Teen Shaktiya

Mumbai (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Teen Shaktiya

[Marathi Transcript – Soundcloud track: 1975-0121 Seminar Mumbai (Marathi), from 18:13 to 21:00]

ते ही अत्यंत दुःखी लोक आहेत. रडत असतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत. अन्न पचत नाही त्यांना. काय फायदा! जिथे खायला नाही ते रडतात, ज्यांना खायला आहे ते ही रडतात. आत्महत्या करतात. जे आजारी आहे ते रडतात, जे आजारी अस्सल आहे. आम्ही अस्सल द्यायला आलो आहोत. तुम्ही काय नकली गोष्टी मागता आमच्याकडे. तब्येत बरी नाही ते ही रडतात. काय सुरू आहे? सगळा वेडेपणा आहे. मागायचं तर ते मागा जे करून द्या. अमकं ठीक करून द्या. तमकं करून द्या. अरे, होईल ते. त्याचं काय! अस्सल माल घ्या आधी. त्याचे मूल्य नाही. अरे संसारात सगळ्यात महत्त्वपूर्ण तेच आहे. ते मिळाल्याशिवाय आनंदच मिळणार नाही. काहीही बाकी सगळं व्यर्थच ठरतं. आता परिसासारखे जे आहे ते मागा. असे मागणारे असते, तर देणारे आम्ही आहोत इकडे बसलेले, पण आहेत कुठे मागणारे? आईला मागितलं तर विशेषच मागायला पाहिजे. असलं कसलं काय मागायचं! भाडोत्री! सगळी कमाई देऊन टाकू तुम्हाला. मागा तर खरी. सगळी पुण्याई तुमच्यासाठी लावून टाकू पणाला. उभे तर रहा! तुमच्या चरणावर येऊन पडलो तरी तुमच्या लक्षात येणार नाही. ही केवढी तळमळ आतून आहे. समजलं पाहिजे. कळेल का? ध्यानात जायचे आहे प्रेमाने. सगळे प्रेमाचे खेळ आहेत. अगदी शांतपणे डोळे मिटायचे. काही करायचं नाही. स्वत:चं, जे तुमच्यातलं आहे, ते अगदी वर आहे.