2nd Talk

Mumbai (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

2nd talk, 1976-12-18

[Marathi Transcript]

 मी आज आपण सर्वाना भेटायला इथे खारे गावात आलेली आहे. हे योगायोग जुने असतात .जन्मजन्मांतराचे असता ते,आणि त्यांची पुनरावृत्ती अशी कशी होते हे ,ते आपल्या एवढे लक्षात येणार नाही .कारण आपल्याला आपला 

पूर्वजन्म माहित नाही .पण हे पूर्वजन्माचे योगायोग आहेत आणि त्यामुळेच आज परत हया जन्मात सुद्धा आपल्या सर्वाना भेटण्याचा हा उत्तम वेळ आलेला आहे. इथे येण्यात मला इतका आनंद होत आहे कि खरंच तो मी शब्दांनी  कधीच वर्णन करून सांगू शकत नाही . 

 ग्रामीण विभागात सहजयोग फार उत्तम पणे पोचला जाईल .हे मला माहित  आहे . कारण  शहरात राहाणारी लोक हि मंडळी स्वतःला फारच शहाणी समजतात . एकतर बहुतेक पढत मूर्ख असतात. पढत मूर्ख  नसले तर पैशाच्या आणि सत्तेच्या दमावर स्वतःला काहीतरी विशेष समजतात . त्यांना असं वाटतं कि सर्व जग त्यांनीच निर्माण केलेले आहे . हे आकाश सुध्दा त्यांनीच निर्माण केलेले आहें . आणि तेच परमेश्वराच्या ठिकाणी आहेत . आणि परमेश्वर नावांची वस्तू काही जगात नाही. कधीही त्यांना कोणतेही वाईट काम करताना परमेश्वराचा विचार येत नाही,  कि आपण हे अधर्माचं कार्य करीत आहोत. अजून आपल्या देशातील ग्रामीण वस्ती किंवा ग्रामीण मुंबई परमेश्वरालाआठवून आहे . आपली भारतभूमी ही एक योगभूमी आहे . आणि रामानी आणि सीतेने पायी प्रवास करुन सर्व भूमीला पूनीत केलेले आहे. पवित्र केलेले आहे . ग्रामीण समाजामध्ये जो एक साधेपणा, भोळेपणा आणि परमेश्वराची परमभक्ती आहे. (notclear )सुद्धा लोक करतात पण पुष्कळसे लोक खोटया गोष्टी सांगुन पैसे उकळतात . काहीतरी भोळ्याभाबडया लोकांना भुलवुन काहीतरी देवाबद्दल गोष्टी सांगून त्यांच्यामध्ये विचित्र तऱ्हेच्या भावना उत्पन्न करून त्यांच्या कडून पैसे उकळत असतात. 

