Public Program Rahuri (India)

1976-0314, Public Program,Rahuri  महात्मा फुले विद्यापीठाचे प्राध्यापक साहेब, प्राध्यापक वर्ग तसेच परदेशातून आलेले अनेक सहज योगी आणि सर्वात मान्य म्हणजे उद्याचे नागरिक तुम्ही सर्व विद्यार्थी वर्ग यांना माझा नमस्कार. (टाळ्यांचा आवाज)सगळ्यात आधी क्षमा मागायला पाहिजे कारण दैवी कार्य आणि मनुष्याचं कार्य याचा मेळ कधीकधी बसत नसतो आणि प्रत्येक गोष्टीची बंधनं असतात. तुमचं घड्याळ एका प्रकारे चालतं आणि परमेश्वराचं दुसऱ्या प्रकारे चालत आहे तेव्हा त्याचा मेळ बसला पाहिजे. मी पुष्कळ प्रयत्न करते कधीकधी असा उशीर होऊन जातो. नंतर त्यांची कारणं कळल्यावर आपण मला खरंच क्षमा करा. असो आपल्यापुढे आज (अस्पष्ट) भाषण दिलंय (अस्पष्ट) एक तास, त्यानंतर एक तास चव्हाण साहेब बोलले असं त्यांनी मला सांगितलं. विषय बोलण्याचा नाहीच आहे मुळी किंवा वाद-विवाद करण्याचा सुद्धा नाहीय. तुम्ही एक साधी गोष्ट की आपण अमिबा पासून माणसं झालोत तर आपण कोणता वाद-विवाद केला, कोणती पुस्तकं वाचली, कोणचं शास्त्र त्यात घातलत, कोणचं आपण टेक्निक लावलत. आणि इतकी आपलं टेक्निक शास्त्रीय ज्ञान वाढल्यावर सुद्धा आज सायन्स अगदी पराकोटीला आपण पोहोचलोय म्हणतो तरीसुद्धा विध्वंसक शक्ती मात्र आपल्याजवळ खूप हातात आलेली आहे पण अशी अजून एकही आपण किमया गाठली नाही की ज्यांनी आपण जिवंत कार्य करू शकतो. आता आपण शेतकरी आहात आपण बघता की बी-बियाणं दिसायला जिवंत दिसत नाहीत पण पृथ्वीच्या पोटात घातल्या बरोबर तिला जिवंतपणा येतो आणि जिवंत कार्य घडू लागते, घडतं, ते करू शकत नाही, आपण त्यासाठी जर समजा एखाद्या बी- बियाणा पुढे मी लेक्चर दिलं तर ते येईल का? ते जमेल का? त्याला अंकुर फुटेल? सगळी जेवढी जिवंत कार्य आहेत ती आपोआप त्याला इंग्लिश मध्ये स्पाँट्यानुएस्ली म्हणतात ते. त्याच्यासाठी काही तुम्ही प्रयत्न करतो म्हटलं तर तो नुसता स्वतःचा एक मनाचा विचार किंवा एक मनाचं समाधान Read More …