Puja

Pune (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

महाशिवरात्रि,राजवाडे मंगल कार्यालय, पुणे,दिनांक २५/०२/१९७९,वेळ सायंकाळी ६.०० वा.

Part 1

आजची महाशिवरात्री आहे.म्हणून मी आपल्याला आज शिवांचं महत्व सांगणार आहे. ते समजून घेतलं पाहिजे. ब्रह्मदेवानी ही सगळी सृष्टी जरी घडवली असली आणि त्या सृष्टीत उत्क्रांतीमूळे मानवपद आपल्याला मिळालेलं आहे आणि हे मानवपद आपल्याला विष्णूच्या शक्तीमुळे मिळालेलं आहे. तरीसुद्धा ह्या मानवाला शिवतत्व मिळवायचं असतं. शेवटी विष्णूला शिवाची पूजा करावी लागते. एवढं शिवाचं महत्व आहे.शिवतत्व म्हणजे आपला आत्मा आहे. ही सगळी धडपड,हि सारी उत्क्रांती त्या तत्वाला जाणण्यासाठी आहे जे शिवतत्व आहे. म्हणजे आदितत्व जे आहे ते शिवतत्वच आहे. सदाशिवाचं तत्व आहे.ते सदा असतं. आणि त्यातून हि सर्व तत्वे निघून मानवनिर्मिती झाली. आता मानवानी त्या शिवाला ओळखलं पाहिजे,ज्यानी ही इच्छा केली होती कि ही सृष्टी करावी,त्यात मानव निर्माण करावेत आणि त्या मानवानी परमेश्वराला ओळखावं, त्याची शक्ती वर्णावी आणि त्याच्या शक्तीच्या आनंदात,त्याच्या कार्यात रतं राहावे,त्याचा बोध मानवाला व्हावा हि त्याची इच्छा. ती आज सहजयोगातून घडून आलेली आहे. विष्णू तत्वानी तुम्ही जरी पार झालात,तरी मिळवलं तुम्ही काय तर शिवतत्व. ते शिवतत्व हातातून वाहतय त्याला आपण चैतन्यलहरी असं म्हणतो. हाच योग घडलेला आहे. शिवानी आपली शक्ती जी शिवशक्ती आहे तिला आपण महाकाली शक्ती म्हणतो त्यातलाच थोडासा भाग कुंडलिनी म्हणून प्रत्येक मानवात ठेवलेला आहे आणि ती ह्या साही चक्रातून निघून भेदून परत शिवालाच मिळते,हे असं शिवतत्व आहे. शिव म्हणजे करुणेचा सागर,दयेचा सागर,प्रेमाचा ठेवा. हे सगळं प्रेमतत्व आहे. शिवाला जाणलं म्हणजे सत्य जाणलं आणि तो आनंदसागर आहे. त्याच्यात्न आनंद वाहत असतो. शिवाला प्रसन्न करायचं फार सोपं काम असतं. भोळा आहे तो अगदी. प्रेमाचा भूकेला परमेश्वर आहे तो. फार सोपं काम आहे .त्याची दृष्टी फार वर होत नाही,नेहमी खाली असते. फार डोळे फाकून ते सगळं बघत नाही.त्याच्यामुळे जे रत असतात, त्याच्या चेहऱ्याशी जे रत असतात,तेवढच त्यांना दिसतं. भोळेपणा म्हणजे इतका जास्त आहे कि, राक्षसानी सुद्धा शिवाला प्रसन्न केलं. त्याच्या सेवेला तत्पर.शिवाला नाराज करायचं नाही काही असलं तरी. ही चलाखी ओळखून शिवाला पुष्कळ वेळा प्रसन्न करून घेतलेलं आहे त्यांनी आणि त्याच्या दमावरच मात केलेली आहे किंवा म्हणता येईल किंवा शिवतत्व आपलं त्यांनी थोडंबहुत जागृत करून घेतलं आणि शिवाला प्रसन्न करून घेतलय. तेव्हा काही जरी केलं तरी आपलं अस्तित्व सहजासहजी मिटू शकत नाही असा विचार करून तेंव्हा वाटेल ते करत आहेत. आज तुम्ही आपल्या प्रार्थनेमध्ये त्या शिवतत्वाला हे मागून घ्या कि आता आपले डोळे उघडा,तिसरे डोळे उघडा आणि त्या डोळ्यांनी बघून या सर्व राक्षसांचा नायनाट झालाच पाहिजे.भक्तांना फार त्रास दिलाय ह्यांनी.त्राही त्राही करून ठेवलय आणि आता भक्त त्या दशेला आले आहेत. इथे शिवावर फक्त त्यांचाच अधिकार आहे.अशी प्रार्थना जर तुम्ही शिवाला केली.आज फार मोठा दिवस आहे. तर ते शिवतत्व तुम्हांला फार मोठा आशिर्वाद देणार आहे आणि तो आशीर्वाद जगाला,सर्व संसाराला अत्यंत सुखकर होईल. हा आशीर्वाद मागून घेण्याचा,इच्छा करण्याचा सर्व अधिकार आपल्यालाच आहे. म्हणून हा आशीर्वाद मागून घ्यावा आज. तसच स्वतःच्या शिवतत्वाबद्दलसुद्धा परमेश्वराला आज मागून घेतलं पाहिजे. शिवतत्व म्हणजे आत्म्याचं तत्व आहे.