Seminar (India)

Aapan Dharma Janla Pahije Date 19th January 1979 : Place Kalwe Seminar & Meeting Type Speech Language Marathi लंडनहुन मुंबईला यायचं म्हणजे फार बरं वाटतं कारण लंडन फारच गजबजाटातलं आणखीन अत्यंत यांत्रिक शहर आहे आणि तिथल्या लोकांची एकंदर प्रवृत्तिसुद्धा यांत्रिक झालेली आहे. मग मुंबईहन कळव्याला यायचं की त्याहून बरं वाटतं. कारण शहरातून जी स्थिती आज लोकांच्या मनाची आणि श्रद्धेची होत आहे ती पाहून असं वाटतं की कुठूनतरी दोन-चार मंडळी खऱ्या श्रद्धेची असतील अशा ठिकाणी जावं . आमचा सहजयोग हा खेड्यापाड्यातून होणार आहे , शहरातून होणार नाही. हे मागे मी बोलले होते आणि त्याची प्रचिती आम्हाला येते. आता तुम्ही मुंबईच्या जरा जवळ असल्यामुळे थोडंबहूुत शहराचं वातावरण आलं आहे तुमच्यात, पण तरीसुद्धा ह्या प्रसन्न, नैसग्गिक वातावरणात रहाणाऱ्या लोकांना परमेश्वराची जाणीव सतत असते. परमेश्वर आहे किंवा नाही त्याबद्दल आपण आजपर्यंत जे काही वाचत आलो होतो त्यात काही अर्थ आहे की उगीचच आपल्याला काहीतरी भुलवण्यासाठी म्हणून लोकांनी हे ग्रंथ लिहिले आहेत, हे पडताळून पहाण्याची आणि त्याची पूर्णपणे प्रचिती घेण्याची ही वेळ आहे कारण आपण देवाच्या नावावर अनेक उपटसुंभ लोकच बघत असतो. देवळात गेलं की तुम्हाला पैसे द्यावे लागतात. दोन पैसे द्या तेव्हा तुम्ही जवळ राहणार. एखादा श्रीमंत मनुष्य जर देवळात आला की लगेच पहिल्यांदा त्याच्या गळ्यात हार, सगळ्यात मोठा हार देवाचा त्याला घातला जातो. जसं काही देवालासुद्धा पैशाचं फार समजतं ! त्यातनं जर तो एखाद्या मोठ्या मोटारीतून आला तर त्याला आणखीनच फार जवळ समजलं जातं. पण देव हा भावाचा भूकेला आहे. त्याला पैसा, अडका आणि बाहेरची श्रीमंती समजत नाही. त्याला श्रद्धेची श्रीमंती समजते. तो श्रद्धेचा भुकेला आहे आणि श्रद्धाच त्याला ओळखू शकते. आता श्रद्धेचा Read More …