Talk, Bholepana ani nirvicharitecha killa Mumbai (India)

[Marathi transcript ver 1] भोळेपणा आणि निर्विचारीतेचा किल्ला मुंबई, २१ जनवरी १९७५ काल भारतीय विद्या भवनमध्ये परमेश्वराच्या तीन शक्तींबद्दल मी सांगितले होते आपल्याला. पुष्कळ लोक असे म्हणाले, की आमच्या डोक्यावरून गेले. तेव्हा हृदयातून जाणारे काही तरी सांगायला पाहिजे. डोक्यातून काही आतमध्ये खरंच घुसत नाही. जे लोक फार मोठे शास्त्रज्ञ, शिकलेले, सुशिक्षित आणखीन आचार्य वगैरे आहेत, त्यांच्यामध्ये सहजयोग घुसत नाही. असे मी पुष्कळ विद्वान पाहिले आणि एक साधारण मनुष्य ज्याला धड कपडा नाही, खायला नाही अशा माणसामध्ये सहजयोग सहजच घुसतो. शिक्षणाने परमेश्वर जाणता येत नाही. असे म्हटल्याबरोबर सगळे शिक्षणाचे अधिकारी मला मारायला उठतील. शिक्षणाने संसारातील सर्व लौकिक गोष्टी जाणता येतील. पण परमेश्वराच्या कार्याला जाणण्यासाठी दुसरे मार्ग पाहिजेत. दूसरे गुण पाहिजेत. पैकी मुख्य गुण म्हणजे भोळेपणा. ज्याला इंग्लिश भाषेमध्ये इनोसन्स म्हणतात. लहान मुलांमध्ये असतो बघा भोळेपणा. काही काही मोठी माणसेपण फार भोळी असतात हो! ठगविली जातात ती. अशा लोकांना लोक त्रासही जास्त देतात. छळतातही फार ! म्हणूनच सगळ्या संत लोकांना फार छळलंय या जगाने आणि आज ही छळताहेत. याचेच रडू येते कधी, कधी. आपण जी मंडळी पार झालात ती सुद्धा संत मंडळी आहात. संतच नव्हे तर देवता स्वरूप आहात. आज देवतांच्या ठिकाणी तुम्ही आलात. हीच देवता हेच ते देव ज्यांचे वर्णन आपण पुराणात वरगैरे वाचले असेल. हे देव जागवले गेलेत आपल्यामध्ये. हे देवपण आलेले आहे आपल्यामध्ये. तेव्हा आ देवपणामध्ये भूते ही पिंगा घालणारच! आणि तुम्हाला त्रास देणार. देऊ देत. कुठवर त्रास देणार? जिथप्यंत त्यांची मर्यादा आहे. त्यांची मर्यादा फक्त तीन आयामात, तीन डायमेंशनमध्ये चालते. म्हणजे जे काही लौकिक आहे तिकडे. फार तर तुमच्या शरीराला अपघात करतील. करू दे. शरीर हे नश्वरच आहे. Read More …