Sahajyog Sagalyana Samgra Karto

Mumbai (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Sahajyog Sagalyana Samgra Karto 29th May 1976 Date : Place Mumbai Seminar & Meeting Type Speech Language Marathi

ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK असल्या विचित्र कल्पना घेऊनसुद्धा पुष्कळ लोक इथे येतात. तेव्हा तुम्ही शहाणपणा धरा. शहाणपणा धरला मी पाहिजे. शहाणपणा हा फार मुश्किलीने येतो. मूर्खपणा फार लवकर येतो. तेव्हा आपल्यामध्ये शहाणपणा धरा. आई आहे. मी तुमचा मूर्खपणा किंवा तुमचा जो वाईटपणा आहे त्याला मी सांगणार. तुम्ही करू नका. ते तुमच्या भल्यासाठी आहे. मी काही गुरुबिरू नाही. मला तुमच्या कडून काही नको. फक्त हे एवढंच. तुमचं भलं आणि कल्याण झाले पाहिजे. तुमच्या हितासाठी जे चांगलं आहे ते मी सांगणार. त्याबद्दल वाईट वाटून घ्यायचं नाही. आता नवीन मंडळी आलेली आहेत, त्यांना मी सांगते. कोणी वाईट वाटून घेतलं, तर ते गेले कामातून. व्हायब्रेशन्स जाणार. मी काढत नाही हं. डॉक्टरसाहेबांची डोकी म्हणजे खोकी करून ठेवलेली आहेत. कोणी ऐकायला तयार नाही हो! मी करू तरी काय? मलाच समजत नाही. घरामध्ये देवाचा फोटो ठेवतील पण मी जर म्हटलं तुम्हाला देवाचा आणि कॅन्सरचा संबंध दाखविते तर तयार नाहीत म्हणजे त्यांच्याशी बोलायचे तरी कसे ? प्रॉब्लेमच आहे ना….. आता जी मंडळी पार नाही झालेली त्यांनी हात असा करा आणि जी मंडळी ध्यानात बसलेली आहेत त्यांनी येतंय थंड? …..तुम्हाला? हातामध्ये थंड वाहतंय…उत्तम….! जरा असे बघायचे. बघुया. तो असतो. तुम्हाला जो आवाज आला किनई असाच आवाज आपल्या ‘ओम’ जो आवाज म्हणतात, कळलं का! म्हणजे ही एनर्जी वाहत आहे नं, आणि जेव्हा ती वाहते आहे पण ती पूर्णपणे चैनलाइज्ड झालेली नाही, त्यावेळेला तसला आवाज येतो. ती चैनलाईज व्हायला सुरुवात झाली म्हणजे असा आवाज येतो म्हणून आपल्यामध्ये ‘ओम’चा आवाज कधी कानामध्ये येणार, कधी डोक्यामध्ये येतो तेव्हा असं समजायचं की एनर्जी पूर्णपणे अॅडजस्ट आणि चैनलाईज्ड नाही म्हणून तसा आवाज येतो. म्हणून तो आवाज जर आला तर असं समजलं पाहिजे की ती एनर्जी अजून बरोबर व्यवस्थित आपली बसलेली नाही. तिला बरोबर फिक्स करावी लागते. आणि त्याला फिक्स करण्याचे प्रकार म्हणजे या स्क्रू चे नाही. पण मनाचे स्क्रू फिरवावे लागतात. तर हे जर मनाचे स्क्रू फिरवता आले तुम्हाला कारण आमचं मशीन वेगळं आहे, पण तरीसुद्धा तुम्ही जर विचार करून आपल्या मनाचे थोडे जर स्तक्रू फिरवायला सुरुवात केली तर हा जो वेस्टेज आहे एनर्जीचा जो आज तुम्हाला कानात, डोक्यात ऐकायला येतो तो जाऊन निव्वळ त्याच्यातून स्वर असा निघेल की तो मौन होऊन जाईल. स्वर मौन होऊन जाईल. आता काही एनर्जीचा स्वर आला नाही की आपण म्हणतो अगदी बेस्ट पोझिशनला आला. त्या एनर्जीला एकदम मौन स्थितीला ती आली म्हणजे समजायचं की आपण त्या स्थितीत आहोत. आपण त्याचा उपयोग करतो. कळलं का आता! ‘ओम’चा जो अर्थ आहे, लोक म्हणतात आतून ओमचा आवाज येतो. सात तऱ्हेचे आवाज येतात. ते म्हणजे बरोबर नाही. आला नाही पाहिजे आवाज. याच्यातून पुष्कळसे आवाज येतात. हे आवाज येत असताना हे ন

