The Creation

New Delhi (India)

1977-02-20 1 Creation 1, 48' Download subtitles: EN,RU,UKView subtitles:
Download video (standard quality): Transcribe/Translate oTranscribe

1977-02-20 1 Creation 2, 40' Download subtitles: EN,RU,UKView subtitles:
Download video (standard quality): Transcribe/Translate oTranscribe

1977-02-20 The Creation Delhi NITL, 71' Download subtitles: EN,ITView subtitles:
Download video (standard quality): Transcribe/Translate oTranscribe

Feedback
Share

“The Creation”, New Delhi (India), 20 February 1977

[Marathi translation from English]

आज आपण ‘सृजन’ बद्दल बोलण्याचे ठरविले आहे. पण आपल्या आयोजकांना आपल्याला खडू व फळा देणे जमले नाही. मला माहीत नाही, चित्र काढल्याशिवाय ते समजावण्याचा मी प्रयत्न करते. हा फार अवघड विषय आहे, पण तुम्हाला समजेल असा तो करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पण सृष्टीची निर्मिती (सृजन) अशा अवघड विषयाकडे पूर्ण लक्ष द्यावे अशी मी तुम्हाला विनंती करते.

तुमच्यापैकी पुष्कळांना चैतन्य लहरी समजतात हा आजचा फार मोठा आशीर्वाद आहे आणि एवढेच नाही, तर तुम्हाला याचे ज्ञान व समज (अनुभव) आहे, की चैतन्य लहरी विचार करू शकतात व प्रेम करू शकतात. हा फार मोठा आशीर्वाद आहे. अर्थात्‌ तुमच्या पैकी काहींना ते मिळाले नाही. पण ज्यांना मिळालंय त्यांना हे ज्ञान आहे, की चैतन्य लहरी (व्हायब्रेशन्स) संघटित करू शकतात, कारण ते कुंडलिनी चढवतात. जिथे कमतरता तिथे दयेने जातात, त्या भागात जातात जिथे कमतरता (व्हायब्रेशन्सची) आहे. त्यांना समजते, त्यांचे वैश्‍विक स्वरूप, त्यांचा वैश्‍विक स्वभाव, ती संघटित करतात आणि ती प्रेम करतात. ती तुमच्या प्रश्‍नांना उत्तरे देतात, तुम्ही प्रश्‍न विचारता तेव्हा त्यांच्याकडून उत्तरे मिळतात. ती जिवंत व्हायब्रेशन्स आहेत. ती व्हायब्रेशन्स परमेश्वरी (डिव्हाईन)’ कडून येतात. या परमेश्वराला ब्रह्म, ब्रह्म तत्त्व – ब्रह्माचे तत्त्व असे म्हणतात.

आपल्याला असे म्हणता येईल, की सृष्टीचे सृजन ही चिरंतन प्रक्रिया आहे, म्हणजे बीजाचा वृक्ष होतो आणि

तो वृक्ष पुन्हा बीज होतो व ते बीज वृक्ष होते. हे होतच असते. हे चिरंतन आहे. याला सुरूवात नाही आणि याचा शेवटही होऊ शकत नाही. हे होतच राहते. म्हणून याच्या अस्तित्वाच्या विविध अवस्था असू शकतात. तुम्ही असे म्हणू शकता, की ‘असण्याची’ अवस्था. तेव्हा प्रथम केवळ ‘असणे’ आहे. ते ब्रह्म आहे. तेव्हा काहीच अस्तित्वात नसते. काहीच नाही असे आपण म्हणतो. जेव्हा काहीच नाही असे आपण म्हणतो तेव्हा तो सापेक्ष शब्द असतो, कारण आपण अस्तित्वात नसतो. म्हणून आपण म्हणतो, की काहीच अस्तित्वात नाही. हा सापेक्ष शब्द आहे. जेव्हा आपण अस्तित्वात नसतो तेव्हा आपल्यासाठी प्रत्येक गोष्ट नसतेच. काहीतरी असते, पण ते आपण स्वत: नसतो. म्हणून त्याचा संदर्भ घेऊन (त्याच्या सापेक्षतेने) आपण म्हणतो, ‘ते काही नाही.’

म्हणून फक्त शब्द आहे ‘ब्रह्म’. तुम्ही म्हणू शकता किंवा कल्पना करा, की शक्ती आहे. हवे असेल तर म्हणू शकता, की ऊर्जेचे (शक्तीचे) एक रूप अस्तित्वात आहे. पण ती शक्ती एका ठिकाणी (एका बिंदूत) एकत्र येते व न्यूक्लियस (केन्द्रबिंदु) तयार करते. ती शक्ती जी विचार करते, जी विभागली जाते, जी एका बिंदूत एकत्र येते – बिंदूवर एकाग्र होते असेही म्हणता येईल. ज्या बिंदूला आपण सदाशिव म्हणतो, तो हा बिंदू आहे. हे घडते, कारण ती शक्ती इच्छा करते, विचार करते, संघटित करते, प्रेम करते. जेव्हा निर्मिती करायची असते, जेव्हा त्या शक्तीमध्ये निर्मिती करण्याची इच्छा झाल्याचे जाणवते त्या वेळी न्यूक्लियस निर्मिला जातो. या न्यूक्लियसला

आपण सदाशिव म्हणतो -्हा न्यूक्लियस नाहीसा होत नाही. तुम्ही चमकणारा ढग, चमकणाऱ्या ताऱ्यांचा समूह अशाही कल्पना करू शकता. मला म्हणायचंय की कशाचा तरी संदर्भ घेऊन तुम्ही कल्पना करू शकता. जे परम परिपूर्ण, अँबसोल्यूट स्वरूप आहे, त्याची कल्पना करू शकत नाही. पण तुम्ही अशा एका अवस्थेची कल्पना करू शकता जिथे फक्त शक्ती आहे आणि निर्मिती नाही. पण ती शक्ती वीज नाही, चुंबकत्व नाही, की तसे काही नाही. तर ती शक्ती सगळ्यांचा संयोग (कॉम्बिनेशन) आहे, सिंथेसिस आहे. ज्याचा लय होतो, जे लयाला जाते, ते सर्व ती शक्ती होते, त्या शक्तीमध्ये त्याचा संयोग होतो. त्या बिंदूत ज्याला आपण न्यूक्लियस म्हणतो, त्याच्यात सगळ्याचा विलय होतो. या बिंदूला आपण सदाशिव म्हणतो. हे सदाशिव ईश्वर सर्वशक्तिमान देव आहेत. आता आपण याला परमेश्वर म्हणू कारण आता याला मर्यादा आहे, अशा अर्थाने की आपण काही नाव देऊ शकतो. फक्त शक्ती असेल तर आपल्याला ब्रह्म म्हणावे लागेल. आपल्याला असे म्हणता येईल १ पाण्याचे बर्फ झाल्यावर आपण पाणी आणि बर्फ यांच्यात फरक करू शकतो. पण तरीसुद्धा हे सापेक्ष आहे, तुलनात्मक समजणे आहे. या अवस्थेत सर्वशक्तिमान देव, परमेश्‍वर स्वरूप धारण करतात आणि त्यांना जाणीव (आयडेंटीटी) असते, अस्तित्व असते. म्हणून आपण म्हणू शकतो, की हे ब्रह्म नाही तर अस्तित्व आहे. अस्तित्वाला त्याचे तेजोबलय (ऑरा) असते असे म्हणता येईल, प्रकाश असतो. हा प्रकाश परमेश्वरी प्रेम आहे. हा वेगवेगळे आकार धारण करतो, परंतु सदाशिव मात्र जसे आहेत तसेच राहतात. आता निर्मितीची इच्छा तेजोबलयात (ऑरा) पाठवली जाते. ऑरा ही परमेश्वरी शक्ती असते. ईश्‍वराच्या पलीकडे काही गोष्टी असतात व काही त्याच्यासमोर असतात. परमेश्वराच्या पलीकडे काही गोष्टी असतात, ज्यांच्यावर त्यांचे नियंत्रण नसते. एक म्हणजे त्यांच्या चिरंतन स्वभावावर त्यांचे नियंत्रण नसते. चिरंतन असणे हे त्यांचा स्वभाव आहे. ते थांबवू शकत नाहीत. ते स्वरूप बदलत राहतील हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांचा चिरंतन स्वभाव ते बदलू शकत नाहीत. ते चिरंतन असणार आहेत, चिरंतन असणे, चिरंतनत्व हा त्यांचा स्वभाव आहे. त्याच्यावर ते मात करू शकत नाहीत. उदाहरणार्थ परमेश्वर तुमचे सत्याची निवड करण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाहीत. त्यांना ते करणे शक्‍य नाही. एकदा दिल्यावर ते काढून घेणार नाहीत. तुमच्या सर्व स्वतंत्रतेत तुम्ही ते निवडायला हवे. परमेश्‍वर तुमच्यावर सत्याची निवड करण्याची सक्ती करणार नाहीत. अनेकांना तशी आशा आहे, पण ते चुकतात. या स्थितीत, पूर्ण विनाश किंवा पूर्ण पुनरुत्थान एवढाच फक्त प्रश्‍न आहे. आता सत्याचा स्वीकार करायची इच्छा आहे, की असत्याच्या मागे जाण्याची, हा निर्णय माणसाच्या हातात दिला आहे. तेव्हा तुम्हाला निवड करण्याचे सर्व स्वातंत्र्य दिले आहे. परमेश्वराच्या बाबतीत मी सविस्तर बोलणार नाही, कारण तो फार सूक्ष्म विषय असून त्याच्यासाठी फार लक्ष देण्याची गरज आहे. याबद्दल अनेक लोकांशी मी पूर्वी बोलले आहे. त्यांचा सर्व स्वभाव वगैरे, ते सर्व त्यांना माहिती आहे. पण ते साक्षी आहेत साक्षीच्या स्वरूपात आहेत, पण ते कशाचे साक्षी आहेत ? ते सृष्टीचे साक्षी आहेत आणि या सृष्टीची निर्मिती करणारी जी शक्ती आहे ती त्यांची शक्ती आहे, त्यांची पत्नी आहे. आता आपण माणसांना हे समजत नाही, की पती-पत्नी इतके एक कसे असू शकतात. उदा.तुम्हाला हे समजेल, की सूर्य आणि सूर्यप्रकाश, चंद्र आणि चंद्रप्रकाश या दोन गोष्टी एकच आहेत किंवा शब्द आणि त्याचा अर्थ. त्याचप्रमाणे शिव व शक्ती एक व एकत्र आहेत. उदा.तुम्ही वडील असता, भाऊ असता, मुलगा असता. त्याचप्रमाणे तुम्ही स्वत: असू शकता व तुमची शक्ती ही असू शकता. तुम्ही, तुमचा आत्मा व तुमची शक्ती वेगळे आहात, पण तुम्ही एकच आहात. तुम्हाला लिहिण्याची शक्ती आहे, पण तुम्ही तुमची शक्ती नाही. तसेच तुमची शक्ती पण तुमचा आत्मा नाही. तसेच शिव आणि शक्ती यांची दोन व्यक्ती म्हणून ओळख आहे, पण ते एकाच विशेष स्वरूपाचे अविभाज्य घटक आहेत. त्यांना ब्रह्म म्हणतात.

