Seminar Day 3 Rahuri (India)

विज्ञान म्हणजे सत्याला शोधून काढणे राहुरी, २४/२/१९७९ अनुभव किंवा स्वत:चे विचार सांगितलेले आहेत. वेळ कमी असल्यामुळे ते काही तुम्हाला पूर्णपणे सांगू शकले नाहीत. तरी सुद्धा एक गोष्ट त्यात लक्षात घेतली पाहिजे, की यांच्या भाषणामध्ये आपल्या भारताची केवढी थोरवी यांनी सांगितली आहे. आता आपल्याला ज्या पाश्चिमात्य लोकांनी सहजयोगाबद्दल स्वत:चे इतकेच नव्हे, तर आपल्या देशामध्ये जी मर्यादा आहे, जी श्रद्धा आहे आणि धर्म आहे, किती महत्त्वाची आणि विशेष वस्तू आपल्याजवळ आहे, त्यावर त्यांनी फार भर दिलेला आहे. कारण हे सगळे त्यांनी घालविलेले आहे. परदेशात मी अनेकदा गेले होते पूर्वी, पण तिथली स्थिती इतकी भयंकर आणि गंभीर असेल अशी मला मुळीच कल्पना नव्हती. जेव्हा आमच्या साहेबांची निवडणूक झाली आणि मला लंडनला जावे लागले, तिथे रहावेच लागले, त्यानंतर मी तिथे सहजयोगाच्या कार्याला सुरुवात केली म्हणण्यापेक्षा याच लोकांनी सुरुवात करवली कारण यांना लोकांकडून कळले होते, की माताजी इथे आलेल्या आहेत. तेव्हा त्या समाजाशी संबंध आल्यावर मला आश्चर्य वाटले, की सायन्सच्या दमावर हे लोक सत्यापासून किती दूर गेलेले आहेत. सायन्स म्हणजे सत्याला शोधून काढणे. सायनंस म्हणजे जे काही असेल त्यातील खरे काय आहे ते शोधून काढणे, पण यांचे सायन्स जे काही असेल ते सत्यापासून दूर का निघाले, ते आपण बारकाईने समजावून घेतले पाहिजे. मनुष्य जसा आहे, तसा अपूर्ण आहे. तुम्ही अजून पूर्णत्वाला पोहोचलेले नाहीत मुळी. जसे हे मशीन आहे. त्याला मी मेन्सला लावले नाही तर याचा काहीच उपयोग नाही किंवा याला काहीही अर्थ लागत नाही. त्याचप्रमाणे माणसाचे आहे. जोपर्यंत माणसाची आत्म्याशी ओळख झालेली नसते, जोपर्यंत त्याचा संबंध परमेश्वराशी आलेला नसतो, जोपर्यंत त्याचे आत्म्याचे डोळे उघडलेले नसतात, तोपर्यंत तो अपूर्णच आहे. त्यामुळे सत्य काय आहे ते लक्षात Read More …