हे प्रत्येक खेड्याखेड्यातून चाललेलं आहे . हि अत्यंत दुःखाची गोष्ट आहे . पण भोळ्याच्या मागे साक्षात शंकर बसलेला आहे ,आणि तो सगळ्याचं रक्षण करीत असतो . परमेश्वर हा भोळ्याच्या साधेपणाला भुलतो आणि नेहमी त्यांच्या मदतीला तो उभा असतो . पण परमेश्वराचा विश्वास एक  क्षण हि सोडला नाही पाहिजे . साध्या साध्या गोष्टीवर आपण लक्षात ठेवल्या कि परमेश्वराला बाजारात  विकत घेऊ शकत नाही .किंवा  परमेश्वराचा जो मनुष्य असेल तर तो कोणत्याही प्रकारचा पैसा तुमच्या कडून  घेऊ शकत नाही . जर त्याने तुमच्या कडून पैसे लुबाडले तर तो परमेश्वराचा मनुष्य नाही . मग तो कोणत्याही कारणांनी पैसे मागत असेल तर त्याला सरळ सांगायचं की हे बघा आम्हांला तुमचं काही  कर्तव्य नाही ,दुसरी गोष्ट रोगराई वगैरे शहरातून जितकी आहे ,त्यामानाने ग्रामीण भागात कमी आहे . आश्चर्याची गोष्ट आहे . त्याला कारण स्वच्छ हवा वातावरण तसेच पवित्र कार्य सुद्धा आहे. लोकांची मन पवित्र आहेत . पण रोगराई दूर करण्यासाठी सुध्दा आमच्या सहजयोग्यानी अत्यंत कार्य केलेले आहे ,आणि एकदा तुम्ही सहजयोगा मध्ये जर साक्षात्कारी पदवीला प्राप्त झालात तर तुम्हांला औषध डॉक्टर वगैरे काहीही नको ,आणि सगळे रोग मानसिक किंवा शारीरिक रोग नेहमी साठी निघून जातात . सहजयोगा साठी तुम्हाला काही पैसे दयायला नको ,तुम्हाला त्याच्यासाठी काही विशेष मेहनत करायची नाही ,काहीच मेहनत नाही ,जस एखाद बी स्वतःच उपजत तस तुमच्यात असलेल बी अंकुरत . तुमच्या मध्येच ते अंकुर आहे ,आणि त्या अंकुराला उजगारानी कुंडलिनी अस नावं दिलेले आहे तस प्रत्येक बी मध्ये अंकुर असत तुमच्या प्रत्येका मध्ये ते अंकुर आहे ,पण एखाद बी जरा,(inaudible) नसलं किंवा त्या बी मध्ये पूर्णपणे वाढ झालेली नसली  तर मात्र त्या अंकुराला फुटायला वेळ लागतो . आम्ही फक्त त्या बी वर किंवा त्या अंकुरावर  आपल्या प्रेमाचं पाणी ओततो दुसरं काही करत नाही आणि त्यात तुम्ही तरी काय करणार  बी आपोआपच उगवतं. तसच तुमच्यात असलेल हे  जे परमेश्वराने ठेवलेल अंकुर आहे ते आपोआपच वर येत पण एवढच आहे.की जस एखादा दिप तुम्ही सजवुन ठेवलेला असला  तर तो आपोआपच पेटत नाही त्याला एक पेटलेल्या दिप जवळ आणायला पाहिजे. त्याचप्रमाणे सहजयोगात सुद्धा जो दिप पेटलेला आहे तोच न पेटलेल्या दिव्याला पेटवू शकतो . पण जेव्हा दुसरे दिवे पेटतात तेव्हा ते सुद्धा दुसऱ्या दिव्यांना पेटवू शकतात . तर अशी क्रिया आहे. जर एखाद्या दिपाची वात घसरलेली असते एखादा दिप फुटका असतो. किंवा एखादया दिपात तेल कमी असत तेव्हा त्याची सुध्दा व्यवस्था सहजयोगात पहिल्यांदा करता येते .कुण्डलिनी हि तुमची आई आहे. आणि ती जन्मोजन्मी तुमच्या बरोबर जन्मते तुमच्या मध्ये वास करते आणि आई किती पवित्र वस्तू आहे हे आपल्याला माहित आहे. तरी नुसती पवित्रता तुमची आई आहे आणि ती त्या क्षणाची वाट बघत असते . ज्यावेळेला अशी कोणीतरी व्यक्ती कि ती प्रेमाने ओतप्रेत असेल कि ती सामोरीआली कि कुण्डलिनी आपोआप उभी होते आणि तुम्हाला त्याचा साक्षात्कार घडतो.

आज आपण त्याचा  प्रयोग थोडासा  येथे करणार आहोत . आणि मला आशा आहे ,तुमच्यातल्या पुष्कळ लोकांना  हे होईल , हे इतक सहज घडत की कोणाला विश्वास वाटत नाही कि आपल्याला  इतक्या लवकर कस झालं कारण त्याच्या साठी इतके उपास केले पाहिजे, तपास केले पाहिजे, हे केल पाहिजे ते केल पाहिजे. त्यानंतर जंगलात जाऊन राहील पाहिजे तपश्चर्या केली पाहिजे. आता अस धरून चाललं पाहिजे कि जर कोणाला कळव्याचा रस्ता माहित नसता तर त्याला शोधत शोधत मुंबई वरून पायी याव लागलं असत. समजा पन्नास वर्षा पूर्वी, तर त्याला किती तरी तास लागले असते. पण आज आम्ही मोटारीने आलो तर आम्हाला काही इतका वेळ लागला नाही. तास कशाला  किती तरी दिवस लागले असते .आम्ही सरळ तिथून निघालो आणि इथं पोचलो .