पण या भयंकर तांत्रिकांनी पुन्हा ते इथे आले – शिव आणि शक्ति यांच्यातील संबंध बिघडवले ते यासाठी नाही की ते मानव होते म्हणून तांत्रिकांनी या सर्व विचित्र कल्पना रूढ केल्या व निरर्थक गोष्टींबद्दल बोलत होते, तर ते यासाठी की ते लोक लैंगिक-बिंदूशिवाय काहीही नव्हते. त्या त्याच्यावर बिलकुल पण नाहीत. ते अत्यंत बिघडलेले, रोगी आणि पापी लोक होते. ते इतके भयानक प्रकारे रोगग्रस्त होते की कोणाच्यातही त्यांना याव्यतिरिक्त काही दिसत नव्हते. अश्वमेध यज्ञाचेही वासनामयशी संबंधित वर्णन केले आहे. ज्या पण गोष्टी ते बघतील त्यात त्यांना वासनाच दिसते. हे अशा प्रकारच्या व्यक्तीसारखे आहे की जो वासनामय चश्म्याच्या प्रकाशाने बघत असतो. त्याच्यासाठी काहीही वासनामय बनते. ते इतके बिघडलेले आणि इतके पापी लोक आहेत की परमेश्‍वरालादेखील ते यौन-बिंदूच्या स्थितीत घेऊन येतात. जोपर्यंत ते या थरापर्यंत घेऊन येत नाही तोपर्यंत ते जिवंत राहू शकत नाही. जसे ते आहेत, कशा प्रकारे ते स्वतःला न्यायपूर्ण ठरवतील ? शिव आणि शक्तीचा वासनेशी काहीही संबंध नाही. सूर्य आणि त्याचा प्रकाश काय आहे? त्याच्यात काही कामुकपणा लपलेला आहे का? या पापी तांत्रिकांजबळ कामवासनेव्यतिरिक्त इतर काही आहे का? वासनेशिवाय काही इतर संबंध असू शकत नाही का?

तेव्हा शिव हे परमेश्‍वर आहेत. आपण त्यांना सदाशिव म्हणू. मी थोडे चित्र काढते, बघू त्याचा कसा उपयोग होतो. अशाप्रकारे केंद्रबिंदू घटित होतो. आता हा केंद्रबिंदूचा शेष भाग, त्याची शक्ती, वलय बनवते. ते कसे घटित होते 2 ते फिरू लागतात, मागच्या बाजूला येतात. तेव्हा काय होते, की ते मागच्या बाजूकडे येतात… (अस्पष्ट) हे सगळे असे इथे राहते आणि सर्व पदार्थ त्याच्याभोवती कवच बनतात आणि सर्व लहरी (लाटा) क्रॉस करून कवचावर स्थिरावतात. तेव्हा अशी परिस्थिती असते, की जेव्हा आतल्या भागातील सर्व एकाग्र होऊन आणखी एक न्यूक्लियस तयार करते. ही शक्ती आहे आणि हे सदाशिव आहेत ही महाशक्ती, आदिशक्ती आहे आणि हे सदाशिव आहेत.

आता इथे शिव आहेत. एकदा शक्तीने तिचे व्यक्तिमत्त्व घडवले किंवा आपण म्हणू तिचा अहंकार स्थापित झाला, की शक्तीची शिवांपासून वेगळी जाणीव (ओळख) निर्माण होते. कारण सर्व प्रक्रिया साक्षीने पहावे म्हणून लीला नाटक तयार करण्याची आहे. सदाशिवच एक आहेत, जे या लीला नाटकाचे प्रेक्षक आहेत आणि शक्ती ज्या आहेत त्या सृजन करणार आहेत. म्हणून त्या, त्यांचा अहंकार बिंदूवर या ठिकाणी साठवतात आणि शक्ती होतात. तिथे त्यांचे स्थान ग्रहण करतात आणि शक्ती या रूपात त्या पहिली गोष्ट ही करतात, की लंबगोलाकारात त्यांच्या स्वामींच्या भोवती फिरतात. हा मुद्दा लक्षात येणे आवश्यक आहे. त्या शक्ती आहेत, परमेश्वराच्या शक्ती आहेत. परमेश्वराला दिसावे एवढ्यासाठीच सर्व सृजन करायचे आहे. शक्तीच्या लीला नाटकाचे फक्त तेच प्रेक्षक आहेत आणि त्यांना नाटक आवडले नाही, उदा.जसे ते नाटक होत आहे, निर्माण जालेली माणसे जशी वागत आहेत, ते जर त्यांना आवडले नाही, तर लगेच आपले डोळे बंद करून ते खेळ थांबवू शकतात, खेळ नाकारून किंवा त्यांचा राग व्यक्त करून, थांबवतील किंवा नुसतेच थांबवतील. म्हणून त्यांना विनाशक असेही म्हणतात.

पण हे सर्व त्यांच्या करमणुकीसाठी असल्याने आणि या नाटकाने त्यांना आनंद दिला नाही, तर ते थांबवू शकतात. म्हणून सर्वात प्रथम जर कोणाला प्रसन्न करायचे असेल, तर जे प्रेक्षक आहेत त्यांना. या कारणासाठी आदिशक्ती शिवांना हार घालतात, तो परावलय (पॅराबोला) आहे. म्हणून परावलय (पॅराबोला) हे आदिशक्तीचे चिन्ह आहे. हे एक प्रकारे त्यांना सर्टिफिकेट आहे, एक प्रकारे वरदान देणे आहे, ज्याला संस्कृतमध्ये म्हणतात, की ‘तुमच्या कार्याचा आरंभ करा’ असे वरदान देणे आहे. त्यांनी ही मंजूरी दिलेली आहे. त्या हा पॅराबोला पूर्ण करतात तेव्हा मंजूरी मिळालेली असते आणि म्हणून त्या पॅराबोला आहेत. याठिकाणी पुरूषांनी स्त्रियांवर प्रभाव टाकायचा की स्त्रियांनी पुरूषांवर, असा प्रश्‍न उद्‌भवत नाही, कारण तो आपल्या डोकक्‍्यांमध्येच पूर्वीपासून प्रभावी असतो.

आपण याचा विचार करतो तेव्हा स्त्रिया व पुरूष असा आपण विचार करतो. पण असं काही नाही. पूर्ण एकरूपता आहे. जे अगदी पूर्णपणे एक आहेत अशा एक तरी पती-पत्नींच्या जोडप्याची आपण कल्पना करू शकतो  का ? करू शकत नाही ही. कारण आपण अपूर्ण लोक क आहोत. होत. आपल्या कल्पनाशक्तीला शक्ताला इथपर्यंत ताण दिला. की जिथे दोन्ही फक्त एकदुसऱ्यासाठीच आहेत आणि त्या कार्यप्रवण आहेत, त्या आदिशक्तीच आहेत आणि त्यांचे प्रेक्षक असलेल्या परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठीच कार्य करीत आहेत आणि परमेश्‍वरालाच सर्वात प्रथम प्रसन्न करायचे आहे. म्हणून त्या स्वत: परमेश्वराला शरण जातात व पॅराबोलातून त्यांची मंजुरी घेतात.

म्हणून पॅराबोला फार महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे, की प्रत्येक गोष्ट पॅराबोलातून प्रवास करते, सरळ रेषेत कधीच नाही. उदा.तुम्ही कोणावर प्रेम करीत असाल, तर तुमचे प्रेम त्या व्यक्तीच्या भोवती जाऊन प्रेम म्हणून तुमच्याकडे परत येईल. तुम्ही त्याचा द्रेष कराल तर त्याच्याभोवती जाऊन प्रचंड द्वेष म्हणून  तुमच्याकडे परत येईल. म्हणून पॅराबोला घेतला. तुम्ही म्हणाल की पॅराबोलाच का? वर्तुळ का नाही ? कारण असे, की दुसर्‍या वस्तुच्या किंवा स्थानाच्या भोवती जाण्यास पॅराबोलाने कमीत कमी अंतर लागते म्हणून पॅराबोला आहे. रोजच्या जीवनातसुद्धा आपल्याला हे घडतांना दिसेल. तुम्ही जे दुसऱ्याला कराल ते सशक्त रूपात तुमच्याकडे परत येते, मग तुम्ही चांगले करा किंवा वाईट. यामुळेच आपल्या कर्मसिद्धांताच्या व पुण्य करण्याच्या कल्पना आहेत. कारण आपल्यातून आपण बाहेर सोडू ते आपल्याकडे परत येणार. त्याचप्रमाणे तुम्ही सगळ्या जगाला आशीर्वाद द्या, सगळ्या जगाचे आशीर्वाद तुमच्याकडे येतील.

मी सांगितल्याप्रमाणे ही प्रक्रिया चित्र काढून दाखविण्याइतकी सोपी नाही. कारण ही मोठ्या प्रमाणावरची क्षेत्रातली) जिवंत प्रक्रिया आहे. पण तुम्हाला समजावी म्हणून मी सोपी करण्याच्या प्रयत्नात आहे. आता हा पॅराबोला, आता शक्ती इथे आहेत. जेव्हा त्या पॅराबोलाच्या गतीमध्ये जातात आणि श्री शिव त्यांना मंजुरी देतात, ती जिवंत क्रिया असते, जितकी आपण जिवंत माणसे आहोत, तितकी ती जिवंत क्रिया असते. दोन्ही शिव आणि शक्ति मानवी असतात, जितके आपण आहोत तितकेच आपल्याला म्हणता येईल हजारपट जास्त मानव असतात. तेव्हा इथे पत्नी जी कायम एकत्रच असते, ती म्हणते, ‘मी अशीच सुखात आहे, याच्यापेक्षा अधिक पुढे मला जायचे नाही.’ कारण तिच्यासाठी निर्मिती करणे ही सोपी गोष्ट नाही. तिला तिच्या पतीपासून वेगळे व्हायचे नाही. सृष्टी हे बाळ आहे आणि ती म्हणते, ‘मग आता मुले होणे आवडत नाही, कारण मला तुम्हाला सोडावे लागेल.’ असे म्हणून ती पतीकडे झेपावते व पती तिला मागे ढकलून अंतर्धान होतो. पॅराबोलास या ठिकाणी भेदून तो बाहेर जातो. आता ती या स्वरूपात असते. आता ओम्‌ होण्याची सुरूवात होते. प्रथम पॅराबोला ओम्‌ मध्ये बदलतो. आता ती स्वतःला खाली ढकलते (खाली बसते) व थोडा वेळ, स्थिरावून ध्यान करून सर्व कसे कार्यान्वित करायचे हे पाहते.

