Sahaja Yoga is a big blessing (India)

Sahajayogacha Upyog Saglyani Karun Ghyava ICI 25th March 1977 Date : Place Kalwe Public Program Type Speech Language Marathi यांनी हा सुंदर योग घडवून आणलेला आहे, की मी आज आपल्याला सर्वांना भेटायला इथे खारे गावात आलेली आहे. असे योगायोग जुने असतात. जन्मजन्मांतरातले असतात ते. आणि त्यांची पुनरावृत्ती अशी कशी कशी होते ते आपल्या एवढं लक्षात येणार नाही, कारण आपल्याला आपले पूर्वजन्म माहीत नाहीत. पण हे पूर्वजन्माचेच योगायोग आहेत. आणि त्यामुळेच आज परत, या जन्मातसुद्धा आपणा सर्वांना भेटण्याचा, हा उत्तम योग आलेला आहे. इथे येण्यात मला इतका आनंद होत आहे की तो मी खरंच शब्दांनी वर्णन करून सांगू शकत नाही. ग्रामीण विभागात, सहजयोग, फार उत्तम तऱ्हेने पोहोचला जाईल हे मला माहीत आहे. कारण शहरात राहणारे हे लोक, ही मंडळी स्वत:ला फार शहाणी समजतात. एक तर बहुतेक पढतमूर्खच असतात. पढतमूर्ख नसले तर पैशाच्या व सत्तेच्या दमावर स्वत:ला काही तरी विशेष समजतात. त्यांना असं वाटतं की सगळं जग त्यांनीच निर्माण केलेलं आहे. हे आकाशसुद्धा त्यांनीच निर्माण केलेले आहे आणि तेच परमेश्वराच्या ठिकाणी आहेत आणि परमेश्वर नावाची वस्तु काही जगात नाही. कधीही त्यांना कोणतंही वाईट काम करताना परमेश्वराचा विचार येत नाही, की आपण हे अधर्माचं कार्य करीत आहोत. अजून आपल्या देशातली ग्रामीण वस्ती किंवा ग्रामीण मंडळी परमेश्वराला आठवून आहेत. आपली भारतभूमी ही एक योगभूमी आहे आणि रामाने आणि सीतेनी पायी प्रवास करून सर्व भूमीला पुनीत केलेले आहे, पवित्र केलेले आहे. ग्रामीण समाजामध्ये, जो एक साधेपणा, भोळेपणा आणि परमेश्वराची परम भक्ती आहे, त्याचा दुरुपयोगसुद्धा लोक करतात म्हणजे पुष्कळसे लोक खोट्या गोष्टी सांगून पैसे उकळतात. काही तरी भोळ्याभाबड्या लोकांना भिववून काही तरी देवाबद्दल गोष्टी सांगून त्यांच्यामध्ये Read More …