त्याप्रमाणेच आधुनिक काळामध्ये जी प्रगती आम्ही बाहेर केली आहे तशीच झाडांनी जर बाहेर प्रगती  केली तर त्याच्या मुळांनी प्रगती केली असणारच, तेव्हा हि  मुळाची जी प्रगती झालेली आहे ती तुमच्या लगेच लक्षात येणार नाही 

कारण झाडाची प्रगती  लक्षात येते मूळ पहिल्या शिवाय लक्षात येणार नाही .हे मुळाच काम आहे .आणि जेव्हा त्याचा स्त्रोत्र सापडला, जर स्त्रोतच मुळी हाताशी  लागला एखाद्या झऱ्याला जर जाऊन भिडलं ते मूळ तर प्रश्नच उरत नाही. त्या झाडाच्या  मरण्याची किंवा त्याला काही त्रास होण्याची कितीही तो फोहावला तरी सुध्दा त्याला ते पाणी  मिळू शकत . तसंच सहजयोग हा हया आधुनिक कलियुगामध्ये सापडलेला आहे . आणि त्याचा उपयोग सगळयांनी करून घ्यावा . फक्त सहजयोगाला फार उथळ मनाची माणस चालत नाहीत. म्हणजे टर उडवणे, टिंगल करणे,वगैरे अशा पद्धतीची लोक जर असतील त्यांना जरी व्हायब्रेशन आले तरी ते सुटून जातील श्रद्धा हि पाहिजे परमेश्वराप्रती श्रद्धा  पाहिजे किती म्हटलं तरी जर तुम्हाला जर एकाद्या प्रती श्रध्दा नसली तर त्यांनी का तुमचं भलं करावं? तुम्ही म्हणता आमच्या मुलाला बर करा, पण माताजी आमची तुमच्या वर श्रध्दा नाही तर का बरआम्ही त्याला बर करावं? एक साधा विचार करा जरी मी प्रेमानं म्हटलं कि नाही तरी मी तुम्हाला ठीक करते, तर जर त्याला ठीक करणारे अनेक देवता बसलेले आहेत . त्यांनी मान्य केलं पाहिजे . हनुमानाला पटलं पाहिजे ,गणेशाला पटलं पाहीजे, शंकराला पटलं पाहिजे ,कृष्णाला पटलं पाहिजे कि हा मनुष्य  ठिक आहे नाही तर ते म्हणतात ह्यांना मदत करायची काही गरज नाही . ते नुसत्या उथळया मनाची लोक आहेत थोडया पुरते आलेले आहेत त्यांना मदत करण्यात काही अर्थ नाही.

सहजयोगाच्या द्वारे हजारो लोक बरे झालेले आहेत. रोग बरे  झालेले आहेत. त्या शिवाय साक्षात्कार हजारो लोकांना झालेला आहे ज्या लोकांना साक्षात्कार झालेला आहे ते सुद्धा दुसऱ्या लोकांना ठीक करत आहेत . सहजयोग मध्ये हे फक्त लक्षात ठेवले पाहिजे कि मानवाला सगळी काही आपल्या बद्दल माहिती नाही त्याला हे समजत नाही आहे की आपण मेल्यावर आपलं काय होते? जन्मांच्या आधी आपण कोण होतो? पुढे काय होणार? ह्या सर्व गोष्टी त्याला स्वतः बद्दल माहित नसतात तेव्हा जे सहजयोगाचे थोडेबहुत नियम आहेत ते करावे लागतात . म्हणजे एक छोटीसी गोष्ट आहे की सहजयोग्यानी कोणाकडून कुंकू लावुन घ्यायचं नाही. जो कोणी पार असेल त्याच्या कडुन फक्त कुंकू लावून घ्यायचं पण कपाळाला हात लावू दयायचा नाही. तर सहसा तुम्ही पृच्छा  कराल प्रश्न विचाराल  माताजी असं का,?