आता त्यांची इच्छा जागृत व्हायला पाहिजे. त्यांची इच्छा जागृत झाली नाही, तर त्या सृष्टीची धारणा करणार नाहीत. अशात एक कल्प निघून जातो. त्यांच्या स्वत:च्या विचार करण्यात, की कोणत्या पद्धतीने हे सर्व रावे, पुष्कळ काळ निघून जातो. त्यांनी अनेक विश्वे तयार केली आहेत. एकच विश्‍व नाही बनवले. त्यांनी विश्‍वामागून विश्वे निर्माण केली आहेत. त्यांनी इतकी विश्वे कशी बनवली ते मी तुम्हाला दाखवीन. त्यांच्यापैकी काही अद्यापही अस्तित्वात आहेत, तर काही नष्ट झाली आहेत. पण आज आपल्यासमोर हे विश्‍व आहे, पृथ्वी आहे आणि या पृथ्वीवर भारत आहे. भारतात दिल्ली आहे आणि दिल्लीमध्ये तुम्ही इथे बसून माझे बोलणे ऐकत आहात. ते असे आहे. तेव्हा या क्षणी जे काही होत आहे ते भूतकाळ नाही, भविष्यकाळ ही नाही, पण मी तुम्हाला या क्षणाबद्दल सांगते. आपण इथे आहोत. पण आदिशक्तींनी अनेक विश्वे आपल्या पूर्वीसुद्धा तयार केली आहेत, अनेक गोष्टी करून बघितल्या व शेवटी हे करून पाहिले आहे. त्यांनी पृथ्वी बनवली आणि मग आपल्याला बनवले. त्यांनी कसे ते सगळे केले हे आपण नंतर पाहू. आता आपण हे पाहू, की त्या त्यांच्या तीन शक्‍्त्या कशा धारण करतात. त्या सृष्टीची रचना करण्याचे ठरवतात तेव्हा त्यांना तीन शक्‍त्या प्रदान केल्या जातात. परमेश्वराच्या तीन शकत्या त्यांना मिळतात. त्यांना प्रदान केलेल्या असतात. पहिल्या शक्तीने सर्वात

प्रथम अस्तित्व असते. अस्तित्वाची इच्छा, परमेश्वराकडे अस्तित्वात येण्याची इच्छा करतात. दुसरी शक्ती निर्माण करण्याची आणि तिसरी ते धारण करून टिकविण्याची. पहिली शक्ती अस्तित्व आहे, दुसरी सृजन आहे व तिसरी उत्क्रांत करणारी, धारणा करणारी शक्ती आहे जिच्यामुळे हळूहळू तुम्ही काही तरी धारण करता, टिकवता आणि काही तरी होता. या तीन शक्ती आदिशक्ती धारण करतात. थोडक्यात आपल्याला म्हणता येईल, की या तीन शक्ती महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी त्या घडवतात व या तीन शक्ती त्या स्वत:मध्ये धारण करतात. आता त्या पुन्हा त्यांची पॅराबोलाची प्रणाली वापरतात. समजा, मी या रस्त्याने या घरात आले. मला हा रस्ता समजला. नंतर त्या रस्त्याने आले. मला तो रस्ता माहीत झाला. मग मला प्रत्येक रस्ता, प्रत्येक गोष्ट समजली. त्या ज्ञानाने मी दुसरे काही पण करू शकते. म्हणून त्या पुन्हा त्यांच्या पॅराबोलात फिरण्याचा उपयोग करतात. वास्तविक त्यांच्या तीन महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वतीच्या हालचाली  सतत, सर्वकाळ, आदिशक्तींशी एकरूप असतात. त्यांना वेगळे करून आदिशक्ती तीन नाड्यांमध्ये घालू शकतात. तसेच त्यांना एकत्र करून, एकात्म करून पॅराबोला म्हणूनही वापरू शकतात. म्हणून आपण बंधन घालतो, तेव्हा आपण म्हणतो पॅराबोला घाला. हा पॅराबोला असतो कारण त्याच्यात सर्व चैतन्य लहरी असतात, तिन्ही शक्ती त्याच्यात वाहतात.

तेव्हा आपल्याला तुम्ही जाणताच, तीन शक्ती आहेत. महाकाली शक्ती आहे. महाकाली शक्तीने आदिशक्ती इच्छा करतात. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ती परमेश्वराची भावनिक बाजू आहे. ती परमेश्वराच्या भावनिक

बाजूचे प्रतिनिधित्व करते. त्या इच्छा करतात. ती परमेश्वराची जे साक्षी आहेत, त्यांची इच्छा असते आणि

आदिशक्ती त्या साक्षींना तुमच्या हृदयात बसवतात. त्यांना तुमच्या हृदयात प्रतिबिंबित करतात आणि तुम्ही काय करता, तुमची निर्मिती झाल्यावर तुमचे खेळ चालतात, ते पाहण्यास प्रतिबिंब कायम, सर्वकाळ, प्रतिबिंबित ठेवले जाते. आता त्यांची महासरस्वती शक्ती पॅराबोलामध्ये फिरते. ती कोणत्याही कोनातून फिरते, ३६० अंशातून फिरते. एका बिंदूपासून जाते. काही वेळेस ती एका बिंदूवरच गोल गोल फिरते. जेव्हा महासरस्वती शक्ती एकाच बिंदूवर गोल गोल फिरते तेव्हा ती घट्ट होत जाते. घन होत जाते. इतनी घन होते की तिचे तुकडे होतात. हे सर्व तुकडे महाकाली शक्तीच्या महासरस्वती शक्तीच्या फिरण्याच्या गतीमध्ये जातात कारण ती गोल गोल फिरत असते. म्हणून ते तुकडेसुद्धा त्या फिरण्याच्या गतीमध्ये जातात. ते सुद्धा फिरू लागतात. उदा.हा तुकडा फिरू लागतो, तो तुकडा फिरू लागतो वगैरे. फिरू लागल्यावर ते गोल होतात. त्यांचे कंगोरे जाऊन ते गोल होतात. मी तुम्हाला फार थोडक्यात सांगत आहे. हे गोल तुकडे पुन्हा एक दुसऱ्याच्या घर्षणात घातले जातात. अशाप्रकारे आपण म्हणू, दुसर्‍या विश्वांचे सोडून द्या, त्यांच्यासाठी दुसर्‍या पद्धती तयार केल्या होत्या – अशा पद्धतीने हे विश्‍व तयार केले गेले.

आता तुम्ही सतत लक्षात ठेवा, की ही शक्ती विचार करते, समजते, संघटित करते, प्रेम करते आणि तिला जाणीव असते, ओळख असते. तेव्हा, ती पृथ्वीचे सृजन करते. पृथ्वी इतक्या सहज रीत्या बनवली गेली नाही. सूर्याचा एक तुकडा असा हाताने तुम्ही म्हणू शकता, काढला. आता आपण समजले पाहिजे, की सूर्य इतका थंड कसा झाला. सूर्याचा तुकडा त्याच्यापासून फार दूरवर नेला गेला. त्यामुळे तो पूर्णपणे गोठला. मग पुन्हा सूर्याच्या जबळ आणला गेला. लंबकाप्रमाणे थंड बाजूकडे व गरम बाजूकडे हलवत ठेवला. मग मध्यवर्ती ठिकाणी आणला गेला जिथे पृथ्वी तयार झाली. मी पुहा सांगते ही निसर्गातली सहज झालेली घटना नाही. माणसांना राहता यावे म्हणून मुद्दाम घडवून आणलेली आहे. तापमान कमी केले गेले. हे आदिशक्तींनी, आदिमातेने मुद्दाम केले आहे. अशा आईची कल्पना करणे सोपे नाही. पण तिने ते केले आहे आणि तिने पृथ्वीला अशा ठिकाणी आणले जिथे जीवनास आरंभ होऊ शकतो. तेव्हा चंद्र व सूर्य यांच्या एकत्रीकरणाने चंद्रापासून हायड्रोजन येतो व सूर्यापासून ऑक्सिजन येतो, पाणी मिळते. गोठवणे व गरम करणे, पाणी मिळते. पाण्यात, पृथ्वीला वर्तुळात फिरवित वरच्या बाजूस हलवल्याने गरम होणे व थंड होणे सुरू होते. गरम व थंड करण्याने अमायनो असिडच्या रूपात जीवन येते. हे सहेतुकपणे केले जाते. मला सांगायचे आहे, की हे असेच काहीतरी संयोगाने घडले नाही. याच्या वरसुद्धा विचार करायला हवा की हा कसा काय संयोग नाही ? तुम्ही डार्विन वाचा. तो फार मोठा जीवशास्त्रत्र होता. मला वाटते तो सर्वात मोठ्या जीवशास्त्रज्ञांपैकी (बायलॉजिस्ट) एक होता. ज्यांनी याचे गणित मांडले, की पदार्थ मात्रापासून (मॅटर) एक साधा अमीबा तयार करण्यास किती काळ लागला असावा. त्याने गणिताने असे ठरवले की आतापर्यंत जेवढा काळ आपल्याला मिळाला आहे, त्याच्यापेक्षा पुष्कळ जास्त कालावधी लागावा. लाखो करोडो वर्षे लागतात, एक संयोग मिळायला. ‘लॉ ऑफ चान्स’ आहे. मला माहिती नाही, की तो तुम्हाला सविस्तरपणे सांगावे की नाही. पण लॉ ऑफ चान्स असा आहे, की तुम्ही एका ट्यूबमध्ये ५० लाल गोट्या व ५० पांढऱ्या गोट्या मिसळून त्यांचा क्रम पूर्ण नाहीसा केला तर त्यांना पुन्हा पहिल्या क्रमात हव्या त्या क्रमात आणावयास ती ट्यूब इतक्या वेळा हलवावी लागते. तेव्हा एक व्यवस्थित जगणारे प्रोटोप्लाझम, पेशी बनवायला आतापर्यंत जेवढा काळ गेला त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागला असता. फारच जास्त काळ. लक्षावधी वर्षे. पृथ्वीला सूर्यापासून वेगळे होण्यास ५० लाख वर्षे लागली व फक्त वीस लाख वर्षे थंड होण्यास. तेव्हा तो शास्त्रज्ञ म्हणतो, की हे समजण्याच्या पलीकडे आहे, एवढेच स्पष्टीकरण देता येईल. आपण म्हणू शकतो की त्याच्यामागे एखादा जादूगार असावा आणि एक जादुगार आहे, ज्याच्याबद्दल आपले महान क्ररषी मुनी म्हणतात तो जादूगार दुसरा कोणी नसून आदिशक्ती, आदिमाता आहे. आदिपिता सदाशिव आहेत व आदिमाता आदिशक्ती आहेत. आपण त्याच्या लैंगिक संबंधाविषयी बोलू शकतो का? मांत्रिकांबरोबरच आपणही असे करू का? आपल्या आई-वडिलांना आदरांजली देण्याची हीच पद्धत आहे का? आपल्याला हे समजायला हवे, की आपण फार फार उदात्त विषयाची चर्चा करीत आहोत. या ठिकाणी आपण आदिमाता-पिता यांच्या प्रेमाच्या मंदिरातल्या गाभाऱ्याची चर्चा करीत आहोत. ही फार फार पवित्र गोष्ट आहे. आपण पवित्र लोक नाही. आपण अजून हव्यास व वासना यांनी भरलेलो आहोत आणि ते प्रत्येक गोष्टीच्या पलीकडे आहेत. म्हणून त्यांची चर्चा करतांना ती मोठ्या श्रद्धेने आपली मस्तके त्यांच्यासमोर झुकवून करायला हवी. आपले हे सद्‌भाग्य आहे की आपण या आदिमाता -पित्यांच्या बद्दल ज्यांनी ही सृष्टी, त्यांचे अपत्य जन्माला घातले, त्यांच्याबद्दल काही तरी शिकू शकतो.

