ असतो की तुम्हाला आश्रय आहे. कोणीही गेला तुमच्या आश्रयाला आणि त्याला जर तुम्ही आश्रय देऊ शकत नाही, तर तुम्ही कसले लक्ष्मीपती उगीचच? स्वतःच्या मुला-बाळांना पैसे देऊन-घेऊन गब्बर करण्यामध्ये काही लक्ष्मीपती नाही होत! जनावरात सुद्धा ती स्थिती संपते, थोड्या दिवसांनी. पण आपल्या मनुष्यामध्ये जनावरांपेक्षा बत्तर (खालची) स्थिती आहे. अगदी म्हातारे होईपर्यंत, त्या मुलासाठी पैसे कंजुषासारखे जोडत बसायचे आणि मुलगा मग मोठा झाला, की त्याने ते म्हाताऱ्याचे पैसे सगळे उधळायचे. पण [काही] म्हटलं, “अरे, एखाद्या गरीबाला दोन पैसे देऊन टाक रे!” बापरे! “ऐसे मांगनेवाले तो रोजही आते हैं (असे मागणारे रोजच येतात)!” आपला मुलगा, आपली मुलगी, इथे सुद्धा तुम्ही बघा ध्यानात, आपली मुले घेऊन पहिल्यांदा येतील पुढे-पुढे, “घ्या-घ्या, घ्या-घ्या.” अहो, सगळी मुलेच आहेत तुमची. आपला मुलगा ठिक झाला पाहिजे, आपल्या मुलीला बरं वाटलं पाहिजे. आपण, आपण, आपली, आपली…., अहो, शेवटी तीच मुले तुम्हाला त्रास देतात! देणारच…, कारण या प्रेमाला काही अर्थ नाही. हे सीमित प्रेम जे आहे, हे प्रेमाचा मृत्यू आहे! एखाद्या झाडामध्ये जाणारी त्याची शक्ती, [त्याच्यावर] पाणी जाऊन जर एखाद्या फुलामध्ये अडकून बसलं तर सबंध झाड मरून जाईल आणि ते फुलही मरून जायचं! अशा प्रेमाचा काय फायदा होणार आहे? अशा लक्ष्मीपतीच्या हातामध्ये हे जर नाही, हा बाण (प्रेम) आहे, हे जर नाही तर तो सुद्धा लक्ष्मीपती नाही. अशा रीतीने पूर्वी काळी […] […] […].  लक्ष्मीपतीची बायको स्वतः [नटून] अगदी बसलेली असते आणि तिची शेजारीन एक बाई, जिच्या अंगावर चिरगुट कापड ही नसेल, तिच्या [अंगाला/मनाला] खंत [असणार नाही]. […] […] [दुसऱ्याचे हालअपेष्टा बघून जे] हृदय तिचं पाझरलं नाही, ते हृदय आहे की दगड आहे!

हे सगळं कार्य मी आपल्या हृदयाच्या दमावर करते, हे आपल्यला माहीती नाही. नुसते हृदयाच्या दमावर करते, हृदय चक्राच्या खेळाचा सबंध खेळ आहे. तुम्ही पाहिले आहे, हातावरती कशी कुंडलिनी फिरते माझ्या! सगळा प्रेमाचा चक्कर आहे. सर्व सृष्टी परमात्म्याने नुसत्या प्रेमामध्ये केलेली आहे, त्याला आपण क्रिएटिव्ह पावर(creative power) म्हणतो, ती सबंध त्याची प्रेम शक्ती आहे. नुसते प्रेम, प्रेम, प्रेम! तीनदा लिहून घ्या त्याच्यावर. आणि ज्या माणसाला प्रेम करता येत नाही, दगड माणसांना इथे काही कार्य नाही. ज्या माणसामध्ये प्रेम नाही आहे, हृदय उघडून जो सगळ्यानां आपल्या हृदयाशी घेऊ शकत नाही, अशा माणसाला हे (हा) धर्म मिळणार नाही. काही, इथे काही [काठ्या] आणि धमक्यांनीं देव मिळवणार आहात? किंवा एखाद्या पंडिताला जर तुम्ही शंभर रुपये दिले तर त्याने देव मिळत असेल, तर तो देव इथे मिळणार नाही. देव प्रेमाचा भुकेला आहे! काय, त्या देवालासुद्धा प्रेमाची भूक आहे!. म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे, ही! आणि या प्रेमाच्या सागरात एकदा बुडायला लागलात, तर कोण दुसरा? या हाताने, या हाताची सेवा करावी आणि म्हणावं, “अरे, मी तुझी किती सेवा केली?” तसे तुम्ही सगळे माझ्या अंगातच आहात. तुमच्या आतून एकच जेव्हा शक्ती वाहवू लागते, जशी या शरीरातनं एकच शक्ती वाहते, तेव्हा या बोटाला लागलं, तर हे बोट चटकन त्याला […] येतं. तसचं आता तुम्ही बघता जे लोक पार झालेले आहेत, ते लगेच धावून येतात तुम्हाला बघायला. […] मंडळी, स्वतःचा पैसा खर्च करून ह्या तुमच्या धुळ्याला आलेली आहेत. त्यांना एक तुमच्याकडनं पैसा नको, काही नको. सगळा खर्च करून तुमच्यासाठी इथे आलेली आहेत, कशाला? तुम्हाला त्या भवसागरातून वाचविण्यासाठी! कारण आतलं प्रेम, वाहेचंच आहे! या प्रेमासाठीच, मी, सुद्धा धावत आले आहे तुमच्याजवळ. जर हे प्रेम माझ्यात नसतं, तर माझ्याजवळ एवढी संपदा आहे, बाहेरची सोडा, आतली, मला काही गरज नाही. पण करुणा! करुणेत, करुणा आतून इतकी जास्त [ओढते], की आतला आनंदसुद्धा बेकार वाटतो! […] […] जन्मजन्मांतरीची [जन्मलेली/जमवलेली] आहे! पण या जन्मामध्ये, दिल्याशिवाय मार्ग नाही. रात्रं-दिवस एक करते आहे तुमच्यासाठी. तुम्हीच यात थोडी माझी मदत करायला पाहिजे.