Nirvicharita Mumbai (India)

Nirvicharita “VIC Date 6th April 1976 : Place Mumbai Seminar & Meeting Type Speech Language Marathi हे सहजयोगाचे कार्य किती विशेष आहे! मी आपल्याला आधी सांगितलं की गणपतीसारखं एक नवीन मॉडेल मी तयार केलं आहे तुमचं. एक नवीन पद्धत आहे ही. ती विशेष रूपाने तुम्ही ग्रहण केली कारण तुम्ही त्या ग्रहणाला योग्य आहात. अयोग्य दान नाही दिलेलं मी. तुमची योग्यता क्षणोक्षणी, पदोपदी मी जाणते. फक्त एवढे म्हणता येईल की आईच्या प्रेमामुळे फारच हळुवारपणे, सांभाळून, प्रेमाने, अत्यंत काळजीपूर्वक हे कार्य झालेले आहे. पण आपल्यामध्ये ती योग्यता नसती, तर हे झालं नसतं. पैकी आज हजारो मंडळी इकडे-तिकडे धावत आहेत. वेड लागलं आहे लोकांना. विचार करीत नाही, की आजपर्यंत शास्त्रांमध्ये जे सांगितलेले आहे, अनादी कालापासून, जे मोठ्या-मोठ्या त्त्ववेत्त्ांनी आणि कृष्णासारख्या महान परमेश्वराने, ते त्याचीच एक साक्ष आहे. त्यांच्या तोंडूनही ज्या गोष्टी निघाल्या, त्या सगळ्यांना एकीकडे फेकून ह्या लोकांनी ज्या नवीन नवीन पद्धतींनी लोकांना आपल्या जाळ्यात फसवलेले आहे त्याबद्दल कोणताही विचार हे लोक का करीत नाहीत ? कोणत्याही शास्त्रात, मग ते मोहम्मद साहेबांनी लिहिलेले असो, किंवा ख्रिस्तांनी सांगितलेले असो, किंवा कृष्णाने गीता म्हटलेली असो, सगळ्यामध्ये जे तत्त्व आहे, की तुम्हाला स्वत:च्या आतमध्ये असलेला स्व जाणला पाहिजे आणि त्याची शक्ती तुम्हाला लाभते. पण असे म्हटल्याबरोबर लोक त्यापासून परावृत्त होतात. कारण सत्याच्या गोष्टी केल्या की लोकांना ते पटतच नाही मुळी. असत्य असलं की ते लगेच पटतं आणि असत्याच्या मार्गावर चालण्याची सवय पडल्यामुळे ते रुचतंही जास्त. असत्याची कास धरून मानवाने शेवटी गाठलंय काय? तर नरकाची पायरी. नरक गतीला उतरायची स्थिती आलेली आहे. हे कलियुगात दिसतंय आपल्याला चहुकडे. बापाला मुलाचा विश्वास नाही, मुलाला आईचा विश्वास नाही. संसारात सगळा Read More …