तेव्हा या गोल तुकड्यांपैकी एक पुन्हा तुटतो आणि सूर्यमंडल होते आणि सूर्य मंडलात जसे तुम्हाला माहिती

आहे, पृथ्वी, चंद्र व इतर आहेत. पृथ्वी कशी निर्माण होते ते मी तुम्हाला सांगितले आहे. पृथ्वीच्या निर्मितीनंतर

प्रथम अमायनो असिडू्स तयार झाले, मग वनस्पतीची सुरूवात झाली आणि नंतर माणसांची सुरूवात झाली. आता पदार्थमात्र (मॅटर) सुद्धा फार पद्धतीशीर आहेत. पदार्थमात्र विस्कळित नाहीत, व्यवस्थित आहेत, पण था संघटित नाहीत. या दोन्ही मध्ये फरक आहे. पद्धतशीर गोष्टी मृत असू शकतात. तुम्ही इथे पाच दगड पद्धतशीरपणे ठेवू शकता, पण ते संघटित नसतात. कारण ते जीवित वस्तू नाहीत. या दोन्हीमधेही फरक आहे. प्रथम पद्धतशीर वस्तू बसवल्या गेल्या. तुम्हाला माहिती असेल, आठ वेगळ्या प्रकारचे मूळ पदार्थ निर्माण केले. निर्मितीनंतर श्रीगणेशांकरवी त्यांच्या योग्य जागी ठेवले गेले. तुम्हाला माहिती आहे, की पिरियॉडिकल एलिमेंट्स (पुनरावर्तित मूळ पदार्थ) जे दिसतात त्यांच्या केंद्रस्थानी कार्बन आहे. याचा अर्थ एक, दोन, तीन, चार व्हॅलन्सीज असलेला मूळ पदार्थ. शिवाय चार व्हॅलन्सीज असलेला कार्बन मायनस (वजा) एक, मायनस २, मायनस ३ व मायनस ४ अशाप्रकारे पूर्ण आठ आहे.

अशा पद्धतीने सर्व पदार्थमात्र (मॅटर) संघटित केलेला आहे. पदार्थमात्र (मॅटर) संघटित करण्यासाठी एक दैवत निर्माण करायचे होते आणि पहिले दैवत जे बनवले ते श्रीगणेश होते. आता ते कसे केले ते आपण पाहू. तुम्ही पाहिले आहे, की आदिशक्तींचा एक भाग-महासरस्वती शक्तीने पदार्थमात्राची (मॅटर) निर्मिती केली आहे. आता महाकाली शक्तीने त्याला अस्तित्व प्रदान करायचे आहे. आता तुम्हाला अस्तित्व कशाप्रकारे मिळते? तर ते तुमच्या धारणेतून (टिकून राहण्यातून), तुमच्या गुणधर्मातून. तेव्हा महाकाली भौतिक पदार्थांना अस्तित्व देते, माणसांना नाही, किंवा जीवित वस्तूंना नाही, तर पदार्थमात्राला (मॅटर) देते, एका दैवतामार्फत, महाकाली ते देते. ते दैवत आहेत श्रीगणेश. विराटाच्या हृदयात, तुम्हाला दिसेल, इथे विराट येतात – कारण ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे-विराट म्हणजे आदि शरीर, पूर्ण आदिपुरूष, त्यांच्या हृदयात महाकाली स्थिरावतात. ती काय करते, हृदयातून ती साडेतीन वेळा खाली जाते. एक वर, एक खाली अशाप्रकारे साडेतीन वेळा आणि खाली उतरत साडेतीनच्या टोकाशी येते. हे साडेतीन झाले आणि आता ती याच्या टोकाशी आली. अशाप्रकारे साडेतीन करून त्याला सरळ छेदले तर तुम्हाला सात छेद मिळतात. (इथे कोणी अशी व्यक्ती आहे का जी चांगल्याप्रकरे रेखाचित्र बनवू शकेल? तुम्ही ते अशाप्रकारे बनवू शकता.) ती खाली, इथे येते, ती इथे खाली आली आणि इथून ती आत जाते. इथे ती सात बिंदूंचा छेद करते. या ठिकाणी ती पहिले दैवत श्रीगणेश बनवते. मला सांगायचंय, हे एका दिवसात होत नाही, एका वर्षात नाही, एका युगात नाही, अनेक कल्पात होते. श्रीगणेशांची निर्मिती ही पहिली पायरी, हे महाकालीचे घर आणि श्रीगणेशांना त्यांनी इथे स्थापित केले आहे. आता श्रीगणेश या सगळ्यांतून त्यांच्या चैतन्य लहरी सोडतात. जे महाकालीने निर्माण केले आहे त्या सगळ्यामधून ते जातात. या चित्रावर, तुम्हाला म्हणता येईल, महासरस्वतीचे कार्य स्थिरावले आहे. तिच्या सर्व कार्यक्रमासहित (प्रोग्रॅम) ती खाली येते आणि इथे पुन्हा मिळते. म्हणून श्रीगणेश तिच्यातून चैतन्य लहरी सोडतात.

र्वप्रथम श्रीमहाकाली, श्रीगणेशांची निर्मिती करतात, तेव्हा श्रीमहासरस्वती खाली येतात. हे सर्व तयार

करून त्या श्रीगणेशांशी जोडल्या जातात. म्हणून श्रीमहासरस्वतीने जे निर्माण केले आहे त्या सगळ्यामधून श्रीगणेशांच्या चैतन्य लहरी (व्हायब्रेशन्स) वाहू लागतात. हे सर्व निर्माण करण्यापूर्वी, भविष्यात काय घडणार आहे, याचा पूर्ण विचार श्रीआदिशक्तींच्या दृष्टीसमोर स्पष्टपणे येतो आणि त्यांच्या सर्व योजनेप्रमाणे त्या कार्यान्वित होतात. सर्वात प्रथम श्री महाकाली खाली येऊन श्रीगणेशांना निर्माण करतात. आता तुम्हाला समजेल, की पवित्र व्यक्ती होणे किती महत्त्वाचे आहे. प्रथम त्यांनी या पृथ्वीवर पावित्र्य निर्माण केले. सर्वात प्रथम त्यांचे मुलांबरोबरचे नातेसंबंध प्रस्थापित झाले. कारण बालकाच्या स्वरूपात सृष्टीची निर्मिती करायची होती. म्हणून सर्वप्रथम श्रीगणेशांची निर्मिती झाली आणि नंतर इथून श्रीआदिशक्तींची दुसरी शक्ती महासरस्वती

खाली येते आणि श्रीगणेशांशी जोडली जाते आणि तशा पद्धतीने श्रीगणेश संबंध प्रस्थापित करतात आणि या सगळ्यातून आपल्या चैतन्य लहरी सोडतात. त्यांच्या चैतन्य लहरींमुळे, जी त्यांनी निर्मिलेल्या पदार्थमात्रातून जातात. उदा.आपली भूमी माता, तिच्यातून अक्ष (अँक्सिस – पृथ्वीच्या केंद्रातून जाणारी सरळ रेषा) जातो. अक्ष कोणी पाहिला नाही, पण ज्या पद्धतीने पृथ्वी फिरते, तिच्यावरून असे म्हणतात की अक्ष आहे. एक प्रकारचा अक्ष आहे. आता, ही महाकालीची शक्ती, आपण म्हणू शकतो, श्रीगणेशांची शक्ती – भूमी मातेच्या अक्षामधून जाते, तिच्यात चुंबकीय शक्ती आहे आणि त्या प्रकारे, त्याच्यामधून पृथ्वीची गती, तिचे फिरणे नियंत्रित होते आणि ती आपली (माणसांची) काळजी घेते. आपण एक लहान बीज मातीत रोवले तर ते आपोआप अंकुरते, याचा आपण का विचार करीत नाही? तुम्ही पाहिले आहे, की तुमच्यापैकी पुष्कळांना काही त्रास होतो, आजार होतो ते भूमी मातेने आत ओढून घेतले, तिने ते शोषून घेतले. हे वास्तव आहे. सहजयोगात, तुम्हाला दिसेल, तुम्हाला काही त्रास असेल, तर डोके जड आहे आणि तुम्ही साक्षात्कारी जीव आहात (अन्यथा ती ऐकणार नाही), तुम्हाला कार्यप्रवण करायचे आहे किंवा श्रीआदिशक्तीने तुम्ही साक्षात्कारी व्यक्ती आहात असे सर्टिफिकेट द्यावे यासाठी. नाही तर ती तुम्हाला का स्वीकारेल ? तर तुमचे डोके जमिनीला लावाल, दोन्ही हात जमिनीवर भूमी मातेवर ठेवाल, तर तुम्हाला समजेल, सर्व त्रास कपाळातून शोषला जाईल. अनेकांचे असे झाले आहे पायातून सुद्धा खाली शोषले जाऊ शकते. भूमी माता, वास्तविक, श्रीआदिशक्तीची आई आहे, तुम्ही म्हणू शकता. ती आई असे म्हणतात कारण तिला असे घडवले आहे, की जगाचा सर्व भार स्वत:मध्ये घेते. ती जगाची सर्व वजने नियंत्रित करते आणि ती तुमचे सर्व वजन शोषून घेऊ शकते. आता वजन म्हणजे तुमचे वजन ‘इतके’ आहे (शारीरिक वजन) ते नाही. वजन म्हणजे तुमची पापे, तुमचे पुण्य, म्हणजे प्रत्येक गोष्ट. तुमच्यात फारच पापे असल्यास पृथ्वी मातेला त्रास होतो. जिथे फारच पाप असते, तिथे भूमी माता मदत मागते. तेव्हा कोणत्या तरी दैवताला, उदा.स्वत: श्रीविष्णूंना येऊन पृथ्वीला असह्य झालेल्या पापाच्या वजनापासून वाचवावे लागते. हे वास्तव आहे. मी कल्पनेतील सांगत नाही. चैतन्य लहरी मिळाल्यावर तुम्ही याचा पडताळा घ्यावा. चैतन्य लहरी मिळण्यापूर्वी पृथ्वीकडून तुम्हाला हे समजणार नाही.