(  इनऑडिबल )तरंग वाहात असतात. आपण म्हन्तोना ह्याचा हात चांगला आहे, ह्याचा हात बरा नाही, ह्याचा हात शेतीला चांगला आहे, ह्याचा हात वैद्यकीला चांगला आहे. त्याला असं कारण कि आपल्या हातातून हे तरंग वाहत असतात. ज्या माणसाच्या हातातून वाईट तरंग वाहतात त्यांनी तुमच्या कपाळाला हात लावला तर तुमच्यातुनही वाईट विचार येऊ शकतात. म्हणुन आपल्या कपाळाला फार जपुन राहील पाहिजे. असा हा सहजयोगातला एक नियम आहे. की कपाळ माणसांचे फार परमेश्वरनं विचार करून मिळवलेले आहे. म्हणुन ते कोणासमोरही नतमस्तक करायचं फार विचार करून करायला पाहिजे. प्रत्येक माणसासमोर तुम्ही डोकं वाकवत जर फिरलात समजा तो एक राक्षस निघाला तर त्याच्यातले जे दुर्गुण आहेत ते तुमच्यात सहज येणार.

  असे थोडे बहुत नियम आहेत ते जर पाळले तर सहजयोगाला तुम्ही प्राप्त कराल. आणि सहजयोग हा मोठा वरी वरदानाचा भाग ठरतो . आपल्याला आश्चर्य वाटेल सहजयोगाचे अनुभव इथल्या काही लोकानी तुम्हाला सांगितले तर तुम्हाला विश्वास वाटणार नाही . एकदा एका आगगाडीतून एक सहजयोगी जात होते. आणि ती आगगाडी उलथून पडली. संबंध आगगाडी उलथून पडली पण आगगाडीत एकालाही अपघात झाला नाही. आणि त्याच्यात त्यांचं लहानमुल होते ते सुद्धा अगदी फार दुर जाऊन पडले पण त्याला सुद्धा काही झाले नाही. लोकांना अगदी आश्चर्याचा धक्का बसला. हे कस झालं अकॅसिडेन्ट वैगरे हे फार टळतात . तुम्ही म्हणाल हे कस होत? आता आपण हनुमान वर फार विश्वास ठेवतो. येता जाता  हनुमानारे,  हनुमानारे करत असतो. गावात येताना हनुमानाचं एक देऊळ असायचं आपल्याला हे नाही वाटत कि हनुमान हा सगळीकडे पसरलेला आहे . त्याचा आपला संबंध नाही नाहींतर हनुमानाला हाक मारल्याबरोबर तो तिथल्या  तिथे उभा राहतो . इतकच नाही पण एक सहजयोगी जिथे पुढे असेल तर त्याचा संबंध परमेश्वराशी झालेला असतो त्याच्या पाठीवाटी उभा असतो . गणपती सगळीकडे असतात . आपल्याला अस वाटत की गणपती देवळातच बसलेले असतात. तो सगळ्याचं साहाय्य्य करणारा सगळीकडे उभा असतो . जर कोणी सहजयोग्याला काही त्रास झाला तर गणपति त्याच निवारण करतो. आपण सर्व म्हणतो कि गणपतिआहे, मारुतीराया आहे ,दत्तात्रयची जयंती करायची आहे, शंकर आहे,  सगळ्यांना आपण मानतो पण हे आपल्याला समजत नाही कि हे जे आपलं शरीर आहे. हे जे आपल शरीर आहे ते जे आपल्या डोळ्यांनी बघतो आहे. आणि ह्या ज्या वातावरणात आहोत ते हे सर्व त्या लोकांनी भारावलेलं आहे आणि ते सगळीकडे व्यवस्थित पहारा देत आहेत. ह्या गोष्टीची जाणीव परमेश्वराची आणि तुमची गाठ पडल्याशिवाय होणार नाही, कस आहे आता ह्या माईक वर मी बोलत आहे आणि जस ह्याच कनेकशन मेन शी लागलं नाही. तर तुम्हांला काहीही ऐकू येणार नाही तसंच  जोपर्यन्त तुम्ही परमेश्वराशी एकाकार होत नाही किंवा तुमचा साक्षात्कार होत नाही तो पर्यन्त तुम्ही परमेश्वराला हाका मारत राहीलात तरी तो कसा ऐकणार तुम्हांला ,आपण परमेश्वरच नाव घेत राहतो . रात्रंदिवस आणि कधी कधी इतकं (इनऑडिबल ) जसा काही तो आपला नोकरच आहे. सारखी त्याला काम सांगत असतो. तु हे कर रे तु  ते कर रे तु माझ्या बापाला हे कर रे, तु माझ्या मुलाला हे कर रे, पण तुमचा काय अधिकार आहे परमेश्वरावर? तुम्ही परमेश्वरासाठी काय केलेलं आहे ?तुमचा संबंध आहे का परमेश्वराशी ? 