Original Transcript : Marathi मशीन बिघडलेलं आहे. म्हणजे बिघडलेलं नाही पण या मशीनमधून येणारी जी शक्ती आहे ती बरोबर अॅडजस्टेड नाही तसंच आहे. ओम जो आवाज येतो, तो आम्ही मोठे दुर्ग मिळविले म्हणून जे लोक म्हणतात, त्यांना जरा अर्धवट नॉलेज आहे. त्याच्यामुळे त्यांना समजत नाही की ते चुकलेलं आहे. आवाज बिवाज काही यायला नको खरं म्हणजे आवाज सुरुवातीला यायला हरकत नाही. म्हणजे काय, तुम्ही ऐकता आवाज. पण काही हरकत नाही. कारण आता एनर्जी येऊ लागली आहे. अॅडजस्ट करून घ्यायचं. काय गोष्ट आहे. असा आवाज का आला आपण अॅडजस्ट करून घ्यायचं. अॅडजस्ट करून घेतल्यावर समजलं पाहिजे की हं आता बरोबर आलं आहे . आता ही एनर्जी वापरली पाहिजे. घेण्यासाठी किंवा देण्यासाठी. दोन्ही गोष्टींसाठी. आता हा आहे माईक. जर याच्यामध्ये आवाज येत असला तर माझा आवाज यातून कसा येईल? तेव्हा जर काहीही जरासं अॅडजेस्टमेंटला फरक असला तर परमेश्वराचा आवाज आपल्यातून कसा जाईल, त्याची शक्ती आपल्यातून कशी जाईल, तेव्हा या मशिनला पूर्णपणे मौन झालं पाहिजे. तसंच तुमच्या या शक्तीला सुद्धा आतून मौन झालं पाहिजे. मौन होणं म्हणजे बेस्ट अचीव्ह केलं. अॅक्टिव्हिटीचं जे तंतोतंत डेलिकेट जी अॅडजस्टमेंट आहे ते जेव्हा मौन झालं म्हणजे बेस्ट झालं. म्हणजे मग ते वरून येणारे आहे ते मुखीर होत नाही. म्हणून ते ही आता एक सांगते मी. कारण परवा ते वाचत होते पुस्तक, हठयोगावरती म्हटलं बघावं. हे एवढं तर पुस्तक लिहून ठेवलंय म्हणा. त्याच्यात त्यांनी सांगितलंय आवाज येतात म्हणजे काय ? मशीन बिघडलेलं आहे. मशीन आम्ही केलेले आहे नं म्हणून आम्हाला माहिती. मशीन खराब आहे तर ते ऐकत बसू नका. ते काही चांगलं नाही. आवाज येतो म्हणजे ते मशीन खराब आहे म्हणजे अॅडजस्टेड नाही म्हणून आवाज येतो. आता हा तुम्हाला अनुभव येईल. तुम्हाला आजार होऊ दे, तुम्हाला काही त्रास असला म्हणजे आवाज येणार डोक्यात. डोकं भणभण करणार, काहीतरी असा त्रास असला म्हणजेच आवाज येणार, तुम्ही जर पूर्णपणे अगदी स्वस्थ असाल नं तर मौन आहे. मौन शांत, शांती आणि मौन, या दोन गोष्टी स्थापित झाल्या. आता सांगायचे म्हणजे आज वेळ कमी आहे, पायावर येणं सुरू झालं म्हणजे धडाधड, माझे पाय, तुम्ही सगळ्यांनी मिळून मोडून टाकले. तेव्हा हे पाय जरा थोडे दिवस आणखी चालू द्यावे ही विनंती आहे. कारण मी काही इन्शुअर केले नाहीत माझे पाय तर तुम्ही जर माझे पाय मोडले तर माझं काही ठीक होणार नाही. म्हणून माझी अशी विनंती आहे की माझे पाय एवढ्या जोरात धरून वरगैरे ओढू नका. आणखीन जरी पायातून पुष्कळ परवा शक्ती वाहते पण तरी जरा नाजूकच आहेत ते. तेव्हा हळूच हात-पाय खाली ठेवून डोकं जर ठेवलं तर बरं. पण इतक्या जोरामध्ये पाय दाबून असं धरायचं नाही. कृपा करून विशेषत: आपली मराठेशाही माझ्यावर गाजवू नका. गरीब माणूस आहे. परवा कारण तुम्ही लोकांनी माझे पाय एवढे ओढले की माझी मुलगी म्हणाली तुझ्या पायावर कोणी मारलं की चाबकाचे फटके असे वाटतंय पायावर वळ आल्यासारखे अर्थात त्याला काही हरकत नाही म्हणा. तुम्ही प्रेमाने करता पण प्रेमात अगदी लचकाच घेतला पाहिजे असं काही जरुरी नाही. जोपर्यंत अर्धाशेर मांस नाही काढलं तोपर्यंत आपण प्रेम प्रदर्शन केलं नाही असं नसतं. उलट नाजूकपणाने व्यवस्थितपणे, श्रद्धेनी कोणतेही कार्य केले म्हणजे सुबक दिसतं आणि बरे असते. तेव्हा थोडीशी माझी काळजी घ्यावी त्याबाबतीत अशी माझी विनंती आहे. कितीही असलं तरी आई म्हणजे आईच असते नां! तिला मुलं जायला लागली म्हणजे देवी असो की कुणी असे ना, तिला वाटते की मी मुलांना सोडून आता कुठे निघाले असं वाटणारंच.