काही वेळेनंतर – तुम्ही साक्षात्कारी असल्यास भूमी मातेवर उभे राहून तिला विचारा, ‘हे भूमी माते, मी साक्षात्कारी आहे, तुम्ही माझी कर्मे काढून घ्याल का?’ लगेच ती काढून घेणे सुरू करते. तुम्हाला आश्‍चर्य वाटेल. तुम्हाला इतके हलके वाटेल! तुम्ही त्यांचा उपयोग करावा. तसेच भूमी मातेला तयार केले आहे. पण आदिशक्तींनी त्यांच्या महासरस्वती शक्तीतून पंचमहाभूतांची निर्मिती केली आहे. सर्वात आधी, ज्याला तन्मात्रा म्हणतात, ते बनवले आहे. मी फार विश्लेषणात गेले तर तुम्हाला जास्त होईल. पण सर्वात आधी त्यांनी कारणात्मक सत्वे तयार केली. पण मी असे म्हटले तर त्यात काही खोटे असणार नाही, की केवळ पाहून  च्या

दृष्टीतून श्रीआदिशक्तींनी प्रकाश तयार केला. त्यांच्या शश्‍वासोच्छवासातून वायू निर्माण केला कारण त्यांची इच्छा अंतिम असते (त्यांच्या इच्छेच्या पुढे कोणी जात नाही). त्यांनी इच्छा केली, की वायू असावा आणि वायू निर्माण केला. तसेच त्यांच्या वास घेण्यातून त्यांनी गंध तन्मात्रा तयार केली व त्याच्यातून पृथ्वी माता तयार झाली आणि हे सर्व फक्त त्यांच्यापासूनच, त्यांच्या इच्छेतूनच, केवळ त्यांच्या इच्छा करण्याने, त्यांच्यासाठी केले गेले आणि अशाच प्रकारे संपूर्ण विश्वात निर्माण केले गेले आणि पुढे तेच पृथ्वी, सूर्य, चंद्र या सर्व गोष्टी निर्माण झाल्या. वास्तविक त्यांची इच्छा मात्र होती जिने या सर्व गोष्टी प्रत्यक्षात आणल्या. जे कोणी केवळ इच्छेने सृजन करू शकते, त्याला समजणे आपल्याला अशक्य आहे, पण आपण असा विचार का करू शकत नाही, की कोणी तरी जगातील सर्व सत्तांच्या वर आहे, ज्या सर्वोच्च आहेत हे आपण जाणतो, ज्यांना हवे असेल ते त्या करू शकतात? असे कोणी तरी असेल अशी आपण कल्पना करू शकत नाही. आपण परमेश्‍वरांची कल्पना करतो त्यांना सर्वशक्तिमान समजतो, पण त्यांच्या शक्तीबद्दल बोलतो (ताकदीबद्दल बोलतो) तेव्हा हसू लागतो. हे कसे असू शकते ? पण त्यांना हवे ते त्या करू शकतात. त्यांच्या केवळ इच्छेने ही सर्व सृष्टी, प्रत्यक्षात आणली आहे आणि जगात या सर्व गोष्टी ज्या तुम्हाला दिसत आहेत, त्या केवळ त्यांच्या इच्छेने तयार झाल्या आहेत. त्यांनी आकाश तत्त्व निर्माण केले. पंचमहाभूते निर्माण केली आहेत, जी तुम्हाला माहिती आहेत. आणि नंतर त्यांनी आपल्या दुसऱ्या रूपातले, ज्याला आपण महालक्ष्मी म्हणतो त्या रूपातले कार्य सुरू केले. त्यापूर्वी मला वाटते, पदार्थमात्रातील श्रीगणेशांच्या अस्तित्वाबद्दल मी तुम्हाला सांगावे. ते पदार्थमात्रात चैतन्य लहरी १ महासरस्वतीच्या च्या चैतन्य लहरी या रूपात कार्य करतात.

त्या विद्युत चुंबकीय चैतन्य लहरी आहेत, महासरस्वतीच्या चैतन्य लहरी विद्युत चुंबकीय आहेत. त्याबरोबरच नाद आणि ही पंचमहाभूते त्यात अभिव्यक्त होतात. तुम्ही त्यांना रेकॉर्ड करू शकता. कारण उदा.तुम्ही सल्फर डाय ऑक्साईड घेतला, सल्फर डाय ऑक्साईड – दोन ऑक्सिजन आणि एक सल्फर आणि तुम्ही त्याला शक्तिशाली सूक्ष्मदर्शकाखाली त्याचे निरीक्षण करा – तुम्ही प्रयत्न करा, लोकांनी केले की नाही, ते मला माहीत नाही, पण तुम्ही प्रयत्न करून शोधून काढा आणि तयार करून त्याला फार मोठ्या सूक्ष्मदर्शकाखाली ठेवा. तुम्हाला पाहता येईल, की सल्फर स्थिर आहे, पण या दोन ऑक्सिजनमधून चैतन्यित करीत आहेत. त्याच्यात चैतन्य लहरी आहेत. ते चैतन्यित करीत आहेत. या दोन चेंडूंच्यामध्ये चैतन्य लहरी आहेत. ते मेट्रिक, सिमेट्रिक, इव्हन व अनइव्हन ही असू शकतात आणि विस्तारित होणारी ही असू शकतात. तेव्हा आपल्याला तीन प्रकारची व्हायब्रेशन्स आढळतात. चौथी बाजू (साइड) दुसरे काही नाही तर नियंत्रण करणारे स्वत:  गणेश आहेत. हे आपल्याला पहायचे असल्यास साध्या डोळ्यांनी दिसू शकते. तुम्ही साक्षात्कारी असा किंवा नसा. या सर्वात लहान, न्यूनतम परमाणूत (मोलेक्‍्यूलमध्ये) काढून चैतन्य लहरी आल्या आणि कशा आल्यात? कोणी सांगू शकेल? इतके ते सूक्ष्म – परासूक्ष्म आहे. श्रीगणेशांच्या शक्ती फार फार सूक्ष्म आहेत आणि त्या पदार्थमात्रात शिरून अशा चैतन्य लहरी या विद्युत चुंबकीय चैतन्यलहरी एका लहान मोलेक्‍्यूलमध्येसुद्धा निर्माण करतात, जे तुम्ही पाहू शकता व रेकॉर्डही करू शकता. जसे मूळ पदार्थांचे (इलिमेंट्स) आहेत. तुम्हाला समजेल, की सर्व मूळ पदार्थांचे आठ प्रकारात वर्गीकरण केले आहे. आता आपण हे पाहू हे एलिमेंट्स आठ प्रकारात कसे वर्गीकृत झाले, ते करायला कोणी नव्हते, तरी ते झाले. या एलिमेंट्सचा व्यवस्थित चार्ट बनवल्याशिवाय काही करणे शक्‍य आहे का? विचार करा! तुम्ही परमेश्वराला आव्हान देता तेव्हा हे पाहायला हवे, की या जगात प्रत्येक पदार्थ इतका व्यवस्थित बसवलेला आहे आणि एलिमेंट्सचे आठ वर्ग इतके व्यवस्थित बसवलेले आहेत. प्रत्येकाचे विशिष्ट वागणे आहे, प्रत्येकाच्या प्रोटॉन्सची वेगळी संख्या आहे आणि ही संख्या इतकी व्यवस्थित आणि अशा पद्धतीने मोजली (कॅलक्‍्यूलेट) गेलेली आहे की शेवटी सर्व प्रोटॉन्सचे शेवटचे वर्तुळ आठ असावे. आठ नसल्यास, आठपेक्षा कमी असल्यास व्हॅलन्सीची समस्या निर्माण होते. इतके सर्व व्यवस्थित बसवलेले आहे, की तुम्ही अभ्यास केला, थोडे रसायनशास्त्र येत असेल तरी किती आश्‍चर्य वाटेल! आपण सर्व गृहीत धरतो. हे सर्व व्यवस्थित बसवायला हवे. हा आपण आपला हक्क समजतो. परंतु बाहेरच्या वर्तुळात आठ प्रोटॉन्सना जसे व्यवस्थित बसवले आहे, त्याच्यावर व्हॅलन्सीज अवलंबून असतात. हे सारे कार्य महासरस्वती शक्तीमधून केले जाते. परंतु चैतन्य कार्यान्वित करणारी प्रेरणा (व्हायब्रेटिंग फोर्स) …… , एक व्हायब्रेटिंग फोर्स आहे. हे सर्व महासरस्वती शक्तीतून, मी सांगितल्याप्रमाणे होते. आता चैतन्य लहरी कार्यान्वित करणारी प्रेरणा आहे. ती अस्तित्वात आहे. पदार्थमात्रही अस्तित्वात आहे. ते अस्तित्वात असायलाच हवे. ते अस्तित्वात नसतील तर काहीच अस्तित्वात असू शकत नाही. म्हणून अस्तित्वाची प्रेरणा ही महालक्ष्मी प्रेरणा, महाकाली प्रेरणेतून दिली जाते. ती प्रेरणा, न्यूक्लियसमध्ये बसलेल्या श्रीगणेशांच्या मधून काम करते. ते प्रत्येक मॉलेक्‍्यूलच्या, प्रत्येक अणूच्या केंद्रकस्थानी (न्यूक्लिअस) बसलेले असतात. तुम्हाला कल्पना तरी करता येईल का की ते किती असतात! आता तुम्ही एक एलिमेंट घ्या. समजा सोने. त्याच्यात किती परमाणू (मॉलेक्यूल) असतात. तुम्ही मोजू शकता का? त्याच्यात किती अणू आहेत, तुम्हाला मोजणे शक्‍यच नाही. तर श्रीगणेशांच्या किती प्रतिमा असतील! अशा पद्धतीने ते साध्य केले आहे. आणखी एक गोष्ट जाता जाता मी तुम्हाला सांगते, किती अमर्याद प्रतिबिंबे पकडली असतील? आता

श्रीशिव आणि श्रीआदिशक्ती दोन वेगळे का आहेत? याचे कारण असे की त्यांना अमर्याद प्रतिबिंबे निर्माण

करायची आहेत. आता तुम्ही अमर्याद प्रतिबिंबे कशी कराल? तुम्हाला माहीत आहे? कोणाला भौतिकशास्त्र

माहीत आहे? दोन आरसे समोरासमोर ठेवून त्याच्या मधोमध एखादी वस्तू ठेवली तर अमर्याद प्रतिबिंबे मिळतात. पहिला आरसा आदिशक्ती आहेत व दुसरा आरसा सृष्टी आहे. अशा प्रकारे पृथ्वीवर अमर्याद प्रतिबिंबे मिळू शकतात. तुम्हाला अमर्याद प्रतिबिंबे मिळू शकतात, त्याचे हे कारण आहे. याच्यासाठी प्रतिबिंबित करणारा दुसरा आरसा निर्माण करावा लागला आणि म्हणून तीन जाणिवा, अस्तित्वे हवी होती, सर्वशक्तिमान परमेश्वर नंतर आदिशक्ती व नंतर संपूर्ण विश्‍व.ते तसेच आवश्यक होते. त्याशिवाय तुम्हाला अमर्याद प्रतिबिंबे मिळू शकत नाहीत. ज्याने हे सर्व घडवले तो फार फार बुद्धिमान माणूस असला पाहिजे, यात शंका नाही. जेव्हा माणसांना वाटते, की बुद्धीतून ते देवाला समजू शकतात, तेव्हा त्यांनी हे शिकावे की ही बुद्धी जी परम आहे, तिथे कसे जायचे ? आपल्या निर्मितीसाठी त्यांनी किती कष्ट घेतले आहेत! पदार्थमात्राला तयार केल्यावर ते किंवा मी म्हणेन त्यांची शक्ती महालक्ष्मी स्वरूपात, पृथ्वीवर उतरते. महालक्ष्मी धारणेस (सस्टेनन्स) मदत करते. सस्टेनन्स याचा अर्थ हे जे मूळ पदार्थ, एलिमेंट्स आहेत त्यांचे स्कॅनिंग, परीक्षण करणे.

