Seminar Ahmednagar (India)

कुण्डलिनी शक्ती आणि सात चक्र अहमदनगर, २३ फेब्रुवारी १९७९ अहमदनगरच्या नागरिकांनी इतक्या प्रेमाने आम्हाला आमंत्रण पाठवलं त्याबद्दल आम्ही सर्वच आपले फार आभारी आहोत. त्यातूनही अहमदनगर जिल्हा म्हणजे काही तरी मला विशेष वाटतो. कारण राहुरीला जे कार्य सुरू झालं आणि जे पसरत चाललं त्यावरून हे लक्षात आलं की या जिल्ह्यामध्ये काहीतरी विशेष धार्मिक कार्य पूर्वी झालेलं आहे. तसेच महाराष्ट्र हा एक आध्यात्मिक परिसर आहे. म्हणून अनेक संतांनी इथे जन्म घेऊन अनेक कार्य केलेली आहेत. सगळ्यात शेवटी सांगायचे म्हणजे साईनाथांनी आपल्याला माहिती आहे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये फार सुंदर कार्य केलेले आहे. ही सगळी तयारी अनादिकालापासून मानवामध्ये झालेली आहे.  मनुष्य हा एक अमिबापासून वाढत वाढत आज या दिशेला पोहोचलेला आहे की तो परमेश्वराबद्दल विचार करू लागला. तो अमिबापासून या दशेला का आला ? एवढी मेहनत त्याच्यावर का घेतली गेली? तो आज मानव स्थितीत येऊन तरी पूर्णत्वाला आलेला आहे की नाही ? ज्यासाठी त्याला अमिबापासून त्या स्थितीला आणून सोडलेले आहे त्या स्थितीत येऊन तरी काय त्याला सगळे माहीत झालेलं आहे? परमेश्वराबद्दल जे त्याच्यामध्ये कुतूहल आहे, काहीतरी उत्कंठा आहे, जिज्ञासा आहे. परमात्मा म्हणून कोणी तरी शक्ती संसारात आहे, असं प्रत्येक मानवाला वाटत असतं. ते त्यानं कसं जाणलं, कुठून जाणलं? त्याबद्दल त्याने पुष्कळ पुस्तकं लिहिली आहेत, संतांची पूजा केलेली आहे. त्रास ही दिलेला आहे. अशा या मानवाला काहीतरी अर्थ असला पाहिजे. वायफळ कुणीतरी इतकी मेहनत केलेली नसणार. निदान परमेश्वराने तरी केलेली नसणार. जर समजा आम्ही हे एक यंत्र बनवलं. त्याचा आधी पाया घातला, त्याची सबंध व्यवस्था केली तर सहजच आपण विचाराल की ‘माताजी, कोणासाठी? काय आहे हे? काय बनवणं चालवलंय तुम्ही? याच्यातून काय होणार?’ हे सगळं Read More …