आता असं आपण म्हणायचं आपले राष्ट्रपति आहेत. राष्ट्रपति ना  जर तुम्हांला भेटायचं असल तर तुम्हाला त्यांना पत्र पाठवायला लागतं, त्यांच्या कडुन परवानगी घ्यावी लागते. जर तुम्ही सरळ तिथे जाऊन बसलात ये राष्ट्रपति इकडे ये माझं हे कार्य कर, तर पोलिस तुम्हांला बांधुन ठेवतील कि नाही ? तेव्हा तुम्हाला अधिकार असायला  पाहिजे आणि त्या अधिकारांची ओळख अशी असते. कि जेव्हा मनुष्य आत्मसाक्षात्कारी होतो . तेव्हा त्याच्या हातुन चैतन्य लहरी वाहातात अस शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे. आणि तेच आज घटीत होत आहे. परमेश्वराच्या नुसत्या बाता नाही आहेत . आज परमेश्वराराला येऊन सिध्द करु शकतो. तुम्हीही सिद्ध करु शकता. तेव्हा हा मार्ग म्हन्तातना “येड्या गबाळ्याचे काम नोहे” ह्या मार्गाला येणाऱ्या लोकांमध्ये श्रद्धा असायला पाहिजे. साधेपणा, भोळेपणा आणि परमेश्वराला जाणण्याची उसुक्ताअसली तर कुठल्याकुठे तुम्ही सगळे पोचु शकता. 

( inaudible )– ——- भगवे वस्र आणि केस काढुन  संत मनुष्य होत नाही. तस जर म्हटलं तर मेंढ्याचे रोजच केस कातरले जातात . म्हणुन काही तो संत होतो का? कपडे बदलुन कोणी संत होत नाही . बाहेरचे हे प्रकार करुन कोणी संत होत नाही. आपल्या कडे केवढी संत मंडळी झाली. तुकारामबुवा झाले, त्यांनी काय संन्यास घेतला नव्हता. कोणत्याही संतांना संन्यास घेण्याची काहीच गरज नसते कारण तो आतूनच संन्यस्थ होऊन जातो. आतूनच ती वृत्ती बदलते म्हणूनच बाहेरचे देखावे, बाहेरचे प्रदर्शन हे करण्याची काही गरज नाही. जी गोष्ट घटित व्हायची आहे ती आतुन होते आणि त्याची जाणीव आतमध्ये होते. आता ह्यापैकी काही लोकांना असे अनुभव येतील कि थोडा वेळ वाटेल की आम्हाला आले हातामध्ये तरंग आले माताजी आम्हांला वाटल आमच्या हातामध्ये तरंग आलेत. आणि मग थोड्या वेळानं अस होईल दहा लोकांना येतील चारला लोकांना येणार नाही ती चार मंडळी  ज्यांना आले नाहीत. ते त्वेषानी बोलू लागतील कि हे खोट आहे अमक आहे तमक आहे म्हणजे ही जी दहा आहेत. ती त्यांच्या बरोबर जाणार त्या चार लोकांबरोबर कारण माणसाचं जे डोकं असत ते अर्धवट असत. हा अगदी नवीन अनुभव आहे. आणि ह्या नवीन अनुभवाला जमलं पाहिजे, तुम्ही म्हणाल की एका क्षणातआणि एका मिनिटात होईल, ते होत, पण ते जमण्यासाठी तुम्हांला थोडस बसावं लागत म्हणजे त्यासाठी तुमची बैठक असावी लागते. थोडीशी मेहनत करावी लागते. म्हणूनच हि पार झाल्यावर करायची असते. आधी

नसते. 