जेव्हा पदार्थमात्राची निर्मिती झाली तेव्हा तो विविध प्रकारे तयार केला गेला, वेगवेगळ्या हेतूसाठी बनवला

गेला. पण शेवटी काय? सृष्टीच्या निर्मितीचे अंतिम ध्येय मनुष्याची निर्मिती करणे हे आहे – हे सृष्टीचे सृजन! कल्पना करा! तुम्ही लोक इतके महान आहात, की तुमच्यासाठी हा सर्व त्रास घेतला आहे. मानव हा इतका महत्त्वाचा आहे, की त्याच्यासाठी हा सर्व त्रास घेतला, तुम्हाला निर्माण करताना पदार्थमात्र व जे काही तयार केलेले आहे, त्याचा उपयोग केला जातो. हे अंतिम ध्येय आहे. हा सर्व मंच (स्टेज) मांडावा लागतो. आणि तुम्ही सहजयोग्यांनी मंचावर देखाव्यात यावे.

माणसाचे उपकरण (इन्स्टरमें) तयार करायचे आहे. आता परमेश्वराने माणसाचे इनस्ट्रमेंट का बनवले ? कारण त्यांना असे इनस्ट्रमेंट का बनवले ? कारण त्यांना असे इनस्ट्रमेंट बनवायचे होते, जे त्यांना समजेल, प्रसारित करेल, जशी श्रीकृष्णांनी त्यांची मुरली बनवली. त्यांना आपल्या इनस्ट्रमेंट्स मधून त्यांच्या शक्तीचे संगीत वाजवायचे होते. पण त्यांना असे मृत इनस्ट्रमेंट्स तयार करायचे नव्हते तर जिवंत इनस्ट्रमेंट्स मधून करायचे होते. समजा हे (मायक्रोफोन) हे समजते आहे, प्रेम करू शकत आहे, त्याला मानवी मन आहे आणि पोकळ व्यक्तित्वाप्रमाणे माझा आवाज त्याच्यातून जात आहे, तर हे साक्षात्कारी व्यक्तित्व आहे, पण हे जिवंत शरीर नाही. तुम्ही जिवंत शरीरे आहात. हा सर्व त्रास घेऊन अडचणी पार विशेषकरून माझ्यासाठी इतके काळजीपूर्वक, नाजूकपणे » एकामागून एक बनवले आहे. आता आपल्याला उत्क्रांतीच्या भागात जायचे आहे. हे फार दीर्घ आहे. तेव्हा आता आपल्याला सर्वात महत्त्वाच्या भागात, उत्क्रांतीच्या भागात यायचे आहे. तुम्ही हे समजून घ्या कारण आपल्याला विमानातून उत्क्रांती माहिती आहे. जेव्हा या तीन प्रेरणा अस्तित्वात येतात, तेव्हा पृथ्वी किंवा हे विश्‍व किंवा काहीही निर्माण होण्यापूर्वी प्रथम त्यांना त्यांच्याबद्दल योग्य चित्र तयार करावे लागले आणि व्यवस्थित समजून घ्यावे लागले. ज्याप्रमाणे काही करण्यापूर्वी आपल्याला सर्व योजना बनवाव्या लागतात, आपल्याकडे योजना आयोग असतो त्याच्यात बसूनप्रथम सर्व योजना बनवली जाते. त्याच पद्धतीने प्रथम त्यांना एक टप्पा (स्टेज) किंवा मंच रचावा लागला, जिथे त्यांना योजना बनवता आली. या स्टेजला आपल्याला वैकुंठ अवस्था म्हणता येईल ही सर्वात पहिली अवस्था नाही. ती नंतर निर्माण केली गेली. पहिल्या योजना बनवण्याच्या स्थितीला वैकुंठ स्थिती असे म्हणतात. या स्तरावर त्यांनी अवतार निर्माण केले. पृथ्वीच्या निर्मितीनंतर अवतार निर्माण केले नाहीत. ही चुकीची कल्पना आहे. त्यांनी सर्व अवतार वैकुंठ अवस्थेत निर्माण केले. त्या काळात तुमचा डोळा नव्हता, पृथ्वी नव्हती किंवा तुम्हाला साध्या डोळ्यांनी दिसणारे काहीही अस्तित्वात नव्हते, पण अस्तित्वाची एक स्थिती, सर्वात पहिली, वैकुंठ स्थिती म्हणून ज्ञात असलेली अस्तित्वात होती. त्या वैकुंठ अवस्थेत संपूर्ण विश्वाची आणि संपूर्ण ‘कॉसमॉसची अनेक विश्वे योजना निश्‍चित करण्यात आली. 

तेव्हा प्रथम आलेले व्यक्तिमत्त्व होते श्रीशिव. कारण त्यांच्याशिवाय काहीच अस्तित्वात येऊ शकत नाही. पण त्यांना कुठे स्थापन करायचे, कारण त्यांना कोणावर तरी प्रतिबिंबित करायचे होते. जर श्रीशिवांना प्रतिबिंबित करायचे असल्यास प्रतिबिंबित करणारे, रिफ्लेक्टर निर्माण करावे लागणार होते. तेव्हा प्रथम त्यांना एका आदिव्यक्तित्त्वाचा विचार करावा लागला. त्यांना एक विशाल व्यक्तित्व असे तुम्ही म्हणू शकता, त्यांना विराट असे म्हणतात. त्यांनी विराटाची निर्मिती केली. की हे विराट असतील. हे विराटांचे, आदि व्यक्तित्त्वाचे किंवा आदिपुरूषाचे पूर्ण रूप असेल. ज्याच्याबद्दल मी सांगितले तो हा रिफ्लेक्टर आहे. प्रथम सर्वशक्तिमान परमेश्वरांना प्रतिबिंबित करायचे होते म्हणून सर्वात प्रथम आदिपुरूषाला निर्माण करूया, विराटाला निर्माण करूया. राटामध्ये त्यांनी विविध अवतारांचे सृजन केले. अवतार माणसांमधून निर्माण केले नाहीत. लोकांना असे

का वाटते मला माहिती नाही! माणसे अवतार निर्माण करू शकत नाहीत. पण प्रथम अवतारांना निर्माण केले.

अमीबा ते मानव अशी उत्क्रांती ठीक आहे, पण अवतारांना उत्क्रांती नसते. आरंभापासून त्यांना तसेच बनवले

जाते. मी तुम्हाला विराटाचे चित्र दाखवले आहे. तुम्ही पहिल्याप्रमाणे, विराटामध्ये महालक्ष्मी, महासरस्वती,

महाकाली शक्ती आज्ञा चक्रात मिळतात. तिथे प्रत्येकीने दोन अपत्यांना जन्म दिला – ही गोष्ट नाही, वास्तव आहे – ते बहिण-भाऊ होते. हे बहिण-भाऊ म्हणजे हे अस्थायी स्वरूपाचे पण फार सूक्ष्म स्वभावाचे नाते होते आणि मग त्यांचे विवाह झाले. त्यांचे परस्परांतील संपर्क तयार झाले. महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांनी एकंदर सहा अपत्ये तयार केली. त्यांची लग्ने झाली. आपापसात लग्ने झाली. त्या लग्नामुळे त्यांना कार्यान्वित ऊर्जा (कायनेटिक एनर्जी) असलेले एक आणि सुप्तावस्थेतील ऊर्जा (पोटेन्शियल एनर्जी) असलेले एक अशी व्यक्तिमत्त्वे असलेली जोडपी, अशी कॉम्बिनेशन्स मिळाली. त्या अवतारांची चक्रावर स्थापना करण्यात आली. त्यांना वरून खालच्या बाजूस म्हणजे आज्ञा चक्रापासून खाली आणून चक्रांवर बसवण्यात आले. तुम्हाला माहिती आहे, की या अवतारांना विराटाच्या वेगवेगळ्या चक्रांवर स्थापित केले गेले.

पुष्कळ लोकांना हे समजणार नाही आणि हे ऐकायला आवडणार नाही, कारण माणूस इतका अहंकारी आहे,

की त्याला परमेश्वर सर्वशक्तिमान आहेत व ते प्रत्येक गोष्ट करणार आहेत त्यांच्या करण्याच्या पद्धती आहेत हे

समजत नाही. आता मी तुम्हाला सत्य सांगत आहे की नाही ते तुम्ही चैतन्य लहरींवर तपासून पाहू शकता, हे

अवतार कसे निर्माण केले ते स्वत: समजू शकता आणि हे सर्व अवतार विराटांच्या अवस्थेत इथे, दुसऱ्या बाजूत प्रतिबिंबे निर्माण करण्यासाठी, बसवण्यात आले. श्रीशिवांना शक्तीपासून आरंभी केले होते तसे वेगळे करण्यात आले आणि विराटांच्या मस्तकावर सदाशिवांचे पीठ म्हणून बसवण्यात आले. त्याचप्रमाणे आपल्या

मस्तकावरसुद्धा सदाशिवांचे पीठ आहे. तुम्ही हे पहा, की आपण प्रतिबिंबकाचे प्रतिबिंब (२००0०1 0112

एथ्री20) आहोत. म्हणून आपली ही तशीच पद्धत आहे. आपल्याही मस्तकावर सदाशिवांचे पीठ आहे.

त्यांचीही इथेच स्थापना करण्यात आली आहे. पण जेव्हा कुंडलिनी शरीरात प्रवेश करते, जेव्हा स्त्री गर्भावस्थेत असते, त्यावेळी सदाशिवांचे पीठ किंवा आपण म्हणू शकतो ,या पीठातून ॥ठातून सदाशिव खाली [ली हृदयात उतरतात. आणि त्यामुळे मुळ तुम्हाला ला हृदयात पहिला ठोका का ऐकू येतो. विराटात घडले तसेच इथेही होते. पण वैकुण्ठ अवस्थेत हे निर्माण केलेले नव्हते. दुसरा प्रतिबिबक निर्माण केलेला नव्हता, फक्त पहिलाच केलेला होता. म्हणून फक्त विराटांनाच बनवले होते आणि त्यांच्या शरीरात, योजना बनवण्याच्या टप्प्यावर सर्वात आधी, हे अधिकारी, चक्रांचे प्रमुख, आदिशक्तींनी निर्माण केले. परमेश्वर साक्षी आहेत, श्री आदिशक्ती लीला-नाटक करीत आहेत आणि त्या ही चक्रे निर्माण करीत आहेत. त्या चक्रांवर नियंत्रणासाठी या दैवतांची स्थापना करीत आहेत. आता अस्तित्व आहे, सृष्टी आहे, सृजनात्मक प्रेरणा (फोर्स) आहे आणि उत्क्रांतीची प्रेरणा आहे आणि हे सर्व विराटाच्या अवस्थेत आहे. आता हे वैकुठ अवस्थेत आहे असे आपण म्हणतो, कारण ही अवस्था पहिल्या प्रतिबिंबावर आहे. ही आपल्यात नाही अथवा आपण वैकुंठ स्थिती जाणू शकत नाही कारण ती पहिल्या प्रतिबिंबात आहे. त्याच्यानंतर दुसरी अवस्था मग तिसरी आणि नंतर चौथी अवस्था जी भवसागरांची अवस्था, ज्यावेळी आपले जन्म झाले – अशी निर्मिती झाली. सर्वप्रथम, चौथ्या अवस्थेत, आता चार पातळ्या, स्तर असलेली व्यक्ती आरशासमोर आहे अशी कल्पना तरी करू शकता का? आता पहिली दाखवली जाईल ती कोणती? सर्वात वरची. म्हणून सर्वात वरची भवसागराची अवस्था दाखवली जाईल, पण तुम्ही तुमच्या स्थितीच्या गहनतेत उतराल, तर तुम्हाला इतर तीन अवस्था ही जाणवतील. परंतु पहिली अवस्था, जी तुम्ही पाहू शकता व जाणवू शकता ती भवसागराची अवस्था आहे. या स्तरावर तुम्ही भवसागराच्या स्थितीत आहात. या भवसागराच्या अवस्थेत तुम्हाला निर्माण केले आहे व तुम्हाला उत्क्रांत व्हायचे आहे.