अगदी निर्व्याज्य,निर्लिप्त,सन्यस्त आहे ते. ज्या माणसाचं लक्ष आत्म्यावर असतं त्याची प्रगती फार होते. आतमध्ये स्वतःकडे अंतर्यामात नेहमी आत्म्याची पूजा केली पाहिजे.आत्म्याकडे लक्ष असलं पाहिजे म्हणजे बाह्यातलं लक्ष सुटून जातं. बाह्यातलं सगळं मिथ्या आहे. ब्रह्मतत्त्व हे शिवाच्या अंगातले रोमांच आहेत. तेव्हा शिवाला मिळवण्यापलीकडे काहीही नको.तेच आम्हांला मिळवायचं आहे. तेच आम्हांला जाणायचंय.त्यात आम्हाला रामायचय. त्यातून आम्हाला जगाकडे बघायचय.आत्म्यातून आमची दृष्टी बाहेर गेली पाहिजे. असं स्वतःबद्दल परमेश्वराला मागून घेतलं पाहिजे. म्हणजे हळूहळू बाहेरचे व्याप सुटून तुम्ही तत्वात उतराल.तत्व होऊन जाल. तत्व हे कशालाही बिलगत नाही. ते अलिप्त असतं,निर्व्याज्य असतं आणि मग सबंध आनंदच आनंद. त्या आनंदाला पारावार नाही. त्याच्यासाठी काही बाह्यतनं दाखवायला नको कि आम्ही हे सोडलं,ते सोडलं. आतून सुटत जातं आणि आपलं चित्त त्या शिवतत्वावर पूर्णपणे सामावून जातं.तसं आपल्या सर्वांचं होवो असा आमचा आशीर्वाद आहे आपल्याला.आज अत्यंत नम्रपणे ही शिवपूजा करावी आणि त्यातलं जे फार महत्वाचं आहे. ज्यासाठी हा सबंध सहजयोग उभारलाय,ते मिळवावं आणि ते तुम्हाला मिळेल अशी पूर्ण मला आशा आहे. पहिल्यांदा पावित्र्य हे पाहिजे.पावित्र्य झाल्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती आपल्याला आता कुंडलिनी आहे.कुंडलिनी आताच मी सांगितलं कि सदाशिवांनी आपली शक्ती बसवलेली आहे. ती कुंडलिनी आहे,ती महाकालीशक्ती आहे. महाकाली शक्तीतूनच बाकीच्या नंतर शक्त्या निघतात. तेव्हा पहिल्यांदा महाकाली शक्ती आणि तिचा काहीतरी अंशमात्र म्हणा हि कुंडलिनी शक्ती आहे आणि ती खाली अशी त्रिकोणाकार अस्थीमध्ये आपल्या बसवली आहे.तर ती गौरी स्वरूप आहे म्हणजे पावित्र्य आहे अजून, लग्न झालेलं आहे पण अजून पतीची वाट बघत बसलेली कुंवारीकाच आहे ती.अशारीतीची हि कुंडलिनी आहे आणि त्या कुंडलिनीला तिचं पावित्र्य रक्षण करण्यासाठी म्हणून तिनी गणेश तयार केलेला आहे. आता आपण गौरीचं म्हणजे कन्येचंच आवाहन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता तिला जायचं कोणाच्या मार्गानी तर ते महालक्ष्मीच्या मार्गानी सुषुम्ना मार्गानी जायचय आणि सुषुम्ना मार्गानी ती गेली कि ती सदशिवाचे पाय आहेत,तिथे सदाशिवाला भेटली म्हणजे हृदयामधे असलेलं जे परमेश्वराचं शिवतत्व आहे ते तृप्त होतं, ते संतुष्ट होतं, ते अलोकित होतं, प्रबुद्ध होतं तेव्हाच आपला योग घटित होतो. तेव्हा पहिल्यांदा आता शिवावर पोहोचण्याच्या आधी त्याचा मार्ग आपण आक्रमण केला पाहिजे म्हणून आता महालक्ष्मीचं आवाहन करायला पाहिजे.महालक्ष्मीचं आवाहन झाल्यावरती मग आपण शिवतत्वार येणार आहोत आणि हे कुंडलिनीद्वारा आणि कुंडलिनी हि शिवशक्तीच आहे. हि शिवाची शक्ती आहे म्हणजे ती महाकालीचीच शक्ती आहे आणि ती आपल्या त्रिकोणाकार अस्थीत बसलेली आहे.पण ती शिवशक्ती नंतर महालक्ष्मीच्या याच्यावर आरूढ होवून आणि वर जाते आणि शिवाला मिळते.असा आहे त्याचा प्रकार. म्हणजे नेहमी लक्ष्मीनी पार्वतीची पूजा करावी किंवा शिवानी नेहमी वरदान दिलेलं आहे आणि नेहमी विष्णूनी त्याची पूजा केलीली आहे. तेव्हा शिवतत्व हे किती वरचं आहे ते लक्षात घेतलं पाहिजे.