आज कळव्याला मला बोलावलेलं आहे. पण मला माहित नाहीआणखी पुढचा

काय कार्यक्रम आहे तर माझी अशी इच्छा होती कि आपण ध्यानाला वगैरे

जाव सगळ्यांनी आणि ध्यानामध्ये जर पार होता आलं तर बर होईल. आणि

त्याच्यानंतर काही रोगी वगैरे असले तर त्यांना हि मी बघीन.  ह्यापुढे आपले काही प्रश्न असले तर थोडेबहुत

विचारा मला फार आनंद होईल .

आहेत का प्रश्न ?हो विचारा हो विचारा या

हिन्दी : 

प्रश्न :माताजी पार तो हो गये आपकी कृपासे पर ……..

माताजी:अच्छा

हा विचार येत नाही आता हे स्मशान आहे. स्मशान आम्ही म्हणतो गावाच्या बाहेर असलं पाहिजे पण लोक काय करतात आता जागा आहे ना मग स्मशान

असो कि काही असो . आत्ता मुंबई ला आमच्या येथे स्मशान आहे . आणि त्या

स्मशानामध्ये लहान मुलांची खेळाची जागा बनवुन टाकली. आत्ता हि लहान

मुले जितकी तेथे जातील त्यांना हे त्रास होईल कि नाही,कारण त्याच्या तेथे

सगळ्या कबरी आहेत. ह्याचा काही विचार मनुष्य ठेवत नाही. आजकालच्या

ह्या आधुनिक माणसाला ही अक्कल नाही. आणि अशाच रीतीने आज कॉलनी

वगैरे बनवलेल्या आहेत .तेव्हा ह्यांना सुद्धाआणि तुम्हाला सुद्धा कुकुं वगैरे

आपल्या बचावाला घेऊन गेले पाहिजे. आणि नंतर जेव्हा तुम्हाला कळेल कि

काय आहे .तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल की केवढ्या मोठया त्रासातुन तुम्ही

बचावलेले आहात. म्हणूनच लोकं वेडे होतात, पागल खान्यात जातात

,आजारी होतात, मरतात आणि त्यांना हेच लक्षात येत नाही कि हा आजार

आला कुठून,अस झालंच कस आमच्या घरात , लहान लहान मुले सुद्धा, कारण तुम्हांला स्वतः बद्दल कल्पनाच नसते ,दुसऱ्याच्या बद्दल कशी

कल्पना येणार?ह्यांना काय झाले? हे कोण आहेत ?इतकं मी आत्ता एक साधी

गोष्ट घ्या तुम्ही देवळात गेले देवळामध्ये परमेश्वर आहे . देव आहे त्यांना

नमस्कार हि केला पाहिजे. देऊळ फार जरुरी आहे पण जर एक भामटा तेथे

पुजारी बसला. समजा आणि तो काही वाईट धंदे करत असला ,काळी विद्या

वगैरे करत असला, समजा तो, त्यांनी तुम्हाला प्रसाद दिला तर तो तुमच्या

पोटात जाणार की नाही ? आता तुम्हाला कस कळणार जर तुम्ही साधी माणसं

असणार तर नाही कळणार जर तुम्ही सहजयोगी असाल तर लगेच तुम्हाला

त्या उलट्या होऊन निघून जाणार, राहणारच नाही पोटात, अशी काही वस्तू

पोटात गेली तर निघूनच जाणार ती राहणारच नाही. मग घरी आलं की एकदम

पोटात दुखायला लागलं मग खुप जोराचं आल आणि हॉस्पिटल मध्ये

तडकाफडकी गेले. काय झालं माताजी कळलं नाही? हे सगळं कळण्याचं

लक्षण सगळं काही तेव्हाच होऊ शकत जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता आणि

त्यामुळे दुसऱ्यानाही ओळखता ,कारण स्वतःचीच ओळख पटलेली नाही

आपली शक्ती आत मध्ये किती जबरदस्त आहे ती आधी जाणली पाहिजे.