यावेळी तुमच्या उत्क्रांतीसाठी महालक्ष्मी शक्ती कार्य करते. उत्क्रांती कशी घटित झाली ते तुम्हाला आधीच

माहिती आहे. आमच्या पुराणांत सांगितल्याप्रमाणे उत्क्रांती कशी झाली – जे वास्तव आहे – ते मी तुम्हाला

सांगते. मनुष्याच्या उत्क्रांतीची सुरूवात अमीबापासून झाली, तुम्हाला म्हणता येईल, कारण प्रथम पाण्यात जीवन अस्तित्वात आले. मी सांगितले आहे की प्रथम पाणी निर्माण झाले. पाण्यात अमायनो असिड्स बनले, मग अमीबा बनले आणि मासे बनले. मासे बनले तेव्हा समजले, की लहान माशांना जगणे अवघड झाले कारण मोठे मासे त्यांना खाण्याचे प्रयत्न करीत होते. त्याची प्रतिक्रिया होते. लहान मासे या विनाशाला कंटाळले होते. या वेळी श्रीविष्णू जे उत्क्रांतीची शक्ती आहेत, स्वत: मत्स्यावतारात पृथ्वीवर अवतरले. त्यांनी काही माशांना

किनाऱ्यावर येण्यास मदत केली. जसे ते लीडर होते त्यांच्यात पार करण्याचे साहस होते. ही उत्क्रांतीची पहिली

पायरी आहे. हे मासे पुढे जाऊन उत्क्रांतीच्या अवस्थेत सरपटणारे प्राणी झाले. पण ते सरपटणारे प्राणी कसे झाले ? त्यांना कोणीतरी नेतृत्व देणारे आवश्यक होते. परत हे कार्य श्रीविष्णूंनी केले. ज्यांनी कूर्म अवतारात पृथ्वीवर येऊन त्यांना नेतृत्व दिले. या वेळी वैकुंठ अवस्थेत अनेक गोष्टी केल्या गेल्या. त्या श्रीविष्णू कूर्मावतारात पृथ्वीवर येण्यापूर्वी झाल्या. त्यांनी ही पृथ्वी निर्माण केली तेव्हा संपूर्ण विराटाची योजना तयार केली. त्यांना प्रतिबिंबकाच्या या बाजूस जे करायचे होते त्याची संपूर्ण योजना आणि संपूर्ण विचार त्यांनी केला. त्या प्रक्रियेत काही निरूपयोगी गोष्टी निर्माण झाल्या व पुढे आल्या. हे निरूपयोगी पदार्थ दूषित झाले किंवा आपण म्हणू एका बाजूला साठून राहिले. काही तरी कारणाने त्याच्याकडे दुर्लक्ष झाले आणि त्याच्यामधून सैतानी ताकद बाहेर पडायला सुरूवात झाली. सैतानी ताकद व चांगल्या शक्ती यांच्यात मोठे युद्ध झाले. हे तिसऱ्या अवस्थेत, वैकुंठ अवस्थेत नाही, तर तिसऱ्या अवस्थेत झाले. कारण जेव्हा योजना बनायला आणि ती कार्यान्वित करण्यास आरंभ झाला तेव्हा सैतानी शक्ती सुरू झाल्या. आता लोक म्हणतील, की परमेश्वराने सैतान का निर्माण केले? त्यांनी नाही केले. पण शेवटी तसे ते झाले. कारण दुसऱ्या अवस्थेत जेव्हा देवांपैकी काहींनी त्यांना निर्माण केले, ते उत्क्रांत झालेले लोक नव्हते, पण ते सर्व पंचमहाभूतांचे आणि तत्त्वांचे आणि या सर्व कार्याचे प्रमुख होते असे अधिकारी व बाहेर जाऊन कार्य करणारे लोक निर्माण करावे लागतात. या देव-देवतांच्या कार्यातून काय झाले ? त्यांच्यापैकी काही भरकटले व सैतानी शक्ती झाले. एक प्रकारचा निरूपयोगी पदार्थ उद्भवला. त्या निरूपयोगी पदार्थाबरोबर सैतानी शक्ती सुरू झाल्या आणि ते अशा प्रकारे वागले, की कूर्मावताराच्या काळात राक्षसांच्या, असुरांच्या बरोबर युद्ध झाले. म्हणून चांगले  लोक जे एलिमेंट्सचे प्रमुख होते. परमेश्वराच्या कार्यालयात काम करीत होते. त्यांनी सैतानी ताकदींशी युद्ध सुरू

केले. या काळात त्यांनी स्वत: हे कार्यान्वित केले आणि तुम्हाला माहिती आहे की अमृत मंथन झाले तेव्हा काय झाले. लोकांना हे समजत नाही, की अमृत मंथन भवसागरात कसे झाले. ते झाले नाही. ते भवसागराच्या अवस्थेत झाले नाही. आता आपण भवसागर अवस्थेत आहोत. या भवसागराच्या अवस्थेत तेच कूर्म (श्रीविष्णूंचा अवतार) पृथ्वीवर जन्माला आले आणि आपल्याला योग्य सरपटणारे प्राणी कसे व्हायचे याची समज दिली. सर्व सांगण्यात बराच वेळ जाईल. मी त्याच्यात जाणार नाही, पण अंतिमत: माणसाला निर्माण केले. हे सर्व महालक्ष्मी शक्तीने केले. त्यांनी श्रीविष्णूच्या माध्यमातून कार्य केले. तेच मी तुम्हाला सांगितले की उत्क्रांती कशी झाली व तुम्हाला कसे तयार केले.

आता काय होणार आहे? तुम्ही या बिंदूपर्यंत (पॉइंट) येता, या बिंदूवर जिथे येशू ख्रिस्त आले, ख्रिस्त सुद्धा

अवतार होते आणि त्यांची आई दुसरे कोणी नाही, तर राधाजी, महालक्ष्मी स्वत: होत्या. ते मानवाला या

अवस्थेपर्यंत पुढे घेऊन आले. याच्या पुढे आता मनुष्याला काय व्हायचे आहे? त्या अवस्थेत जायचे आहे. जिथे तो निर्विचार होईल याचा अर्थ भवसागरापुरतीच चेतना राहिली नाही तर तुम्ही थोडे त्याच्या पुढे जाता. याच्यापुढे तुम्ही वैश्‍विक अचेतनेच्या अवस्थेत गहनतेत जाता. त्याला अचेतन म्हणतात. ते दुसरे काही नाही, तर तीच शक्ती जी इथे अस्तित्वात आहे, जी तिन्ही शक्तींचे एकत्रीकरण आहे. हे तीनही शक्तींचे एकात्म होणे आहे. ती आदिशक्तींची शक्ती आहे. आदिशक्तींची शक्ती सर्वव्यापी आहे, ती प्रत्येक ठिकाणी अस्तित्वात असते. पण आपल्याला इतर स्थितीत ती जाणवत नाही. का? याचे कारण आपण फार स्थूलात असतो. समजा एक ट्यूब आहे, तिच्यात चार स्तर आहेत, त्याच्यापैकी फक्त बाहेरची ट्यूबच वापरली जाते कारण आतल्या ट्यूब्ज सर्व बंद आहेत. पण सर्वात आतली ट्यूब उघडेल तेव्हा तुम्ही परम परिपूर्ण आत्मसाक्षात्कारी व्हाल, पण दुसरी ट्यूब उघडली तरी तुम्हाला परमेश्वराच्या सर्वव्यापी शक्तीची जाणीव होईल. जिला आपण सर्वव्यापी अचेतन म्हणतो. पण आता ती मच्यासाठी अचेतन नाही कारण तुम्हाला त्याची जाणीव, त्याची चेतना आहे.

अशा प्रकारे तुम्ही परमेश्वराशी संभाषण सुरू करता. काय होते की इथे प्रतिबिंब आहे, इथे प्रतिबिबक (रिफ्लेक्टर) आणि प्रतिबिंबित होणे आहे. इथून तुमचे उत्थान या भागात होते. तुमचे या भागात उत्थान होते.

तुम्ही हे होत नाही, तर तुम्ही या भागात उन्नत होता. या इथून तुम्ही या क्षेत्रात उन्नत होता. आणि हे क्षेत्र

श्रीआदिशक्तींच्या सर्वव्यापी शक्तीने भरले आहे. तुम्हाला अवताराच्या या स्तरापर्यंत जायला हवे. हे अर्थातच मोठे अंतर आहे. मी म्हणू शकते की बुद्ध आणि महावीर दोन्ही या उंचीवर उन्नत झाले होते. पण त्यांचा निरिच्छपणा पहा ! उदा .बुद्धांचा निरिच्छपणा पहा. पण लोकांनी काही ज्ञान नसतानाही जसे पुतळे बनवले आहेत, त्यांनी दाखवले आहे, की देवी श्री शिवांवर उभी आहे, पार्वती आहे, ती श्रीगणेशांना मारते आहे! हा सर्व मूर्खपणा आहे. त्यांनी त्या शक्तीची प्रतिमा, जी एकात्म शक्ती आहे, जी सर्व काही घडवून आणते आहे, एकच कल्पना आहे, एकच मन अहे, ती प्रतिमा नष्ट केली आहे. जे लोक एकात्म होऊ शकले नाहीत, ते राक्षस झाले, सैतानी शक्ती झाले. मी सांगितल्याप्रमाणे हा फार फार अवघड विषय आहे, मी समजावण्याचा प्रयत्न केला आहे. इंग्रजीत तर जास्तच अवघड आहे. माझ्याकडून सर्व प्रयत्न केला आहे. तुम्हाला प्रश्‍न असल्यास मला विचारू शकता, मला पत्र लिहू शकता.

