Sahajayoga Baddal Sarvanna Sangayche Mumbai (India)

Sahajayoga Baddal Sarvanna Sangayche,Bombay (India), 27 May 1976. सहजयोगावर एका सहजयोग्याने म्हंटले आहे की , ‘माताजी, तुम्ही आधी कळस मग पाया देता, आधी तुम्ही आमचा कळस बांधता.’ आणि खरोखर ही गोष्ट खरी आहे. म्हणजे समाधीला आत्तापर्यंत साधारणपणे जे काही लोकांनी केलं, मेहनत केली वगैरे वरगैरे, योग म्हणा, हठयोग म्हणा, काही राजयोग म्हणा, जे काही केलं असेल ते, अर्थात त्याच्यातले काही खरे आणि काही खोटे असे सगळे मिळून त्या लोकांनी जे काही साधलं किंवा केलं, ती पद्धत म्हणजे ज्याला द्राविडी प्राणायाम म्हणतात, त्याच्यापेक्षा जास्त जबरदस्त त्रास आहे आणि ते काढायचं, तर त्याला एक पुराण लागेल सगळें काही सांगायचं म्हटलं. अर्थात् एक पुस्तक पातंजली योगशास्त्र एवढं मोठं आहे. ते एक हं मात्र. बाकी अनेक असतील अशी. आणि पुष्कळ असे शास्त्र वगैरे लिहिले गेले, मनुष्याने अध्यात्म कसा घडवून आणायचा आणि अध्यात्माने वर कसं यायचं आणि उंची कशी गाठायची, वगैरे वरगैरे अनेक पुराणं आपल्याकडे लिहिली गेलेली आहेत. त्यापैकी काही खरी आहेत, काही खोटी आहेत. काही घोटाळे आहेत आणि काही म्हणजे मूर्खपणा पण आहे. त्यात कारण असं, की जे शोधणारे होते, ते मुळात आंधळे होते. पण शोधता शोधता जेव्हा त्यांना सापडलं, तेव्हा डोळस झाले आणि डोळस झाल्यावर आम्ही आंधळेपणातून हे सगळे काही मिळविलेले आहे, तेव्हा तसंच सगळ्यांनी मिळवावं किंवा तसेच मिळेल. अशा पद्धतीने त्यांची मांडणी केली. ते बरोबरच आहे. त्यांच्या दृष्टीने ते बरोबर आहे. आता असं आहे की जो मनुष्य बैलगाडीतून नेहमी प्रवास करतो, त्याला एरोप्लेनच्या प्रवासाची काय कल्पना येणार! कितीही कितीही कल्पना केली तरी त्याला काय कल्पना येणार? तसंच आहे आमच्या या सहजयोगाचं! अध्यात्मामध्ये ज्यांनी नुसतं आपल्या तंगड्या तोडल्या, डोक्यावर उभे राहिले वर्षानुवर्ष. श्वासोच्छवास Read More …