आणि ती जाणताच तुम्हाला कळेल ह्या माणसामध्ये काय दोष आहे . ह्या

दुसऱ्या माणसानं मध्ये काय दोष आहे? आणि तो दोष जर आपल्याला

त्रासदायक असेल . तर त्याच्यापासून त्याचा बचाव हि करता येईल, ह्याची

ओळख कशी असणार त्या ओळखीला समजलं पाहिजे.

हिन्दी :(इनऑडिबल)

(आप भी,वहा आया किजिये.कोशिश किजीये सारी मास्टर कर देंगे कुण्डलिनी

में ये लोग जो बैठे हैं मास्टर है कुण्डलिनी में, बिलकुल मास्टर हो गये, इन्होने हजारो लोंगो की बीमारी ठिक

कीं, ये धुलिया के है ,इनके यहा 

सेन्टर खोला, हज़ारो लोग कि बिमारी ठीक कि, इनके लडके डॉक्टर हैं और

दुसरें लडके बडे भारी वो हैं जमीनदार लोक हैं . इन के यहां सेंटर खोला हजारो लोगो इनके हाथ से ठीक हो गये और, अब बोलते है सब लोक जो पार हो गये एक पैसे की दवा हम नही लेते, इनके सब बच्चे पार हैं, सब लोग पार हैं. 

अब आपकी कळवा में यहा पर सभी को इसको करना चाहिये, आप लोक इसपर ध्यान दे और इस को पा ले, सहजयोग मे ये नही कि आप पार हो गयेऔर दुसरे दिन आप भूल जाइये, नही ये आपको समझना चाहिये, समझो हमने आपको बिजली दे 

बी दि और आपको नही बताया कि किस तरह से बटन चलाना तो आप कैसे

जानिये, थोडी सी भी चीज सिख लेनी चाहिये ना ? साधारणता, आपको दो चार चीजे ध्यान मे रखे तो कोई भी तकलिफ नही, बंधन देना, अपने को पानी पर निकलना, दोन तीन चिजोसे आप ठिक रह सकते हो बहुत ज्यादा कुछ करने कि जरुरत नहीं लेकीनं 

आप एक बार आके फिर आये नही होंगे? 

इसलिये आपको पुरा पता नहीं होगा इन लोगोसे बातचीत करनी चाहिये. वैसे

नही चलता ना परमेश्वर का काम हैं थोडा बहुत सिखाना भी पडता है, छोटी सी चिज है बिजली के काम के लोगो को सालो लग जाते हैं परमेश्वर का काम है थोडा बहुत तो सिखनाही चाहिये .  यहा तक की पूजा मे कौंसी उंगली हम इस्तमाल करते हैं किस चीज के फुलं देते है इस सबको अर्थ हैं छोटी छोटी चीज है इतना नहीं जानेंगे थोडा बहुत सिख लिजिए.

श्रीमाताजीं :हा आता विचार प्रश्न :काय आहेत का प्रश्न?

( ————)

जैसे सहजयोग मे दारु पिना हैं ! ऐसे हम कुछ नही कहेते तुम दारु मत

पीओ,पर सहजयोग के बादआप दारु नहीं पी सकते! आप दारु पीयेंगे तो फौरन उलटी हो जायेगी आपको टिक हि नही सकती, आपके अंदर दारु, बहुत 

मुशकील हो जायेगी , सिगारेट पिंनेमे भी टकलीफ होगी, आप सिगारेट पिना

शुरु करेंगे सहजयोग के बाद तो आपको तकलिफ होगी, आपका मन करेगा की नही पियेगे छोड दो ,हमारे यहा सिगारेट कोई  नही पीता. सबकी सिगारेट छुट गयी अपने आप ऑटोमॅटिक, मैं तो कुछ नही कहती छोडो करके अपने आप ही छुट जाती हैं!

एक साब सिंगापुर मे बहुत दारु पिते थे! उनकी बिबी मेरे पास लेके आयी थी

उनकी आप दारु छुढानेके लिये, वो पार हो गये . पता नही कैसे, उसके बाद उनाका ये हाल हुवा जब भी दारु पिने लगे तो उनको सुगंध आती थी !

इतनी जोर से सुगंध आती थी उसके बाद उनोन्हे दारु हि छोड दि सुगंध ही लेके

बैठ गये..