उद्या…….. मला तुम्हाला हेच सांगायचे आहे, की तुम्हाला जाणिवेतली निर्विचारिता आली आहे यात

शंका नाही. तुमच्यापैकी बहुतेकांना जाणिवेतली निर्विचारिता आली आहे, तुम्हाला चैतन्य लहरी मिळाल्या

आहेत. पण तुम्हाला निर्विकल्पात जायला हवे. निर्विकल्पात आणि ते गहन ध्यानातून, आंतरिक गहनता खुली

करून. अन्यथा, निर्विचारितेच्या या लहान अवस्थेचा काही उपयोग नाही. तुम्हाला निर्विकल्पात जायलाच हवे. पण पुष्कळ जण अजून वर-खाली जातात. या अवस्थेला झेन धर्मात सतोरी (५5101) असे म्हणतात – यात माणूस वर-खाली जातो, म्हणजे त्याला पकड येते, तो हे करतो, ते करतो वगैरे. या स्थितीवर मात करायला हवी. मग तुम्ही निर्विकल्प अवस्थेत जाता. निर्विकल्प अवस्थेच्या शेवटी तुम्हाला विशेष पकड येत नाही. तुम्हाला पर्वा नसते. अजून मला तसा माणूस भेटला नाही. मी मोठे संत पाहिले आहेत, साक्षात्कारी लोक पाहिले आहेत, ते निश्‍चित आत्मसाक्षात्कारी आहेत हे मी सांगू शकते, निसर्गावर नियंत्रण करतात, पण तरी सुद्धा त्यांची चक्रे पकडतात. हे आश्‍चर्यकारक आहे. पण माणसे तशी असतात. ते तिसऱ्या आत्मसाक्षात्काराच्या अवस्थेत पूर्ण गेलेली असतात, पण ते पुन्हा सतोरी अवस्थेत येतात, पुन्हा वर जातात, असे होते. पण अजून मला एकही माणूस भेटला नाही, जो मी म्हणेन पूर्ण आत्मसाक्षात्कारी आहे, ज्याची चक्के पकडत नाहीत. माझा अपवाद सोडल्यास मला प्रत्येक स्त्री चक्रे पकडतांना दिसतात. चक्रे पकडली जात नाहीत, ही अवस्था मिळवणे अवघडआहे. पण ती कशी मिळवायची ? तर चक्रांच्या पकडण्याकडे तुम्ही अशा दृष्टीने पहा, समजा तुमचे आज्ञा चक्र पकडले आहे. समजा तुमची आज्ञा पकडली आहे, तर आपली आज्ञा पकडली आहे हे तुम्हाला समजायला हवे. तेव्हा तुम्ही असा विचार करू नका, की तुमचे आज्ञा चक्र पकडले आहे, तर असा करा, कीदुसऱ्या माणसाशी लढण्यासाठी तुम्ही शक्ती (फोर्स) एकत्र करीत आहात. तुम्हाला तसे करता आले, समजा तुमचे विशुद्धी चक्र पकडले आहे. तेव्हा आपले विशुद्धी चक्र पकडले आहे असे म्हणून त्याच्याबद्दल नाराज होण्यापेक्षा तुम्ही असा विचार करा, की त्या व्यक्तीच्या विशुद्धी चक्राला समोरच्या बाजूने तुमच्या बाजूने संतुलनात आणण्यासाठी तुम्ही ही शक्ती (फोर्स) एकत्र करीत आहात. याचा, मला वाटते, फायदा होईल. म्हणून मी नेहमी सांगते, की तुमचा हात पुढे करा आणि स्वत: अनुभव घ्या. याचा पुष्कळांना उपयोग झाला आहे. कारण त्यांची आज्ञा पकडत असेल आणि ज्याची आज्ञा पकडली आहे अशा माणसाला त्यांनी व्हायब्रेशन्स दिल्यास ते मोकळे होतात. हे फार थोड्यांना होते, पण होते. तेव्हा तुम्ही हे करून बघा. तुमचे चक्र पकडले आहे असा विचार करू नका तर असा विचार करा, की दुसऱ्या माणसाच्या आज्ञा चक्रावरची पकड काढण्यासाठी ही शक्ती एकत्र झाली आहे. आरंभी, अर्थात, ही हळूहळू होणारी क्रिया आहे, पण हळूहळू तुम्हाला जमेल. फक्त लोकांनी दुसर्‍यास द्यायला सुरू करायला पाहिजे.

हा सामूहिक विचार आहे, सामूहिक विचार आहे. आता तुम्ही असे म्हणू शकता, समजा माझ्यावर मलेरियाचा

अटॅक आहे, तेव्हा माझ्या स्वत:च्या रक्तातील पेशी त्याच्याशी लढत आहेत आणि त्या लढत आहेत. मी सोडून दिले, शरण गेले तर मला मलेरिया होईल, पण मी शरण गेले नाही, तर मी जिंकेन. चैतन्य लहरी देतांना तुम्ही असा विचार कराल की तुमचे चक्र पकडल्यास तुमच्यात ही शक्ती गोळा होत आहे, तर सर्व क्रषी-मुनी एकत्र येऊन होईल, त्याच्यापेक्षाही तुम्ही जलद व्हाल. पण माणसांना असा विचार करणे जरा अवघड असते कारण एकदा त्यांचे चक्र पकडले तर त्यांना काळजी वाटते आणि स्वत:च पकड काढण्याची सुरूवात करतात, पण तुम्ही स्वत:च स्वत:ची पकड न काढता, दुसऱ्याला चैतन्य लहरी देण्याचा सर्व प्रयत्न करा, तर ते चांगल्या प्रकारे कार्यरत होईल. मी एक दोन लोकांवर याचा प्रयोग केला आहे आणि मी सांगते आणि त्याने काम झाले. प्रत्येकात ही क्षमता नसते. हळूहळू तुम्ही उभे राहता. कारण अजून तुम्ही नवजात शिशू आहात. अजून तुमची वाढ व्हायची आहे. तुम्ही शिकत असाल, तुम्हाला पुष्कळ ज्ञान असेल पण तुमच्या आध्यात्मिक स्थिती संबंधात, तुम्ही नुकतेच सतोरी अवस्थेतून बाहेर आला आहात – काही जण, तर काही जण अजून ही सतोरी अवस्थेत असतील. तेव्हा काळजी घ्या. मला तुम्हाला भेटायचे अहे, कदाचित दोन वर्षांनी, मला माहीत नाही केव्हा ? उद्या आपण इथे ध्यान घेणार आहोत. तिथे मी जास्त बोलत नाही. इथे ध्यान केंद्र आहे. तिथे तुम्ही जा, भेटा. तुम्ही ग्रुपमध्ये एकत्र येता तेव्हा ते सामूहिक कार्य होते, तिथे मी असेन. तुम्हाला आश्‍चर्य वाटेल, माझ्या चैतन्य लहरी जेवढ्या ग्रुपमध्ये जाणवतात, तेवढ्या दुसरीकडे जाणवत नाहीत आणि मला हे ज्ञात असते, की हा प इथे काम करीत आहे.

दिल्लीमध्ये तीन गट कार्यरत आहेत आणि ते जवळच आहेत. तुम्हाला माहिती असेलच, की इतर लोक गेले, तसे तुम्हाला हिमालयात जाण्याची आवश्यकता नाही. हे सगळे करण्याची गरज नाही. आपल्याला फक्त आपल्याजवळ असलेल्या ठिकाणी जायचे आहे. सगळे आपल्या दरवाजात आणले आहे, ज्ञान, चैतन्य लहरी, आत्मसाक्षात्कार आणि प्रत्येक गोष्ट एवढी सोपी केलेली आहे. पण याचा अर्थ असा नाही, की तुम्ही हे होणारच असे गृहीत धरावे. मी म्हणेन, की हे सर्व माझ्या मोठ्या तपस्येतून सोपे झाले आहे.

मी अनेक युगात, हजारो वर्षे राहिले आहे, अनेक माणसांवर अनेक गोष्टींवर हे घडवले आहे आणि शेवटी

मला बहुतेक सर्व माणसांचे विविध गट एकत्र करणे, त्यांना विविध पद्धतींनी योग्य प्रकारे एकत्र करणे शक्‍य झाले आहे. मी त्या पद्धतीने केले नसते, तर जमले नसते. अशा प्रकारे ते घटित झाले आहे, बहुतेक सर्व लोकांवर झाले आहे. फक्त एकाच प्रकारच्या लोकांचा अपवाद आहे, जे राक्षसांशी बांधले गेले आहेत त्यांच्यासाठी फार फार अवघड आहे. जे राक्षस म्हणून जन्माला आले आहेत त्यांच्या पायाला तुमचे डोके लागले असेल, तर ते फार अवघड आहे. तेव्हा तुम्हाला मी इशारा देते की कोणाच्याही पायाला स्पर्श करण्यापूर्वी काळजी घ्या. ईश्वराचे तुम्हाला आशीर्वाद! तुम्हाला सगळ्यांना आधीच उशीर झाला आहे एवढा अवघड विषय इतक्या थोड्यावेळात मांडणे फार अवघड आहे. सहजयोगावर मी एक पुस्तक लिहिणार आहे. ते होईल अशी आशा आहे, मी आशा आहे असे म्हणते कारण मी अजून एक ही पुस्तक लिहिले नाही. मी लिहायचा प्रयत्न करीत आहे. पण त्यापूर्वी दुसरे काही लोक लिहीत आहेत. मी पण लिहीन अशी आशा आहे. पण काहीही असले तरी, तुमच्या स्वत:च्या साक्षात्कारापेक्षा आणि तुमच्या उत्थानापेक्षा याला जास्त महत्त्व नाही. संपूर्ण ज्ञान तुम्हाला मिळेल, प्रकाशमान होईल. तुम्हाला काही करायला नको. प्रत्येक शब्द जो तुम्ही

वाचाल, त्याचा अर्थ लागेल व ते तुम्हाला समजेल. पहिली गोष्ट ही की तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळायलाच हवा. दुसरी ही, की तुमचे उत्थान व्हायलाच हवे. अधिक अधिक उत्थान व्हायला हवे. आणि याच्यासाठी वेळ द्यायला हवा. हे होणारच असे गृहीत धरू नका. ही फार महत्त्वाची गोष्ट तुम्ही करायला पाहिजे. इतर गोष्टी पण आहेत त्याही महत्त्वाच्या आहेत आणि हे करायलाच पाहिजे. परमेश्वराच्या कृपेने हे घटित झाले तर मला आनंद होईल. तशीच मी फार आनंदात कारण माझ्या कोणत्याच जन्मात इतक्या लोकांना आत्मसाक्षात्कार देणे मला शक्‍य झाले नव्हते. म्हणून आहे तशीच मी फार समाधानी आहे, पण अधिक, आणखी अधिक मागा आणि ते दिले जाईल. कारण तुम्ही लोक मंचावर आहात. तुम्हाला या हेतूनेच बनवले आहे. हे करायलाच पाहिजे. परमेश्वरांना हे करायलाच पाहिजे. त्यांनी हे केले नाही, तर त्यांच्या स्वत:च्या इच्छा ते पूर्ण करू शकणार नाहीत आणि त्यांनी स्वत: निर्माण केलेली सृष्टी ते नष्ट करणार नाहीत.

परमेश्वराचे तुम्हाला आशीर्वाद!